जुळले प्रेमाचे नाते - भाग-३१ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३१

"कॉजेल नंतर माझ्या घरी प्रॅक्टिस. आई.., चालेल ना तुम्हाला. मी प्रांजल ला सोडयला येत जाईल." निशांत आईची परवानगी घेत होता. "हो चालेल, तु आहेस तर कसली काळजी नाही बघ मला निशांत." आई ने छान हसुन सांगितलं.



मग थोडं बोलून निशांत निघाला. खरतर आई त्याला जेवायला थांबवत होती. पण घरी आजी-आजोबांची काळजी वाटत होती म्हणून तो निघाला. मी त्याला सोडायला म्हणुन खाली जाते सांगून त्याच्या सोबत आले. हेल्मेट आणि त्याचे कपडे घेऊन आम्ही निघालो.



लिफ्टमध्ये दोघंच..., कोणीच कोणाशी बोलत नव्हतं की, अचानक निशांतने माझा हात घट्ट ठरला. त्याच्या अशा करण्याने माझे तर हार्ट बीटच वाढले. मी हात सोडायचा प्रयत्न करत होते पण कसल काय.. त्याच्या हातातुन सुटन काही मला जमल नाही.



जसे आम्ही खाली पोहोचलो समोर बाबा उभे. हे बघून तर मी अर्धीमेली झालेली. निशांत ही घाबरला आणि लगेच माझा हात सोडला. नशीब बाबांनी पाहिलं नाही. "अरे आलात तुम्ही...? कसा झाला बर्थडे.???" बाबा निशांत शि बोलत होते. मी तर गप्प बाजूला उभी. कारण अजून ही माझ्या पोटात आलेला गोळा काही शांत झाला नव्हता.



थोडफार बोलून बाबा घरी गेले. मग निशांतने स्वतःची बाईक काढली आणि जाण्यासाठी निघाला. तो जात होता तर मलाच कस तरी वाटू लागलं होतं. ते नाही का वाटत जवळची व्यक्ती दूर जाताना फील होत तसच काहीसं.. त्याच्याही डोळ्यात दूर होण्याचे भाव स्पष्ट दिसत होते.. जरा नाजरीनेच आम्ही एकमेकांना बाय केलं आणि उद्या कॉलेजमध्ये भेटु ठरवून निशांत निघून गेला. मी त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे काही वेळ तशीच बघत राहिले... स्वतःशीच हसत लिफ्टमधला तो क्षण आठवला... परत एकदा पोटामध्ये असंख्य फुलपाखरे उडवीत तस झालं..



"हीच तर ती भावना होती जी आपलं त्याला बघुन फील करणार होतो.. म्हणजे आपल्याला आपला लाईफ पार्टनर मिळाला.. म्हणजे निशांतच तो आहे.." स्वतःशीच बडबडत मी वर आले. थोडं बाबांशी बोलून आम्ही जेवलो.


रूममधे जाताच मोबाईल चेक केला. निशांतचे घरी पाहोचण्याचे मॅसेज होते.., पण सोबत आज एक वेगळा मॅसेज ही होता तो होता.. "आय लव्ह यु" चा. तो मॅसेज वाचुन गालावर हसु उमटलं. "करु का रिप्लाय... नाही नको.. जाऊदे करते. आता आपण ही प्रेम करत आहोत तर देऊया रिप्लाय." अस स्वतःशीच बोलून मी त्याला त्याच्या त्या मॅसेज चा रिप्लाय दिला आणि लगेच मोबाईल बाजूला ठेवून दिला.



"पहिलं प्रेम..., त्या पहिल्या प्रेमाच्या नवीन भावना आंनद देत होत्या.. पोटाय असंख्य फुलपाखरे उडत होती. मनात रोमँटिक सोंग्स घोळत होती. गुलाबी झालेलं सगळं काही.. खरच प्रेमात एवढी ताकत असते की, जग नव्याने कळत. प्रेम ही भावनाच वेगळी आहे नाही...! प्रत्येकाने ती अनुभवली पाहिजे..



नेहमी आनंद देणारी. त्या पहिल्या पावसाच्या सरी सारखी. अंगावर शहारा आणणारी.. अस हे पहिल प्रेम.. मी डोळे बंद करून सगळं आठवत होते. मनात हसत होते. देवाचे आभार किती मानू आणि किती नको असं झालेलं.




प्रेम हे जगातल सर्वांत सुंदर गोष्ट आहे. ती भावना प्रत्येकाच आयुष्य बदलून टाकतं. देवाचे आभार मानून मी निद्रेच्या हवाली झाले.. कारण उद्या हर्षु ला फेस जे करायच होत.



आज जरा घाबरतच मी क्लासरूम मध्ये आले. सगळेजण स्वतःची मस्ती करण्यात गुंग होते. आमच्या रोजच्या बेंचवर हर्षु नव्हती. कदाचित ती आली नसावी. मी आजूबाजूला पाहिलं... कदाचित रागावून दुसरीकडे बसली असेल. पण खरंच ती नव्हती आली. तिला कॉल केला पण ती काही घेत नव्हती. फक्त रिंग जात होती. मग एक सॉरी चा मॅसेज टाकून मी बसले स्वतःचा अभ्यास करत. हे सगळं चालू असताना हर्षु क्लासरूम मध्ये एंटर झाली. तिचा चेहरा कोमेजला होता.



परवाच्या दिवसाचा प्रसंग परत एकदा डोळ्यासमोर येऊन गेला. तिचा तो रडका, डोळ्यात नसलेले भाव बघून मी काहीच बोलु शकली नाही. ती माझ्या बाजूला येऊन बसली. पण माझी हिम्मत होत नव्हती तिच्याशी बोलण्याची. त्यांनंतर लेक्चर्स सुरू झाले. पण पूर्ण लेक्चर्समध्ये हर्षु काही नव्हतीच. तिचं काही लक्ष नव्हत. ती होती शरीराने, पण मन मात्र दुसरीचकडे होत. ती एवढी गुंतली होती की, रिसेस झाली हे देखील तिला कळलं नाही. मग मीच तिला हलवुन उठवलं.., " हर्षु...तु ठीक आहेस ना.??" माझ्या या प्रश्नाला तिने एकदा माझ्याकदे पाहिलं आणि एकदा समोर.



काही ही न बोलता स्वतःची बॅग घेऊन ती क्लास बाहेर निघाली. मी देखील स्वतःची बॅग घेत तिच्या मागे गेले. मी काही तरी बोलायच म्हणून तिला थांबवलं आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. "हर्षु..., मला माहित आहे की, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे. पण खरच मला म्हाहित नव्हतं निशांतच्या मनात मी असेल हे." मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण तीच लक्ष काही नव्हतच... "माफ कर मला हर्षु. पण खरंच माझं ही निशांत वर प्रेम आहे." एवढं बोलून मी स्वतःची मान खाली घालून उभी राहिली. हे बघून ती माझ्या जवळ आली.



जवळ येऊन तिने एक कानाखाली माझ्या लगावली. हे अचानक झाल्याने सर्वजण बघवत राहिले. मी सुद्धा स्वतःच्या कानाखाली हात पकडून उभी. नकळत डोळ्यातल्या पाण्याने कडा भरल्या गेल्या. ती पुढे बोलु लागली..


"प्रांजल.., तुला मी आधीच बजावलं होत की, माझ्या निशांत पासून दूर राहायचं. पण नाही तु नाही राहिलीस. आता त्याने तुला प्रपोज केल, तर लगेच तुझं ही प्रेम झालं. अग खोटेपणा किती करशील. तुला कीती पैसा हवा ते सांग. मी देते तुला. पण माझ्या निशांतला सोड.. नाही तर तुला हे जग सोडून जावं लागेल..लक्षात ठेव" एवढं बोलून ती निघून गेली.



हे सगळं मी कानाखाली हात धरून तिथेच उभी होती... मागून कोणी तरी खांद्यावर हात ठेवला. तो राज होता. त्यानेच मला कॅन्टीनमध्ये नेलं आणि पाणी प्यायला दिल. "सॉरी प्रांजल, मला माहित आहे की, आज हर्षुने तुझ्या कानाखाली लगावली. मी माफी मागतो तिच्याकडून. पण काय आहे ना तीच खूप प्रेम आहे ग निशांत वर म्हणुन तिने अस केलं. तो मला समजावत होता.


पण मला ऐकू येत होते ते तिचे शब्द.... तु निशांतला सोड नाही तर...., तुला हे जग सोडून जावं लागेलं.....



(कथेचा हा पार्ट कसा वाटला नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)



स्टेय ट्यूट अँड हॅपी रीडिंग गाईज.

To be continued.....