Julale premache naate - 54 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५४

"सॉरी गाईज मी तुमचं बोलण ऐकल.. पण प्रांजल हे सगळं तुझ्याचसाठी आम्ही करत होतो.. कारण तु विसरली आहेस की...." तिने एक मोठा स्पोज घेतला...

"की आज तुझा वाढदिवस आहे आणि दिवाळीच्या गडबडीत तु तो विसरली आहेस."

हे सगळं माझ्यासाठी थोडं धक्कादायक होत.. मी स्वतःचा वाढदिवस विसरावे. आणि आपण उगाच त्या रियाला वाईट साईड बोलत होतो." मी माझ्या मनातच माफी मागण्याची प्रॅक्टिस करत होते..


"सॉरी प्रांजल.. खरतर मीच सर्वांना सकाळी तुला सांगायचं किव्हा विश करायचं नाही हे सांगुन ठेवलं होतं. म्हणजे तो कुर्ता जाळण्याचा प्लॅन ही त्यातलाच कारण तुझं मन दुसऱ्या कशामध्ये तरी गुंतून रहावं म्हणून हे केलं आणि हो मेरे भाई को कुछ मत बोल.." ती निशांतच्या खांद्यावर हात टाकून बोलली.

हे "भाई" माझ्यासाठी वेगळ होत.. कारण तिच्या तोंडुन भाई नाव ऐकताच मला एकतर हर्षुची आठवण झाली आणि दुसरं म्हणजे ही कधीपासून निशांतला भाऊ मानायला लागली.." माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न बघून दोघेही खूप हसवत होते.


"सगळं सांगते पण आधी जेवुन घे.. बघ असा स्वतःच्या हाताने भरावणारा बॉयफ्रेंड सर्वांना नाही हा भेटत." रिया माझ्याकडे बघून डोळा मारत बोलली. तशी मी ही जास्त आढेवेढे न घेता जेवायला निशांतच्या समोर बसले..
रिया बोलायला लागली..

"खरतर आत्या होती तेव्हा मी दर दिवाळीत यायची बाबांसोबत.. तेव्हा मी दोन- तीन वर्षांची असेन.. खूप लाड कराची आत्या आणि काका.. निशु दा तर खूपच.. आम्ही खूप खेळायचो.. मग आत्या-काकांच ऍकसिडेड झालं आणि निशु दा एकटा झाला.. एकटाच रहायचं.. मग आजी-आजोबा दर दिवाळीमध्ये मला बोलवायचे.. त्या निमित्ताने तरी निशु दा दिवाळी साजरा करायला लागला होता.."

"हळूहळू आम्ही एकमेकांचे चांगले फ्रेंड्स झालो.. नंतर जास्त यायला जमायचं नाही माझं कॉलेज तुस्ट सायन्स.., स्टडीमध्ये मी बीझी होत गेले आणि दा परत एकटा झाला... पण काही दिवसांपूर्वी मला दा ने कॉल केला खुप हॅप्पी होता.. बोलला ही छान. खूप वेळ अगदी एक- दोन तास आम्ही कॉल वर बोलत होतो."

"आणि सरते शेवटी तुझ्या बद्दल कळलं.. खूप बोलायचा तुझ्या बद्दल. एवढा की माझा कान दुःखे पण याची बडबड नाही.. खूप दिवसांनी त्याच्या आयुष्यात त्याच हक्काचं कोणी तरी आलेल आता मला ही काळजी नव्हती.. मध्यंतरी तुझ्या ऍकसिडे बद्दल कळलं तेव्हा खूप घाबरले होते.. वाटलं तो बाप्पा माझ्या निशु दादाचा आनंद परत हिरावुन तर नाही घेणार ना.. पण बघ ना तु आता माझ्या समोर आहेस."

"खूप खूप थँक्स प्रांजल वहिनी... हो तूच माझी वहिनी आणि मी तुझी लाडकी ननंद कळलं ना...!!" गोड हसुन तिने चक्क मला मिठीच मारली..

"बापरे हे तर काही वेगळच झालेलं.. म्हणजे मी किती चुकीचा विचार करत होते हिचा आणि ही आपल्या आनंदासाठी किती करते आहे." नकळत माझे डोळे भरून आले मी तिला घट्ट मिठी मारली...

मागून निशांत ही आला आणि त्याने ही एकाच हाताने आम्हाला घट्ट मिठित घेतलं...
"चला आता जेवुन घ्या आणि जरा तुम्हाला प्रायव्हसी देते" एवढं बोलून हसत रिया बाहेर गेली.

"किती हे सगळं कन्फ्युजन..." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला..

"काय करणार मॅडम प्यार मे ये करना पडता हें।"

"हो का...??"

"मग काय तुझ्यासाठी रात्री सरप्राईज होत पण रियामुळे गप्प झोपावं लागलं.. पण कोई नई रात को देंगे सरप्राईज..." निशांतने एक डोळा मारला..
नंतर राहिलेलं सगळं जेवण मी शहाण्या मुलीसारख संपवल.


आता वाट बघायची होती ते संध्याकाळची... यासर्वामुळे मी माझा मोबाईल बघायला ही विसरले.. जो नंतर मला निशांतने दिला.. कारण मला कळू नये म्हणून तो बंद करून लपवुन ठेवण्यात आलेला होता...

आणि तो क्षण आलेला.. संध्याकाळ. आजचा दिवस वेगळा होता... आज माझा बर्थडे आणि पाडवा एकत्र आलेला..
आज आजींनी त्यांची आवडती साडी मला नेसायला लावली होती.. सोबत राणी हार.. जो निशांतच्या आईचा होता. त्या साडीला शोभेल अशी छानशी हेअरस्टाईल आईने करून दिली आणि सोबत सॉरी ही म्हटलं.. तिने जो राग-राग केला होता हा ही एक प्लॅनच होता. मी माझ्याच रूममधे होते.. आणि मला बाहेर बोलावण्यात आलं....


समोर काळाकुठ्ठ अंधार.. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता होती... मी त्या अंधारात ही काही दिसत आहे का हे बघत होते.. आणि अचानक कोणी तरी माझा हात धरला... आणि लाईट्स लागल्या समोर निशांत होता.. गुढग्यावर बसलेला. एका हाताने माझा हात धरला होता तर दुसऱ्या हातात डायमेंटची रिंग होती.. तोच ओशन ब्लू कलरचा माझा आवडता शर्ट त्याने घातला होता...
समोर आजी-आजोबा.., आई-बाबा आणि रिया असे सगळे होते..


"मिस प्रांजल प्रसाद प्रधान... आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलं आहे.. म्हणजे बघ ना पहिल्याच दिवशी जिच्याशी भांडण झालं आज तिच्याच सोबत साता-जन्माच्या गाठी जोडल्या जाव्यात.. यालाच म्हणतात डेस्टिनी.. तुझ्यामुळे मला माझे हॅप्पी आजी-आजोबा भेटले... सोबत आई-बाबा ही.. आता बस एक साथीदार हवी जी आयुष्याभर माझी साथ देईल.. होशील का माझी सोबती. देशील आयुष्यभर माझी साथ....??? होशील का मिसेस चिडणीस.???" निशांत भरभर बोलत होता.. आणि माझे डोळे आनंदाश्रूने भरत होते..


"मी एकदा आईकडे तर नंतर बाबांकडे पाहिलं.. दोघांनी ही डोळ्यानेच होकार दिला होता.. हो त्यांनी आमच्या नात्याला होकार दिला होता... काय पाहिजे होत मला अजून आयुष्यात.. आपली फॅमिली आणि आवडती व्यक्ती."


"चला चला आता सेंटीपणा बस झाला केक ही खायचा आहे.." रिया मधेच बोलली तसे सगळेच डोळ्यातल्या आनंदाश्रूसहित हसले. "काय मग प्राजु म्हटलं होतं ना तुला गोड गिफ्ट देणार.., दिल ना..??"

रियाच्या या वाक्यावर मी तर काही बोलूच शकले नाही. तिला एक घट्ट मिठी मारून फक्त "थँक्स" एवढंच काहीसं माझ्या तोंडुन बाहेर आल.

निशांतने ही हातातील रिंग माझ्या बोटात घातली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.. मी जाऊन आईला बिलगली. मग आम्ही दोघांनी मिळून आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतले. नंतर आई-बाबांचे ही.

"आज माधु असता तर हे सुख बघून भरून पावला असता.. बघ रे माधु आपलं स्वप्न खर झालं.." आजोबांच्या या वाक्याने तर सगळेच दुःखी आणि सोबत आनंदी झाले..

नंतर आम्ही केक कापला.. भरवण्याचा कार्यक्रम झाला.. गिफ्ट देणं झालं आणि पाडवा साजरा करायची वेळ आली. आज हक्काने मी निशांतला माझ्याच घरी पाडव्याला ओवळणार होते की ते भाग्य. आणि ते ही लग्नाआधी.. बस किती आणि कसे गणूचे आभार मानू. मघाशी जर रागावलेच पण आता मात्र खूप हॅप्पी होते..

आजींनी आजोबांना ओवाळले.. तर आईने बाबांना.. मी निशांतला आम्ही घेतलेलं सोन्याचा ब्रेसलेट दिला जे त्याला खूप आवडल. बाबांनी आईला छानसे कानातले गिफ्ट केले. तर आजोबांनी आजीला साडी भेट म्हणून दिली होती.

रियाला ही भाऊबीज पर्यंत थांबता येणार नव्हतं म्हणुन आजच तिची भाऊबीज झाली.. निशांतने तिला तिच्या आवडीचा डायमेंटच ब्रेसलेट गिफ्ट केलं होतं.


त्यास नंतर नाही नाही म्हणत कपल फोटो झाले.. आज हक्काने आम्ही एकत्र छान असे फोटो काढत होतो.. रियाने सुंदर क्षण कॅमेरा मध्ये बरोबर टिपले होतेच.. मग सोबत सेफी तर झाल्याचं पाहिजे ना.. आणि ग्रुप फोटोने तो फोटोशूट तिथेच संपला...

रात्रीच जेवण करून मी आणि निशांत दोघेच गार्डनमध्ये गेलो...
"हे घे तुझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आणि हो आम्हा दोघांकडून हा." एक छोटासा बॉक्स माझ्या हातात ठेवला.

"अरे आताच तर रिंग दिलीस ना मग हे कशाला...?? आणि दोघे कोण..??"

"असुदे ग बघ तर काय आहे... मी आणि बाबा"

तो बॉक्स मी उघडला... त्यात एक चावी होती..

"नाही नाही.. तु मस्करी करतो आहेस ना...??" मी निशांतकडे बघत विचारल.. मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की त्यात scooty ची चावी होती.. मी तर उडयाच मारत होते...

"तु वेडा आहेस का...? एवढं महाग गिफ्ट देत का कोणी...?? बाबा पण ना..." मी उड्या मारत निशांतला बिलगले.. मागून बाबा आणि रिया ही आले.. आई च्या हातात पूजेच ताट होत.. मग मला डोळे बंद करून उभं केलं आणि निशांत scooty घेऊन आला..

"घ्या मॅडम तुमची स्वतःची scooty आता रोज याच्या वरूनच कॉलेजला जायचं कळलं का..??" निशांत सर्वांसमोर मला सांगत होता. तस मी त्याला तोंड वाकड करून दाखवलं आणि आईने लगेच त्याची पूजा केली..
बाबांनी नारळ फोडला.. आणि मला बसायला सांगितलं... मग रियाने माझे काही क्लिस काढले...
ते सगळं करून आम्ही वर आलो. आई-बाबांना आणि आजी- आजोबांना गुड नाईट करून आम्ही माजज्या रूममधे शिरलो.

रात्री माझ्या रूममधे मी, रिया आणि निशांत गप्पा मारत होतो कारण रिया उद्या जाणार होती. एकतर कॉलेज आणि त्यात तिने सायन्स घेतल्या कारणाने तिला कॅम्पला ही जायचं होतं. म्हणुन आज आम्ही गप्पा मारत होतो...

रिया आणि निशांत तर अजून ही लहान मुलासारखे भांडत आणि मस्ती करत होते.. आणि मी त्यांना बघत होते..


सुख म्हणजे काय हे आज मला कळलं होतं.. खरा आनंद हा आपल्या जवळच्या लोकांसोबत साजरा करण म्हणजेच खर सुख.
परत परत देवाचे आभार मानत होते की एवढे चांगले आई-बाबा.. आणि समजूतदार लाईफ पार्टनर दिला होता.. मस्ती करता करताच दोघे ही झोपले. तो दिवस अविस्मरणीय गेला होता. झोपलेल्या दोघांच्या ही कपाळावर एक एक किस घेत मी माझा मोबाईल हातात घेऊन सर्वाना थँक्स चे रिप्लाय करत बसले आणि शेवटी मी ही झोपले.


हा पाडवा आणि वाढदिवस खरच खुप आनंद देणारा होता.. कधी ही न विसरता येणारा..



to be continued....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED