तोच चंद्रमा.. - 16 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

तोच चंद्रमा.. - 16

१६

पुन्हा पुन्हा ब्रुनी!

आता गोष्ट बरीच पुढे सरकली होती. विशेषतः ब्रुनी घरी आली न आमचे जे नेत्रकटाक्ष एक्सचेंज झाले त्यामुळे तर आम्ही अजून जवळ आल्यासारखे मनातून वाटत होते मला, काहीही न बोलता. तिलाही ते तसे वाटले हे मला नंतर कळाले. म्हणजे राॅबिन म्हणतो तशी आग दोन्ही बाजूंनी लागलीय तर..

ब्रुनी अाणि ते टायटॅनियन्स निघून गेले त्या दिवशी. पुढे दोन तीन दिवस असेच गेले. ब्रुनी बिझी असावी. मला पण अाॅफिसच्या रूक्ष हिशेबांत हे दिलाचे हिशेब मांडायला वेळ नाही मिळाला. मग एके दिवशी दुपारी वेळ मिळाला मला. आजवर ब्रुनीच इकडे येत होती मला भेटायला. आता माझी पाळी .. मीच देईन टाळी!

तिच्या आॅफिसात पोहोचलो मी. फोन न करताच. म्हटले सरप्राईज द्यावे .. तर ती माझ्याच आॅफिसात गेल्याचे कळले! दोघांनी एकमेकांना एकाचवेळी एकच सरप्राईज द्यावे? व्हाॅट अ कोइन्सिडन्स! मी फोन लावला तिला.. म्हणालो,

"डिअर, वेट इन माय आॅफिस.. आयॅम कमिंग!" मी तुझ्याच आॅफिसात गेलोय हा तपशील टाळत!

ब्रुनी माझ्या केबिनमध्ये बसलेली. तशीच सुंदर दिसत होती ती. माझ्या छातीतली धडधड अचानक वाढली तिला पाहून ..

"जस्ट रीच्ड डिअर?"

"हो. खूप दिवसांत .. मी म्हणाले ना, तू आला नाहीस तर मला यावेच लागते ना ..?"

हीच ती वेळ तिला सांगायला हवे मी पण तिला भेटायलाच गेलेलो.. पण नाही सांगितले मी. मूळ स्वभाव कसा बदलणार?

"कशी आहेस?"

"मी मस्त. बिझी होते. आमची टायटॅनियन टीम गेली कालच परत. म्हणून आज मोकळी झाले. आणि आय वाॅज इगर टू मीट यू."

"यस.. मी टू. पण म्हटले तू बिझी असणार."

"अरे, त्या दिवशी बोलता नाही आले आपल्याला.. जेवण फारच सुंदर .. अप्रतिम!"

"हो ना! माझी आई जेवण बनवतेच तसे. बोटे चाखतात खाणारे."

"आय वुड लाइक टू लर्न फ्राॅम हर.. व्हाॅट कुकिंग! वाॅव!"

"शिकवेल ती तुला.. घरी आलीस की!"

माझ्या मते मी तिला खूपच मोठी हिंट दिली!

"अरे, आमचे टायटॅनियन एवढे खूश झाले सांगू. अँड युवर पेरेंट्स आर सो नाइस.."

"थ्यांक्स.."

"नो वंडर.."

"काय?"

"काही नाही .."

"बोल ना.."

"आय मीन नो वंडर यू आर आॅल्सो सो नाइस.."

मी दीर्घ श्वास घेतला एक.. आणि तिच्या डोळ्यांत पाहात म्हणालो, "ब्रुनी माय मदर लाइक्ड यू सो मच! आजकाल पृथ्वीवर अशा मुली दिसत नाहीत जास्त .."

"अशा म्हणजे?"

"ब्युटी विथ ब्रेन अँड वेल नेचर्ड अँड.. आय रन आऊट अाॅफ अॅडजेक्टिव्हस् डिअर.."

"ओह!" ती लाजत म्हणाली .."अॅक्चुअली आय हॅव टू टेल यू समथिंग.."

"बोल ना.."

"इथे नाही. लेट्स् मीट समव्हेअर एल्स.."

"दॅट गार्डन? आर्टिफिशियल वन?"

"चालेल ..आर्टिफिशियल गार्डन .. बट नो आर्टिफिशियल टाॅक.. आज संध्याकाळी .."

संध्याकाळी भेटलो आम्ही. त्याच गार्डन मध्ये.

येतायेताच म्हणाली ब्रुनी, "हे.. यू डिडन्ट टेल मी.. तू माझ्या आॅफिसात मलाच भेटायला गेलेलास मी आले तेव्हा .."

"यस डियर. तुझाच विचार करत होतो.."

"मग बोलला नाहीस तो?"

"तुला खरं सांगू, खूपशा गोष्टी न सांगता जास्त कळतात .."

"तेच सांगायचेय मला तुला डियर.. त्यादिवशी तुझ्या घरी आले ना, आपण बोललो नाही काहीच जास्त .. पण आय थिंक आय नो यू बेटर आफ्टर दॅट.."

"मी तुला एक सांगू..?"

"बोल.."

"हेच.. तू त्यादिवशी येऊन गेलीस नि आय थिंक यू आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट .."

"हुं. हेच मला तुला पण सांगायचं होते डियर.."

"थ्यांक्स डियर.."

"नाऊ यू आर ब्रेकिंग द रूल .. नो थ्यांक्स इन फ्रेंडशिप.."

"तसे नाही गं.. तू मला इथे बोलावलेस ना.. स्वतः .. म्हणून! नाहीतर मला हे असे जमले नसते.."

"ओके.. आय अंडरस्टँड अँड अॅक्सेप्ट युवर थ्यांक्स.. आय थिंक इट्स हाय टाइम वुई मीट अॅट माय होम.."

"यस डियर.. छेडो दिलके तार विथ गिटार. यू नो ब्रुनी.. पहिल्यांदा पाहिले ना तुला तेव्हाच तू मला आवडलीस. यू आर टू गुड यार.. इट वाॅज लव्ह अॅट फर्स्ट साइट .."

"वाॅज?"

"हा! हा! राँग इंग्लिश .. पण भावनांकडे बघ.."

"बघते.. पण सेम हिअर डियर.."

"पण मग ते एकदा तू म्हणालेलीस.. आय डोन्ट फरगेट क्लायंट्स.. ते?"

"वेडा अाहेस तू.. साध्या गोष्टी नाही कळत तुला.. तिथे अजून कुणी असताना मी काय बोलणार होते? आय थिंक बाॅइज आर बाॅर्न विथ लेस ब्रेन्स, आय मीन अक्कल ..आणि तू त्याचे उदाहरण आहेस जिवंत!"

"बोल! बोलून घे आता.."

"बट यू अार टू क्यूट अंबर.. आयॅम सो हॅपी.."

"विथ लेस ब्रेन? एनी वे तुझ्याहून मोठा मेंदू मला नाही वाटत कुणाचा असेल."

"बोलून घे तू आता.. मग कधी भेटायचेय?"

"एनी डे.."

"शनिवार?"

"डन .."

आधीच चंद्रावर तरंगत चालावे लागते त्यात अजूनच तरंगत पोहोचलो घरी मी. ब्रुनी बरोबरची ती संध्याकाळ आयुष्यभर न विसरण्यासारखी. घरी आलो तर राॅबिन माझ्याकडे पाहून हसत होता.

रात्री आला माझ्याकडे नि म्हणाला,

"सो.. कधी छेडतोयस दिलके तार विथ गिटार?"

"तुला काय ठाऊक?"

"या राॅबिनला सारे काही ठाऊक आहे ब्रदर अंबर, आजची त्या गार्डनमधली मुलाकात.. नि शनिवारी परत भेटणे.. आय नो इट आॅल.."

"तू काय जासूसी करत होतास बागेत?"

"नो ब्रो.. आय वाॅज ट्राइंग टू डू व्हाॅट यू यार ट्राइंग टू डू.. तू जे करतोयस तेच करायचा प्रयत्न .."

"म्हणजे?"

"सिंपल.. मी तेव्हा त्याच गार्डन मध्ये होतो.."

"कुणाबरोबर? "

"क्युरीबरोबर.."

"दिसला नाहीस तू?"

"तुझे लक्ष असेल तर दिसेल ना कुणी तुला.. ब्रुनी असताना काय.."

मी त्याला आयती दिलेली विकेट तो थोडीच सोडणार होता.. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत म्हटले,

"तू? आणि क्युरी?"

"यस्स.. तुझ्यामुळे यू नो.. लव्ह इज इन द एअर.. मी माझ्या प्रोग्रामिंग मध्ये बदल करून घेतला.. टू लाइक रादर टू लव्ह समबडी.. मग त्या नजरेतून मला आवडायला लागली क्युरी.. म्हणून तिला म्हटले बागेत बोलवावे."

"ओह! सो यू इन सेम बोट?"

"राँग इंग्लिश डिअर.. पण नाही, क्युरीकडे असा प्रोग्राम नाही .. मी तिला म्हटले, क्युरी आय लाइक यू व्हेरी मच.."

"मग ती काय म्हणाली?"

"ती म्हणाली, लाइक? म्हणजे काय? म्हणून तिने मशीनीत चेक केला शब्द तो.. तिला काय कळणार व्हाॅट इज लव्ह.. मला पण नसते कळले तू नसतास तर.."

"आता?"

"आता काय? तुझ्यामुळे चावला मला हा लव्ह बग!"

काय गंमत आहे नाही .. अापल्या गावरान भाषेत याला इश्काची इंगळी म्हणतात नि हा राॅबिन त्याला लव्हबग म्हणतोय. थोडक्यात पृथ्वीच्या पाठीवर .. किंवा तिच्या बाहेरही जा कुठे.. ह्या प्रेम प्रकरणांचा कीडा सारखाच दिसतोय!

"मग आता पुढे काय?"

"तो प्रोग्राम डिलिट करणार मी!"

"नो! अरे.. लव्हबग असा तसा जात नाही.. महा चिवट असतो तो. आता तुझा काढण्याऐवजी तोच क्युरी मध्ये टाकायचा प्रयत्न कर राॅब!"

"यस्स.. दॅट्स बेटर! बघतो जमतेय का!"

"वा! तू अगदी फास्ट इव्हाॅल्व होतोयस.."

"सारी कृपा तुझीच बरे.. आणि त्या बदल्यात मी ही केलीय एक कृपा.."

"कसली?"

"तुझी ती गिटार .."

"व्हाॅट अबाऊट इट?"

"रघुवीर सरांचा फोन आलेला. तुला ती हवीय म्हणून .."

"वा! आणलीस गिटार?"

"यस्स.. होम डिलिव्हरी!"

"थ्यांक्स!"

"पण होम कुठले ते नाही विचारलेस?"

"का?"

"अरे, ट्रस्ट धिस फेलो.. तुझी गिटार ब्रुनीच्या घरी देऊन आलो मी!"

"तू? तुला कोणी सांगितले?"

"कुणी कशाला सांगायला हवे? मला माहितीय.. तू आणि ब्रुनी .. अॅन इव्हिनिंग विथ गिटार! मी म्हणालो रघुवीर सरांना.."

याने शनिवारचे काही सांगितले तर नाही ना.. भीती वाटत मी ओरडलो.. "काय?"

"हेच.. गिटारच्या प्रोग्रामला बोलावू जरूर .."

"शनिवारी?'

"नो डियर, नो हड्डीस इन कबाब.. नंतर केव्हा तरी. तसा मी हुशार आहे. मी सांगितलेय त्यांना, यू नीड टू प्रॅक्टिस .. एखादा महिना तरी!"

"राॅबिन्या, रोबो नसतास तर मुका घेतला असता तुझा.."

"फक्त एक .. तुझ्या गिटार प्रोग्रामला या फ्रेंडला बोलवशील ना?"

"चूप .. आता राॅबिन भाऊ.. शहाण्यासारखे जाऊन झोपी जा.. आणि शनिवार इज अ टाॅप सीक्रेट .."

"ओके अंबर ब्रो.. गुडनाइट .. स्वीट ड्रीम्स"

"गुडनाइट .. स्वीट ड्रीम्स अाॅफ क्युरी टू यू टू!"

लव्ह इज इन एअर.. गाणे गात राॅबिन गेला..

राॅबिन म्हणजे राॅबिन आहे. तो आहे म्हणून किती आयु़ष्य सुसह्य झालेय इकडे. आता तो ही हे प्रेमाचे प्रयोग करणार की काय? व्हाय नाॅट! नेक्स्टेस्ट जेन ह्युमनाॅईड्स!

आजच्या दिवसाचा आढावा घेत झोपलो. कॅमेरासारखे मन असायला हवे.. त्यात सारे रेकॉर्ड करून ठेवता यायला हवे.. म्हणजे आपल्या नातवंडाना दाखवयाला बरे.. नातवंडे .. पतवंडे! ती पण या चंद्रावर की पृथ्वीवर? की टायटनवर? हा प्रश्न कठीण होता.. तो आॅप्शनला टाकून मनातल्या मनात गिटारचे काॅर्ड्स हाताळत झोपी गेलो.. रिहर्सल म्हणा! शनिवारी वाजवायची गाणी.. स्पेशली फाॅर अॅड ओन्ली फाॅर माय डियर ब्रुनी!