अपूर्ण बदला ( भाग १९ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग १९ )

संध्याकालची वेळ होती गावात मांत्रिक बोलवला होता. सुरेशच्या घराबाहेर मांत्रिकाने आपले तंत्रमंत्राचे आखाडा सुरु केला सगळीकडे लिंबू मिरची, भुबुत्ती आणि आणि बरोबर आगीचा तांडव आणि सुरु झाला तो मांत्रिकाच्या मंत्रांचा बोलबाला. हरी आणि त्याचे सगळे मित्र हे पारखून बघत होते. समोर काटीला बांधून ठेवलेली कवटी समोर अग्निकुंड आणि बाजूने नुसतीच लिंब आणि त्यांना टोचलेल्या टाचण्या. आजची संध्याकाळ खूप भयंकर होणार आहे हे सर्वानाच जाणून होत. म्हणूंन सगळेच आपापल्या घरात होते, हरीला थोडी भीती जाणवत होती आज तो सैतान पुन्हा येणार आणि तांडव करणार तेवढ्या तिथले वातावरण बदलू लागले. आंब्याच्या झाडाच्या दिशेनं वादळ येऊ लागले आभाळ काळभोर झालं.सगळीकडे जळण्याचा दर्प येऊ लागला. आणि सगळीकडे सुरु झाला तो थरार! सैतानाने त्याची चाहूल दाखवली. मांत्रिकाचे ,मंत्र बोल धरू लागली, अग्निकुंडात लाल काली पिवळी असा बुभुती पडू लागली, त्यातून लाल काळे आगीचे गोळे तयार होऊन बाहेर एखाद्या ज्वालामुखीसारखे वाटत होते. सगळीकडे हसण्याचा आवाज सुरु झाला तसे हरी आणि हरीचे मित्र घाबरले हरीने त्याचा आईला जोरात पकडून ठेवले.

समोरच मान तुटलेली, अंग होरपलेले, डोळे खोलवर गेलेलं आणि बिभूल बाहेर आलेले आतड्या लोंबलेलं आणि सगळीकडे एक घाणेरडा दर्प सुटलेला अशी आकृती समोर आली. तू मला काही करू शकत नाहीस मला कोणीच हरू शकणार नाही. मी माझी शिकार करणार. आज शिकाऱ्याची शिकार पूर्ण होणार. आणि जर शिकाऱ्याच्या शिकारी समोर कोणी आलं तर शिकारी त्यालाही सोडणार नाही. मांत्रिक थोडा भयभीत झालेला त्याने पहिल्यांदाच एवढे भयानक सैतान बघितलेला. तरी त्याने त्याचा प्रयत्न सोडला नाही आज तो त्याला कैद करणार म्हणजे करणारच होता .त्या सैतानाने सुरेश आणि मंगेश ला हेरले ते सुद्धा मांत्रिकाच्या बाजूने बसलेले. त्याने सुरेशला वाऱ्यागत भेरकावुन दिले. तसे मंगेश ने बाजूची मशाल त्या सैतानाला फेकून मारली तोच तो सैतान मागे हटला आणि त्याने मंगेशला हि हवेत फेकले. आत्ता मांत्रिक थोडा घाबरलाच तरी त्याने त्याची मंत्राच्या शक्तीने त्याची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. तू का आलाय वापस? तू तुझा खुनाचा बदला मंगेशच्या बापाला आणि सुरेशच्या बापाला मारून घेतलेलास. तसाही तू त्याच्या मुलाला ही मारलस. मग का आत्ता सगळ्या गावकर्यांना त्रास देतोय? त्यांनी माझ्या मुलाला मारले तसेच मी ह्यांच्या मुलांनाही नाही सोडणार. सैतान घुगऱ्या आवाजात बोलू लागला .मी सगळ्यांना ठार करणार. तसा तो जोर जोरात हसायला लागला आणि त्याने त्या मांत्रिकाला त्या अग्निकुंडात उलटा फेकला आणि तो जागीच जळून खाक झाला.

आत्ता मात्र सुरेश आणि मंगेश ला त्यांचा मृत्यू जवळ दिसत होता. त्या सैतानाने हरीचा वेध घेतलेला मात्र हरी घरात आईच्या कुशीमध्ये जोरात मिठी मारून रडत होता. त्या सैतानाने घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्यातरी अदृश्य शक्तीने तो बाहेर फेकला गेला. त्याला काहीच समजला नाही. हे काय होतंय तेवढ्यात गावातून सगळे लोक मशाली घेऊन आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भयानक संताप होता. सगळे जण ह्याच्या छळाने भरडले होते. कित्येकांचा बळी घेऊन हा बलाढ्य सैतान झालेला. आज काही करून ह्या सैतानाला संपवायचं असा मनात अट्टाहास घेऊन सगळे त्याच्यावर मशालीमार्फत अग्नीचा वर्षाव करायला लागले. त्यामुळे सैतान खूप चवताला समोर येईल त्याला भिरकावत होता मात्र त्याची शक्ती वेशीबाहेर असल्या कारणाने त्याच त्या दैवी शक्ती असलेल्या जागेवर काही चालत नव्हते. म्हणून तो गावाच्या वेशीबाहेर निसटण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याने ते आंब्याचं झाड गाठल, उंच भला मोठा आंब्याचं झाड रात्रिच्या किरणात खूप भयानक वाटत होता. माणसांनी कसलाही विचार न करता त्याचा पाठलाग करत गावाची वेशी पलटली अर्धे गावाच्या वेशीवर येऊन थांबले.

क्रमशः