एडिक्शन - 17 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - 17

वरून जो नकार वाटत होता तो मुळात नकार नव्हताच ..तिने मला त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या अथांग प्रेमाचा त्याग केला होता ..त्यामुळे तिच्या शब्दांसमोर मी काहीच बोलू शकलो नाही परंतु मला विश्वास होता की तिचा नकार काही दिवसात होकारात बदलणारच आहे ..तिच्या प्रेमात तडफडणारा मी दिसतोय की बोलणं देणारा समाज यावरच आता आमचं भवितव्य अवलंबून होत ..त्यामुळे वाट पाहण्याशिवाय माझ्या हाती काहीच उरलं नव्हतं ..

तिला मनातलं संगीतल्यापासून सर्व काही बदललं होत ..श्रेयसी जी मला रोज फोन करायची तिने आता फोन करनच सोडून दिलं होतं ..बहुतेक ती माझ्यात गुंतत जाईल आणि गुंतली की बाहेर निघता येणार नाही हे तिने जाणलं असल्याने ती माझ्यापासून दूर राहू लागली होती आणि मी तिच्या या निर्णयाला साथ दिली ..रोज जॉबवर जायचो आणि फ्री असलो की तिला कॉल करायचो त्यामुळे आमच्यात संवाद आता फारच कमी झाला होता वरून मला कळलं होतं की तिने एक छोटीशी जॉब बघितली आहे आणि त्यातच दिवसभर व्यस्त असते ..पून्हा एकदा अनोळखीपणाचा प्रवास सुरु झाला ..जिथे मंजिल एकच होती पण वाटा वेगळ्या झाल्या होत्या ..तरीही मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता ..

हा अनोळखीपणाचा प्रवास सुमारे 3 महिने चालला ..जिथे फक्त मीच तिला मिळविण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती मला टाळू लागली होती ..असाच एकदा दिवस ..रविवार असल्याने मी निवांत बसून होतो ..बाहेरून फिरून आलो आणि टीव्ही पाहत बसलो होतो ..तितक्यात दारावर बेल वाजली ..दार उघडाव तशीच श्रेयसी समोर आली ..तीन महिन्यानंतर तिला पाहत होतो त्यामुळे भरपूर आनंद झाला होता ..मी तिच्याकडे असच पाहत होतो आणि ती म्हणाली , " आता असच पाहणार आहेस की आत पण घेशील ? " ..तिच्या शब्दांनी थोडा भानावर आलो आणि बाजूला सरकलो ..ती समोर - समोर जाऊ लागली ..आणि मी मागूनच म्हणालो , " कॉफी घेणार आहेस का ? " आणि ती त्यावर उत्तरली , " घेणार तर आहेच पण मी स्वताच बनविणार आहे तू बस आपली टीव्ही पाहत .." मी काही बोलणार त्याआधीच ती किचनला पोहोचली ..मिसुद्धा टीव्ही पाहण्यात व्यस्त झालो ..सर्व काही सुरळीत चाललं होतं ..तितक्यात किचनमधून काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि मी घाबरून किचनकडे धावू लागलो ..किचनमध्ये पोहोचलो तेव्हा बघितलं की श्रेयसी खाली कोसळली होती सुदैवाने तिच्या अंगावर चहा पडला नव्हता ..आधी गॅस बंद केला आणि श्रेयसीला आवाज देऊ लागलो पण तिला होशच नव्हता ..लगेचच पाणी घेऊन तिच्या तोंडावर पाण्याचे थबकारे मारले ..आता कुठे तिने डोळे उघडले पण तरीही पूर्णतः बरी वाटत नव्हती .. मी आतमध्ये जाऊन कपडे चेंज केले आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जायला निघालो ..ती मला काहीही झालं नाही अस सांगत होती आणि मी तीच काहीही ऐकण्यास तयार नव्हतो ..तिच्या चेहऱ्यावर भरपूर घाम येत होता आणि मी तो पुसून गाडी चालवू लागलो ..हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत साडे चार झाले होते ..पेशंटची गर्दीही बर्यापैकी वाढली होती ..डॉक्टरांशी बोलून मी आधी तीच चेकअप करायला लावलं होत ..आणि तिची तब्येत बरी नसल्याने मॅडमने माझी विनंती स्वीकारली होती ..आता फक्त रिपोर्ट यायला वेळ होता तोपर्यंत मी तिला एका बेडवर पडायला सांगितलं होतं ..रिपोर्ट यायला बराच वेळ लागला ..साधारणतः नऊ ते साडे नऊ वाजले होते ..श्रेयसी देखील उठली होती आणि गर्दी देखील नाहीशी झाली ..रिपोर्ट येताच मॅडमने आम्हाला बोलवून घेतलं ..श्रेयसीची तब्येतदेखील उत्तम जाणवत होती ..आम्ही दोघेही मॅडमसमोर बसून होतो आणि मॅडम रिपोर्ट वाचू लागल्या ..रिपोर्ट वाचून झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद जाणवू लागला आणि त्या म्हणाल्या , " मिस्टर & मिसेस प्रेम अभिनंदन तुम्ही पॅरेन्ट्स होणार आहेत ..हे ऐकल्यावर श्रेयसीच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा पसरल्या पण मी मात्र नाराज झालो ..फक्त ती उदासी मला डॉक्टरांसमोर दाखवायची नव्हती त्यामुळे हसून ते अभिनंदन स्वीकारलं ..मॅडमने काही औषधे लिहून दिली आणि श्रेयसीची काळजी घ्यायला सांगितली ..आम्हीही त्यांचे धन्यवाद मानून बाहेर पडलो ..मला तिच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद दिसत होता आणि माझ्या चेहऱ्यावर तिला फक्त दुःखाच्या छटा जाणवत होत्या..तरीही मी शांत होत गाडीकडे पोहोचलो ...दोघेही गाडीत बसलो आणि श्रेयसीच्या घराकडे जाण्याचा प्रवास सुरु झाला..गाडीतही ती कधी माझ्याकडे तर कधी खिडकीबाहेर पाहत होती ..तिलाही माझ्या चेहऱ्यावर आनंद हवा होता पण तो कुठेच दिसत नव्हता त्यामुळे तीही थोडी चिंतीत होती ..परंतु आज आनंद इतका होता की त्या सर्व गोष्टी तिला निरर्थक वाटू लागल्या ..
सुमारे अकराच्या सुमारास आम्ही तिच्या घरी पोहोचलो ..तिला रोडवरच सोडून निघून जाईल अस तिला वाटत होतं पण मी तिला अशा अवस्थेत सोडून जाण बर नव्हतं त्यामुळे तिला घरात घेऊन गेलो ..आतमध्ये पोहोचलोच असेल की समोर सिगारेटचा पॉकेट दिसला ..मी लगेच एक सिगारेट ओठांना लावली आणि तिच्या नशेमध्ये अलगद बुडालो ..एक सिगारेट संपली की दुसरी ..दुसरी संपली की तिसरी असा माझा खेळ सुरू होता आणि श्रेयसी हे उघड्या डोळ्यांनी पाहत होती ..एक तर मी इतक्या सिगारेट कधीच पीत नाही हे तिला माहीत होतं त्यामुळे आज सिगारेट घेतोय म्हणजे बाळाची बातमी एकूण मला टेंशन आलंय हे तिने अचूक हेरलं ..सिगारेटचा पॉकेट देखील संपण्याच्या मार्गावर होता .शेवटची सिगारेट काढली आणि मी गॅलरीत जाऊन पिऊ लागलो ..श्रेयसी माझ्या बाजूला येत म्हणाली , " प्रेम मला माहित आहे तुला बाळाची बातमी एकूण टेंशन आलंय पण तू काळजी नको करू मी या बाळाचा तुझ्यावर भार होऊ देणार नाही ..हो पण मी याला जन्म देणार ..आता तरी टेंशन नको घेऊना रे ..आणि तसही जिथे मला स्वतःलाच माहिती नाही हे बाळ कुणाच आहे तिथे मी हे ओझं तुझ्यावर कस टाकणार ? "

मी सिगारेट संपवत म्हणालो , " श्रेयसी मी टेंशनमध्ये आहे हे नक्की पण या कारणासाठी नाही की मला बाळ नकोय की हे माझं बाळ नाही तर मी याची जबाबदारी का स्वीकारू? एक तर मला माहित आहे की माझ्या स्पर्शानंतर तु कुणालाच स्वताला स्पर्श करू दिला नाही तेव्हा हे बाळ माझंच आहे हे पक्क आहे आणि समजा नसेलही तरी तुझं बाळ आहेच की तेव्हा मी त्याला आंदनाने स्वीकारेल ? "

आणि ती चिंताग्रस्त होत म्हणाली , " मग तुला टेन्शन कसलं आलंय ? "

आणि मी तिच्या हातांवर हात ठेवत म्हणालो , " टेंशन आहे तुझ्या व्यसनाच ..जिथे तुझा एकही दिवस व्यसनाशिवाय जात नाही तिथे नऊ महिने तू खरच काढू शकशील ? "

मला पडलेल्या प्रश्नाने आता तिच्या चेहऱ्यावर उदासीचे सावट निर्माण केले ..ती आता माझ्यासारखीच शांत झाली होती ..मी तिच्या उत्तराची वाट पाहत होतो आणि ती म्हणाली , " प्रेम आजपर्यंत मला आयुष्यात जगण्यासाठी कुठलंच कारण नव्हतं पण आज तुझ्यासाठी आणि या बाळासाठी मी काहीही करायला तयार आहे ..मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगते की हे नऊ महिने मी व्यसन करणार नाही ..आजपासून माझं संपूर्ण जीवन फक्त तुमच्यासाठी .." ..तिच्या उत्तराने माझ्या चेहऱ्यावरचे उदासीचे सावट दूरवर पळाले आणि वडील बनण्याचा आनंद माझ्याही चेहऱ्यावर जाणवू लागला ..मी धावतच तिच्या बेडरूममध्ये पोहोचलो ..तीही माझ्या मागेच आली .मी तिचे संपूर्ण कपडे एका बॅगमध्ये भरत होतो हे पाहून ती म्हणाली , " हे काय करतो आहेस प्रेम ? " आणि मी त्यावर म्हणालो , " आजपासून तू माझी जबाबदारी आहेस तेव्हा तू प्रत्येक क्षण माझ्यासोबतच राहायचं म्हणून तुला सोबत नेतोय.. येणार माझ्यासोबत ..? आणि ती म्हणाली , " आता माझा प्रत्येक श्वास फक्त तुमच्या दोघांसाठी !! "
भर रात्री आम्ही दोघे एका जगावेगळ्या प्रवासासाठी माझ्या घरी निघालो ..वाटा नक्कीच खडतर होत्या ..आता त्या वाटांच सांगणार होत्या की आमचे स्वप्न इथेच दम तोडतील की आम्ही जगावेगळी प्रेम कथा निर्माण करनार होतो ?

क्रमशः ...