जुळले प्रेमाचे नाते - भाग-४१ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४१

पण यासर्वांत मी आणि निशांत बरेच जवळ आलो होतो.. आमच्यामधलं प्रेम आता नव्याने बहरत होत. एक्साम ही जवळ आल्या होत्या.. सगळं विसरून मी जोमाने अभ्यासाला लागले.. आजकाल मी आणि निशांत लायब्ररीत बसून अभ्यास करायचो.. त्यात राज असायचा, पण मधेच त्याला आठवण आली की त्याच्या भावनांचा बांध तुटे...


अशाच एके दिवशी मी कॅन्टीनमध्ये बसले असता माझा मोबाईल वाजला.... कॉलवर राजचा नंबर झळकत होता. "हॅलो...,बोल ना राज" मी हातातलं काम करतच विचारले.
"हॅलो मी राज नाही.., राजचा मित्र राहुल बोलतोय. तो क्लासरूम मध्ये चक्कर येऊन पडला आहे.. तु येतेस का जरा...??" एवढं बोलुन त्याने कॉल कट केला. मी माझ्या हातातलं सगळं कसतर बॅगमध्ये भरल आणि धावत त्याच्या क्लासरूममधे गेले..


राजला त्याच्या काही मित्रांनी एका बेंचवर बसवलं होत.. मी धावत जाऊन त्याला माझ्याकडच पाणी दिल... "अचानक कस झालं राज..?? तु ठीक आहेस का..??" मी त्याला काही विचारत होते पण त्याला काहीच कळत नव्हतं.. त्याचा मित्रच मग सांगू लागला... "अग प्रांजल, तो आजकाल स्वतःची काळजी कुठे घेतो.. हर्षलचं अस झाल्यापासून जरा डिस्टर्ब आहे तो.. काल जेवला नाहीये की सकाळी नाश्ता केलाय.." एवढं बोलून राहुल शांत झाला.


मी राजकडे पाहिलं.. "राज काय बोलतो आहे राहुल... आपण आता कॅन्टीनमध्ये जात आहोत.." एवढं बोलून मी राजचा हात धरला आणि त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेले.
"अग नको ग काही मी जातो घरी..." तो बोलत होता पण मी काही लक्ष दिला नाही. "तु गप्प चल माझ्यामागे राज..." एवढं बोलून आम्ही कॅन्टीनमध्ये पोहोचलो.


मी बळेबळेच त्याला नाश्ता करायला लावला.. निशांतला कॉल करत होते पण तो काही घेत नव्हता. नाश्ता करून राजला बर वाटल तसे मीच त्याला घरी सोडायला त्याच्या सोबत गेले.. निशांतला कॉल करण चालुच होत पण तो काही घेत नव्हता. शेवटी मॅसेज टाकून मी राजला घरी सोडायला गेले.


आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि सरळ त्याच्या रूममधे मी त्याला घेऊन गेले आणि झोपवले. अशक्यपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. काही वेळ झोपुन होता की मी एका ला सांगून कॉफी बनवायला सांगितली आणि राजच्या रूममधे आले.


"राज... उठ चल मस्त गरम कॉफी घे बघु. तुला जरा फ्रेश वाटेल. " मी कॉफीचा मग पुढे करत बोलले. त्याने ती घेतली तेव्हा कुठे तो बोलु लागला....



"प्रांजल थँक्स..., तु सोबत आलीस ते बर केलंस. मला तर आज जमलंच नसत घरी यायला." जातात कॉफीचा मग घेत राज बोलला. "अरे थँक्स काय... मी तुझी मैत्रीण आहे ना.. अशावेळी आपली मैत्री उपयोगी नाही आलाय तर काय फायदा.." मी एक स्माईल देत बोलले. तस त्यालाही बर वाटल.



"काय करू ग प्रांजल, हर्षुच हे अस झालं तेव्हा पासून माझी झोप उडाली आहे. कारण त्या दिवशी.." तो काही विचार करू लागला. त्याच्या अशा बोलण्याने मी चमकुन त्याच्याकडे पाहिलं.. "कोणत्या दिवशी..??" मी राजकडे बघत विचारले..



"तुझ एक ऑपेशन करून तिला शिफ्ट केलं होतं. त्या दिवशी तुला भेटुन मी लवकर गेलेलो. कारण मला डॅड ने काम सांगितलं होतं. त्या रात्री हर्षलचा कॉल आला मला. मी गाडी चालवत होतो. गाडी बाजुला लावली आणि कॉल घेतला....




"हॅलो भाई..., हेल्प मी...! कुठे आहेस तु..., मला वाचवं..प्लीज नाही तर तो मला मारून टाकेल..." ती रडत होती ग.. खुप मी तिला विचारल कोण मारून टाकेल.. पण ती काहीच बोलली नाही.. मी तिला नक्की कुठे शोधणार होतो. पण प्रयत्न केला.. काहीच झालं नाही. शेवटी घरी आलो तेव्हा एक मॅसेज होता तिच्या नावाचा... "भाई.., मी प्रेमात एवढी वेडी झाली की मला हे देखील कळलं नाही की, मी माझ्या बेस्ट फ्रेंड चा जीव घेण्याचा दोनदा प्रयत्न केला. मला माझी चुक कळली आहे. आणि म्हणूनच मी आत्महत्या करत आहे. आई-बाबांची काळजी घे आणि स्वतःला जप. गुड बाय भाई....!!" असा तिचा मॅसेज होता.


आणि राज रडु लागला. मी त्याला धीर देत होते. त्याने मला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा तो रडु लागला. मी देखील त्याला रोखु नाही शकले.. म्हंटल येऊदे भावना बाहेर.. काही वेळ रडून त्याने तो मॅसेज मला ही दाखवला.


"हे बघ प्रांजल.. ती आत्महत्या करण शक्यच नाहीये. मला तरी वाटत कोणी तरी तिला मारल आहे. तिचा खून केला आहे. ही केस मी रिओपन करणार होतो पण पोलीस ते करू देत नाही आहेत कारण काकांनी तस सांगितलं आहे..." एवढं बोलून राज शांत झाला. मला ही आता यामध्ये कोणाचा तरी हात असावा असं वाटाय होत.... "पण प्रांजल, मी माझ्या बहिणीच्या खुण्याला पकडणार तेव्हाच माझ्या बहिणीच्या आत्माला शांती लाभेल." राजने एक दीर्घ श्वास घेत स्वतःचं बोलण थांबवल.
यासर्वात मी काहीच बोलु शकले नाही.



"चल राज आता मी निघते. तु स्वतःची काळजी घे. आणि हो जास्त वाटलं तर डॉक्टरकडे जाऊन ये." एवढं बोलून मी निघाले.


घरी येताना निशांतला कॉल केला आणि घडलेलं सगळं सांगितलं. तेव्हा त्याच्यासाठी ही हे सगळं नवीन होत. घरी पोहोचले आणि स्वतःच्या रूममधे जाऊन फ्रेश झाले... आणिअभ्यास करत बसले. कारण जे काही झालं होतं त्याने माझ्या मनावर खोलवर परिणाम होत होता. पण तो मला माझ्या अभ्यासात होऊ द्यायचा नव्हता.


असेच दिवस जात होते. अभ्यास.., एक्साम लेक्चर्स. यासर्वात दिवाळी कधी आली हे देखील कळलं नाही.. शेवटचा पेपर लिहून मी आणि राज निशांतची वाट बघत कॅन्टीनमध्ये बसलो होतो की समोरून निशांत आला. आम्ही नाश्ता करत बसलो होतो.. "ये निशांत., तुझं आवडीचं आहे आज." एवढं बोलून मी पोह्यांचा डबा पुढे केला. "नाही नको आज नको..." त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघेही त्याच्याकडे बघतच राहिलो.. "गाईज फास्ट आहे ना माझा आज.." त्याने मोबाईलमध्ये दाखवलं तर आज मंगळवार होता.


एवढं बोलून तो काऊंटर वर गेला आणि ज्युस घेत आमच्या टेबलवर येऊन बसला. "राज.. प्रांजल बोलली मला की तुला वाटतं आहे की, हर्षलचा खुण झाला आहे. काही ठरवल आहेस का..?? आणि हो काही मदत हवी असेल तर सांग. कारण काही झालं असाल तरीही ती माझी देखील मैत्रीण होती. जर तिचा खरचं खुण झाला असेल तर आपण तिला न्याय द्यायला हवा." निशांत ज्युसवरचा फेस स्ट्रॉन ने बाजूला करत बोलला. हर्षुचा विषय येताच राज भावुक झाला तस निशांतने त्याला धीर दिला.



"मी प्रयत्न करतो आहे. माझे कॉन्टॅक्ट वापरून की त्या दिवशी ती शेवटला कोणाला दिसली होती का..? हे बघत आहे.!" राजने माहिती पुरवली. यासर्वात मी गप्प सगळं ऐकत होते. निशांत आणि राजच बोलण झालं तसे आम्ही एकमेकांना भेटुन परत भेटुया ठरवुन आम्ही निघालो.



मी आणि निशांत बाईकने जाणार होतो. तो घेऊन येईपर्यंत मी तिथेच उभी होते. राज स्वतःच्या गाडीने जात होता. लांबूनच त्याने मला बाय केल आणि तो निघुन गेला... विचारांमध्ये असताना समोर निशांत आला बाईक घेऊन. आणि आम्ही निघालो.


घरच्या इथे पोहोचताच मी खाली उतरले... "काय मग मिस्टर चिडणीस.. कधी पर्यंत करणार आहात.???" मी एक भुवई वर करून विचारलं. "काय कधीपर्यंत..?? कशा बद्दल बोलत आहेस हनी-बी..??" त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं.



"अरे तु उपवास किती दिवस करणार आहेस...?? आता तर मी देखील ठणठणीत झाली आहे." मी कॉलर टाईट करत बोलले. "मॅडम एकतर तुमच्या टिशर्टला कॉलर नाहीये. आणि दुसरं म्हणजे आता उपवास मी जिवंत आहे तोपर्यंत करणार आहे.." निशांत मिश्किलपणे हसत बोलला खरा पण मी माझे हात त्याच्या ओठांवर ठेवले...


"काही ही असत हा निशांत तुझं... म्हणे जिवंत असेपर्यंत उपवास करणार.." मी हसुन बोलले तस त्याने माझा हात धरला आणि जवळ खेचलं... "अरे निशांत.., सोड हा हात..कोणी बघेल ना...??" मी लगेच स्वतःचा हात त्याच्या हातातुन सोडवुन घेतला.. "मग काय करणार तुझ्या गणु ला प्रॉमिस केलं आहे सो आता ते प्रॉमिस तुटणार नाही माझ्याकडून..." निशांतने स्वतःचे हात बाजुला करून दाखवले.. "वेडु.." मी त्याच्या कपाळाला हलकच ढकललं बोलले.



"उद्यापासुन कॉलेज नाही.. आता आपलं भेटणं कमी होणार ना...? " मी जरा नाराज होत बोलले असता निशांतने माझ्या डोक्यावर टपली मारली... "अग मी येत जाईल घरी भेटायला कळलं का... आणि आता तर माझं प्रेम आहे तुझ्यावर सो आता आपण कपल आहोत मॅडम विसरलात की काय...??" त्याने डोळा मारत स्वतःच वाक्य पूर्ण केलं असता मी गोड लाजले.. "गप्प हा खडूस.." आणि स्वतःची जीभ दाखवुन घरी जायला निघाले.. मी जाईपर्यंत तो बाईकवर बसुन माझ्याकडेच बघत होता. अगदी मी नजरेआड होईपर्यंत...

घरी आले तरी माझ्या चेहऱ्यावर गोड स्माईल तशीच होती.. आजकाल प्रेम नव्याने काळात होत. ती भावना आनंद देणारी होती. निशांत सारखा समोर असावा अस वाटत होता.



ती रात्र आराम करण्यात संपली.. दुसऱ्या दिवसापासुन मी हातात झाडू, डोक्याला फडकं बांधुन तय्यार झाले साफसफाई करायला.. मी आणि आईने एका दिवसात सगळं काम संपवलं. संध्याकाळी दोघेही फ्री झालो..
"आई.. मी आपल्यासाठी चहा करते. तु जास्त थकली आहेस ना..!! बस हा आलेच.." एवढं बोलून मी किचनमध्ये गेले आणि फक्कड असा चहा केला. तो घेतल्यावर कुठे आम्हाला तरतरी आली. मस्त फ्रेश वाटलं.


मग मी स्वतःच्या रूममधे जाऊन निशांतसोबत कॉल वर गप्पा मारत बसले.. रात्री एकत्र जेवण झालं आणि झोपताना आजकाल निशांतसोबत बोलण वाढलं होत.. अभ्यास असा काही नव्हताच त्यामुळे टेंशन नव्हतं. पण उद्यापासून फराळ करण्यात आईला मदत करावी लागणार होती.. आणि त्यात माझी रूम मलाच साफ करायची होती..


डोळ्यांवर झोप एवढी होता की तोंडावर तो मोबाईल पडत होता.. पण निशांतच बोलण झोपु देत नव्हत. पण शेवटी हा ना करत झोपायचं ठरवून आम्ही निद्रेच्या हवाली झालो...



जवळ येत होती दिवाळी.. सण म्हटला की आनंद येतोच.. पण या दिवाळीत काही तरी वेगळं होणार होत....



to be continued.....