एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 5 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 5

अजिंक्य रियाकडे बघून किंचित हसू लागला ..हे बघून रियाला अजिंक्यचा राग येऊ लागला आणि ती बाहेर जायला निघाली ...ती बाहेर जाणारच तेवढ्यात अजिंक्यने तिचा हात पकडत तिला थांबविले ..तिची नजर आताही त्याच्याकडे नव्हती आणि तो म्हणाला

वो मोहब्बत भी क्या
जो हर किसीं से बया की जाये
ये तो हाल है दो दिलो का
जो अकसर जमाना समझ न पाये
हम भी थे कभी डुबे
ऊस दर्द भरी मेहफिल मे
बस फरक इतना है की
हम किसीं से केह नही पाये ..

" तुला उत्तर हवं आहे ना ? ..बस मग इथे ", अजिंक्य म्हणाला आणि ती बाजूच्याच चेअरवर जाऊन बसली ...ती त्याच्याकडे बघू लागली आणि तो म्हणाला , " प्रेम ...किती सुंदर भावना असते ना ? . प्रत्येकालाच आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आयुष्यात कायम असावी अशी इच्छा असते फक्त फरक इतका की काहींच्या इच्छा पूर्ण होतात आणि काहींच्या नाही ..इच्छा पूर्ण न होणार्यातला मीसुद्धा एक होतो ..अशाच एका मुंबईच्या कोपऱ्यावर मला ती भेटली ..तीच नाव मृणाल ..दिसायला अगदी राजकुमारी ..आमच्या पहिल्याच भेटीत मी तिच्याकडे आकर्षिल्या गेलो ..भेटी होत राहिल्या आणि आम्ही अगदी जवळचे झालो ..याच वेळी तिने तिच्या आयुष्याच सत्य सांगितलं आणि माझ्या अंगावर थरकाप सुटला ..सतत पाच वर्षे वडिलांनी केलेला अत्याचार असो की परिस्थितीने तिला वैश्या बनण्यास भाग पाडन असो सर्व काही मनाविरुद्ध झालेल असताना ती जीवन जगत होती आणि शोधत होती असा जीवनसाथीजो तिला तिच्यापेक्षाही जास्त जपेन..अर्थात ते भाव सुद्धा तिला माझ्याशी शेअर करता आले नाही ..आणि त्यावेळी तिला साथ देण्याचं मी ठरवलं ..दिवस जाऊ लागले आणि मीच माझ्या मनातलं तिला सांगितलं प्रेमात पण फक्तसमाजाच्या भीतीने , लोक मला काय - काय बोलतील या भीतीने तिने मला नकार कळविला पण नशिबाने साथ दिली आणि एका व्यक्तीने आम्हाला एकत्र आणलं ..ते म्हणजे आमची मुलगी ..मुलगी तर झाली पण व्यसनाच्या अधीन असल्याने तिला स्वताला सांभाळणं झालं नाही आणि स्वतःचा हात कापून घेतला ..आणि व्यसन सोडण्यासाठी तिला बंगलोरला पाठवलं ..तिनेही तेही केलं फक्त माझ्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी..पूर्ण एक वर्षे आपल्या प्रेमापासून दूर राहणारी ती अगदी मनातच बसली ..ती कायमची ..आता तिला या हृदयातून फक्त माझा मृत्यूच बाहेर काढू शकतो..रिया तुला माहिती आहे मला मिळविण्यासाठी तुला जेवढा त्रास होतोय त्याहीपेक्षा आपला भूतकाळ लपवून प्रत्येक दिवस ती जगते ..मी म्हणेन स्वतःलाच मारते ...तरीही ती जगते आहे आमच्यासाठी ..मला माहित आहे की ती आतून खूप घाबरून असते ..सतत मला गमावण्याची तिला भीती लागून असते पण फक्त माझ्या आनंदासाठी ती स्वताला खुश ठेवते ..रिया तुला हजारो सुंदर मूल मिळतील पण मृणालकडे फक्त एकच अजिंक्य आहे आणि तिला सोडून मी दुसऱ्याच होणं या जन्मी तरी शक्य नाही ..रिया प्रेम म्हणजे मिळविण नसत ग ..प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीला मनात जपून ठेवण ..मग ती शरीराने सोबत असो वा नसो ..मला तुझं प्रेम दिसत नाही अस मुळीच नाही पण तिचा त्याग , तीच प्रेम मला तिच्यापासून दूर होऊ देत नाही ..हा जन्म तिचाच आहे ..तू म्हणशील तर पुढचे सहा जन्म मी तुझा व्हायला तयार आहे पण प्लिज मरण्याच्या गोष्टी नको करू ..मेल्यानंतर हे जग तर सोडून जाशील पण आपल्या इतर खास व्यक्तींना देखील दुखावून जाशील ..सो जग स्वतःच्या प्रेमासाठी ..नक्कीच हा जन्म फक्त मृणालसाठी आहे .."

रिया आताही अजिंक्यकडेच बघत होती ..तिच्या डोळ्यात आताही अश्रू होते आणि टिन्स शांत राहनच पसंद केलं..तिला आता अजिंक्यसमोर राहणं अवघड होऊ लागलं आणि ती आपली बॅग घेऊन लागेच बाहेर पडली ..अजिंक्यही तिच्या मागे - मागे जाऊ लागला ..ती एकटीच रस्त्याने जात होती आणि अजिंक्य कार घेऊन तिच्या बाजूला उभा झाला ..कार समोर थांबल्याने ती तिथेच थांबली ..तो तिला आत येण्याची विनंती करीत होता आणि ती फक्त त्याच्याकडे पाहत होती ..शेवटी ती कारमध्ये बसली आणि दोघेही घराकडे निघाले ..त्याने तिला ऑटो स्टँडवर सोडले ..ती लगेच दार काढून बाहेर जाऊ लागली ..अजिंक्य तिला बाय म्हणत होता पण तिने एकदाही त्याच्याकडे पलटून पाहिलं नव्हतं ..शेवटी ती रिक्षामध्ये बसली आणि अजिंक्य देखील घराकडे निघाला ..अजिंक्य गाडी चालवत तर होता पण रिया स्वताला काही करून तर घेणार नाही याची काळजी त्याला लागून होती ..विचारा - विचारात तो घरी देखील पोहोचला ...

अजिंक्य आज फारच थकून घरी पोहोचला ..तशी मृणाल रोजच दारावर त्याची वाट पाहत असे पण आज ती दारावर कुठेच नव्हती ..अजिंक्य हॉलमध्ये पोहोचला तरीही ती त्याला कुठेच दृष्टीस पडली नाही ..तो आपली बॅग घेऊन बेडरूमला पोहोचला ..मृणाल प्रज्ञाला छातीशी कवटाळून बसली होती ..अजिंक्य बॅग ठेवत म्हणाला , " काय मॅडम आज काही खास आहे का ? ..पिल्लुला कवटाळून ठेवलं आहेस .." त्याच्या शब्दाने ती भानावर आली आणि म्हणाली , " नाही रे पिल्लुची तब्येत खराब झालीये सकाळपासून ..ताप पण आहे खुप म्हणून तिला कवटाळून बसले आहे.. " अजिंक्य हे ऐकताच प्रज्ञाकडे धावू लागला आणि मृणालला म्हणाला , " मग मला कळवायला नको होतं का ? चल हॉस्पिटलला लगेच घेऊन तिला ..बघ तरी किती ताप भरलाय आणि तू बसली आहेस आरामात.." आणि त्याने प्रज्ञाला हातात घेतले ..तेव्हाच मृणाल म्हणाली , " एकदा मोबाइल बघ तरी !!..किती फोन केले मी तुला पण तू रिसिव्हच केले नाही ..असो मी घेऊन गेले होते तिला डॉक्टरांकडे ..तेवढी काळजी आहे मला आपल्या लेकीची..थोडा सर्दीचा ताप आहे दोन दिवसात बरा होईल म्हणाले डॉक्टर सो काळजी नको करू ..ती होईल लवकरच बरी .."

अजिंक्यने प्रज्ञाला मृणालकडे सोपविले आणि एकदा मोबाइल चेक केला ..त्यावर मृणालचे दहा मिस कॉल आले होते पण मोबाइल सायलेंट असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं नव्हतं..तो पुढच्याच क्षणी शांत होत म्हणाला , " सॉरी तुला ओरडलो त्यावर ..कामाच्या ओघात मोबाईलकडे लक्ष गेलं नाही ..सो सॉरी .." आणि ती त्याच्यावर हसत म्हणाली , " नाही रे त्याची गरज नाहीये ..मला माहित आहे तू कामात होतास आणि आपल्या लाडक्या लेकीच्या काळजीनेच बोलला आहेस हे सर्व ..असो सकाळपासून तू जेवण पण केलं नसेल ..तू फ्रेश हो मी वाढायला घेते .." अजिंक्य तिला त्याच क्षणी थांबवत म्हणाला , " तू पिल्लूची काळजी घे ..बाकी करतो मी सर्व .."

ती पिल्लुला हातात घेऊन बसली होती तर अजिंक्य जेवण करून परत आला ..पिल्लुचा अजूनही ताप कमी झालेला नव्हता आणि मृणाल तिच्याजवळच बसून होती ..मृणालला थोडं मोकळं करता यावं म्हणून त्याने पिल्लुला हातात घेतल ..आपल्या लाडक्या मुलीला त्रास होताना पाहून दोघानाही त्रास होत होता आणि दोघेही तिच्या बाजूलाच बसले ..कधीही शांत न बसणारे ते दोघे आज मात्र फक्त तिच्याकडे लक्ष देऊन होते आणि तिला त्रास होत असल्याने प्रज्ञा जोराने रडू लागली होती ...औषध वगैरे दिल्यानंतर पिल्लुला झोप येऊ लागली आणि तेव्हा कुठे दोघांच्याही जीवात जीव आला ..अजिंक्य आज कामामुळे फार थकला असल्याने तो केव्हा झोपला हे त्यालासुद्धा कळाल नाही तर मृणाल दोघांचीही काळजी घेत तशीच जागी होती ..पिल्लू उठेल या भीतीने तिला झोपच येत नव्हती ..शेवटी दोन - तिनच्या सुमारास तिला निवांत झोप लागली ...

सूर्य किरण डोळ्यावर यावे आणि अजिंक्य डोळे चोळत - चोळत निद्रेतून जागा झाला ..मृणाल अंगावर न घेताच झोपी गेली होती ...तो तिच्या अंगावर चादर ओढवत पिल्लूकडे गेला ..ती देखील शांत झोपी गेली होती ..आपल्या पिल्लुच्या कपाळावर ओठ टेकवत तो बाहेर पडला ..
मृणाल उशिरा झोपली असल्याने त्याची तिला त्रास देण्याची अजिबात इच्छा नव्हती ..त्यामुळे फ्रेश होऊन त्याने किचनचा चार्ज घेतला ..चहा बनविल्यावर लगेच नाश्ता बनविण्याची त्याची तयारी सुरू झाली आणि तेवढ्यात दारावर बेल वाजली ..अजिंक्य सरळ दारावर पोहोचला आणि त्याने दार उघडल ..दारावर रिया उभी होती आणि अजिंक्य तिला बघून शॉक झाला ..कालच्या प्रसंगानंतर ती आज सरळ घरीच आल्याने त्याला मनोमन भीती वाटू लागली ..कालची गोष्ट मृणालला माहिती झाली की ती तुटून जाईल हे त्याला माहित होतं म्हणून तो अगदीच चिंतेत पडला ..तो काहीच बोलत नाही हे पाहून रिया म्हणाली , " आता असच बघत राहणार आहेस की आत पण घेशील ? " ..अजिंक्य स्वतःच्याच विचारातून बाहेर आला आणि त्याने तिला आत घेतलं ..रिया आत येताच घराचं संपूर्ण निरीक्षण करू लागली आणि तो तीच निरीक्षण करू लागला ..ती घर बघत असताना अजिंक्य म्हणाला , " सॉरी तुला काय हवं काय नको हे विचारलंच नाही ..बर कॉफी घेणार आहेस का ? " आणि ती पुन्हा थट्टेत म्हणाली , " तुझ्या हातच काहीही चालेल !! विष पण देशील तरी आनंदाने घेईल " ती सहज बोलून गेली होती तरी अजिंक्य मात्र घामाघूम झाला होता ..कदाचित मृणालला गमावण्याची भीती त्याला सतावत होती ..पुढच्याच क्षणी ती सोफ्यावर बसली आणि अजिंक्य कॉफी आणण्यासाठी किचनला पोहोचला ..काहीच क्षण झाले असतील मृणाल झोपेतून उठली आणि बाहेर जाऊ लागली ..मृणाल हॉलमध्ये पोहोचलीच होती की तीच लक्ष रियाकडे गेलं ..आणि नेमकां त्याच वेळी अजिंक्य कॉफीचा कप घेऊन बाहेर आला ..मृणालच रियाकडे लक्ष होत आणि अजिंक्यचे हात थरथर कापत होते ..तो काही बोलणार तेवढ्यात रिया म्हणाली , " सॉरी मृणाल सकाळी - सकाळीच आले तेही कुणालाच न कळविता ..पण तुझ्याशी बोलायच होत त्यामुळे स्वताला सावरू शकले नाही ..सॉरी थोडा त्रास झाला माझ्यामुळे तुम्हाला !! " आणि मृणाल हसत म्हणाली , " त्रास कसला ? ..तू आज पहिल्यांदा घरी आली आहेस ..उलट मला आनंद झाला की तुला भेटायला मिळालं ..पण सॉरी हा ..काल बराच उशीर झाला झोपायला त्यामुळे सकाळी लवकर उठू शकले नाही ..तू कॉफी घे मी येतेच लवकर आवरून " ..मृणाल अजिंक्यकडे कटाक्ष टाकत फ्रेश व्हायला निघून गेली आणि अजिंक्यला कळून चुकलं की रियाच्या सकाळी - सकाळी येण्याने तिला राग आलाय ..तरीही त्याने रियाला कॉफी ऑफर केली आणि तिच्या जवळ जाऊन बसला ..रिया कॉफी घेता - घेता म्हणाली , " अजिंक्य जीच्याबद्दल माझ्याकडे सतत बोलत असतो आज त्या मुलीच दर्शन नाही देणार का ? अरे कुठ आहे तुझं पिल्लू ..? " आणि तो हसत म्हणाला , " अग तिची तब्येत बरी नाही म्हणून झोपून आहे ..उठली की भेटवेन तुला ..काल पासून तिला ताप आहे त्यामूळेच मृणाल पण रात्रभर झोपली नाही .." त्यांच्यात गप्पा सुरूच होत्या की मृणाल कॉफीचा कप हातात घेत हॉलला पोहोचली आणि अजिंक्य अचानक शांत झाला ..आणि तेव्हाच रिया म्हणाली , " काय रे अजिंक्य बायकोला घाबरतोस का ? ..बायको आली की लगेच शांत झालास म्हणून म्हटलं .." आणि ती आपल्याच बोलण्यावर जोराने हसू लागली ..मृणालदेखील तिच्यासोबत सामील होऊन हसू लागली ..रिया आज वेगळीच भासत असल्याने अजिंक्यच्या पोटात गोळा उठू लागला ..त्याच हृदय जोराजोराने धकधक करीत होत पण त्याने ते दोघानाही कळू दिलं नाही ..आपली द्विधा मनस्थिती कुणालाच कळू नये म्हणून मृणालला तिथेच बसवून तो नाश्ता आणायला किचनला गेला ..नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे असल्याने त्याने पोहे भिजवायला टाकले होते आणि त्याने नाश्ता बनवायला घेतला...तो जरी किचनमध्ये असला तरीही त्याच संपूर्ण लक्ष या दोघींच्या बोलण्याकडे होत ..त्यामुळे लवकरात लवकर नाश्ता बनवून त्याला तिथे पोहोचावस वाटत होतं .नाश्ता बनवेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता ..शेवटी एकदा नाश्ता झाला आणि तो लगेच घेऊन बाहेर आला ..

त्या दोघींनि नाश्ता घ्यायला सुरुवात केली आणि अजिंक्य अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला ..पिल्लुच्या रडण्याचा आवाजाने ते दोघेही बेडरूमला पोहोचले होते ..सुमारे वीस - पंचवीस मिनिटे त्या दोघीही हळू आवाजात काहीतरी बोलत होत्या ..अजिंक्यला आवाज येऊ नये म्हणून त्यांनी दार देखील लावून घेतलं ..अजिंक्य अंघोळ करून बाहेर आला तरीही त्यांचं बोलणं काही संपलं नव्हतं ..हलक्या आवाजात त्यांच्यात काहीतरी बोलणं सुरू होत पण त्याला काहीच ऐकू येत नसल्याने त्याला अधिकच भीती वाटू लागली ..त्याने घड्याळात बघितले तेव्हा साडे नऊ वाजले होते ..ऑफिसला जायला उशीर होत असल्याने त्याने लगेच नाश्ता करून घेतला आणि रियाला बाहेर बोलावलं ..बऱ्याच वेळानंतर त्या दोघी बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णतः बदलले होते पण कुणालाही काहीही विचारण्याची त्याची हिम्मत होत नव्हती ..त्याने अगदी दहा मिनिटात सर्व तयारी आटोपली आणि गाडीकडे पोहोचला ...त्याला इतकं टेंशन आलं होतं की पिल्लुला किस्सी करण्याचं पण तो विसरला होता ..जाताना रियाने पिल्लुची पप्पी घेतली आणि तो देखील पिल्लुची पप्पी घेऊन कारमध्ये बसला ..

कारमध्ये दोघे निघाले पण त्यांच्यात काहीच बोलत नव्हतं ..होती ती निरव शांतता ..एक तर ती काही बोलायला तयार नव्हती आणि अजिंक्यचा घसाही कोरडा पडला होता ..पण विचारन देखील भाग होत आणि त्याने हिम्मत करून तोंडून पहिला शब्द काढला ..


क्रमशः ....