Addiction - 12 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 12
तारीख 3 जून ..तिने गिफ्ट दिलेला पांढरा शर्ट परिधान करून मी अगदी सकाळी - सकाळीच तिच्या घरी पोहोचलो ..सकाळची वेळ असल्याने ती झोपूनच असेल याची खात्री होती आणि झालं देखील तसच ..मी कितीतरी वेळेपासून दरवाजावर बेल वाजवत होतो पण ती होती की दरवाजा काही खोलेना ..काहीच क्षणात दरवाजा खोलल्या गेला आणि आळस देतच ती म्हणाली , " काय आहे राव !!! किती वेळ आणखी बेल वाजवणार ..सुखाने झोपू पण देत नाही लोक .."

तिने माझ्याकडे पाहिलं देखील नाही आणि बोलू लागली आणि मला हसू आवरेना कारण मॅडम आज अगदी भूतनिसारख्या दिसत होत्या ..मी जोराने हसू लागताच तीच माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती भानावर येत म्हणाली , " तू आहेस होय आणि आज सकाळी - सकाळी इकडे कसा काय ? "

आणि मी तिच्याकडे पाहत म्हणालो , " तुमच्याकडे काही प्रथा आहे का बाहेरूनच विचारपूस करण्याची .."

" सॉरी !! ये आत ये " , ती म्हणाली

मग मी आत गेलो ..

" आता तरी सांग इकडे कसा काय ? " , ती म्हणाली आणि मी त्यावर उत्तरलो , " थोडं सरप्राइज आहे ..आपल्याला बाहेर जायचं आहे आता सो जा लवकर तयार हो ..आपल्याला लवकर निघावं लागेल .."

आणि ती आळस देत म्हणाली , " ए नाही यार एवढ्या सकाळी नको कुठेच "

पण माझ्या हट्टासमोर आज तीच काहीच चालणार नव्हतं आणि ती फ्रेश व्हायला गेली .." प्रेम पण मला वेळ लागेल सो तू कॉफी घेणार आहेस का ?..थाम्ब मी लगेच बनवते .." आणि मी त्यावर म्हणालो , " त्याची काळजी नको करू ..मी करतो तू फक्त लवकर तयारी कर ..आणि बर एक ना !! आज आपण जिथे जाणार आहोत तिथे तुला वेस्टर्न कपडे परिधान करून जाता येणार नाहीत सो प्लिज काहीतरी साधं लाव .. " आणि ती पलटून म्हणाली , " प्रेम सॉरी यार पण माझ्याकडे नाहीये यार तसे कपडे ..एकच होता तो पण खराब आहे .."

मी यापुढे काहीच बोललो नाही आणि ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली ..काहीच क्षणात ती बाहेर आली आणि आरशासमोर उभी झाली ..ती कपडे परिधान करायला काढणार तेवढ्यातच मी तिच्यासमोर गुलाबी साडी धरली आणि ती म्हणाली , " ए नको ना रे प्रेम .. मला सावरायला खूप त्रास जातो आणि मला साडी नेसता पण येत नाही .."

आणि मी लगेच हसत म्हणालो , " बस एवढंच तर अरे युट्युब वर बघुयात की .."

तिला आता जाणवलं की आपल्यासमोर कुठलाच पर्याय नाही आणि ती साडी नेसायला तयार झाली ..ती हातात साडी पकडून होती आणि मी साडीला चिण्या पाडू लागलो ..हळूच तिच्या कंबरेवरून हात फिरावा आणि क्षणात जादू व्हावी ..मलाही ती जादू जाणवत होती तर तीच काहीच सांगायला नको होतं ..तरीही मी स्वताला साडी नेसण्यात व्यस्त करून घेतलं ..चिण्या नेसून झाल्या आणि हळूहळू साडीचा पदर स्तनांवरून वर घेऊ लागलो आणि अचानक तिच्या स्तनाना स्पर्श झाला आणि ती मोहरून उठली ..,आरशात मला सर्वच दिसत होत ..कदाचित तिला अस वाटत होतं की मी तिला त्याक्षणी उचलून घ्यावं ..पण मी काहीच रिएकट करत नाही हे पाहून ती थोडी निराश झाली होती ..साडी आता नेसवून झाली होती ..आणि पुढची तयारी करण्यासाठी मी तिला बेडरूममध्ये एकट सोडलं ..काहीच क्षणात तिची तयारी पूर्ण झाली आणि मी आतमध्ये गेलो ..आज ती फार म्हणजे फारच सुंदर दिसत होती ..तिने छान केस बांधून घेतले होते , पायात पैंजण आणि हलकासा मेकअप आणि आधीच गोरा वर्ण त्यामुळे ती फार खुलून दिसत होती ..मी आतमध्ये गेलो आणि ती मला विचारू लागली , " कशी दिसते आहे मी .." आणि मी तिच्याकडे पाहू लागलो ..ती आताही तशीच बसून होती आणि मी हळूच तिने केसाला लावलेला चिमटा काढला आणि तिचे केस वाऱ्याने भुरभुर उडू लागले ..आणि माझ्या गळ्यात असलेली एक साधी चैन तिच्या गळ्यात टाकली ..आणि म्हणालो ..आता दिसत आहेस परफेक्ट .."

तिने पुन्हा एकदा स्वताला आरशात पाहिलं आणि म्हणाली , " प्रेम खरच आयुष्यात मी इतकी सुंदर कधीच दिसले नाही ..मानना पडेगा बॉस आपको ..आणि धन्यवाद सर मला इतकं सुंदर सजवायला ...पण सर आता तरी सांगा आपण जातोय कुठे .? "

आणि मी पुन्हा एकदा शांत झालो ..तिला समजलं की मी तिला काहीच सांगणार नाही ..शेवटी डोर लॉक करून आम्ही बाहेर निघालो ..पार्किंगमध्ये जागा नसल्याने मी आज दूरवरच गाडी पार्क केली होती ..त्यामुळे तिथपर्यंत पायीच जावं लागणार होतं ..ती मला वारंवार कुठे जाणार असल्याचं विचारत होती आणि मी मात्र शांतच होतो ..मी काहीच बोलत नाही म्हणून ती थोडी रुसली होती पण तो रुसवा चेहराही आज फारच खुलून दिसत होता .मला नेमका त्याचवेळी कॉल आल्याने मी फोनवर बिजी झालो ..ती आपले मोकळे केस हातानी कानामागे करत होती ..बहुदा तिला वाटत होतं की मी त्याक्षणी तिला पाहावं पण तस काहीच होत नव्हतं आणि मी तिच्याही नकळत तिच्या त्या सुंदर वर्णाकडे लक्ष देऊन होतो फक्त ते तिला जाणवू दिलं नाही ..जी बारकी पोर कधीतरी काय आयटम दिसते आहे असं म्हणायची आज तीच मूल ताई तू खूप सुंदर दिसत आहेस अस म्हणत होती ..येणारा - जाणारा प्रत्येक पुरुष तिच्याकडे पाहत होता आणि ती बिचारी लाजून मान खाली घालुन चालू लागली ..मी ही सर्व मज्जा शांतपणे बघत होतो ..शेवटी आम्ही गाडीजवळ पोहोचलो ..आणि लगेच आम्ही गाडीत बसून कुठेतरी बाहेर निघालो ..

गाडी भर वेगाने धावत होती आणि ती एकच प्रश्न मला वारंवार विचारत होती..मीही आता तिच्याकडे दुर्लक्ष करू लागलो ..काहीच क्षणात कार किलबिल अनाथआलयासमोर थांबली ..तिला आपण इथे का आलो आहे याबद्दल बरेच प्रश्न पडले होते ..आम्ही गाडीतून बाहेर आलो आणि माझी लाडकी मोहिनी आली ..ती फक्त 2 वर्षाची होती ..मी जेव्हा - केव्हाही आश्रमात जायचो तेव्हा संपूर्ण वेळ तिच्यासोबतच असायचो ..ती आली आणि मी तिला उचलून घेतलं ..तिने मला एक गोड पापी दिली ..मोहिनी श्रेयसीला पाहून फार खुश झाली होती ..श्रेयसीने तिला घेण्यासाठी प्रयत्न न करताच ती तिच्याकडे जायला हात समोर करू लागली ..मी हे सर्व कुतूहलाने पाहू लागलो होतो ..आणि ती माझ्या हातून लगेच तिच्याकडे गेली ..मी आताही श्रेयसिकडेच पाहत होतो आणि श्रेयसी म्हणाली , " काय पाहतो आहेस रे ? " आणि त्यावर मी उत्तरलो , " कस आहे ना ही फक्त आम्हा तिघांकडेच येते तेव्हा ही पहिल्याच भेटीत तुझ्याकडे कशी काय आली याचाच विचार करतोय ." आणि ती माझीच खेचत म्हणाली , " मग मी आहेच स्पेशल "

तिच्या अशा बोलण्यावर आम्ही दोघेही हसू लागलो आणि काहीच क्षणात आतमध्ये पोहोचलो ..कुमुद काकू आमची वाट पाहतच होत्या ..काकू म्हणजे त्या आश्रमाच्या संस्थापिका ..त्यांना मूल नव्हतं म्हणून त्यांनी हे आश्रम सुरू केलं होतं ..मी गेल्या - गेलीच त्यांचे चरण स्पर्श केले आणि त्या म्हणाल्या , " वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा ..तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते .."

काकूंचे शब्द कानावर पडले आणि श्रेयसीच्या डोक्यात लाईट पेटला ..तिथे मला जवळपास सर्वच ओळखत होते ..काही क्षणात सर्वांनीच मला विश केलं ..ती मात्र माझ्याकडे रागाने पाहत होती ..तिथल्या छोट्या - छोट्या मुलांशी माझा अगदी जवळचा परिचय झाला होता ..मी त्यांच्यासाठी काही कपडे आणले होते ..त्यामुळे लगेच डिकीतून आणून त्यांना ते दिले ..तेही फार आनंदाने कपडे परिधान करून बाहेर आले ..काकूने माझ्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती ..मी आधी काकूंना श्रेयसीशी ओळख करून दिली ..तिने देखील त्यांना वाकून नमस्कार केला ..मी आज कितीतरी दिवसांनी मनभरून जगत होतो .काकूने आणलेला केक मी सर्वांच्या समवेत कापला आणि मी केक सर्वाना भरवु लागलो ..माझ्या वाढदिवसाला माझे छोटे मित्र फारच खुश होते आणि माझ्या अवती - भोवती फिरू लागले ..मी देखील लहान बनून त्यांच्यासोबत खेळू लागलो ..मला अस जगण्यात फारच मज्जा यायची ..

काकूने त्यादिवशीच जेवण तिथेच ठेवलं होतं त्यामुळे जेवण वाढायला आणण्याकरिता आतमध्ये गेल्या ..त्यांच्या मागेच श्रेयसी आत गेली ..बाकी आम्ही सर्वच खेळण्यात व्यस्त होतो ..तिकडे मात्र काकू - श्रेयसीच्या गप्पा रंगात आल्या होत्या ..श्रेयसी काम करीत असताना काकूने नकळत तिला प्रश्न विचारला , " श्रेयसी तू त्याच्यावर प्रेम करतेस ना ? "

आणि बिचारी काही क्षणांसाठी गोंधळली ..ती काहीच बोलायला तयार नव्हती पण तिचा चेहरा सर्व काही बोलत होता .."

काकू पुन्हा म्हणाल्या , " बेटा आज न तू खूप सुंदर दिसते आहेस आणि मनातलं सांगू तर माझ्या प्रेमला फक्त तूच शोभुन दिसशील ...तसा तो फार हळवा आहे ..कुणाशी जास्त बोलत देखील नाही म्हणूनच त्याची जास्त काळजी वाटते ..म्हणून बेटा तू सांभाळ हा त्याला .."

श्रेयसीला आता फारच लाजायला होत होत म्हणून ती विषय बद्दलवत म्हणाली , " काकू तुम्ही प्रेमला कस ओळखता ? " , आणि काकू उत्तरली , " दोन वर्षाआधी तो इथे आला होता ..पैसे दान करायला ..त्यावेळी मोहिनी आमच्या घरी आली होती ..तिला कुणीतरी रोडवरच सोडून गेल होत आणि आमच्या एका सहकार्याने तिला इथे आणलं ..सर्वांनी प्रयत्न केले तरी ती रडायचं थांबेना शेवटी प्रेमने तिला उचलून धरलं आणि बिचारी शांत झाली ..तेव्हा पहिल्यांदा मी त्याला पाहिलं आणि तेव्हापासूनच ओळखू लागले ..तो वेळ मिळेल तेव्हा आश्रमात यायचा आणि आला की पैसे नक्कीच घेऊन यायचा ..मग हळूहळू त्याच्याशी ओळखी वाढू लागली आणि तो आज या छोट्याश्या जगाचा एक भाग झाला ..मी लग्न केलं नाही त्यामुळे तोच माझा मुलगा झाला ..फारच गुणी मुलगा ..आता दर आठवडयाला येतो आणि माझे सर्व कामे करतो ..पैशासाठी तो सदैव तत्पर असतो ..असा आहे माझा प्रेम ..अगदी मनमिळावू सर्वाना आपलंसं करणारा .."

यांच्यात बोलणं संपत नव्हतं आणि आम्हाला इकडे भूक लागली होती त्यामुळे आणखीनच ताट वाजवू लागलो ..आमचा आवाज ऐकून ते दोघेही बाहेर आले ..काकूने मला आवडनारे सर्वच पदार्थ बनविले होते ..त्यामुळे काकूंच्या हातच मी मनभरून खात होतो ..माझ्यासोबत आज मोहिनी बसली होती त्यामुळे तिला भरवायच कामसुद्धा मीच करीत होतो ..काहीच वेळात आमचं जेवण आटोपलं ..त्या लहान - लहान पिल्लांसोबत खेळताना मला आज फारच बर वाटत होतं ..त्यांच्याशी खेळताना सांज कधी झाली तेसुद्धा कळलं नाही त्यामुळे आता परत निघन गरजेचं होत आणि काकूंचा आशीर्वाद घेऊन मी पुन्हा एकदा परतीला निघालो ..

श्रेयसीच्या चेहऱ्यावरचा आनंद आज पाहण्याजोगे होता ..ती गाडीत येताना फारच बोलत होती ..त्यातही मोहिनीच नाव तिने कित्येकदा घेतलं होतं ..आणि बोलता - बोलता म्हणाली , " धन्यवाद प्रेम इतकं सुंदर सरप्राइज दिल्याबद्दल ..हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे ..आधी नाराज होते तुझ्यावर पण आता ती नाराजी कुठेतरी दूर पळाली आहे ..पुन्हा एकदा धन्यवाद हा क्षण दिल्याबद्दल आणि हो तू मला सांगितलं का नाहीस तुझा वाढदिवस आहे असं ? "

आणि मी हसत म्हणालो ," सांगितलं असत तर सरप्राइज कस मिळालं असत ..म्हणून नाही सांगितलं "

" बर झालं मग नाही सांगितलं तर ..आणि हो बर का वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला .."

मी तिच्या त्या शुभेच्छा स्वीकार केल्या ..काही क्षणातच तीच घर आलं ..मी तिला ड्रॉप करून माझ्या घरी पोहोचलो होतो ..आजचा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वाढदिवस होता आणि त्याच आठवणी सोबत घेऊन मी शांतपणे झोपी गेलो ...

क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED