Aala Shravan manbhavna - 4 books and stories free download online pdf in Marathi

आला श्रावण मनभावन भाग ४

आला श्रावण मनभावन भाग ४

श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते.

धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते.

ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती ह्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते.

बुध ग्रहाला भाग्याचा म्हणजे नशिबाचा अधिपती असे म्हणतात, म्हणून या बुधग्रहाची भक्ती करावी.
भक्ती किंवा उपासना मनापासून केल्याने अगदी अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य होतात.

चांगले भाग्य येण्यासाठी बुधाची उपासना करावी, आणि कोणतेही चांगले काम सिद्धीस जाण्यासाठी अकरा पांढरे बुधवार करावेत.

बुधवार हा महालक्ष्मीचा वार आहे. अकरा बुधवारी पांढरी फुले वाहून महालक्ष्मीची पूजा केली जाते .
हे अकरा बुधवार श्रावण महिन्या पासुन सुरवात करतात .

ह्या पुजेसाठी स्नान करून सकाळी देवीसमोर तुपाचे निरांजन लावून व नारळ ठेवून बुधस्तोत्र म्हणतात.उदबत्ती पेटवून श्रीलक्ष्मी , बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा आकृती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवतात.

या व्रतात मांस खाऊ नये, मद्य (दारू) पिऊ नये आणि अकरा बुधवारी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.

अकरा बुधवारच्या काळात भांडू नये अगर वाद करू नये.

बुधाची कहाणी दुसर्‍यास सांगावी अगर आपण स्वतः दुसर्‍यास ऐकू जाईल अशी वाचावी.

पांढर्‍या वस्तूचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे दूध, साखर, खडीसाखर अशा प्रकारचा.

बुधवारी शक्य तर मौन पाळावे.

बुधवारी उपवास करावा. त्या दिवशी मीठ व मिरची वर्ज्य करावी. आळणी बुधवार करावा. साबूदाण्याची खीर, केळ्याचे शिकरण खावे. तांदळाचा भात खाऊन उपवास सोडावा.

अकरा बुधवार पुर्ण झाल्यावर बाराव्या बुधवारी ऐपतीप्रमाणे सुवासिनीला भोजन व दक्षिणा द्यावी. आणि या व्रत कथेचे एक-एक पुस्तक द्यावे. मग आपण भोजन करावे. पक्वान्न खिरीचे करावे.

हे व्रत सात वर्षे केले जाते.

ह्या व्रताची कथा अशी सांगितली जाते .
ऐका बुधबृहस्पतीनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होत. तिथ एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या.
त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला येत.
राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत, म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले. सर्वांचे हात रिकामे झाले.
मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितले असते तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वांत धाकटी सून शहाणी होती.तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही,ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही. ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा.

ते म्हणाले, श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पती वारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी, अतिथीचा सत्कार करावा. म्हणजे ईच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करुं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडल.
ब्राह्मण जेवत आहेत.
ती चांदीच्या भांड्यांतून तूप वाढीत आहे.
ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली.
त्यांनी तिची चेष्टा केली.
इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा जिकडे प्रवासाला गेला होता.
त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावयाचे नाही. म्हणून तेथिल लोकांनी काय केलें? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविली.
ज्याच्या गळ्यांत ती हत्तीण माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटवली. हत्तिणीन त्या बाईच्या नवर्‍याच्या गळ्यांत माळ घातली.
मंडळीनीं त्याला हाकलून दिलें. परत हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली.
याप्रमाणे दोनदा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला.
आता तो राजा झाला .
नंतर त्यानेआपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ते अन्न अन्न करुन देशोधडीला लागल्याची बातमी कळली.

मग राजाने काय केले? मोठ्या तलावाचं काम सुरु केलं. हजारो मजूर खपू लागले.
तिथं त्याची माणसं आली. राजाने आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला.
तिनं बुधबृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीगत त्याला सांगितली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्ता केली.
राजानं ही गोष्ट मनांत ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला.
हिच्या हातात चांदीच भांड देऊन तूप वाढावयास सांगितले. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिले.
त्यांचा सन्मान केला. मुलंबाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले.
जशी त्यांच्यावर बुधबृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हाआम्हावर करोत, ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
धाकनेट्या आपल्या पत्नीला, मुलांना आणि भावंडांना ओळखले.
राजपदा वर पतीला पाहून धाकट्या सुनेने ओळखले हा सर्व बुधवार व्रताचा प्रभाव आहे .
धाकट्याला फार आनंद झाला .त्याने सर्वाना त्याच्या जवळ बोलावून घेतले .
त्याचे ऐश्वर्य पाहून सर्व भाऊ थक्क झाले .
मग धाकट्या सुनेने बुधवार व्रताची सर्वाना कथा सांगितली व त्यामुळेच हे दिवस दिसले असे सांगितले .
मग ते सारे तिथेच पुन्हा वैभवात आनंदाने राहू लागले.

धनसंपत्ती आणि बुद्धिमत्ता मिळावी म्हणून हे व्रत केले जाते.

श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल त्यांनी ते करावे.

शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात त्यांचे आशीर्वाद घ्यावेत .

धार्मिक शिक्षकदिनच म्हणला जाईल .

ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल त्यांनी ते करावे. शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. निदान एखादे फूल, एखादे पुस्तक द्यावे .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED