आयुष्यात वादळांना खूप महत्त्वाचं स्थान असत..एकदाच वादळ येऊन निघून गेल की मागे साचलेली संपूर्ण घाण निघून जाते आणि बाकी उरत शांत , स्वच्छ वातावरण ..आयुष्यही असच एक कोड ..इथे प्रत्येक व्यक्ती जवळ असतो पण आयुष्यात वादळ आलं की आपले कोण आणि परके कोण याची जाणीव होते ..रियाच्या अजिंक्यच्या आयुष्यात येण्याने मृणाल - अजिंक्यच प्रेम आणखीच घट्ट झालं होतं ..वरून खलनायिका जरी ती वाटत असली तरीही तीच त्यांना नकळत एकमेकांजवळ आणत होती ..तेही जगू लागले बेभान होऊन ..
साधारणता तीन महिने उलटून गेले होते ..या काळात अजिंक्य फक्त काम आणि कामच करीत होता परंतु मुलीप्रति , बायकोप्रति आणि कुटुंबाप्रति असलेली जबाबदारी तो कधीच विसरला नाही ..त्याने आपल्या वागण्यातून उत्तम पुरुष काय असतो हे दाखवून दिलं होतं ..पुरुष आणि स्त्री दोघेही कुटुंबासाठी जगत असताना दोघेही कसे श्रेष्ठ आहेत हे अजिंक्य जाणून होता आणि म्हणूनच त्यांच्यात मतभेद नावाची गोष्ट कदाचीतच जन्म घ्यायची ..कधी मृणालला मासिक पाळी आली असताना तिच्या वेदनात हातात हात घालून सामील होणारा , आई घरी नसली की तिला आराम व्हावा म्हणून घरच सर्व काम बघणारा अजिंक्य नेहमीच मित्रांच्या गप्पात हास्याच कारण व्हायचा पण अजिंक्य मात्र आताही तसाच होता ..इतरांच्या हसण्याचा त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नव्हता .. लग्न म्हणजे विश्वास ..एकमेकांप्रति असलेला ..एखादी स्त्री लग्नापूर्वी आपली ओढणी खाली जाऊ देत नाही आणि लग्नानंतर तीच स्त्री एखाद्या परपुरुषाला आपलं संपूर्ण शरीर स्वाधीन करते यातच विश्वासाची महती पटते ..तरीही पुरुष मात्र सदैव तिच्या कपड्यांवरून , तिच्या एखाद्या मित्रांशी बोलण्यावरून तिच्यावर शंका घेतो याच अजिंक्यला फार वाईट वाटत होतं ..पण त्याने कधीच आपल्या मित्रांना हे सर्व बोलून दाखविल नाही ..त्यांचे विचार एकूण त्याला एकीकडे हसू यायचं आणि दुसरीकडे कुठेतरी त्रास व्हायचा आणि तेव्हाच त्याने ठरवलं की मी माझ्या मुलीसमोर असा पुरुष उभा करेन की तिला या जगात वावरताना आपल्या वडिलांचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटेल ..जबाबदारी सांभाळत असताना देखील त्याने मृणालला कुठल्याच बाबतीत कमी होऊ दिली नव्हती ..कदाचित हाच खऱ्या प्रेमाचा विजय होता ..त्याने आपल्याच लोकांविरुद्ध बंड पुकारलं होत आणि हेच बंड त्याच प्रेम अजरामर करणार होत ..
अशाच एका दिवशी अजिंक्य सायंकाळी सर्वांसोबत बोलत बसलेला असताना अचानक त्याचा मोबाइल रिंग करू लागला ..त्याने मोबाइल हातात घेतला आणि स्क्रीनवर कुमुद काकूच नाव फ्लॅश होऊ लागलं ..त्याने कॉल रिसिव्ह केला आणि समोरून आवाज आला , " बाळा आईला विसरलास वाटत ...तिकडे जाऊन वर्ष होत आलंय पण माझी काही आठवण येत नाही ..म्हणून म्हटलं चला आपणच फोन करून बघूया .." अजिंक्य हसत म्हणाला , " कुठे ग आई तुला विसरण शक्य आहे का ? ..तुझी आठवण खूप येते म्हणून तर मृणालला कॉल लावायला लावून तुझा आवाज एकत असतो .." काकू थोड्या भावनिक होत म्हणाल्या , " खूप आठवण येत आहे रे बाळा तुझी ..आज राहवलं नाही म्हणून कॉल केलाय तुला ..आणि आज मी तसाही कामानिमत्य फोन केला आहे ..मला आदर्श समाजसेविकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे तेव्हा तो पूरस्कार स्वीकार करताना मला माझा मुलगा सोबत हवा आहे ..तू येशील ना बाळा ? " अजिंक्य काही बोलणार तेवढयात मृणाल त्याच्या हातातून फोन घेत म्हणाली , " आई तुम्ही निश्चित रहा ..मी घेऊन येईल तुझ्या लाडक्या मुलाला ..तस पण आम्ही खूप मिस करतोय तुला .." पुढे त्यांच्यात बरच बोलणं झालं आणि शेवटी काकूने फोन ठेवला ..काकूंना पुरस्कार तीन दिवसानंतर मिळणार होता त्यामुळे कमीत कमी दोन - तीन दिवसांच्या सुट्ट्या काढायला तिने सांगितलं होतं ..तीचही वय होत असल्याने अजिंक्यने तिच्यासोबत काही क्षण घालवावे अशी तिची इच्छा होती आणि अजिंक्यही पुन्हा एकदा त्या स्वप्ननगरीत जायला तयार झाला ..
अजिंक्यने मागील तीन महिने खूप मेहनत घेतली होती ..या दिवसात त्याने एकही सुट्टी घेतली नव्हती ..त्यामुळे सुट्टी मंजूर होणार याबद्दल त्याला खात्री होती ..अजिंक्य आज सुट्टीचा अर्ज घेऊनच ऑफिसला पोहोचला होता ..आज सर ऑफिसला लवकरच आले होते त्यामुळे तो सरळ सरांच्या केबिनला पोहोचला ..सरांचा मूड आज बरा जाणवत होता ..त्याने केबिनच्या आत पोहोचतच सरांकडे अर्ज दिला ..सरांचा अर्ज वाचून झाला आणि ते हसून त्याच्याकडे पाहू लागले ..त्याला काय समजायचं होत ते समजलं पण पुढच्याच क्षणी सर म्हणाले , " अजिंक्य सुट्टी गरजेची आहे का ? ..बरच काम उरलं आहे आणखी आणि तुझ्याविना ते पूर्ण होईल अस वाटत नाही ." आणि अजिंक्य सरांकडे पाहत म्हणाला , " सर मला जाणीव आहे त्याची पण खूप खास क्षण आहे हा ..नाही तर मी कधीच गेलो नसतो ..मृणालला पण बाहेर फिरायला कधीच घेऊन गेलो नाही त्यामुळे ती पण फार उत्सुक आहे बाहेर जायला ..तेव्हा यावेळी सुट्टी मंजूर करा .." सर अर्ज टेबलवर ठेवत म्हणाले , " आता बायकोच नाव घेतल्यावर सुट्टी द्यावीच लागेल नाही तर ऑफिसला पर्मनंट सुट्टी घेशील आणि तुला गमावन मला अजिबात परवडणार नाही त्यापेक्षा दोन दिवस ये फिरून ..पण हा त्यावर एक पण दिवस नाही ..हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि दुसरा प्रोजेक्ट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे सो तू तेव्हा मला हवा आहेस .." सरानी परवानगी दिली हे ऐकून तो फारच खुश होत आपल्या केबिनला पोहोचला ..तो आपला लॅपटॉप ओपन करणार तेवढ्यातच रिया आत येत म्हणाली , " काय अजिंक्य ..आज आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे ..काही खास आहे का आज ? " अजिंक्य लाडात येत म्हणाला ..हो खास तर आहे ..पण आधी कॉफी मागव मग बोलू यावर .." काहीच क्षणात कॉफी त्यांच्या टेबलवर हजर झाली आणि रिया म्हणाली , " आता तरी सांग काय झालं ? " आणि अजिंक्य म्हणाला , " जवळपास मी एका वर्षाने माझ्या खास लोकांत जाणार आहे ..ज्यांनी माझं जीवन बनवलं ..ज्यांनी मला प्रत्येक क्षणी मदत केली ..त्यांच्याकडे जातोय त्यामुळे फक्त त्यांचं नाव ऐकताच माझ्या चेहऱ्यावर तरतरी आलीय ..आय मिस देम यार .." आणि रिया नाराज होत म्हणाली , " हो जा एकटाच ..मस्त जग आपले क्षण ..बायकोसोबत ..मी कोण आहे ? ..मला कुणीच विचारत नाही ..मस्त रोमान्स करत बसशील बायकोसोबत समुद्र किनारी .." तीच बोलणं पूर्ण होणार तेव्हाच अजिंक्य म्हणला , " व्हॉट अ फंटास्टिक आयडिया ..मी असच करेन पण मला एक प्रश्न पडलाय तुला याच का वाईट वाटतं आहे .." आणि ती चेहऱ्यावर रुसवा आणत म्हणाली , " आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला दुसर्यासोबत पाहणं खरच अवघड असत..आपको नही समझेगा अजिंक्य बाबू "
अजिंक्य कपाळावर हात मारत म्हणाला , " अरे देवा !! जिकडे - तिकडे फक्त इर्षाचं सुरू आहे ..काही खर नाही या बायकांचं .." आणि ती पुन्हा एकदा म्हणाली , " तुला नाही कळणार रे ते !! जेव्हा मृणालसोबत कुणाला बघशील तेव्हा कळेल तुला ईर्षा म्हणजे काय असत ..आणि तस पण जिथे प्रेम असत तिथे इर्शाही असते ..तुला नाही कळणार ते .." एवढं बोलत तिने केबिन सोडलं ..अजिंक्य तिच्या बोलण्यावर विचार करू लागला आणि नकळत त्याच्या डोक्यात विचार आला की खरच मृणालशी कुणी फ्लर्ट केली तर ..तर काय जीवच घेईल त्याचा .." तो विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला तेव्हा त्याला कळाल की आपण देखील रिया आणि मृणालसारखंच काहीतरी बोलून गेलो आणि त्यांची मनाची होणारी घालमेल देखील त्याला समजू लागली ..आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ नसताना आपल्याच खास व्यक्तीच्या जेव्हा जवळ जाऊ लागते तेव्हा जाणवते ती भावना म्हणजे ईर्षा ..आणि ईर्षा हेच प्रेमाचं दुसर नाव ..कारण ते सांगत की त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात काय जागा आहे.. प्रेमाचं व्यसन देखील गमतीशीर असत..ज्यात स्वताचच एक जग असत आणि प्रत्येक व्यक्ती त्या दुनियेचा राजा / राणी असतो ..कुठलीच अपेक्षा नसते ..आणि आपल्याच भावना दुसर्याप्रति ओसंडून वाहतात ..ती गेली पण अजिंक्यला पुन्हा एकदा प्रेमाचा अर्थ देऊन ..प्रेम म्हणजे खरच काय असत बर ???
दोन दिवस झाले होते ..उद्या पून्हा एकदा मुंबईला जायचं होतं ...बाहेर थंडीने सर्वाना खीळखीळ करून सोडलं होत ..त्यामुळे बहुतेक लोक सर्व काही आवरून लवकरच झोपी जात ..पण आज अजिंक्य मात्र एकटाच टेरिसवर जाऊन उभा होता ..कडक थंडी असतानाही त्याने अंगावर शाल घेतली नव्हती ..मृणाल प्रज्ञाला झोपवून टेरिसवर आली ..तिने त्याच्यासाठी आणलेली शाल त्याला ओढवत म्हणाली , " अजिंक्य एवढ्या थंडीत इथे काय करतो आहेस ? आणि कमीत कमी स्वेटर तरी लावून यायचं होत ..किती हा निष्काळजीपणा ? ." आणि अजिंक्य आकाशाकडे पाहत म्हणाला , " तुला आठवतंय मृणाल अशीच एक रात्र होती ..आकाशात चांदण्यांनी घेराव घातला होता आणि तू मला स्वतात सामावून घेण्यास सांगितल ..सुरुवातीला नकार देणारा मी नंतर तुझाच झालो ..त्यादिवशी मी तुला माझ्या मनातलं सांगितलं आणि तू चक्क नकार दिलास .." मृणाल देखील त्याच्या बाजूने उभी होत म्हणाली , " काय करणार अजिंक्य ..खूप भीती होती रे तेव्हा ..लोकांनी मला घालून - पाडून बोललं होत पण माझ्यामुळे तेच तुझ्या आयुष्यात परत येन नको होतं म्हणूनच नकार कळविला पण त्याचा आता कशाला विचार करतो आहेस ..? " अजिंक्य तिच्याकडे वळत म्हणाला , " त्यावेळी तू घाबरली होती आणि आज मी घाबरलो आहे ..तुला जून काहीच आठवू नये म्हणून मी मुंबई सोडायचा निर्णय घेतला पण आज पुन्हा एकदा तिथेच जात आहोत तेव्हा त्याच शहरातील माणसाना भेटून तुला त्रास होईल याची सतत भीती वाटते आहे ..ती भीती घरच्यासमोर दाखवायची नव्हती म्हणून इथे आलो ..आकाशाकडे बघत शांत उभं राहिलं की बर वाटत .नको जाउया का आपण ? "
मृणालच्या चेहऱ्यावर फार काही बदल झाला नव्हता ..तिने लग्नानंतर या काही दिवसात स्वताला सावरुन घेतलं होतं त्यामुळे याबाबतीत नेहमीच अस्थिर असणारी ती आज अगदी स्थिर जाणवत होती .आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत ती म्हणाली , " भीती खूप वाटते आहे हे तुझ्याशिवाय कुणाला आणखी छान कळेल पण तू सोबत असताना कसलीच भीती वाटत नाही ..तू प्रत्येक क्षणी माझी छाया बनून वावरत असतोस.. तेव्हा तू असताना मला कसलीच भीती नाही आणि मुंबईच म्हणशील तर ..काही वाईट आठवणी आहेत पण त्याहीपेक्षा काही सुंदर आठवणी मला त्याच शहराने दिल्या आहेत ..नकळत काही लोक भेटतील आणि त्या गोष्टी त्रासही देऊन जातील पण त्याहीपेक्षा काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप खास आहे ..आणि भूतकाळाबद्दल म्हणशील तर तो नेहमीच सोबत असतो ..तो माझ्या आयुष्याला लागलेला सर्वात मोठा डाग आहे जो मी कधीच पुसू शकत नाही ..ज्यादिवशी वडिलांनी माझ्यावर अत्याचार केला तो दिवस आला की मी थरथर कापायला लागते पण तेव्हा तुला माझ्या मनाची स्थिती कळते आणि तू क्षणांसाठीसुद्धा मला स्वतःपासून वेगळं करत नाहीस ..अजिंक्य काळजी नको करू माझी ..तुझ्यासोबत मी सुरक्षित आहे आणि तो भूतकाळ देखील काही क्षणांसाठी मला मंजुर आहे फक्त तू माझी साथ कधी सोडू नकोस..तुझी साथ असेल तर मी संपूर्ण जगाशी लढायला तयार आहे .."
आयुष्यात एकदा व्यति खचली की मग तिला उठून उभं राहायची हिम्मत उरत नाही पण मृणालने स्वताला इतकं सांभाळून घेतलं होतं की जणू तिला कुठला भूतकाळ त्रास देतोय अस तिच्या चेहर्यावर तरी जाणवत नव्हतं ..मृणालने जे भोगल होत ते विसरन कदापि शक्य नव्हतं पण अजिंक्यच्या साथीने तिने स्वताला सावरुन घ्यायला सुरुवात केली ..त्याक्षणी मृणाल इतकं कॉन्फिडन्ट बघून त्याला तिचा फारच अभिमान वाटू लागला ..बहुदा तिचा हा स्वभाव त्याने दुसऱ्याच भेटीत जाणला होता आणि त्याच स्वभावाचा तो फॅन देखील झाला होता ..प्रेम व्यक्तीला किती कणखर बनवत ही गोष्ट अजिंक्यला मृणालकडे बघून लक्षात येऊ लागली आणि पुन्हा एकदा आपल्याच बायकोच्या प्रेमात पडत होता ..रात्र बरीच झाली होती ..बाहेर थंडी आणखीच वाढत असल्याने ते बेडरूममध्ये परतले आणि झोपी गेले ..
आज नागपूरहुन दुपारची फ्लाइट असल्याने अजिंक्यची सकाळी - सकाळीच तयारी सुरू झाली ...मृणालने प्रज्ञाची तयारी करून दिली होती आणि ती आपल्या आजीसोबत खेळत बसली ..मृणाल आज खूप दिवसानंतर साडी परिधान करीत होती त्यामुळे ती आपल्याला हवा तेवढा वेळ घेत होती ..तर अजिंक्य सकाळपासूनच कुठेतरी बाहेर पडला होता आणि बऱ्याच वेळेला फोन लावूनसुद्धा त्याचा काहीच पत्ता नव्हता ..इकडे मृणालने आपली तयारी पूर्ण केली ..ती आज फार सुंदर दिसत होती ..साडी परिधान करण्याचं मुख्य कारण म्हणजे तीच तस सजन अजिंक्यला फार आवडायचं आणि त्यासाठीच जणू ती नटून - थटून तयार झाली होती ..ती आरशाच्या बाजूला होणार तेवढ्यातच तिच्या लक्षात आलं की अजिंक्यला मला मोकळ्या केसात बघायला आवडत त्यामुळे मागचा पुढचा काहीही विचार न करता बांधलेले केस तिने लगेच सोडून दिले ..फॅनच्या हव्याने तिचे सिल्की केस उडू लागले ..ती स्वताला आरशात पाहण्यात व्यस्तच होती की मागून आवाज आला , " आज कुणाच तरी काही खर नाही वाटत ..बायको वेडी करून सोडणार आहे मला..तिची ही अदा अगदी घायाळ करून जाते ..म्हणूनच लग्नाला दोन वर्षे झाली तरीही तिच्या प्रेमाचा रंग अजूनही तसाच आहे ..( तिच्याही चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाचे तरंग जाणवू लागले आणि ती मागे पलटणार तेवढ्यात ) अग थांब आणि अजिंक्य तिच्या अगदी जवळ जाऊन थांबला ..हातात असलेला गजरा काढत त्याने तिच्या केसांमध्ये माळला ..ती पलटून त्याचा हात हातात घेत म्हणाली , " अजिंक्य कस कळत रे तुला माझ्या मनातलं इतकं सर्व .लोकांसाठी बायको हे एक कोडं असत पण तू एका स्त्रीच मन किती सहज ओळ्खतोस ना ?..म्हणूनच की काय माझा प्रत्येक साजो - शृंगार फक्त तुझ्यासाठीच असतो ..आपल्या नवऱ्याने फक्त एकदा जवळून न्याहाळाव म्हणून मीही सजते ..आय लव्ह यु नवरोबा " म्हणत ती त्याच्या मिठीत शिरु लागली आणि मागून सासूबाईचा आवाज आला " सुनबाई दार लावून घेत चलावं अशा वेळी ..आणि बर का गजरा खूप शोभून दिसतोय तुझ्यावर ..बघ हा तुझ्या नवऱ्याची नजर आज तुझ्यावरून हटणारच नाही .." सासूबाईचे शब्द ऐकताच ती त्याच्यापासून बाजूला झाली ..ती लाजत - लाजतच आपल्या कानातले झुमके सावरू लागली तर अजिंक्य म्हणाला , " मातोश्री कधी बाबांनी पण आणला असेलच की तुमच्यासाठी गजरा आणि असे काही सुंदर क्षण आलेच असतील मग कशाला आपल्या सुनेला छडता ..आता वाटलं म्हणून आली कुशीत त्यात काय ? ." आणि आई थट्टेत म्हणाली , " तरी मी म्हणालेच की हा बोलला कसा नाही ..कस आहे न अजिंक्य त्यावेळी घरी भरपूर लोक असायचे त्यामुळे आम्हाला मनाप्रमाणे जगता आलं नाही .तरीही लपून - लपून काही क्षण नक्कीच जगलो आणि बाळा तुमच्यातल हे सुंदर नात मला फार सुखावून जात ..जे मला जगता आलं नाही तेच तुमच्या मार्फत जगते आणि एकुलती एक मुलगी आहे तर तिची थोडी गम्मत घ्यायला काय हरकत आहे ..काय ग सुनबाई तुला त्रास देते का मी ? " मृणाल समोर काहीच बोलणार तेवढ्यात अजिंक्यच म्हणाला , " हे बघा स्वताच त्रास देणारी विचारते आहे मी तुला त्रास देते का ..? " आणि आई अजिंक्यला म्हणाली , " चूप रे !!! तुझं ना आता मी नावाच पाडते बायकोचा गुलाम ..किती करशील रे बायकोच्या मागे - मागे ..बघ बघ ती देखील माझं अस बोलणं ऐकून किती खुश झाली आहे !! " तिच्या अशा बोलण्याने तिघेही हसू लागले होते ..त्यांच्या बोलण्या - बोलण्यात बराच उशीर झाला होता ..आता मुंबईला जाण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी बाकी होता ..काही सुंदर आणि काही कटू आठवणी देणार मुंबई शहर पुन्हा काही हिरावून तर घेणार नाही ना याची भीती अजिंक्यला वाटू लागली ..आणि मन घट्ट करून त्याने प्रवासाला सुरुवात केली..
क्रमशः ...