Addiction - 2 - 1 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 1

के जिंदगी ने कुछ ऐसी
लेली है इक करवट
के अब बहोत कुछ पाकर भी
सब कुछ अधुरा सा लगता है ...

उगवता सूर्य हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नव्याने जगण्याची आशा निर्माण करून जातो ..हे सुर्यदेवता तुही माझ्या आयुष्यात नवीन सकाळ घेऊन यावी हीच प्रार्थना तुझ्यासमोर करते आहे ..पुन्हा एकदा मुंबई आणि मागे बराच काळ लोटलेला ..

किलबिल अनाथआलंय ..आजूबाजूला छोट्या - छोट्या मुलांचे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊ लागलं होतं ..दोन दिवसाआधीच इथे एका मुलाला आणण्यात आल ..बिचार्याला त्याच्याच घरच्यांनी कचरा कुंडीत फेकून दिल होत ..आमच्या एका सहकार्याने त्याला रात्रीच इथे आणलं आणि तो या जगाचा भाग झाला ..खूपच गोड ..काळ्या - सावळ्याशा त्या चिमुकल्याने सर्वांच्या मनात घर करायला सुरुवात केलीय ..मग मोठे असो की लहान सर्वच उठल्यापासून त्याच्या बाजूला घोडका करून उभे राहतात ..अजून नाव ठेवलं नाही पण विचार करतोय की त्याच नाव प्रेम ठेवुयात ..." प्रेम " असा एक शब्द जो प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद देऊन जातो आणि कधीकधी व्यक्तीच्या रुपात तो जन्म घेऊन नकोशा असलेल्या व्यक्तींना देखील आपलंस करून जगण्याच महत्त्व शिकवून जातो .....या शब्दाला अंत नाही .याची सुरुवात केव्हा होते ते देखील सांगता येत नाही ..तो नदीप्रमाणे सदैव वाहत राहतो कधी कुणाच्या तर कधी कुणाच्या आयुष्यात ..असा हा शब्द " प्रेम " ....

मी स्नेहा प्रेम सहस्त्रबुद्धे ..कुमुद आजी अचानक हे सुंदर जग सोडून गेल्या आणि त्यांच्या लाडक्या मुलाच्या मुलीवर( म्हणजे माझ्यावर ) या आश्रमाची जबाबदारी येऊन पडली ..जबाबदारी प्रेमवर का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे ..ज्याच उत्तर मी स्वताच शोधते आहे ..कदाचित मागील काही वर्षात अस काही घडत गेलं की विश्वास बसेना आणि त्याच क्षणी मी आले ..पुन्हा एकदा मुंबईला ..जिथून प्रेम - श्रेयसी यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती आणि माझा जन्म झाला ..बराच विचार केला इथे यावं की येऊ नये पण आयुष्याने स्वताच इथे खेचून आणलं त्यामुळे आता हेच माझं विश्व आणि हे शहरच माझं सारथी झालंय .. एक नक्की या शहरात माझ्या आईवडिलांच्या काही प्रेमळ आठवणी आहेत ज्या कदाचित मी विसरू शकणार नाही ..म्हणून हे शहर आता आपलंसं वाटू लागल आहे ..

विचारात गुंतलेच होते की मीरा आश्रमात येताना दिसली ..मीरा माझी जिवलग मैत्रीण ..जेव्हापासून इथे आले तेव्हापासूनच तिच्याशी ओळखी झाली आणि आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी झालो ..मीरा जवळ येत हात मिळवू लागली आणि मी तिला समोर चेअरवर बसविल ..ती समोर बसली आणि तिची नौटंकी सुरू झाली आणि ती बोलू लागली , " हॅलो .....हॅलो ...मिस स्नेहा आज फक्त वयाच्या 24 व्या वर्षी उत्तम लेखिका म्हणून नावारूपास आल्यामुळे तुम्हाला आनंद तर होत असेलच " आणि मीही तिला उत्तर देत म्हणाले , " थोडा थोडा होतोय पण आपण असेच वागत राहिलात तर पूढे आपल्याला आश्रमात येण्याची परवानगी नाकारली जाउ शकते हे लक्षात घ्याव .."

आता ती कानाला हात पकडत म्हणाली , " सॉरी ना !! पण खरंच खूपच सुंदर होती कथा ...काल सुट्टी होती तेव्हा वाचली ती कथा " एडिक्शन - द स्टोरी ऑफ अनडीफाइन लव्ह " ...सुमारे 8 - 9 तास डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते ..मधात वाटायचं की नको वाचूयात आता ही कथा पण वाचल्याशिवाय राहवतसुद्धा नव्हतं आणि मी वाहवत गेले ..शेवटी कथा संपली तेव्हा डोळ्यातले अश्रू तसेच होते फक्त फरक एवढाच की मन समाधानाने तृप्त झालं ..मनाचा कोपरा नि कोपरा हादरला .. आय मस्ट से डिअर यु आर ग्रेट व्रायटर पण कथा वाचताना एक प्रश्न पडला ..स्नेहा ही खरी कथा आहे का ग ..? "

आता मी थोडी फार हसू लागले होते कारण या प्रश्नाचं उत्तर स्वतः माझ्याकडेच नव्हतं किंवा होत पण मला ते द्यायचं नव्हतं त्यामुळे फक्त शांत बसले ..तिला माझं उत्तर कळून चुकलं..आम्ही काही वेळ गप्पा मारत बसलो आणि ती घरी परतली ..

ती परतली आणि डोक्यात विचारांच तुफान उठल .." एडिक्शन - द स्टोरी ऑफ अनडीफाइन लव्ह " हे पुस्तक लिहिलं आणि अगदी काहीच दिवसात त्या कथेने सर्वांच्या मनात घर केलं ..प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतोच जेव्हा कथेत सांगितलेल्या गोष्टीला त्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच ती कथा सर्वांच्या हृदयाच्या जवळची झाली आणि मी पहिल्याच प्रयत्नात लेखिका झाले ..मी त्या पुस्तकाची पहिली प्रत रूममध्ये सांभाळून ठेवली होती कारण ती कथा कुठेतरी माझ्या जवळची आहे..त्यामुळे त्या कथेकडे नकळत ओढल्या गेले ..रूममध्ये प्रवेश केला आणि कपाटातून ते पुस्तक काढलं आणि निवांत वाचता यावं म्हणून आतून रूमच दार लावून घेतलं ..पुस्तक हातात धरून बघू लागले . ..मुखपृष्ठावर नायक आणि नायिकेच चित्र होत ..ज्यात नायिकेने नायकाला मिठी मारली असते पण प्रत्यक्षात तो तिथे नसतोच ..असते फक्त त्याची छाया ..माझ्या डोळ्यात अगदीच अश्रू येतात आणि मी पुस्तकाच पहिल पेज वाचायला घेते ..

आणि कथा सुरू होते ...

ही कथा आहे मृणाल आणि अजिंक्य यांच्या प्रेमाची ( कथेत एक नवीन विषय सादर करता यावा म्हणून मी फक्त तीन पात्रांची नावे बदलली आहेत आणि ती का बदलली आहेत ते शेवटच्या भागाला नक्कीच कळेल ) ...जे सोबत नाहीत तरीही एकमेकांची मने मात्र तितकीच जुळून आहेत ..

कथा सुरू होऊ लागते आणि मी पहिल्याच क्षणी त्यात गुंतू लागते ..

दो दिलो का सफर कुछ ऐसा है
कुछ यादो का सफर कुछ ऐसा है
मोहब्बत करणे वाले मिल गये ऐसें की
दुरियो को भी प्यार का एहसास है


अजिंक्यला मुंबई सोडून जवळपास सहा महिने झाले आहेत ..ते थंडीचे दिवस होते ..सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती आणि पहाटे - पहाटेच अजिंक्य - मृणाल पायी सैरवर निघाले ..मुंबईहून परत आल्यावर त्यांनी आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली ..कुठलाही भूतकाळ नव्हता की नव्हत कुठलं दुःख ..मृणालला हक्काचं कुटुंब मिळालं आणि आई - वडील तिची पुरेपूर काळजी घेत होते त्यामुळे तिचा चेहरा नेहमीच खुललेला असायचा ..दोघेही बाहेर निघाले .. त्यांची मुलगी आताही झोपूनच होती ..बहारदार निसर्गात प्रवेश करताच निसर्गानेही त्यांचं स्वागत केलं ..दोघेही एकमेकांच्या हातात हात टाकून सैरवर निघाले ..बाहेर धुके पसरल्याने आजूबाजूच फार काही दिसत नव्हतं त्यामुळे अजिंक्य अगदीच रोमँटिक होऊ लागला ..मृणाल कुणीतरी पाहिलं म्हणून त्याला सावरत होती पण तो आज काहीच एकण्याच्या मूडमध्ये नव्हता ..एखादी व्यक्ती समोर दिसली की तो लगेच हात सोडून द्यायचा .त्यामुळे मृणाल त्याच्यावर हसू लागली ..गवंतांवर दवाच साम्राज्य पसरल होत आणि मृणाल आपल्या पायांनी त्याना स्पर्श करू लागली ..तिच्या पैंजनाच्या आवाजांनी वातावरण सुमधुर झालं होतं आणि अजिंक्य आणखीच तिच्या प्रेमात पडू लागला ..हळूहळू रस्ता सर करत ते समोर - समोर जाऊ लागले ..हळूहळू गार वारा येऊ लागला आणि वाऱ्याने मृणालचे केस उडू लागले ..तिला पाहूनच अजिंक्य तिच्यात हरवत गेला ..बाजूला वाऱ्याच्या झोक्याने झाडाची पाने डोलू लागली होती ..आणि मृणाल त्यांना स्वतः स्पर्श करून त्या क्षणांना आणखी खास बनवू लागली ..त्यांच्या प्रेमाला निसर्गही पुरेपूर साथ देऊ लागला होता ..जणू हे गीत आज त्यांच्यासाठीच बनविल्या गेलं होतं ..

धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडित जाऊ आज प्रित साजणा
थंडी गुलाबी हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा

रुपेरी उन्हात धुके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
असा हात हाती तू एकसाथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा..

धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा

दवाने भिजावे इथे झाड वेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी ये बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रीत साजणा

धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा
थँडी गुलाबी हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा .
धुंदीत गाऊ ..उ ..उ ...उ ...उ ...

मृणाल समोर चालत होती आणि अजिंक्य अचानक तिच्यासमोर जाऊन गुडघ्यावर बसला आणि हे पाहून ती म्हणाली , " काय नवरोबा असे का बसला आहात ? " , आणि अजिंक्य उत्तरला , " मृणाल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ..खूप म्हणजे खूप ..प्लिज माझ्या गालावर तुझ्या ओठांची मोहोर उमटवना !! " मृणाल आता फारच लाजली होती ..अजिंक्य गुडघ्यावरून उठून तिच्याकडे जाऊ लागला आणि ती जोर्याने पळू लागली ..अजिंक्यही तिच्यामागे पळू लागला ..पण ती काही त्याला सापडली नाही शेवटी तो निराश होऊन तिच्याकडे पाठ करून उभा राहिला ..तो असा उभा असताना मृणाल मागूनच त्याच्या जवळ आली आणि त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि पुन्हा एकदा जोराने पळू लागली ..अजिंक्य पुन्हा तिच्याकडे पाहू लागला होता आणि समोरच्या वाटेवरून राणे काकूंचा आवाज आला , " अजिंक्य मी काहीच नाही पाहिलं हा ..तुमचं चालू द्या " हे ऐकताच मृणालने आपल्या डोळ्यावर हात ठेवला आणि अजिंक्य म्हणाला , " हो काकू सांगा न तस माझ्या बायकोला !! मला सांगून काय फायदा .मी केव्हांच सांगतोय पण ती काहीच ऐकायला तयार नाहीये ..." काकूंना अजिंक्यचा हा स्वभाव खूप जवळचा होता त्यामुळे काकूंही अजिंक्यवर हसून पुढे चालू लागल्या ...

हळूहळू सूर्य उगवू लागला आणि ते दोघेही घराकडे निघाले ..रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींची गर्दीही वाढू लागली होती ..ते दोघेही सोबत जाऊ लागले होते पण का कळेना सर्व त्या दोघांकडे पाहून हसू लागले होते ..तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते घराकडे जाऊ लागले ..प्रत्येक येणारा - जाणारा त्यांच्याकडे पाहून हसू लागला होता आणि त्यांना बघून अजिंक्य - मृणाल विचारत पडले ..गावातून जातानाही अगदी तीच स्थिती होती पण अस का घडतंय याच उत्तर त्यांना काही सापडत नव्हतं ..शेवटी घरी पोहोचले आणि आई अजिंक्यला म्हणाली की , " अजिंक्य आज तू खूप खुश आहेस ना ? " आणि अजिंक्य उत्तरला , " हो पण का ग ? "

आणि ती खेचत म्हणाली , " आता सूनबाईने सकाळी - सकाळी गालावर निशाण उमटवल्यावर तू खुश असणारच .." मृणालने एकदा त्याच्या गालाकडे लक्ष दिले आणि तिला जाणवलं की तिने सकाळी ओठांना लिप बाम लावला होता आणि अजिंक्यला पप्पी देताना त्याचा काही अंशी त्याच्या गालावर अगदी तसाच राहिला होता." हे बघताच मृणाल लाजून घरात पळून गेली आणि अजिंक्य आईला म्हणाला , " त्यात काय तू पण दे या गालावर ..आता तुझा हक्क सुनेने घेतला म्हणून तू अशी म्हणत आहेस ना ? " , आणि आई हसत म्हणाली , " हो घे शहाण्या !! जाआधी फ्रेश हो ऑफिसला पण जायचा आहे तुला ..अजिंक्य आईला एक गोड स्माईल देऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूमला पोहोचला ...आणि अजिंक्य - मृणालच्या एका नवीन पर्वाला इतक्या सुंदर क्षणांनी सुरुवात झाली ...

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED