Julale premache naate - 21 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२१

सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत माझी सकाळ मस्त फ्रेश झाली. लवकर उठुन मी तय्यार होऊन खाली आले.... "कशी आहे तब्बेत प्राजु..? बर वाटतंय ना.?" आईने नाश्ता बनवत विचारलं. मी हाताची तीन बोटं दाखवत छान अस करून दाखवत बाहेर येऊन डायनिंगवर बसले. बाबा पेपर वाचतच बोलले..., "मग परी कस वाटतंय..?? नसेल बर वाटत तर आज नको जाऊस कॉलेजला.." बाबा पेपरमधून डोकं वर काढुन बोलते झाले.... "बाबा आता छान वाटतंय मला. आणि तसही मी आज कॉलेजला नाही जात आहे. मी निशांत ला घेऊन बाहेर जाणार आहे." अस बोलताच बाबांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं. किचनमधुन आईचा ही आवाज आला.. "कुठे जाणार आहात..??"
"अग आई..., काल निशांतने माझी एवढी काळजी घेतली. मला सांभाळून घेतलं मग आपण काही तरी केलं पाहिजे ना त्याच्यासाठी. सो त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे.." मी बाबांकडे बघत डोळा मारत बोलले.... बाबा ही छान हसले. "बाबा मला ते थोडे पैसे हवेत..." मी माझे दात दाखवत हसले. त्यांनी त्यांच्या मोबाईल ने मला पैसे ट्रान्सफर केले. आणि नाश्ता करून बाबा ऑफिससाठी निघून गेले.


अकाऊंट मध्ये पैसे आल्याचा मॅसेज येताच माझ्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आलेली. बाबांनी माझ्या नावाचं अकाऊंट काढलं होत. काय आहे ना स्मार्टफोन आलेत मग आपण ही स्मार्ट झालच पाहिजे अस बाबांच नेहमी बोलन असत. मी स्वतःचा नाश्ता संपवत निशांतला कॉल केला.


रिंग जात होती पण घेत नव्हता. तीन ते चार वेळा करून देखील त्याने कॉल घेतला नाही. त्यामुळे माझा थोडा मुड ऑफ झालेला. तोच मोबाईलवर निशांतच नाव झळकतात लगेच एक मोठी स्माईल चेहऱ्यावर आली.... "बोला मॅडम.., काय काम काढलं माझ्याकडे..??" "कुठे आहेस.??" मी लगेच विचारल. "हा बघ कॉलेजसाठी निघतोय.. तुला पीक करायचं आहे का...??" त्याला वाटलं की, पीक करण्याकरीता मी कॉल केला आहे.


"नाही.., म्हणजे पीक करायला ये.., पण आपण कॉलेजला जाय नाही आहोत." "जायचं नाहीये म्हणजे..?? अग कालच तर आपण सुट्टी घेतली." त्याने प्रश्नार्थक भावनेने विचारल. "हो काल घेतली आणि आज ही घ्यायची आहे. आणि आता काही न विचारता गप्प मला पीक करायला ये. आणि हो येताना तुझा आवडता शर्ट घालून ये. एवढं बोलुन मी कॉल लगेच कट केला. त्याच काही ऐकत बसले असते तर त्याला सगळा प्लॅन कळला असता. मला त्याला सरप्राईज द्यायचं होत म्हणुन सकाळ पासून माझी धडपड चालू होती.मी आज लॉंग व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस घातला. त्यावर टेसलचं वर्क केलेली ओढणी उठुन दिसत होती. हलका मेकअप.. आणि मी तय्यार झाले. बाहेर आले तर आई डायनिंग टेबलावर बसलेली... "काय कुठे निघालीस एवढी तय्यार होऊन.. डेट वर जाते आहेस की काय..??" आई माझी फिरकी घेत होती. "आई ग काही ही असत हा तुझं... तस काही नाही. जरा निशांत सोबत बाहेर जातेय. आल्यावर सांगते आता निघते उशीर झाला आहे." एवढं बोलून मी पटकन निघाले.


लिफ्टमध्ये एकटीच होती की आईचे शब्द आठवले. डेट ला जातेस का.. "काही ही असत या आई-बाबांचं. पण असे कोणते पालक आपल्या मुलांना हसुन विचारत असतील डेट वर जात आहेस.. छान आई-बाबा दिलेस गणु." मी लगेच बाप्पाचे आभार मानले. "आई-बाबांना निशांत आवडत असेल का..??" मनात विचार करत मी खाली पोहोचले.. मेन रोड जवळ निशांत बाईक घेऊन उभा होता. त्याला बघुन तर आज मी फ्लॅट झालेले.., कारण त्याने आज तो सफेद कलरचा शर्ट घातला होता जो आम्ही त्याला गिफ्ट केलेला. त्याचे ते सिल्की केस.., एका हातात मोबाईल तर दुसरा हात हेल्मेट वर ठेवून तो माझीच वाट पाहत होता..."काय गोड दिसतोय हा निशांत.." नकळत माझ्या तोंडातुन शब्द बाहेर पडले. मी स्वतःशी हसतच त्याच्या जवळ पोहोचले.. "किती वेळ हनी-बी..??" त्याने जरा रागातच विचारल. मी त्याच्यासारखी ऍक्टिन करून दाखवली.. तसा तो हसला.. "नौटंकी कुठची.., छान दिसते आहेस." त्याने हसुन सांगितलं. "तु पण हँडसम दिसत आहेस." मी पण लगेच कॉम्प्लेमेंट देऊन टाकली.. "थँक्स..., मॅडम जायचं कुठे आहे आपल्याला." मी फक्त बाईकवर बसले आणि त्याला एक पत्ता दाखवला.. "इथे जायचं आहे आपल्याला. पण त्या आधी आपल्याला केक आणि काही खायला घ्यायचं आहे. आम्ही निघालो आणि एका शॉपमध्ये केक आणि खायला घेतलं.


बाईकवरून आम्ही त्या ठिकाणी जायला निघालो. मजल-दरमजल करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो. बाहेर एक मोठी पाटी होती...,"बालपण". निशांतने बाईक बाजूला लावली.. "काय ग ईकडे कुठे...?" बाजूला येत त्याने विचारलं. "चल ना मागे मागे किती प्रश्न विचारणार आहेस."
आणि आम्ही आत गेलो.आत जाताच सगळ्या लहान मुलांनी माझ्याभोवती घोळका केला... "प्राजु ताई, प्राजु ताई... कशी आहेस तु प्राजु ताई...?" त्यातल्या एका लहान मुलाने मला विचारलं.. "मी छान आहे.., बिट्टू तु कसा आहेस..???" मी त्याला जवळ घेत विचारल. "मी एकदम टकाटक आहे" त्याने आपले इवले हात स्वतःच्या चेहऱ्याजवळ घेत म्हटलं. हे बघून आम्ही छान हसलो. हे सगळं निशांत एका बाजुला उभा राहुन बघत होता.मी त्याला बघतच जवळ बोलावल... "प्राजु दीदी हा कोण दादा..??? तुझ्या बॉयफ्रेंड आहे का.???" मिनूने पुढे येत विचारल. मी तिच्या तोंडावर हात ठेवत तिला गप्प केलं. "मिनू अस काही नाही हा... तो माझा बेस्ट बॉयफ्रेंड आहे." मी निशांतकडे बघत सांगितलं. " मुलांनो हा माझा बेस्ट फ्रिएन्ड निशांत आहे. दादाला हाय करा." तोही सर्वांना भेटला."मला वाटला तो तुझा बॉयफ्रेंड आहे. हा बिट्टू आहे ना तो माझा बॉयफ्रेंड आहे ना" मिनूने बिट्टूच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं. यावर मात्र मला चांगलाच हसु आला. हे सगळं चालू असताना त्यांच्या मॅडम आल्या. "प्रांजल कशा आहात खूप दिवसांनी आलात आश्रमात." तिथल्या मॅडम येत बोलल्या. "आसावरी मॅडम मला तुम्ही अहो जाओ नका करू. मी तुमच्यापेक्षा लहान आहे." मी त्यांच्याकडे बघत बोलले. "मी छान आहे आणि तुम्ही कशा आहात." "मी पण छान, ये आपण केबिनमध्ये बसून बोलूया." अस बोलत त्या निघाल्या. आम्ही ही त्यांच्यामागे निघलो.


"बसा ना.. काय घेणार तुम्ही..?? म्हणजे चहा कॉफी वैगेरे." त्यांनी आम्हाला विचारल असता निशांत बोलला. "मॅडम पाणी मिळेल का.??" ते ऐकताच त्यांनी एकाला बोलावून पाणी आणलं. "आसावरी मॅडम हा माझा मित्र निशांत चिटणीस." मी निशांतची ओळख करून दिली. "बाकी कस चालू आहे सगळं. म्हणजे सगळे शाळेत वैगेरे जातात ना.??" "हो सगळे छान चालू आहे. सरांना आणि मॅडम ला ही भेटायला नक्की बोलवा. सगळे खुप आठवण काढत असतात." त्यांनी आम्हाला बघून स्माईल दिली. "हो नक्कीच... खरतर आज मी बिट्टू चा बर्थडे साजरा करायला आले आहे. आम्ही सोबत केक आणि खायला घेऊन आलो आहोत." मी त्यांना सांगत होते."प्रांजल., सर नेहमी सगळ्या मुलांच्या बर्थडेसाठी वेगळी रक्कम देतात त्यातून आम्ही साजरा करतो. तुम्ही खूपच कष्ट केलेत. पण हरकत नाही आज अजून एका मुलाचा बर्थडे आहे. छान सेलिब्रेशन करूया." अस बोलत मॅडम उठल्या आणि आम्ही ही त्यांच्या मागे निघालो.तिकडच्या हॉलमध्ये त्यांनी आणलेल्या सजवण्याचे समान होते. काही जण ते सजवत होते हे बघून मी देखील त्यांना मदत करायला गेले. माझ्या मागून निशांत ही आला. छान सजवून आम्ही बिट्टू ला आणि राजु नावाच्या मुलाला हॉलमध्ये बोलावले. त्यांच्या समोर केक ठेवण्यात आला. सगळ्यांनी मिळून तो कापला. मग केक सोबत खाऊ वाटप करण्यात ही मी मदत करत होती.


हे सगळं निशांत बाजुला उभा राहून बघत होता. बाजूला आसावरी मॅडम होत्या.. "छान आहेत ना प्रांजल मॅडम..??" त्यांनी समोर बघत निशांतला विचारल. "ह् हो.." त्याने ही उत्तर दिलं. "प्रांजल कधी पासून इकडे येते..??" निशांतने विचारल.... "प्रसाद सर आणि मॅडम यायच्या प्रांजल मॅडम चा बर्थडे साजरा करायला. अगदी त्या लहान असल्यापासून.. सर आणि मॅडम ही खूप छान आहेत. या अनाथ मुलांना ते प्रत्येक बर्थडे, सणाला नेहमी पैसे पाठवतात. त्यांना जमेल तसे भेटुन ही जातात. खुप कमी माणसं असतात नाही अशी" त्यांनी निशांतकडे बघत आपलं बोलणं संपवलं."मी देखील येत गेले तर चालेलं ना..??" निशांतने त्यांना विचारता त्यांनी मानेनेच होकार दिला. मी हातात दोन केकच्या डिश घेऊन आले.. "हे घ्या आसावरी मॅडम," एक डिश त्यांना देत दुसरी निशांतला दिली. आणि निघून गेली. मी त्या लहान मुलांच्या घोळक्यात जाऊन बासले आणि त्यांच्या सोबत केक खाऊ लागले. नंतर छान गाणी लागवून आम्ही डान्स ही केला.. मिनूने निशांतला ही घेतलं आणि मी आसावरी मॅडम ला.. सगळे डान्स करता करता मी आणि निशांत समोरा समोर आलो. आणि सगळे मागे गेले.


"ये आता प्राजु दिदी आणि निशांत दादा कपल डान्स करणार. अस सगळे ओरडू लागले. मी मात्र मागे जाणारच होते की, निशांतने माझा हात धरला आणि जवळ खेचुन घेतलं. एकाने रोमॅंटिक सॉंग ही लावल..


मिले हो तुम हमको बड़े नसीबों से
चुराया है मैं ने क़िस्मत की लकीरों से
मिले हो तुम हमको बड़े नसीबों से
चुराया है मैंने क़िस्मत की लकीरों से

तेरी मोहब्बत से साँसें मिली है
सदा रहना दिल में करीब होके

मिले हो तुम हमको बड़े नसीबों से
चुराया है मैंने क़िस्मत की लकीरों से
मिले हो तुम हमको बड़े नसीबों से
चुराया है मैंने क़िस्मत की लकीरों से

या गाण्यावर आम्ही छान कपल डान्स केला. त्या प्रत्येक ओळीचा अर्थ कळत होता. निशांत आपल्याला खरचं नशिबाने भेटला होता..डान्स च्या वेळी निशांतच जवळ घेणं, त्याचा तो स्पर्श..., त्याच्या बॉडीस्प्रेचा सुगंध वेड लावत होता.
डान्स झाल्यावर शेवटच्या पोज मध्ये आम्ही पाच सहा मिनिटे बघतच राहिलो एकमेकांना... आम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून उभे होतो की, लहान मुलांनी मला खेचून नेलं. मी जरा लाजतच गेले. आणि निशांत ही थोडा लाजला.


त्यांनतर आम्ही सर्वांसोबत गप्पा मारत बसलो. हे सगळं करण्यात वेळ कसा गेला हे देखील कळलं नाही. आम्ही निघालो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजता होते. बाईक वरून आम्ही जवळच असलेल्या एका मंदिरात गेलो. ते एक प्राचीन गणपतीचं मंदिर होत... दर्शनासाठी आम्ही आत गेलो. आत असलेल्या भेटजींच्या हातात ताट दिल आणि आम्ही दोघेही तिथे उभे राहिलो. ते परत करताना आम्ही पट्कन त्यांच्या पाय पडायला वाकलो... आधी निशांत तर नंतर मी असे आम्ही पाया पडत असताना त्यांनी मला आशीर्वाद देऊन टाकला.. "सौभाग्यवती भव.." हे ऐकून मी लगेच उठले आणि निशांतकडे पाहिलं.. तो गालातल्या गालात हसत होता..मी कस तरी हसत त्यांच्या हातातलं ताट घेतलं आणि आम्ही बाहेर आलो. "खूपच हसु येत होतं तुला..?" मी जरा रागातच निशांतकडे पाहिलं. "मग काय ते भडजी काका बोललेच तसे" आणि निशांत अजून हसु लागला. ये बघून मला ही हसु आले आणि आम्ही मिळून हसु लागलो."मग आता कुठे...??" त्याने माझ्याकडे बघत विचारले असता असता मी स्वतःच्या डोक्यावर बोट धरत विचार करतेस असा दाखवू लागले.. "आठवल का.??" त्याने हसुन विचारल. मी मानेनेच नकार दिला. मग त्यानेच बाजूला असलेल्या एका हार विकाणाऱ्याला विचारल... "मित्रा इथे जवळपास काही बघण्यासारखं आहे का.???" त्यामुलाने आम्हाला बघितल आणि तो बोलु लागला... "हो.., उठू पाच मिनिटावर एक नदी आहे.. तुम्हाला बघायची असेल तर जाऊ शकता." स्वतःच्या हातातलं काम चालूच ठेवत तो बोलला.
निशांतने माझ्याकडे बघितल आणि आम्ही जायला निघालो.. बाईक वरून आम्ही लगेच पोहोचलो. बाईक बाजूला लावून आम्ही नदीच्या जवळ जायला निघालो. चालत जाताना समोर दुरवर पसरलेलं नदीच पात्र माझ्या नजरेस पडल.. मी धावत जाऊन तिथे पोहोचले मागून निशांत ओरडत होता..... "अग हळू धडपडतशील...," मी मात्र ते ऐकायला काही इथे नव्हतेच... संध्याकाळ झाल्याने नदीवर सूर्याची किरण चौफेर पसरली होती.. परतीचे पक्षी ग्रुपने घरी परत होते. काही पक्षी तिथेच असलेल्या त्यांच्या घरट्यात येऊन झोपण्याची तय्यारी करताना दिसत होते.. हे सगळं बघून मला मात्र गम्मत वाटत होती..
गावातील काही बायका तिथे पाणी भरत होत्या..ते सगळं बघत असताना अचानक मागून फोटो काढण्याचा आवाज आला. म्हणून मी मागे वळून पाहिलं तर तो निशांत होता. त्याने लगेच स्वतःचा मोबाईल मागे लपवला.. "लपून फोटो काढतोस का..?? समोरून काढ ना.." अस बोलत मी त्याला लगेच पोज देऊन टाकल्या आणि त्याने छान फोटो ही काढले माझे. मग एक सेल्फी.. ज्यात नेहमी सारखा तो माझ्याच कडे बघत होता... मी तर डोक्यावर हात मारून घेतला.. "काय करायच या मुलाचं"


मी त्या थंड पाण्यात स्वतःचे पाय टाकुन बसले. मला बघून निशांतने ही तसाच केलं. काही वेळ बसून आम्ही परतीला निघालो.. "निशांत एका चांगल्या रेस्ट्रोरेंट जवळ गाडी थांबव. मी मागून बोलत होते. आम्ही परत आमच्या इथे जवळ येऊन एका हॉटेलमध्ये गेलो. मस्त डिनर केला. पण बिल मात्र मी पेय केलं कारण आजचा पूर्ण दिवस मला फक्त त्याला आनंद द्यायचा होता. सरते शेवटी गोड म्हणून आईस्क्रिम मागवली.. ती खाऊन मी बिल भरलं आणि आम्ही घरी जायला निघालो....


आमच्या बिल्डिंगमध्ये न येता मेन गेट जवळ आम्ही बोलत उभे राहिलो... "मग कसा गेला दिवस..??" मी हसुन निशांतला विचारल.. "एकदम भारी म्हणजे एवढा छान गेला की, मी ते तुला शब्दात नाही सांगू शकत.. आज कोणी तरी माझ्यासाठी एवढं सगळं केलं." त्याने हसुन माझ्याकडे पाहिलं.. "चला आता उद्या कॉजेल आणि आपली डान्स प्रॅक्टिस.." मी जरा गंभीर चेहरा करत बोलले असता त्याने माझ्या डोक्यात टपली मारली... "मोठी शहाणी.." आणि आम्ही दोघेही हसु लागलो...
पण आमचा आनंद मात्र कोणच्या तरी डोळ्यात खुपत होता.. ती व्यक्ती एका ब्लॅक गाडीतुन आम्हाला बघत होती.. हातातली सिगारेट टाकून ती एक जळजळीत कटाक्ष आमच्यावर टाकून तिथून निघून गेली.. पण आम्ही मात्र आमच्याच बोलण्यात गुंग होतो. आमचं लक्ष ही नव्हतं की कोणी तरी बराच वेळ आम्हचा पाठलाग करत होतं.


"येतोस वर..?" .. " नको आता जातो घरी परत उशीर होईल..." एवढं बोलून निशांत निघून गेला. तो जाईपर्यंत मी त्याला बघत होते... "आज किती हँडसम दिसत होता नाही निशांत... आणि खुश ही." स्वतःशीच पुटपुटत मी घरी आले. आल्यावर आई-बाबांना आज काय काय केलं आणि आश्रमात किती धमाल केली हे सांगितलं. दोघांना हक छान वाटलं. "मी झोपते आहे कारण मी बाहेरून जेवुन आलीये" एवढं बोलून मी रूममधे आले. आत येताच मी फ्रेश होऊन बेडवर पडले होते. थोडावेळ हर्षुसोबत बोलून.. निशांतच्या मॅसेजची वाट पाहू लागले.थोड्या वेळाने मोबाईल ची रिंग वाजली आणि मॅसेज वॉलवर आजचे फोटोस निशांतने पाठवले होते. सोबत पोहोचल्याचा मॅसेज ही होता... ते फोटो बघत आणि आजचा दिवस आठवत मी डोळे बंद केले.. पण सारखा निशांतचा हसरा चेहरा माझ्या नजरे समोर येत होता आणि मी लाजून चुर होत होती...


असाच विचार करता करता मी झोपेच्या अधीन झाले... उद्याच्या भेटीसाठी...to be continued.......


(कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED