जुळले प्रेमाचे नाते - भाग-२५ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२५

दहा-पंधरा मिनिटांनी मी तिला कॉल केला आणि विश केलं.... "हॅपी बर्थडे टू यु माय डिअर हर्षु..." "थँक्स प्राजु..., मला माहित होत की, तु कॉल करशील म्हणून बाजूलाच ठेवला होता मोबाईल. जस्ट केक कापला. भाई घेऊन आला होता." तिची अखंड बडबड चालू होती. मग निमंत्रण देऊन तिने कॉल ठेवला. तशी मी झोपेच्या अधीन झाले. एवढी झोप जी आज आली होती.



सकाळच्या अलार्मने माझी झोपमोड केली... "चांगल्या स्वप्नांच्या वेळी हा अलार्म बरा वाजतो.." स्वतःशीच बडबडत मी फ्रेश होण्यासाठी गेले. आज मी आणि निशांत लवकरच कॉलेजमधुन निघणार होतो. बर्थडे हा लोणावळ्यात होणार होता. त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागणार होतं. मी तय्यारी करून कॉलेजमध्ये गेले. "काय आहेस कुठे...??" मी समोरून आलेल्या निशांतला विचारलं.... "काय ग., काय झालं.?? असे का प्रश्न विचारत आहेस.??" "काल पासुन मॅसेज नाही सकाळी ही रिप्लाय दिला नाहीस. ठीक आहे ना सगळं निशांत..?? आजी-आजोबा???" मी काळजीने त्याला विचारले.



"अग..,आजी-आजोबा एकदम मस्त आहेत. आणि काल मी तुझ्या साठीचा ड्रेस बनवुन घेण्यासाठी माझ्या एका मित्राच्या ओळखीतल्या माणसाकडे गेलो होतो. त्यात माझ्या मोबाईल ची बॅटरी संपली. घरी आल्यावर झोप आलेली आणि झोपलो त्यामुळे वेळच नाही मिळाला चार्जिंग करायला.



आताही पॉवर-बँक ने चार्जिंग करतो आहे." तो मोबाईल बॅगे मधून काढून दाखवत बोलला. मी देखील पुढे काही न बोलता कॅन्टीनमध्ये भेटु एवढं बोलून स्वतःच्या क्लासमध्ये निघून गेले. आज लेक्चर्स अर्धेच संपवुन मी कॅन्टीनमध्ये आले तर निशांत बसला होता वडा-सांबर खात. मी जाऊन त्याच्या समोर बसले..



आणि त्याच्या डिश मधल्या त्या वड्या-सांबर चा शेवटचा घास मी माझ्या तोंडात घातला.. " अब हिसाब बरा बर हुआ." मी तोंडातल्या घासासोबत डायलॉग मारला. हे ऐकून त्याला हसु आवरलं नाही.. "काय ग हनी-बी तु पण ना...लहान मुलांसारखी वागतेस कधी कधी.." माझ्या डोक्यात टपली मारत तो बोलला असता.



मी माझं नाक मुरडून दाखवलं. "असुदे तरीही हिशोब बरोबर केला." हे ऐकून तर त्याने माझ्यासमोर हातचं जोडले.. "बर बाई.." हे ऐकून मी पण त्याला लगेच उत्तर दिलं.. "बर आजोबा.." यावर आम्हा दोघांना हसु आल आणि आम्ही पोट धरून हसु लागलो.


"मग मॅडम निघायचं का.??" हसत त्याने विचारल असता. मी स्वतःची बॅग घेऊन निघाले. त्यानेच मला घरी सोडलं.. आणि घ्यायला येतो बोलून स्वतःच्या घरी निघून गेला.. चेहऱ्यावर फेसपॅक लावून मी बाहेर येऊन बसले असता कोणी तरी बेल वाजवली.... मी दरवाजा काही उघडायला गेले नाही.. नाही तर आलेली व्यक्ती मलाच बघुन मागच्या मागे पाळायची. म्हणुन आईनेच दार उघडलं. तर समोर निशांत होता..




तो दरवाज्यातच आईच्या पाया पडला आणि आत आला. हे बघून मी लगेच हाताची तीन बोड वर करून दाखवली असता तो मला बघून अशी एक क्षण घाबरला आणि नंतर जो हसत सुटला... एवढा की, मी कंटाळुन फ्रेश होण्यासाठी निघुन गेले. फ्रेश वाटावं म्हणुन परत एकदा छान बाथ घेतला..



बाहेर आले तर हिरो जेवत करत बसला होता.. चार वाजता हा माणूस खात होता. "काय बोलणार आता.." मी येऊन त्याच्या बाजुला बसले. "काय मग कपडे हेच का.??"
मी बाजुला बसत विचारले... "नाही ग आणले आहेत. एक तर त्या हर्षल ने मला कॉल करून आजची थीम सांगितली. जाऊन घेऊन आलो मग जे मिळालं ते.." समोरच्या ताटातील घास खात निशांत बोलला. "ओके एक काम कर आई-बाबांच्या रूमध्ये तु तय्यार हो मी माझ्या होते.. म्हणजे लवकर होईल आणि आपल्याला निघायला वेळ लागणार नाही." अस बोलताच त्याने माझ्याकडे पाहिलं... "काय झालं..? असा का बघत आहेस ??" मी स्वतःचे डोळे जरा मोठे करत विचारले.




To be continued......