Julale premache naate - 43 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४३

"अरे निशांत तु....???! कधी आलास...??." मी सोफ्यावर जाऊन बसतच विचारले.... तेव्हा कुठे त्याने स्वतःच तोंड त्या मोबाईलमधुन वर काढल आणि माझ्याकडे बघुन फक्त एक स्माईल दिली... त्याच्या त्या स्माईलच मला काही कळलंच नाही... "मी काय विचारल आणि याच काय चालू आहे..??" स्वतःशीच बोलत मी किचनमध्ये निघुन गेले.."काय ग आई कधी आला हा खडूस..." मी फ्रीजमधुन पाण्याची बॉटल काढुन पाणी पित विचारले... "तु जेव्हा झोपा काढत होतीस तेव्हा आला.. तुझ्या रूमधे गेलेला पण तू झोपली होतीस म्हणून आला बाहेर आणि एकटाच बसला आहे कधीचा.." आई कपामध्ये चहा ओतत बोलली..तशी माझ्या हातात पाण्याची बॉटल तशीच... आणि मला आठवल.., तो स्पर्श... ती किस म्हणजे... म्हणजे निशांत माझ्यारूमध्ये येऊन गेला. "म्हणजे ती किस आणि स्पर्श स्वप्न नव्हतं तर ते खरच झालेलं..."
मी हातातली बॉटल ओट्यावर ठेवुन बाहेर निघाली तशी आई मागून ओरडलीच....


"प्राजु.. ती बॉटल आधी फ्रीजमध्ये ठेव आणि हा चहा निशांतला नेऊन दे.." कशीतरी मी बॉटल ठेवत चहाचा कप घेतला आणि बाहेर आले.. मी बाहेर येताच निशांत माझ्याकडे बघुन गोड हसला.. मी स्वतःचे तोंड वाकड करून त्याला वेडाऊन दाखवलं... गरम चहा दिला आणि त्याच्या समोर बसले... मागुन आई आमच्यासाठी चहा- बिस्किटे घेऊन आली... गप्पा मारत आम्ही चहा बिस्किटे खात होतो.. पण निशांतच लक्ष मात्र माझ्यावरचं होत.


ते बघुन मला कस तरी वाटत होतं... कारण समोर आई देखील बसली होती आणि त्यात हा असा बघत होता. काय बोलणार मग गप्प चहा-बिस्किटे खात बसले...
आईनेच विषय काढला... "मग निशांत चालु झाली की नाही दिवाळीची तय्यारी...??" चहाचा एक घोट घेत आईने निशांतला विचारल...


पण निशांत मला बघण्यात एवढा बिजी होता की त्याला आईने विचारलेला प्रश्न ऐकूच आला नाही..
मग मीच त्याला डोळ्यांनी खूण करून आईकडे बघायला सांगितलं... तसा त्याला लक्षात आलं की बाजुला आई बसलीय.... यावर मी मात्र चांगलेच हसत होते."खास अस काही करण्यासारखं नाहीये. लहानपणी आई सोबत करायचो.. नंतर आजी सोबत फराळ करायचो, पण आता कुठे आजीला जमत.. मग आम्ही बाहेरूनच आणतो." निशांतने आईकडे बघत वाक्य पूर्ण केलं. "मला खुप आवडायचं आजी ला मदत करायला.. त्या शंकरपाळ्या, चकल्या, त्या खुसखुशीत करंज्या.. सगळं काही करायला आवडायचं. पण आता सगळं बंद झालं. खुप मिस करतो आहे." एवढं बोलून त्याने एकदा आईकडे तर एकदा माझ्याकडे पाहिलं आणि डोळ्यातलं पाणी रुमालाने टिपलं.निशांतला भावुक होताना बघुन माझ्याही डोळ्यात पाणी तरंगल... आई ने लगेच निशांतला जवळ घेतलं.. "अरे वेड्या.. आता तुझी आई आहे ना मी.. चल फ्रेश हो मला चकली बवण्यात मदत कर." आई निशांतच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली. तसे निशांतची कळी खुलली... मला ही छान वाटलं.


किचनमध्ये आम्ही तिघेही गेलो. आईने बाजारातून आणलेल. ते पीठ मळल आणि निशांतने साचामध्ये भरून छान अशा चकल्या गाळल्या.. छोट्या छोट्या चकल्या.. एकदम परफेक्ट होत्या त्या.. त्या बघुन आईने लगेच माझ्याकडे पाहिलं.. "घ्या शिका जरा.. प्राजु बघ निशांत किती छान चकल्या करत आहे.. तु पण शिकुन घे बघु. तुम्ही करा मी आले जरा बाजुला जाऊन.. मघाशी मला जोशी काकींनी बोलावल होत.. आलेच हा." एवढं बोलून आई गेली.मी निशांतच्या शेजारी बसले.... "का केलंस अस...??" मी तो करत असलेल्या चकल्या बघत विचारले. "मी काय केलं ग हनी-बी.???" हातातल्या चकल्याचा साचा हातात तसाच पकडून माझ्याकडे बघुन निशांतने विचारल..
"माझ्या रूमध्ये येऊन किस् का केलीस..?? खुप दुष्ट आहेस तु..." मी लटक्या रागात बोलले आणि हाताची घडी घालून फुगून बसले... यार निशांत गोड हसला..

"अग वेडाबाई ग ती... इतर मुलींना आवडत अस आणि काही लोकं रागावतात..." एवढं बोलुन निशांतने हातातलं चकल्याचा साचा बाजुला ठेवला आणि माझ्या जवळ सरकला.. माझा चेहऱ्याला स्वतःच्या ओंजळीत घेतला आणि....


आणि माझ्या डोक्यावर किस केली.. "तु माझ्यासाठी खुप स्पेशिअल आहेस हनी-बी.. तु नाहीस तर माझ कस होईल यार. मी साधा विचार ही नाही करू शकत तुझ्याशिवाय जगणं. खुप वर्षांनी माझ्या आयुष्यात एवढं सुख आलं आहे आणि मला ते गमवायच नाहीये..." हे बोलताना ही त्याचे डोळे भरले होते..."अरे काय खडूस डोळ्यात काय पाण्याचा नळ बसवून आला आहेस की काय....??! आल्यापासून नुसतं बाहेर येतंय.." मी जरा त्याला हसु यावं म्हणून बोलले तसा तो हसलाच...
"वेडु.., काही ही असत हा तुझं..." माझ्या डोक्यावर हलकी टपली मारली."चल तुला चकली करायला शिकवतो...." अस बोलुन त्याने माझ्या हातात चकलीचा साचा दिला.. "मला नाही माहीत काय करायचं.." मी माझे बत्तीस दात दाखवत हसले... "मी दाखवतो आहे मॅडम.. बघ आधी ना पिठाचा एक गोळा घेऊन तो या साचामध्ये टाकायचा.. पण हो आधी त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं हा.. मग चकल्या छान येतात." हे सांगताना त्याने तेल लावुन घेतलं.मग साचा बंद करून छान चकल्या ही गाळल्या... "घे आता तू कर बघु.." एवढं बोलून त्याने साचा माझ्याकडे दिला. मी घेतला आणि प्रयत्न करू लागले खर, पण माझ्याने काही त्या जमत नव्हत्या.. कधी चकलीच तुटे.. तर कधी साचा खाली ठेवून ती चेपून जाई.. हे सगळं बघून निशांत तर एवढा हसत होता हे बघुन मी देखील हसु लागले... माझ्यामुळे का होईना त्याला हसताना बघून छान वाटत होत... मग त्यानेच माझ्याच धरलं आणि मला चकली कशी गाळायची हे शिकवलं...


हे करताना निशांत माझ्या खुप जवळ होता... पण त्याच लक्ष मात्र चकली कशी छान बनेल याकडेच होत. मग मी ही शिकून घेतली.. आणि छान अशा चकल्या केल्याही.. हे करत असताना आई आली आणि मला चकल्या गळताना बघून आश्चर्याने पाहिलं.."वाह...! मस्त चालु आहेत चकल्या.." आईचा आवाज येताच आईला मी केलेल्या चकल्या दाखवल्या... "हे बघ आई मी केल्या आहेत. निशांतने मदत केली." मी हसुन चकल्या दाखवल्या तशी आई गोड हसली आणि आत येऊन तिने गॅसवर कढई ठेवली आणि तेल गरम केलं... त्यात एक एक चकली सोडली तसा चकलीचा खमंग सुगंध दरवळला...


"वाह आई.. मस्त सुगंध दरवळत आहे." निशांत डोळे बंद करून सुगंध घेत बोलला. मी देखील तो सुगंध मनात साठवत होते.. त्यांनतर काही चकल्या निशांतने तर काही आईने गाळल्या तेव्हा मी तळत होते.. त्या नंतर काही वेळ निशांतने त्या तळल्या. सगळं करून आम्ही हॉलमध्ये येईन बसलो. तिघेही चांगलेच थकलो होतो.. मग आईच उठली आणि
एका डिशमध्ये चकल्या घेऊन आली टेस्ट करण्यासाठी....कुरकरीत झालेल्या चकल्या... "वाह.. आई काय मस्त झाल्या आहेत चकल्या.. मला जास्त हव्यात हा.." हातातली चकली संपवत निशांत बोलला.. "हो हो तुझ्यासाठी करणार आहे मी सगळं. आणि या दिवाळीत तु इकडेच ये.. मी तर म्हणते आई-बाबांना घेऊनच ये.. ही दिवाळी आपण एकत्र साजरी करू." आई चकली संपवत बोलली तशी माझ्या चेहऱ्यावर गुलाबी कळी खुलली होती...


आता निशांत दिवाळी मध्ये इकडे असणार हे ऐकून सर्वात जास्त हॅप्पी तर मीच झाले होते. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून निशांत जायला निघला. खरतर जेवुन जायचा आग्रह झालेला पण घरी आजी- आजोबांना जेवायला येणार अस सांगितल्याने त्याला जावं लागणार होतं. मग नेहमी प्रेमाने मी त्याला खाली सोडायला गेले...


"मॅडम उद्या संध्याकाळी तय्यार रहा मग जाऊया शॉपिंगसाठी", निशांत हेल्मेट घालत बोलला. मी फक्त मानेनेच होकार दिला.. तो जाईपर्यंत मी त्यालाच बघत होते. वर आले तेव्हाही त्याच बोलण, मस्ती आठवत होती आणि मी गालातल्या गालात हसत होते...


जेवताना ही तेच.., हे बघुन आईने विचारलं... "काय ग हसत का आहेस... आम्हला पण सांग जोक आम्ही पण हसु..!!" तिचा आज ऐकून माझं हसूच गायब झाला आणि मी मानेनेच नकार देत गप्प जेवले आणि स्वतःच्या रूमध्ये पळाले.. मोबाईल बघितला तर निशांतचा मॅसेज होता घरी पोहोचल्याचा... त्याच्याशी थोडं बोलून मी झोपण्यासाठी बेडवर पडले..


आज निशांत सोबत घालवलेला वेळ, त्या आठवणी मला काही झोपु देत नव्हत्या.. "काय बोलतो खडूस.., म्हणे तुझ्याशिवाय जगु नाही शकत.. मरायचं कोणाला आहे.. मला तर हेच का पूढेचे सात जन्म ही निशांतच सोबती म्हणुन हवा आहे.." स्वतःशी बोलता बोलता मला कधी झोप लागली हे देखील मला कळलं नाही..उद्याच्या भेटीने मन आतुर होतेच.. आता वाट पाहायची होती ती संध्याकाळची.....to be continued....


(कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED