एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 9 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 9

त्याला बघून मृणालचे हात - पाय थरथरायला लागले होते ..आणि तो अधिकच जवळ येऊ लागला ..ती तिथेच स्तब्ध उभी होती आणि तिने अजिंक्यच्या हाताची पकड अधिकच मजबूत केली ..तो तिच्या समोर येत म्हणाला , " मी थोड्या वेळेपूर्वीच तुला बघितलं पण तूच आहेस की नाही याची शंका होती म्हणून बोलू शकलो नाही ..किती दिवस झालेत मी तुला वेड्यासारखं शोधतोय ..नंबर पण बदलून घेतला आहेस आणि फ्लॅटला पण लॉक आहे ..आहेस तरी कुठे आणि काम देखील मधातच सोडून गेलीस .."

ती आताही फक्त त्याच्याकडे पाहत होती ..आणि त्या व्यक्तीला तिच्यासोबत अजिंक्य आहे याचसुद्धा भान नव्हतं ..तो पून्हा एकदा म्हणाला , " आता बोलणार आहेस का ? " ..परंतु ती आताही तशीच होती..तीच संपूर्ण अवसान गळून पडाल होत त्यामुळे मुखातून एक शब्द देखील बाहेर पडत नव्हता आणि पुन्हा अजिंक्यला पाहून तोच बोलून गेला , " आता समजलं खर कारण ..हाच आहे तर खर कारण " तो समोर काही बोलणार तेवढ्यात मृणाल लगबगीने बोलून गेली .." तो माझा नवरा आहे तेव्हा सांभाळून बोल .."

ती फार रागात बोलून गेली आणि तो तिच्याकडे पाहू लागला ..दोन्ही बाजूनी शांतता पसरली आणि ती शांतता मोडीत अजिंक्यच म्हणाला , " अरे मला बघून इतके शांत का ? ..सॉरी मित्रा मला तुझं नाव नाही माहीत आणि तू कोण आहेस हेदेखील माहिती नाही पण तू शांत का आहेस याच उत्तर मात्र माझ्याकडे आहे ..तिचा भूतकाळ जाणूनच मी तिच्याशी नात जोडलं आहे सो तुम्ही दोघेही बिनधास्त बोलू शकता .." अजिंक्यच बोलणं थांबल होत ..मृणाल स्वताला सावरत म्हणाली , " सॉरी सौरभ माझा भूतकाळ समोर आला म्हणून घाबरले त्यामुळे काहीच बोलू शकले नाही ..मी चुकले ..तुला मी जाताना सांगायला हवं होतं पण सर्व काही इतक्या घाईत घडलं की सांगताच आलं नाही ..पण मी आता खुश आहे ..स्वताच कुटुंब आहे आणि त्यासाठीच जगते आहे आणि पुन्हा त्या दलदलीत यायचा विचार पण डोक्यात नाही .. सौरभलाही काय बोलू काय नाही अस व्हायला लागलं ...आपण अजिकयच्या भावना तर दुखवल्याच त्यासोबतच मृणालला नकळत त्रास दिला याच त्याला वाईट वाटू लागलं आणि तो काहीच न बोलता समोर जाऊ लागला ..काही पावले त्याने टाकलीच होती की तो मागे पलटला आणि मृणाल जवळ येत म्हणाला , " सॉरी मृणाल ..खर तर तू ज्यावेळी मला भेटली होती त्यावेळी मी तुला कुठल्याही प्रकारे मदत करू शकलो असतो पण माझा स्वार्थ साधण्यासाठी मी तुला या व्यवसायात खेचून आणलं ..तुही परिस्थितीने ते स्वीकारलं पण आज तुझ्या लग्नाचं एकूण फार बर वाटल विशेष म्हणजे तुझा भूतकाळ स्वीकारून तुझी साथ देणाऱ्या साथीदारांचा फार आदर वाटतोय ..मी केलेल्या चुकीची परतफेड शक्य नाही पण तरीही माफी मागतोय ...आणि आज प्रामाणिकपणे सांगतोय की तुला भविष्यात माझी कधीही गरज पडली तर हक्काने सांग कदाचित मला माझं पाप फेडता येईल .." तो एवढं बोलून आलेल्या पावलानेच परत जाऊ लागला ..आतापर्यंत घाबरणारी मृणाल त्याच्याकडे पाहून हसत होती आणि अजिंक्यला म्हणाली , " शैतान को सुधरते पहली बार देखा है ..जो कधी माझ्या शरीरासाठी आसुसला असायचा ..ज्याला माझ्या शरीराच व्यसन झालं होतं..आज तोच डोळ्यात पाणी आणून बोलत होता यावर विश्वास बसत नाही .." आणि अजिंक्य तिला चिडवत म्हणाला , " ते सर्व ठीक आहे पण आणखी काही वेळ माझा हात असाच धरून राहिलीस तर हातच तुटून जाईल याचा मला पूर्ण विश्वास आहे .."तो बोलून तर गेला पण ती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली ..अजिंक्य कसतरी तिचा हात सोडवत समोर धावू लागला तर मृणाल त्याला मारण्यासाठी मागे धावू लागली ..त्या शांत समुद्र किनारी प्रेयसी - प्रियकरासारखे ते मुक्तपणे वावरत होते आणि आजूबाजूचे लोक त्यांना पाहून हसत होते तरीही तिने त्याच्या मागे धावन थांबविल नव्हतं ..तिच्या पैंजनाच्या आवाजांनी त्या शांत वातावरण सप्तसुर छेडीले आणि हा समुद्रदेखील त्यांच्या प्रेमात सामील झाला होता ..काय जादू होती त्यांच्या नात्यात माहिती नाही पण क्षणात एकमेकांना समजून घेत होणाऱ्या त्रासातून मुक्त करायचे ...

दुसरा दिवस ..

दुपारला बारा वाजता काकूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता ..काकू नेहमीप्रमाणेच साधी साडी परिधान करून तयार होऊ लागली होती तर इकडे मृणाल आणि काकूंची वाट पाहून अजिंक्य थकला होता ..त्याला सोहळ्याची अति घाई झाली होती ..काहीच क्षणात काकू - मृणाल दोघ्याही बाहेर आल्या ..काकूंच्या स्नेहीची आश्रमात गर्दी जमली होती ..त्यातला प्रत्येक व्यक्ती त्यांना शुभेच्छा देत होता ..गेली 30 - 40 वर्षे त्यांनी या आश्रमाला आपलं जीवन दिलं होतं ..पुरस्कारदेखील भरपूर भेटले होते पण एकदाही पुरस्कार घ्यायला त्या गेल्या नव्हत्या ..आज पहिल्यांदाच त्या पुरस्कार स्वीकारणार असल्याने सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू केला आणि काकूही डोळ्यावरून हात फिरवत त्या अमूल्य शुभेच्छा स्वीकारू लागल्या ..काहीच क्षणात मृणाल - काकू गाडीजवळ पोहोचल्या ..तर अजिंक्य आधीच गाडी चालविण्यास सज्ज झाला होता ..काकूंना बाहेर सोडायला भरपूर लोक आले होते ..त्या गाडीत बसल्या आणि बाकी सर्व पून्हा आपल्या कामात व्यस्त झाले ...काकू आज खूपच शांत होत्या ..कुणीही कुणाशी बोलत नव्हतं आणि त्याच वेळी मृणालने प्रज्ञाला काकूंच्या हाती सोपवल ..तिच्या इवल्याश्या हसुने काकू तिच्यात हरवून गेली ..तिचा शांत स्वभाव हा तसा नेहमीचाच पण आज त्यातही काहीतरी वेगळं जाणवत होतं हे पाहून मृणाल म्हणाली , " आई काय झालं ? आज इतक्या शांत का ? ..तुम्हाला बर नाही का ? " काकू मृणालकडे पाहत म्हणाली , " नाही ग बाई मी ठीक आहे ..सर्वांचं प्रेम पाहून भावुक व्हायला झालं ..मला माहित होतं या क्षणी माझी अशीच अवस्था असेल म्हणून तुम्हाला बोलवून घेतलं ..तुम्ही सोबत असाल की मलाही हिम्मत मिळेल .." काकू इतक्याच बोलल्या आणि वातावरण पुन्हा एकदा शांत झाल..कारमध्ये फक्त प्रज्ञा एकटीच होती जीचा आवाज कारमध्ये घुमत होता आणि काकूंही तिच्या खोडकरपणात हरवत चालली होती ..काहीच क्षणात गाडी नाट्यमंदिराजळ पोहोचली जिथे काकूंचा सत्कार ठेवण्यात आला होता ...

काकूंना बघताच आयोजक धावतच त्यांच्याकडे पोहोचले ..संपूर्ण सन्मानानीषी त्यांनी काकूंला आत नेल ..कार्यक्रम सुरू व्हायला फक्त काही क्षणच बाकी होते ..अजिंक्य - मृणाल खाली चेअरवर बसले होते ..त्याच वेळी सर्व सन्माननीय पाहुण्यासोबत काकूंचे आगमन झाले आणि नाट्यमंदिरात बसलेला प्रत्येक श्रोता तिच्यासाठी उभा होऊन टाळ्या वाजवू लागला ..तिनेही सर्वांचे आशीर्वाद स्वीकारून आपले स्थान ग्रहण केले ..कार्यक्रमाला सुरुवात झाली होती ..आयोजकांनी वेगवेगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या होत्या ..सर्वांचं स्वागत होऊन काहींचे मनोगत देखील झाले होते ..आणि आता ती वेळ होती ज्यासाठी प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत होता ..काकूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत होता आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कार्यासाठी स्वताला ऋणी मानत होता तर काकूंच्या डोळ्यात आसवांनी घर केलं ..काकू माईकवर पोहोचल्या ...स्वतःच्या अश्रूंना रुमालाने साफ केलं आणि ती म्हणाली , " या क्षणी काय बोलू तेच कळत नाहीये ..खूप कठीण होता हा प्रवास ..एका कचराकुंडीत एके दिवशी एक तान्हुली सापडली ..तिची अवस्था फारच वाईट असल्याने मी तिला घरी घेऊन आले ..या समाजात तिला स्वीकारणार कुणीच सापडलं नाही म्हणून तिला दत्तक घेण्याची ईच्छा बाळगली ..तेव्हा मी नौकरिवर होते ..पण लग्न झालेल नसताना एखाद्या मुलीला दत्तक घेणं घरच्यांना आवडलं नाही आणि त्यांचा हा निर्णय मला आवडला नाही ..म्हणून फक्त तिच्यासाठी घरच्यांना सोडलं ..तिच्यासाठी जरी घर सोडलं असलं तरीही तिची साथ मला जास्त काळ लागली नाही ..तिला कचराकुंडीत फेकून दिल्याने तिच्या डोक्याला फार जखम झाली आणि प्रयत्न करूनदेखील मी तिला वाचवू शकले नाही ..त्यादिवशी मी खूप रडले ..प्यार किया तो डरणा क्या म्हणणारे लोक शारीरिक संबंधातून जन्म घेणाऱ्या संततीला बाहेर का फेकून देतात ? त्या छोट्याश्या मुलांना जगण्याचा हक्क नसतो का ? त्यांनाही आईवडिलांच्या प्रेमाची माया आवश्यक नसते का ? असे कितीतरी प्रश्न त्याक्षणी मला पडले आणि माणूस म्हणून जगण्याची लाज वाटू लागली ..नौकरी करीत असताना काही मित्र सोबत होते ..त्यांनिही असे बहुतेक प्रसंग एकविले आणि मन बेचैन होऊ लागलं ..या मुलांसाठी काहीतरी करावं हा विचार मनामनात बसला आणि अगदी त्याच दिवशी मी राजीनामा देऊन मोकळी झाले आणि आपलं संपूर्ण आयुष्य या छोट्या मुलांसाठी अर्पण केलं ..या सुरुवातीच्या प्रवासात काही मित्रांनी साथ दिली ..आणि त्यातूनच आश्रम तयार झालं ..

खूप सोपा नव्हता तो प्रवास ..पण एक - एक व्यक्ती जुळत गेला आणि आश्रमाला मायेचा आधार मिळाला ..आश्रम घर बनलं आणि इथे प्रत्येक तान्हुला आपला आनंद शोधू लागला आणि मी लग्न झालेल नसतानाही आई बनले ..एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की मी पुरस्कार स्वीकार करायला कधीच येत नाही मग आज कशी काय आले ..यातही माझा स्वार्थच आहे ..भरपूर वर्षे हा भार सहन केला पण आता वय साथ देईना ..आणि वरून केव्हाही बोलावण येऊ शकत तेव्हा आता वेळ आहे या आश्रमाला दोन सुदृढ हाताची ..जे हात पैशाकडे जाणार नाहीत तर त्या लहानाचे अश्रू पुसण्यास समोर जातील ..त्यामुळे आज मी माझ्या मुलांना म्हणजेच अजिंक्य - मृणालला या आश्रमाची जबाबदारी सोपवते आहे ..पुन्हा एक प्रश्न पडला असेल की अजिंक्य - मृणाल कोण ? ..प्रत्येक व्यक्ती तरुण वयात उत्साही असतो त्यामुळे वेळ कसा जातोय याबद्दल त्याला माहिती पडत नाही पण जेव्हा ती व्यक्ती म्हातारी होते तेव्हा जीवन अपूर्ण वाटत जात आणि आपल्याला मूल का नाहीत याची खंत वाटू लागते ..या स्थितीत असतानाच माझी भेट अजिंक्यशी झाली ..कुठल्याही क्षणी मदतीला धावून येणारा तो मुलगा माझा फार जवळचा झाला आणि त्यांनतर तो माझ्याही जीवनाचा अविभाज्य भाग झाला ..आर्थिक मदत असो की शारीरिक की कुठलीही तो माझ्यासाठी हजर असतो ..मला खात्री आहे माझ्यानंतर तोच आश्रमाची काळजी घेईल ..आणि विशेष म्हणजे मला आता नातही आहे तेव्हा स्वताच या जबाबदारीतून मुक्त होऊन आई , आजी होण्याचा आनंद अनुभवायचा आहे ..हेच कारण होत की मी आज इथे आहे ..मला वाटत फार जास्त बोलणं लांबल त्यामुळे मी इथेच थांबते ..तुम्ही दिलेल्या अपार प्रेमाबद्दल सदैव ऋणी असेल .."

काकूंच बोलणं झालं तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि हात टाळ्या वाजविण्यात व्यस्त होते ..ती खाली उतरणार तितक्यात अजिंक्य तिच्याकडे धावत गेला आणि आज तिच्या कमजोर होऊ लागलेल्या खांद्याना पून्हा एकदा साथ देऊ लागला ..काकू घरी जायला आतुर झाली होती आणि गाडीत बसली ..मृणाल तिथे नसल्यानें ती अजिंक्यला त्याबद्दल विचारत होती पण त्याने कशीतरी वेळ मारून नेली ..अजिंक्यने काकूंसाठीं काहीतरी प्लांनिंग केलं असल्याने तो तिला सरळ आश्रमात घेऊन जाऊ शकत नव्हता त्यामुळे बहाणा करून तो तिला समुद्रकीणारी घेऊन गेला ..तीही आज बऱ्याच दिवसांनी समुद्रकिनारी पोहोचली ..आणि त्या अथांग समुद्रासोबत ती एकांतात हरवली ..काकू खालीवर जनरून त्या लाटांकडे पाहत होत्या..जणू त्यांनीच तिला जगायला शिकवल होत आणि ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त झाले ..

काकू तिथे एकट्याच बसून होत्या तर अजिंक्य दम टाकत काकूंकडे भेळ घेऊन पोहोचला ..काकूना भेळ देत तो तिच्याजवळ बसला आणि काकू म्हणाल्या , " अजिंक्य मी आजपर्यंत कुणाशी एक गोष्ट कधीच बोलले नाही पण आज तुला सांगते आहे ..जेव्हा ती चिमुकली पहिल्यांदा हातात आली तेव्हाच आई होण्याचा आनंद अनुभवू लागले होते पण त्याच वेळी तिची तब्येत बिघडली..मीही तिला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ती नाहीच वाचली ..तेव्हा एक आई नसतानाही आईच्या वेदना काय असतात ते मला जाणवू लागल ..पण बाळा हा समाज असा कसा रे निष्ठुर ??..इथे लोक आनंद मिळविण्यासाठी शारीरिक संबंध तर ठेवतात पण त्या शारीरिक संबंधातून जन्मलेल्या मुलांना आश्रमात फेकून देतात ..जर अनैतिक संबंध चालतात तर मग अनैतिक बाळ का नाही चालत ? त्यांना वाटत का त्यांचं बाळ इथे सुरक्षित राहील ?..आजच्या काळात जिथे बाळ आपल्याच आईवडीलाकडे सुरक्षित राहत नाही तर आश्रमात सुरक्षित राहील हे शक्यच कस ? ..या प्रवासात बहुतेक आईवडील असे सापडले ज्यांना आपल्या मुलीचा खर्च सांभाळता येत नाही आणि त्यांनी आश्रमाचा रस्ता धरला ..पण मला एक प्रश्न पडतो की त्या आईवडिलांना हे बाळ होण्याआधी कळत नाही का ? किती त्रास होतो रे त्यांना ? नाही समजू शकणार हा समाज ..ज्या वयात प्रत्येक मुलाचे हट्ट पुरविले जातात त्या वयात हेच मूल आई कुणाला म्हणावं हे शोधत असतात ...बर तेही मान्य पण आश्रम देखील वयाच्या 18 वर्षापर्यंत काळजी घेत आणि मग त्यांचं काय ..इथे मूल 25 वर्षे होतात तरी त्यांना नौकरी नसते मग त्यांचं काय होत असेल ? ..तरीही हे निर्दयी लोक असे का वागतात ? " ..काकू अजिंक्यच्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रू गाळत होती आणि अजिंक्य म्हणाला , " काकू याच उत्तर माझ्याकडे नाही..कदाचित आजच्या स्त्रीला या प्रश्नाचं उत्तर देता येईल .कारण अनैतिक संबंध ठेवायला जर ती हिम्मत गोळा करू शकते ( नऊ महिने आपल्या मुलाला जपण्यास काय हरकत आहे .स्त्री यासाठी कारण त्या बाळाला नऊ महिने तीच पोटात ठेवते ).आणि तसही समाजाच्या नजरेत पडन केव्हाही बर कारण तुम्ही एका निर्दोष बालकाला स्वतापसून दूर करून आधीच स्वतःच्या नजरेत पडले असताना खरच समाजात ताठ मानेने जगू शकणार आहात ? ए आई !! तुला माहिती आहे याबाबतीत मृणाल मला फार आवडते ..ती मला त्यावेळी म्हणाली होती की तू नाही म्हणालास तरी या बाळाला मी जन्म देणार आहे आणि स्वताच मोठं करेन ...परिस्थितीने गांजलेल्या एका वैश्येला ही गोष्ट समजू शकते आणि समाजात चुकीच वागून नाक वर ठेवणाऱ्या स्त्री पुरुषांना ही गोष्ट का कळत नाही हे विचित्र आहे न ? आणि काकू शांत होत म्हणाल्या , " काय करणार ..पण बर वाटल तुझ्याशी बोलून आणि बर का मी आता हे जग सोडायला मोकळी आहे ..मी आता निश्चित आहेस करण तू आहेस यांची काळजी घ्यायला .." आणि अजिंक्य तिच्यावर ओरडत म्हणाला , " काहीही बोलतेस तू ..आणखी खूप जगायच आहे तुला ..तुझ्यानंतर मी बघेन हे सर्व आवडीने आणि पुन्हा अस काही बोललीस ना तर कधीच भेटायला येणार नाही .."

काकू त्याची अशी समजूत काढताना हसू लागल्या ..एव्हाना अजिंक्यच्या मोबाइलवर मृणालचा मॅसेज येऊन धडकला आणि तो मनोमन खुश होऊन काकूंला सोबत घेऊन आश्रमाकडे निघाला ...


क्रमशः ...