एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 6 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 6

अजिंक्यच्या तोंडून पहिले शब्द निघाले , " रिया तुमच्यात काय बोलणं झालं ? " ..त्याच्या अचानक प्रश्नाने रियाच लक्ष त्याच्याकडे गेलं ..त्याला तिच्याकडे पाहण्याची भीती वाटत होती म्हणून त्याने गाडी चालवितच प्रश्न विचारला ..मधातच त्याने एकदाच तिच्याकडे लक्ष दिलं आणि ती तेव्हाच बाजूला बघू लागली ..अजिंक्यला शंका येऊ नये म्हणून ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली , " सॉरी अजिंक्य पण आमचं सिक्रेट आहे ते ..त्यामुळे ते मी तुला सांगू शकणार नाही .." त्याला तिचा राग आला होता पण तरीही राग आवरत तो गाडी चालवू लागला..पुन्हा एकदा गाडीत निरव शांतता निर्माण झाली . अजिंक्यला ते वातावरण नकोस होऊ लागलं म्हणून त्याने गाडीच्या काचा खोलल्य..गार वाऱ्याने अजिंक्यचा थोडा फार राग शांत झाला होता ..काहीच क्षणात गाडी ऑफिसला पोहोचली ...

अजिंक्यने गाडी पार्क केली आणि दोघेही सोबत जाऊ लागले ..सकाळी - सकाळीच अजिंक्यचा मूड खराब झाला होता त्यामुळे तो रियाशी एक शब्द देखील बोलायला तयार नव्हता ..ऑफिसमध्ये प्रवेश करताच ऑफिस स्टाफने त्याला गुड मॉर्निंग विश करायला सुरुवात केली ..पण त्याच आज कुणाकडेच लक्ष नव्हतं ..तो सरळच आपल्या केबिनला पोहोचला ..नेहमीप्रमाणे कॉफी मागवून घेतली ..लॅपटॉप ओपन करून काम करू लागला ..प्रत्यक्षात काम करायची इच्छा असली तरीही कामात त्याच मन लागत नव्हतं ..बराच प्रयत्न केल्यानंतरही त्याची ती द्विधा मनस्थिती बदलली नव्हती आणि तो चेअरवरच डोळे मिटून पडला परंतु विचारांनी त्याचा पिच्छा काही सोडला नव्हता ..काही क्षण शांततेत गेलेच होते की अजिंक्यला सरांचा फोन आला आणि त्यांनी त्याला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं ..रुमालाने आपला चेहरा साफ करत तो सरांच्या केबिनला पोहोचला ..सरांचा मूड देखील आज खराब जाणवत होता ...टेबल वर जिकडे - तिकडे फाइल्स पसरल्या होत्या आणि सर कुणाशी तरी फोनवर रागाने बोलत होते ..सरांनी फोन ठेवला आणि सरळ अजिंक्यवर भडकले , " अजिंक्य किती हळू काम करतो आहेस ..एव्हाना आपल्या सर्व साइट्सचे काम फास्ट सुरू व्हायला हवे होते ..तुझ्याकडून माझी अशी अपेक्षा नव्हती .." सरांच बोलणं थांबवत अजिंक्य म्हणाला , " पण " आणि सरांना त्याच्या बोलण्यावर राग आला ..सर खूपच रागात होते आणि जोर्याने ओरडून गेले , " डोन्ट गिव मी ऐन एस्कुज ..ऍक्सेप्ट युअर मिस्टेक अँड डु युअर वर्क प्रॉपरली ..नाऊ यु कॅन लिव्ह .." अजिंक्यने सॉरी सर म्हणत केबिन सोडले ..सर अजिंक्यवर एवढ्या जोरात ओरडले होते की सर्व त्यांच्याकडेच पाहत होते ..त्याने सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि सरळ वॉशरूमला गेला ..चेहऱ्यावर पाणी घेत स्वताला शांत केलं आणि पुन्हा केबिनमध्ये जाऊन बसला ..सर आधीच ओरडल्याने पुन्हा जोमाने काम सुरू करू लागला ..कामात लक्ष लागत नसतानाही तो सतत काम करीत होता ..दुपार होऊन गेली होती तरीही तो आपल्या चेअरवरून उठला नव्हता पण राहून - राहून त्याच मोबाइलकडे लक्ष जात होतं ..मृणाल आपल्याला एखादा तरी कॉल करेल अशी त्याला अपेक्षा होती पण अस काहीच झालं नाही ..शेवटी काम संपवत तो सुमारे साडे सहा वाजता घराकडे निघाला ..रियाही त्याच्या मागेच होती ..त्याने तिला ऑटो स्टँडवर सोडावं अशी तिची अपेक्षा असताना तो तिच्याकडे न बघताच कारमध्ये बसून निघाला ...

अजिंक्य काहीच क्षणात घरी पोहोचला ..पिल्लुची तब्येत खराब असल्याने तिचे आजी आजोबा दुपारीच घरी आले होते आणि पिल्लुचा तापही बऱ्यापैकी कमी झाल्याने ती त्यांच्या हातात खेळू लागली होती ..आई - बाबांना पाहून अजिंक्यने आपला मूड छान केला ..बेडरूममध्ये बॅग ठेवून तो फ्रेश व्हायला निघाला तेव्हा मृणाल त्याच्या समोरच उभी होती पण अजिंक्यने तिच्याकडे जरासुद्धा लक्ष दिले नव्हते ..फ्रेश होऊन तो हॉलला पोहोचला ..आपल्या वडिलांना बघून पिल्लू देखील त्याच्याकडे येण्यासाठी हात समोर करू लागली ..अजिंक्यने तिला हातात घेतल आणि तिच्या हसुने त्याचा राग काही क्षणांसाठी का होईना नाहीसा केला ..त्याने तिला ताप नसल्याची आधी खात्री करून घेतली आणि बोबड्या शब्दात म्हणाला , " माझं पिल्लू किती गोड दिसत ना हसल्यावर ..पिल्लू तू आजारी असलीसना माझा जीवच टांगणीला लागतो बघ !! ..तेव्हा तू आजारी नको पडूस..मला न माझी राजकुमारी अशीच हसत खेळत राहणारी हवी ..तू आपल्या बाबांना आता त्रास नाही देणार न ? " आणि पिल्लू ..ऍ ऍ ऍ ...करत हसू लागली ..तिच्या चेहऱ्यावर हसू बघून त्याला बर वाटल ..तो तिच्याशी बोलत असताना मृणालने चहाचा कप त्याच्यासमोर धरला ..त्याला ते माहिती असतानाही त्याने तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मृणाल कप खाली ठेवून परत जेवणाची तयारी करायला आत पोहोचली .एव्हाना अजिंक्य चहा घेऊन फिरायला बाहेर निघाला
रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती तरीही अजिंक्य घरी परतला नव्हता ..मृणालने त्याला फोन केला पण त्याने रिसिव्ह करण्याऐवजी आज जेवायला येणार नसल्याचा मॅसेज सोडला ..घरच्या सर्वांची जेवण आटोपली आणि ते झोपायला आपापल्या रूममध्ये परतले ..आज बऱ्याच दिवसांनी अजिंक्य आपल्या मित्रांमध्ये सामील झाला होता शिवाय त्याला मृणालला फेस करायचं नसल्याने तो जाणूनबुजून मित्रांमध्ये जास्त वेळ थांबला होता ..इकडे मृणाल त्याची वाट पाहत बसली होती ..सुमारे अकराच्या सुमारास तो घरी पोहोचला ..मृणालला सोडून सर्व झोपी गेले होते ..मृणालने अजिंक्यला जेवणासाठी विचारले पण तो तिच्याशी काहीच न बोलता सरळ बेडरूमला पोहोचला .₹ पिल्लुची पप्पी घेत डोळे मिटून तो बेडवर शांत पडला ..एव्हाना मृणालदेखील भांडी आवरून त्याच्याकडे आली ..तो झोपला नसल्याचं तिला लक्षात आलं आणि ती सरळ त्याच्या कुशीत जाऊन पडली ..तरीही त्याने काहीच हालचाल केली नव्हती हे पाहून ती म्हणाली , " अजिंक्य ..मला माहित आहे तू का नाराज आहेस ...आमच्यात सकाळी काय बोलणं झालं हेच एकूण घ्यायचं होत ना तुला ? ..म्हणून स्ट्रेस घेऊन बसला आहेस ..मग एक ..पहिल्यांदा तर सॉरी कारण मीच रियाला काही सांगायला नकार दिला होता कारण मला स्वतःलाच तुला हे सर्व सांगायचं होत ....खर सांगू आज रिया सकाळी - सकाळी आली तेव्हा मला तिचा खूपच राग आला ..सकाळच्याच वेळी नको त्या व्यक्तीचे दर्शन झाल्याने माझाही मूड खराब झाला होता पण मला स्वताला सावरुन घ्यावं लागलं ..रिया हे नाव ऐकताच माझ्या अंगाची लाही - लाही होते तेव्हा ती समोर असताना मला काय जाणवलं असेल हे विचार न केलेलंच बर !! ..तू अंघोळीला गेलास आणि ती माझ्यासोबत बेडरूममध्ये आली ..तिच्या डोळ्यातून अचानक अश्रू आले आणि मला माझंच वाईट वाटलं ..स्वतालाच सावरत तिने काल तुमच्यात घडलेली प्रत्येक गोष्ट मला सांगितली आणि नकळत माझ्याही डोळ्यात अश्रूं आले ..मीही काही वेळ शांत झाले आणि तेव्हाच ती म्हणाली की मी उगाच म्हणत होते की माझ्यापेक्षा अजिंक्यवर कुणीच जास्त प्रेम करू शकत नाही पण मी साफ वेडी होते ..तुझ्याएव्हढ अजिंक्यवर कुणीच प्रेम कुणीच करू शकत नाही ..वरकरणी मी त्याच्याशी फ्लर्ट करत असले तरीही माझं त्याच्यावर खर प्रेम होतं ..त्यालाही ते माहीत असताना त्याने त्या गोष्टीचा कधीच फायदा घेतला नाही ..माझ्या प्रेमाला तो समजून घेत नाही म्हणून मी त्याला प्रत्येक वेळी चुकीच समजत गेले आणि तो काल माझ्या नजरेत अधिकच वर आला ..मला स्वतःवरच अभिमान आहे की मी योग्य व्यक्तीवर प्रेम केलंय आणि मृणाल अजिंक्य अगदी बरोबर म्हणतो की त्याच्यावर तुझ्यापेक्ष्या जास्त प्रेम कुणीच करू शकत नाही ..खरच तू आणि मी फार नशीबवान आहोत ..तू यासाठी की त्याची संगिनी आहेस आणि मी यासाठी की त्याच्यासारखा मन जपणारा मित्र मिळाला आहे ..आज मी तुला हेच सांगायला आले आहे की अजिंक्य फक्त तुझाच आहे आणि सदैव तुझाच राहील .."

तीच संपूर्ण बोलण ऐकून झाल्यावर अजिंक्य म्हणाला , " मग हे आधीच सांगायला काय झालं होतं ? सकाळपासून किती टेंशन आलंय मला माझं मलाच माहिती ? " आणि ती मिठी घट्ट करत म्हणाली , " सॉरी त्यासाठी पण खरंच आज मला माझ्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटतो आहे ..मी सर्विकडे बघते की बहुतेकदा पुरुष लग्न झाल्यावर फक्त शारीरिक संबंधाच्यावेळीच जवळ येतो ..त्याच पहिल प्रेम प्रेयसी बायकोची जागा घेते आणि तो आईवडील आपली मुले यातच खुश होत जातोआणि आपल्याला कुणी बायको नाहीच असा वावरत राहतो पण तुझ्याकडे जेव्हा - जेव्हा मी पाहते तेव्हा जाणवत की नाही ..प्रत्येक पुरुष सारखा नसतो ..प्रेयसी असताना जी तू काळजी घ्यायचा त्यापेक्षाही जास्त काळजी तू आज घेतोस ..न मागताही सर्व स्वप्न पूर्ण करणारा कदाचित तू सर्वात सुंदर पती आहेस आणि म्हणूनच मी दिवसभर तुझी वाट पाहत असते ..तुझ्याशी दोन शब्द बोलण्यासाठी सतत झुरत असते ..आणि जर हीच लग्नाची जादू असेल तर मला आनंद आहे की मी प्रेयसीची बायको झाले .." तिच्या शब्दांनी अजिंक्यवर जादू केली आणि अजिंक्य तिला आपल्याकडे ओढत म्हणाला , " अस आहे तर ? मग आपण दुसऱ्या मुलींना माझ्यासोबत बघून ईर्षा का करता ? " आणि ती हळूच त्याचा हातावर मारत म्हणाली , " तू फक्त माझा आहेस आणि कुणी तुला आपल म्हणावं ..मला हे पसंद नाही ..अजिंक्यला कुणी गमतीतही माझं म्हणावं हे मला आवडणार नाही ..तू फक्त आणि फक्त माझा आहेस आणि नवरोबा जिथे प्रेम असत तिथेच ईर्षा असते आणि बर का जर कुणी तुला माझ्यापासून हिरावून घेतलं तर जीवच घेईल त्याचा मी .." अजिंक्य आता तिच्यावर हसू लागला ..त्याला हसताना पाहून तिने आणखी एक त्याच्या पोटावर मारली आणि म्हणाली , " आता हसायला काय झालं तुला ? " आणि तो हसतच म्हणाला , " आज चिडक्या बायकोला पाहून आणखीच मज्जा येऊ लागली आहे ..आता वाटते आहे बघ प्रेयसी प्रत्यक्षात बायको .."

तीही आता स्वतःच्या डोक्यावर मारत स्वतःवरच हसू लागली आणि त्याला म्हणाली , " हो रे हे मी टिपिकल बायको प्रमाणे कधी वागेल अस वाटलंच नव्हतं ..पण हेही झालं ..ही सर्व ना माझ्या लाडक्या नवरोबाची कमाल आहे ..बघा त्याच्या प्रेमात काय - काय करू लागले .." आता दोघेही थोडे जोराने हसू लागले आणि अजिंक्यच्या डोक्यात विचार आला ..

" खरच किती सुंदर असत ना लग्न नावाचं बंधन ..कधी हसवणार , तर कधी ईर्षा करायला लावणार ..क्षणात रागावणार आणि क्षणात एकमेकांचं होणार ..फक्त त्या नात्याचा खरा अर्थ मात्र कळायला हवा ..एकदा तो कळाला की दोन व्यक्तीं त्या नात्यातली मज्जा , गमती- जमती आयुष्यभर विसरत नाहीत ..आणि कुटुंबातही प्रेम ओसंडून वाहत .."

बेवजह तो नही की तुम
चली आती हो ख्वाब मे
मै धुंडता नही इक पल
फिर भी रहती हो मेरी हर बात मे
अब तो मै धुंडता नही
वजह तेरे आने की
पता है मुझे
जब भी आओगी
कुछ पल दे जाओगी
अब तो मोहब्बत सी हो गयी है
ए ईश्क तेरी मस्तीयो से
बता भी दे - ए - ईश्क
क्या जादू है तेरी हर इक अदा मे .


आयुष्याची एक्सप्रेस सतत एकाच पटरीवर कधीच धावत नाही ..समोरून एखादी एक्सप्रेस आली की गरजेचं असत थोडा वेळ दुसऱ्या पटरीवर विसावा घेऊन पुन्हा तेवढ्याच गतीने आयुष्याला सामोरे जाणे कारण दुःख जाणलेल्या व्यक्तीलाच सुखाची किंमत माहिती असते ..ती आताही त्याच्या मिठीत होती आणि दोघेही आपली मिठी घट्ट करत एकमेकांच्या हृदयाजवळ पोहोचले ..शरीरानेही आणि मनानेही ..


क्रमशः ...