एडिक्शन - 16 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - 16

गावावरून परत आल्यावर श्रेयसीच्या स्वभावात फार फरक जाणवला होता ..तिने बऱ्याच दिवसांनी भरलेलं कुटुंब पाहिल्याने ती त्यातच गुंतली होती ..इकडे ऑफिसच काम नियमित सुरू झालं होतं ..श्रेयसीला आधी जगण्याची इच्छा नव्हती पण आता तिला प्रत्येक क्षण जगावासा वाटत होता ..मी सावलीप्रमाणे तिच्यासोबत असायचो आणि ती माझ्या सोबत असायची ..

ऑफिसच काम सुरू होऊन काही दिवस झालेच होते की एक खूषखबरी मिळाली ..निशाणे एका गोंडस बाळाला जन्म दिला होता ..सरांना जशी बातमी मिळाली तसच त्यांनी मला बोलवून घेतलं आणि आम्ही दोघेही हॉस्पिटलला पोहोचलो ..तिच्या कुटुंबातले सर्व लोक तिला येऊन भेटत होते आणि मी बाहेरून तिला पाहू लागलो ..योगेशच्या हातात ते कार्टून होत आणि वडील झाल्यानंतर योगेशच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता ..निशालाही मातृत्त्व मिळाल्याने ती आपल्या मुलाकडेच सतत पाहत होती आणि मी बाहेरूनच तो प्रत्येक क्षण कॅमेरात टिपू लागलो ..काहीच क्षणात योगेश बाहेर आला आणि त्याने मला आतमध्ये जायला सांगितलं ..आताही हॉस्पिटलमध्ये बरीच गर्दी असल्याने मी बाहेरच उभा होतो ..हळूहळू गर्दी ओसरू लागली आणि योगेश बाहेर सांगत आला की तुला निशाणे बोलावील आहे ..मी लगेच आतमध्ये पोहोचलो ..तेव्हा तिथे कुणीच नव्हतं ..योगेश नातेवाईकांना घरी सोडायला गेला होता ..तिथे गेल्यावर लगेच तिने तिच्या बाळाला मला हातात दिलं आणि विचारू लागली , " काय कुणावर गेलं ? " आणि मी तिची मस्करी करत म्हणालो , " बहुतेक माझ्यावर गेलंय!!! " आणि आम्ही दोघेही खळखळून हसू लागलो ..निशाप्रमाणेच तीच बाळ क्युट होत ..अगदी सुंदर ..फक्त नाक योगेशवर गेलं होतं .थोडस लांब ..मी बाळ तिच्या हातात दिलं आणि तीच अभिनंदन केलं ..तिनेही अभिननंदन स्वीकारलं आणि आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो ..काहीच वेळात नर्स आली आणि निशाला आराम करण्यास सांगून गेली ..मीही तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन परत निघालो ..

आज तिच्या बाळाला हातात पकडल्यावर मला जाणवलं वडील होण्याचा आनंद काय असतो ? आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी जोडीदार असावा जो त्याच्यावर आयुष्यभर निस्वार्थ प्रेम करेल ..या भावना मनात इतक्या घट्ट रोवल्या गेल्या की आता श्रेयसीला मनातलं सांगणं गरजेचं होतं गेलं ..एक तर श्रेयसी स्वतः मनातलं सांगणार नाही हे मला कळलं होतं त्यामुळे यावेळी पुढाकार मलाच घ्यावा लागणार होता आणि मी त्यासाठी योग्य संधीही वाट पाहू लागलो ..हे काही दिवस निशा सोबतच गेले पण श्रेयसीलाही तितकाच वेळ द्यायचो ..निशा घरी आली आणि हॉस्पिटलला जाण बंद झालं ..

तारीख 4 डिसेंबर म्हण्जे श्रेयसीचा वाढदिवस .उद्या तिला मनातलं सर्व काही सांगायचं ठरवलं ..निशा मला जशी सोडून गेली होती तस मला श्रेयसीला जाऊ द्यायचं नव्हतं त्यामुळे आज रात्रीच तिला मनातलं सांगायचं ठरवलं ..रात्री 12 वाजता वाढदिवस सेलिब्रेट करण्याची पूर्ण तयारी झाली होती ..आज लवकरच ऑफिसला गेलो आणि सर्व काम भराभर आटोपले ..आज माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगेच होता ..सर्वांनी मला त्याबद्दल विचारायला सुरुवात केली पण मी त्यांना काहीच सांगणार नव्हतो ..माझं संपूर्ण लक्ष फक्त घड्याळीकडे होत ..हळूहळू का होईना वेळ जाऊ लागली होती ..वाढदिवस तिच्याच घरी साजरा करायचा असल्याने फार काही तयारी करता येणार नव्हती ..घरी पोहोचलो आणि कपडे प्रेस करून घेतले ..जेवण करायची इच्छा नव्हती त्यामुळे थोडा नाश्ता कसातरी ढकलला ...केक देखील ऑर्डर केला होता आणि वेळेवरच घेऊन जाणार होतो ..मनात चलबिचल सुरू होती तरीही भीती नव्हती ..कारण तीच उत्तर काहीही असलं तरी मी स्वीकारायला तयार होतो ..शेवटी रात्रीचे साडे दहा वाजले ..मी लगेच तयारी करून गाडीने तिच्या घराकडे निघालो ..तिच्या घरी पोहोचायला सुमारे एक ते सव्वा तास लागणार होता ..मी केक घेतला आणि तिच्या घराकडे निघालो ..घराकडे पोहोचलो तेव्हा बारा वाजायला पंधरा मिनिटे बाकी होते। त्यामुळे घराबाहेरच तिची वाट पाहू लागलो ..अगदी पाच मिनिटे बाकी असताना मी तिच्या बिल्डिंगमध्ये दाखल झालो आणि आणि दारावर बेल वाजवू लागलो ..दोन मिनिटे होऊन देखील दार उघडल्या गेलं नव्हतं ..तरीही मी बेल वाजवतच होतो आणि आतमधून श्रेयसीचा आवाज आला तेव्हा कुठे मनाला थोडी शांती लाभली..तिने दार उघडलं आणि समोर अगदी मी ..ती मला प्रश्न विचारत होती आणि मी फक्त मोबाईलकडे वेळ पाहू लागलो ..घडयाळीचा काटा ठीक बारा वर पोहोचला आणि म्हणालो , " वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम ..देव आपल्याला शंभर वर्षे आयुष्य देवो .." तिनेही हसून शुभेच्छा स्वीकारल्या आणि मी आत गेलो ..माझ्या हातात असलेला केक तिच्याकडे दिला आणि एक छोटासा टेबल घेऊन टेरिसवर जाऊ लागलो ..कँडल आणि माचीस मी आधीच सोबत आणली होती ..केक बॉक्समधून काढला आणि मॅडमने केक कापण्याची वाट पाहू लागली ..तसे मुंबईत निरभ्र चांदणे दिसणे कठीणच असतात पण रात्रीच्या वेळी थोडेफार चांदणे दिसू लागले होते ..थंडीचे दिवस असल्याने थोडं वातावरण थंड झालं होतं वरून चांदोबा आम्हाला पाहू लागला होता ..याच सुंदर क्षणात तिने केक कापला आणि तिने केक कापताच पहिला घास मी तिला भरविला ..आणि तिने मला भरविला ..ती माझ्याकडे पाहता - पाहता बाजूला झाली आणि म्हणाली , " प्रेम मुंबईत आल्यापासून कुणालाच माझी चिंता नव्हती त्यामुळे वाढदिवस काय असतो ते अगदी विसरूनच गेले होते ..आज पहिल्यांदा कुणीतरी स्वतःहून इतकं सर्व करतंय म्हणून आनंद होतोय ..धन्यवाद प्रेम ह्या सुंदर क्षणांबद्दल ..पण तुला माझ्या वाढदिवसाबद्दल कुठून कळाल ? " आणि मी उत्तरलो , " मॅडम शोधणारे काही पण शोधतात सो हे तर काहीच नव्हतं ..पण सॉरी यार मी तुझ्यासाठी गिफ्ट आणू शकलो नाही .."

ती खुश होत माझ्याकडे वळाली आणि म्हणाली , " बर झाल नाहीच आणलं तर ..आता मला हवं ते गिफ्ट मागता येईल .."

" बर बर माग मग तुला हवं ते ? " , मी म्हणालो आणि ती म्हणाली , " प्रेम आयुष्यात बऱ्याच नावडत्या लोकांचा स्पर्श झाला ..इच्छा नसतानाही ते सर्व सहन कराव लागलं पण आज मला तुझा स्पर्श हवाय ..हाच स्पर्श घेऊन मला आयुष्य जगायच आहे ..प्लिज आज मला तुझा स्पर्श दे..त्या क्षणासोबत मी सम्पूर्ण आयुष्य जगून घेईल ..प्लिज ? "

आता मी चिंतीत झालो होतो ..कारण मी हा माझा स्पर्श फक्त माझ्या होणाऱ्या बायकोलाच देणार होतो त्यामुळे तिच्यापासून तोंड फिरवत आकाशाकडे बघू लागलो आणि ती तेवढ्यात म्हणाली , " ठीक आहे तुझं उत्तर मिळाल ..आजपर्यन्त आयुष्यात काहीच मिळालं नाही आणि त्याचवेळी आयुष्यात असा एक व्यक्ती भेटला , वाटल जो मला सावरुन घेईल आणि थोडा का होईना आनंद देईल पण बहुतेक ते देखील नशिबात नाही ..काही हरकत नाही .." तिचे शब्द पूर्ण व्हावे आणि मी मागे वळत सरळ तिला बाहूत उचलून घेतलं ..ती आताही माझ्या डोळ्यात पाहत होती आणि मी सावधगिरीने एक - एक पाऊल टाकू लागलो ..काहीच क्षणात रूममध्ये पोहोचलो ..पायाने दार सरकवल आणि बेडरूममध्ये मध्ये नेऊन तिला अलगद बेडवर ठेवलं ..तिचे डोळे आताही माझ्या डोळ्यात स्थिरावले होते आणि तिच्या डोळ्यातला प्रत्येक भाव मी मनात साठवून ठेवू लागलो ..मी तिच्याकडे पाहत असतानाच तिने मला तिच्याकडे खेचल आणि मी अगदीच तीच्या शरीरावर जाऊन पडलो ..आयुष्यात पहिल्यांदाच हा भाव मी अनुभवत होतो आणि त्या अथांग सागरात खोलवर बुडू लागलो ..वरून निरभ्र आकाश आमच्या त्या क्षणाना टिपत होत ..तर गुलाबी थंडी आमच्यातला दुरावा कमी करत होती ..काहीच क्षणात मी तिच्या अधरात सामावलो ..तिच्या ओठांतून तो गुलाबी रस शोषून घेताना प्रेमाची लीला काय असते ते जाणवू लागल ..हळूहळू तिच्या ओठांवरून डोळ्यांत शिरलो आणि त्यांच्यावर चुम्बनाचा वर्षाव झाला ..हळूहळू तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर माझ अधिराज्य निर्माण झालं ..लाजेचे पडदे कुठेतरी दूरवर उडून गेले होते आणि दोन शरीर एकत्र आले ..प्रेमाने आसुसलेल्या दोन शरीराना आज एकमेकांत सामावून जीवनाचा आनंद मिळत होता आणि काही क्षण तरी फक्त आम्ही एकमेकांचे होते ..माझा पहिलाच स्पर्श असल्याने त्या स्पर्शाची जादू मी अनुभवू शकत होतो आणि आवडीचा स्पर्श लाभल्याने तिचा चेहराही बरच काही सांगत होता ..बरीच रात्र झाली होती आणि आम्ही आताही जागे होतो ..तिच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव आताही तसेच होते जणू पहिल्या रात्री जसे नवरीच्या चेहऱ्यावर असतात ..

लाजून हासने अन
हासून ते पहाणे..
मी ओळखुन आहे
सारे तुझे बहाणे

डोळ्यास पापण्यांचा
का सांग भार व्हावा ?
मिटतास पापण्या अन
का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे
हरती जिथे शहाणे

मी ओळखुन आहे
सारे तुझे बहाणे ..

जाता समोरूनी तू
उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या
आणि सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे
सुचते सुरेल गाणे

मी ओळखुन आहे
सारे तुझे बहाणे

लाजून हासने अन
हासून ते पहाणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे

मी तिच्या कुशीत असताना म्हणालो , " आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगायला दिल्याबद्दल धन्यवाद ..मी ठरवलं होतं की हा क्षण फक्त माझ्या होणाऱ्या बायकोला देणार त्यामुळे मी आजही माझ्या शब्दांवर कायम आहे ..तसही मी आज ठरवलच आहे की तुला सर्व सांगेन ..श्रेयसी माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ..माझ्यासोबत तुझं संपूर्ण आयुष्य घालवशील ? " ती माझ्या कपाळावरून हात फेरत म्हणाली , " खर सांगू तर माझंही तुझ्यावर खुप प्रेम आहे ..अगदी तुझ्यापेक्षाही जास्त ..मलाही वाटत होत की तुला मनातलं सर्व सांगावं पण नाही करू शकले ..मी वैश्या ..माझं समाजात काहीच स्थान नाही ..मला माहित आहे तू स्वीकारशील पण मला स्वीकारून तुला सर्वांचे बोलणे खावे लागतील आणि म्हणून मी स्वार्थी नाही होऊ शकत ..सॉरी प्रेम पण मी तुझी नाही होऊ शकत ..मला माफ कर मी तुझी नाही होऊ शकत .."

रात्र कशी तरी सरली होती ..ती उठायच्या आधीच मी घरी निघून आलो होतो ..पुन्हा एकदा नकार मिळाला होता पण यावेळी स्वताला त्रास करून घेणार नव्हतो ..शिवाय आम्ही रात्रभर एकमेकांसोबत एकमेकांचे झालो होतो याशिवाय आम्हाला आणखी काहीच नको होतं ..

क्रमशः ...