एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 2 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 2

अजिंक्य बाथरूमकडे जाऊ लागला आणि त्याला स्नेहाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला ..तो तसाचं धावत तिच्याकडे परतला ..काही अंतरावरूनच तो आपल्या पिल्लुला हसवन्याचा प्रयत्न करू लागला आणि तीही त्याच्याकडे बघून हसू लागली ..अजिंक्यकची नौटंकी पाहून सर्व हसायला लागले होते त्यामुळे तो थोडा शरमला पण पिल्लूला हसताना पाहून मात्र तिच्या त्या निरागस हसण्याची एक वेगळीच मजा मला त्याला अनुभवास येत होती आणि त्याने सर्वांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली ...

" अरे बापरे !!! किती गोड हसतय ना माझं पिल्लू !! माझ्याकडे येणार आहेस तू ? " , अजिंक्य बोबड्या शब्दात म्हणाला ..

तिने हे ऐकताच हात समोर केले आणि अजिंक्य तिला घेऊन अंगणात गेला ..चहू बाजूनी असलेली झाडे ..पक्षांचा किलबिलाट एकूण ती पुन्हा खुलू लागली ..

🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻

पहला नशा पहला खुमार
नया प्यार है नया इंतजार
कर लू मै क्या अपना हाल
ए दिलं - ए - बेकरार
तू ही बता
पहला नशा पहला खुमार

🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻

सर्वच चुकीचं म्हणतात की मुलाचं पहिल प्रेम प्रेयसी असते उलट मी म्हणेन की त्या प्रेयसीपासून लाभलेली तिचीच छाया हे प्रत्येक वडिलांचं प्रेम असत ..त्या प्रेमाला कुठलाच अंत नसतो ना कुठला लोभ ..ते अखंड वाहत असत ..श्रेयसीचे उपचार सुरू असताना हे क्षण मी जगूच शकलो नव्हतो पण आता मला त्या प्रत्येक क्षणाची भरपाई करायची होती असे काही विचार अजिंक्यचा मनात घुमत होते आणि त्याने पिल्लुला हातात उचलून फिरवायला सुरुवात केली .....एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो फिरू लागलो ..तिला हवेत फिरताना फारच मजा येत होती आणि तिच्या चेहऱ्यावरच ते गोड हसू आणखीनच गोड वाटू लागलं ..

🎸🎸🎸🎸🎸🎸🎸🎸🎸🎸🎸🎸

उडता ही फिरू इन हवाओ मे कही
या मै झुल जाऊ इन घटाओ मे कही
उडता ही फिरू इन हवाओ मे कही
या मै झुल जाऊ इन घटाओ मे कही
इक कर दु आस्मा - जमीन
कहो यारो क्या करू क्या नही
पहला नशा पहला खुमार
नया प्यार है नया इंतजार
कर लू मै क्या अपना हाल
ए दिलं - ए - बेकरार
तू ही बता

🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻

स्वतःच्याच मुलीच्या प्रेमात पडण्याचा आनंद खूप भारी असतो ..तिने पुन्हा एकदा आपल्याकडे हसून पाहिलं की मग मात्र त्या भावना व्यक्तच करता येत नाही ..अजिंक्यचिही काहीशी अशीच स्थिती झाली होती ..आताही लहान आहेस का म्हणणारी आईदेखील अजिंक्यकडे कुतुहलाने पाहू लागली ..ते दोघेही अजिंक्यला पाहून फार खुश झाले होते ..अजिंक्य एका सुंदर स्वप्नात जगत होता ज्याला कुठेच अंत नव्हता ..फक्त होती ती उत्सुकता तिला मनभरून पाहण्याची आणि तिच्या प्रत्येक स्वप्नात रममाण होण्याची ..

" अहो ..बघा माझ्या सवतेचा फोन ..किती वेळाचा वाजतो आहे हा ..तो घ्या आधी ..मग काय ते पहला नशा म्हणा !! " , मृणाल रागात म्हणाली ..

" म्हणजे रियाचा फोन आहे तर ? " , अजिंक्य चिडवायच्या उद्देशाने म्हणाला

" हो तीच महामाया , या आधी घ्या फोन " , ती लटकेच रागात म्हणाली ...


अजिंक्यने पिल्लुला बाबांकडे सोपवलं आणि फोन घेण्यासाठी बेडरूममध्ये गेला..रिया बॉसची पी.ए. ..तिचा फोन आला की मृणाल फार चिडायची ...चिडायची काय म्हणा इतर प्रेयसिसारखी जळायची ..जाताना ती समोरच होती ..मृणालच्या गालावर टिचकी मारत अजिंक्य बेडरूममध्ये पोहोचला....

" रिया यार तू विडिओ कॉल का करतेस ?? ..आमचं सुप्रीम कोर्ट रागावत ना आमच्यावर !! " , अजिंक्य थट्टेत म्हणाला ..

" काय करणार तुमचा चेहरा पहिला की दिवस खूप मस्त जातो आणि तुमचं सुप्रीम कोर्ट रागावून सोडून गेल तरच माझा चान्स बनेल ना म्हणून विडिओ कॉल करते .. " , तिनेही खेचायच्या मूडमध्येच उत्तर दिलं ..

" तू पण अगदी पागल आहेस !! बर फोन का केला होतास ते सांग ? " , अजिंक्य म्हणाला

" अरे हो विसरलेच की सरानी आज खूप महत्त्वाची सूचना देण्याकरिता मिटिंग ठेवली आहे ..ठीक 11 वाजता तर आज नेहमीप्रमाणे वेळेवर ये ..मी सर्वानाही सांगनार आहे म्हटलं आधी तुला फोन कराव आता बाकी सर्वाना सांगेल .." , रिया उत्तरली


" मी पोहोचेल वेळेवर तू काळजी नको करू ..थँक यु ..सी यु इन ऑफिस बाय टेक केअर ." , अजिंक्यने निरोपाच बोलत फोन ठेवला ..

इकडे मृणाल सर्व कान देऊन एकत होती ..तिने तीच सर्व बोलणं एकल होत त्यामुळे राणीसाहेबांचा पारा फार चढला होता ..ती अजिंक्यकडे रागाने पाहत होती ..त्याला ते जाणवत होतं त्यामुळे तिच्याशी नजर न मिळविताच आईला पाणी टाकायला सांगून तो अंघोळीला गेला आणि काही वेळापूर्ती तरी तिच्या रागापासून सुटका झाली..

अंघोळ करून तो परत आला तरीही तिचा राग शांत झाला नव्हता ..लग्नाआधी प्रेयसी होती तेव्हा प्रत्येक गोष्टीला स्वताच सॉरी म्हणायची पण आता मात्र चूक तिचीही असली की सॉरी मलाच म्हणावं लागत असे ..हो पण ती मजाही वेगळीच होती ..प्रेयसी आता बायको झाली होती आणि बायको म्हटलं की एका शब्दात वावटळच ..तिचा एक शब्द आला की हो राणीसरकार म्हणत सर्व नवरे मागे - पुढे करतात तर मग मी त्यांच्यासमोर काय होतो ..मला तिचा राग माहीत होता त्यामुळे तो शांत करण्यासाठीसुद्धा काहीतरी वेगळंच शोधावं लागायचं ..तो आताही तिच्या विचारामध्येच गुंतला होता ..अंघोळ झाली आणि अजिंक्य टॉवेलने केस पुसत - पुसत बाहेर आला ..त्याचे आई - बाबा बाहेरच होते त्यामुळे थोडी थट्टा करण्याच्या उद्देशाने केसावरच ओल पाणी तो तिच्यावर टाकू लागला..ती आधीच रागात असल्याने जवळपास त्याच्यावर धाऊनच गेली पण तो आईकडे पळाला आणि ती पुन्हा एकदा ओठ दाबत त्याच्याकडे पाहू लागली ..ती आईसमोर काहीच बोलत नसे त्यामुळे आई हेच त्याच ब्रह्मस्त्र होत आणि त्याचा पुरेपूर वापर तो करून घेत होता ..

रियाचा फोन आला की तिचा राग जास्तच उचंबळून यायचा ..त्यामुळे तेव्हा तिची मजा घेण्यात त्याला जास्त रस असायचा ..आज ऑफिसला लवकर जावं लागणार होतं त्यामुळे तयारी करून पुन्हा एकदा तो मृणालकडे आला ..एव्हाना ती नाश्ता तयार करून ठेवत असे ..पण आज टेबल रिकामीच होता ..बाबा आणि आई बाहेरच काम करत बसले होते ..

" राणीसरकार आज नाश्ता नाही मिळणार का मला ? ", माफीच्या सुरात तो म्हणाला ..

" जा ना त्या भवाणीकडे ..ती देईल तुम्हाला सर्वच ", ती रागातच बोलली ..

अजिंक्य तिला मनविण्याचा खूप प्रयत्न करत होता पण ती ऐकायला तयार नव्हती ..अजिंक्यला एक गंमत सुचली आणि संधी शोधून तो तिच्या गालावर किस करून रूममध्ये पळू लागला..शु लावले आणि दाराच्या बाहेर जाणारच होता की तेवढ्यात तिने हात पकडला ..ती आताही काहीच बोलली नव्हती पण टेबलवर नाश्ता आला आणि ती फार प्रेमाने वाढू लागली ..खर तर ऑफिसला उशीर होत असल्यामुळे तिच्यावर रागावन्यात काहीच अर्थ नव्हता पण तिने एवढ्या प्रेमाने सर्व बनविल्यावर असच सोडून जाणे परवडनार नव्हतं म्हणून अजिंक्य खायला बसला ..

" प्लिज पहिला घास भरव ना !! " , तो नजरेनेच बोलू लागला

तिनेही कुठलाच आव न आणता त्याला पहिला घास भरवला आणि लगेच आपल्या कामाला लागली ..त्यानेही लगेच नाश्ता संपवला आणि पिल्लुला गोड पप्पी देऊन ऑफिसला निघाला..

ऑफिस जॉइन होऊन अजिंक्यला 6 महिने झाले होते ..मिश्रा सरांच्या ओळखीमुळे नवीन एम्प्लॉयी म्हणून रुजू होण्याऐवजी सिनियर म्हणून रुजू करून घेण्यात आले होते त्यामुळे स्वताची केबिनसुद्धा मिळाली होती ..बॉस खूपच भारी होता ..बॉस कसला मित्रच होता ..फक्त 5 वर्षाने मोठा असल्याने त्याच्याशी बोलण्यात त्याला खूपच मज्जा येत असे शिवाय काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास बॉस त्यालाच विचारत असे ..त्याचे तर्क एकूण तो फारच इम्प्रेस होऊ लागला होता त्यामुळे काही दिवसातच अजिंक्य तिथे स्थिरावला ..

अजिंक्यला ऑफिसला पोहोचेपर्यंत 10.30 वाजले होते ..मिटींगला अजूनही अर्धा तास उरला होता त्यामुळे त्याने काही महत्त्वाचे मेल्स चेक केले ..पाहता - पाहता सर्व कलिग्स आले आणि बॉस येताच सर्व कॉन्फरन्स हॉलला पोहोचले . एव्हाना सर्वांना कॉफी ऑफर करण्यात आली होती ..सर आले आणि सर्वांनी उभं राहून त्यांना विश केलं ..सरांचा चेहरा आज प्रफुल्लित जाणवत होता ..हातात मिठाईचा डब्बा असल्याने काहीतरी गुड न्यूज होती हे सर्वाना जाणवू लागल ..सरानी मिठाईचा डब्बा खोलला आणि सर्व उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले ..

" आपण बऱ्याच दिवसांपासून ज्या प्रोजेक्ट वर काम करत होतो तो प्रोजेक्ट आज अप्रूव झाला आहे ..माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण आहे ..मी कितीतरी दिवस या क्षणाची वाट पाहिली आहे आणि आज ते स्वप्न जगताना मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय ..हे सर्व घडलंय ते आपल्या सर्वांच्या एफर्ट्समुळे ..तेव्हा हा क्षण मला तुमच्यासोबत साजरा करायचा आहे " , सर हर्षोउल्हासित होऊन बोलत होते ..

सर्वांकडून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला ..

ते पुन्हा बोलू लागले .. , " नाही म्हटलं तरी यात अजिंक्यचा वाटाही तेवढाच आहे तेव्हा मी आज ऑफिशिअली अजिंक्यला या प्रोजेक्टचा हेड बनवतोय "

आता अजिंक्यच्या चेहऱ्यावरचा आनंद उफाळून वर येऊ लागला ..सरानी त्याला केबिनमध्ये ये अस सांगून हॉल सोडला ..एव्हाना सर्वांनी त्याला अभिनंदन केलं ..मिठाई घेऊन सर्व बाहेर पडले ..तोही आज फार खुश होता पण पुन्हा एक जबाबदारी येऊन पडली होती तेव्हा पुन्हा जास्त काम करणं गरजेचं होतं त्यामुळे थोडा निराश झाला होता ..

तिथून उठून सरळ सरांच्या केबिनला गेला..सर आपल्या कामात बिजी होते ..

त्याने नम्रपणे विचारलं , " सर आत येऊ का ? "

" ओ अजिंक्य ये ना ..ये ये बस ", त्यांनी दिलखुलासपणे त्याच स्वागत केलं ..

काहीच वेळात रियाही तिथे आली ..सर बोलत असताना त्यांचा चेहरा आज फारच खुलून दिसत होता पण मधातच त्यांचा फोन वाजायचा आणि ते पुन्हा गोंधळून जायचे ..शेवटी त्यांनी फोन स्वीकारला ..

बोला राणीसरकार ..

हा एकमेव शब्द त्यांच्या तोंडून बाहेर निघाला आणि मग एकही शब्द बोलण्याची त्यांना मुभा दिली गेली नाही ..हे काय आताच निघतो आहे म्हणत सरानी फोन ठेवला ..

म्हणजे आपण एकमेव नाहीत जे आपल्या बायकोसमोर बोलू शकत नाही हें पाहून अजिंक्यला फार आनंद झाला ..सरांना तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागला ..

" हो हस ..सर कसे आपल्या बायकोला घाबरतात हें पाहुन हसू येणारच ..काही नाही रे तिला आज मूवी दाखवणार होतो ..ती थेटरला पोहोचली आणि मी अजूनही पोहोचलो नाही म्हणून रागावत होती बिचारी ..बर चल मी निघतो नाही तर पुन्हा रागवेल ती ..मी प्रोजेक्टची फाइल रियाकडे दिली आहे तू काम करायला सुरुवात कर " , हसत - हसत बोलून ते निघून गेले ..

रियाकडील फाइल घेऊन तो केबिनला पोहचला ..फाईलमध्ये अशा भरपूर गोष्टी करायच्या बाकी होत्या ज्या त्याला पूर्ण कराव्या लागणार होत्या ..त्याने एकदा संपूर्ण प्रोजेक्ट डोळ्यांखालून काढून घेतला ..सर्व मुख्य पॉईंट्स हायलाइट करून घेतले एव्हाना सायंकाळ झाली होती ..तो एकदा काम करायला बसला की ते काम पूर्ण केल्याशिवाय घरी जात नसे त्यामुळे घरी उशीर होण्याची बातमी कळवून तो तिथेच काम करत बसला..

सकाळपासून काम करतच होता..तरीही काम काही संपेना ..ऑफिसला सुट्टी झाली होती ..सर्व लाइट्स बंद झाले होते ..पियुन घरी जात असल्याच सांगून परतला होता ..फक्त तोच तिथे एकटा होता ..रात्रीचे 8.30 वाजले होते ..तितक्यात एक हात कॉफी घेऊन समोर आला ..


" खूप काम केलं आहेस ..घे कॉफी घे बर वाटेल " , रिया काळजीने त्याला म्हणाली ..

त्यालाही ती कॉफी हवी होती शिवाय काही वेळ ब्रेक सुद्धा हवा होता ..त्यामुळे तिची ऑफर त्याने लगेच स्वीकारली

" तू गेली नाहीस अजून ? " , तो रियाला म्हणाला.

" सोबतच जाऊ " , ती म्हणाली

सोबत कुणीतरी असल्याने त्यालाही बर वाटल ...

" रिया बर झालं तू थांबली तर ..मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होत .." , अजिंक्य शांत होत म्हणाला

तीही व्याकुळतेने म्हणाली , " हो बोल ना "

" हे बघ रिया तू फ्लर्ट करतेस मला त्याच काहीही वाटत नाही पण घरी अस नको वागत जाऊ ..मृणाल नाराज होते ग !! मला नाही पाहवत तिला अस ..प्लिज ना विडिओ कॉल नको करत जाऊ ..आणि कमीत कमी तिथे तरी फ्लर्ट नको करत जाऊ ..", अजिंक्य तिला समजावीत म्हणाला..

" किती प्रेम करतोस रे तिच्यावर ..कधी - कधी माझ्यावरही करत जा थोडस प्रेम ..बर ठीक आहे आजपासून सांभाळून बोलेन पण मी ऑफिसमध्ये अशीच वागणार आणि यात काहीच बदल होणार नाही ..आफ्टरऑल यु आर माय बेस्ट बडी डिअर ", ती पुन्हा खेचत म्हणाली ..

तू नाही सुधारणार म्हणत त्याने लॅपटॉप बंद केला...एव्हाना सर्व काम आटोपून निघायला 9 वाजले ..त्याने आधी रियाला ऑटोस्टॅण्ड वर ड्रॉप केलं आणि घराकडे निघाला ..एका तासाचा रस्ता पार करत तो घरी पोहोचला ..छोटंसं शहर असल्याने ट्रॅफिकचा फार त्रास त्याला तिथे सहन करावा लागत नव्हता ..त्याने गाडी पार्क केली ..मृणाल त्याचीच वाट पाहत बसली होती ..तिने येताच अजिंक्यच्या हातातली बॅग घेतली आणि तो फ्रेश व्हायला गेला ...आई- बाबा , पिल्लू झोपले होते ..मृणाल जेवण्यासाठी थांबली होती ..तिचा रागही नाहीस झाला होता ..त्यामुळे प्रेमाने वाढायला सुरुवात केली ..तो हळूच तिच्याकडे पाहून हसू लागला ..तिलाही ते पाहून हसू येत होतं तरीही तिने ते हसू लपवून जेवणावर लक्ष दिलं ..जेवण आटोपलं आणि सरळ बेडवर जाऊन पडला ..

पिल्लू बाजूला शांत झोपल होत ..तिला पाहून पुन्हा एकदा कामाचा थकवा नाहीसा झाला ..मृणालही सर्व काम आटोपून आत आली होती ..येताना तिने दार आतून लावून घेतलं ..आणि अजिंक्यच्या हातावर येऊन पडली ..तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करून तो पिल्लुकडे पाहू लागला ...

" सॉरी ना रे!! मला माहित आहे त्यात तुझी काहीच चूक नव्हती पण तुला दुसरीने स्वताच म्हणावं याचा विचारच सहन होत नाही...मला किती वाईट वाटलं असेल ..तू फक्त आणि फक्त माझाच आहेस कळलं..तरीही सॉरी .." , ती हळू आवाजात त्याला म्हणाली ..

तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिलं नाही ..

" सांग ना काय करू ज्याने तुझा रुसवा जाईल ." , ती पुन्हा एकदा बोलू लागली ..

तो मात्र याच संधीच्या शोधात होता .. " काही नाही मला फ़क्त अधरात सामावून घे " , तो रोमँटिक होत म्हणाला..

" बस एवढंच ना..मी तुझीच तर आहे .हे संपूर्ण शरीर तुझंच तर आहे..जेव्हा तू याला स्पर्श करतोस तेव्हाच याला पूर्णत्त्व मिळत ." , ती म्हणाली

तिने चेहऱ्याचा एक भागही बाकी ठेवला नाही ..तिचा तो स्पर्श आजही त्याला तेवढाच हवासा वाटतो ..त्या क्षणाची खरी मजा तर आज लग्नानंतर जाणवते ..दिवसभर थकल्यावर ती एकच गोष्ट असते जी दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी पुन्हा सज्ज करते ..तिला अस बघून मग एक गीत आठवलं

🎵 🎶 🎵 🎶 🎵 🎶 🎵 🎶

ओठो से छुलो तुम
मेरा गीत अमर करलो
बन जाओ मित मेरी
संगीत अमर करलो

🎶 🎵 🎶 🎵 🎶 🎵 🎶 🎵 🎶


तिच्या त्या नशिल्या डोळ्यात आता तो पूर्णच बुडाला ..ना वेळेचं भान होत ना थकव्याची जाणीव ..होते तर ते फक्त दोघेच ..प्रयसी आणि प्रियकर होण्यापेक्षा नवरा बायको मधील ते आकर्षण त्यांना जास्त आवडत होत ..त्यात समजूतदारपना होता आणि होता तो हट्ट ..जबाबदारीची जाणीव होतीच पण होत ते निरागस प्रेम ..असंख्य वेदनेनंतर हे क्षण त्यांना मिळाले होते आणि ते क्षण ते आनंदाने जगू लागले..तेव्हाच तर कुठे सुखाच महत्त्व आता त्यांना पटू लागलं ..खरच किती सुंदर असतात न लग्नानंतरचे ते पहिले - वहिले क्षण ...लोक उगाच म्हणतात की लग्नानंतर काहीच उरत नाही पण दिवसभर तिच्याशी दुरावा सहन करून जेव्हा तीची घट्ट मिठी घेतो तेव्हा जाणवते ती प्रेमाची जादू ..किती मस्त पर्व आहे न हे प्रेमाचं ???

क्रमशः....