नर्मदा परिक्रमा - भाग २ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नर्मदा परिक्रमा - भाग २

नर्मदा परिक्रमा भाग २

नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे.

या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे.
या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे.
ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे.
परिक्रमा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीला अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो.

या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी प्रदक्षिणा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस, तर अयोध्या-मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस. नैमिपारण्य- जनकपुरी या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा- जवळजवळ तीन हजार ५०० कि.मी. (१७८० मैल) आहे.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते,कारण ती दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहते.
नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा.
मार्कंडेय ऋषींनी नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा ही सर्वात प्रथम त्यांनीच केली होती असे मानतात.
अमरकंटक शिखरातून नर्मदेचा उगम होतो.
सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते.
महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिचा महीमा चारही वेदांत तसेच स्कंद पुराणातही वर्णन केला आहे .
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. नद्यांच्या दैवी प्रभावाची कल्पना-जाणीव आपल्या पुर्वजांना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्यभावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेची !

भरतखण्डात नर्मदेपेक्षाही आकार विस्तार नि लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या तरी त्यांचं आकारमान आणि विस्ताराच्या मोजमापांपेक्षा नर्मदेचं प्राचीनत्व नि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व अशा वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते !

ही परिक्रमा पायी केल्यास ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण २६०० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते.
परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही.
अमरकंटक, नेमावर व ॐकारेश्वर यापैकी कुठूनही सुरुवात करता येते.
परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते.
सदाव्रतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते.

रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर..या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.

परिक्रमेत जाताना या आवश्यक गोष्टी लागतात .
पांघरण्यास एक रग,खाली अंथरण्यास एक पोते, चटई अथवा कांबळे,पाण्यासाठी कडी असलेला डबा,थंडीसाठी स्वेटर अथवा जॅकेट,हातात काठी असल्यास सुविधा होते.

पायी परिक्रमा करतांना लागणारी गावे

परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरू केली तर खाली दिलेली गावे क्रमाक्रमाने लागतात.

ओंकारेश्वर,मोरटक्का,टोकसर,बकावा,भट्यान,अमलथा,बडगाव,नावा टौडी,शालिवाहन आश्रम,बलगाव,खलघाटकठोरा|भिकारी बाबा आश्रम,दवाना,राजपूर,दानोद,पलसुद,निवाली,पानसेमल,ब्राम्हणपुरी,प्रकाशा,खापर,सागबारा,डेडियापाडा,खुरा आंबा,राजपिपला,गोरागाव|नवीन शूलपाणेश्वर,कटपूर
कटपूर ते मिठीतलाई-बोटीतून समुद्राने प्रवास - (नर्मदा व समुद्र याच्या संगमाचे स्थान.),एकमुखी दत्त,अविधा,सुवा,नवेठा,झाडेश्वर,धर्मशाला,नारेश्वर,शिणोर,चांदोद,तिलकवाडा,गरुडेश्वर,मांडवगड|चतुर्भुज राम,रेवकुंड,हिरापूर,महेश्वर,जलकुटी,मंडलेश्वर,जलूद,घारेश्वर|अर्धनारीनटेश्वर,विमलेश्वर,खेडीघाट,पामारखेड
नर्मदेचे नाभिस्थान,छिपानेर,बाबरीघाट,आवरीघाट,बुदनी,बनेटा थाला,पतईघाट,थारपाथर
नर्मदेचा उगम,कबीर चबुतरा,रुसा,गाडा सरई,डिंडोरी,चाबी,सहस्रधारा,तिलवाडा|जबलपूर जवळ,सोमती
कोरागाव,करेली,कौंडिया,बासरखेडा,करणपूर,हुशंगाबाद,आमुपुरा,मालवा,छितगाव,हरदा,मांडला

ओंकारेश्वर –ला परत

बहुतेक गावे मध्य प्रदेश राज्यातील आहेत.
नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या ३ राज्यांमधून वाहते. मध्यप्रदेशमधील अमरकंटक येथून मैय्याचा (नर्मदा) उगम होतो आणि गुजरात मध्ये भडोच च्या जवळ कठपोर येथे ती समुद्राला मिळते ज्याला रेवासागर असे म्हणतात. उगमापासून समुद्रापर्यंत मैय्याची लांबी अंदाजे १५०० कि मी आहे म्हणून परिक्रमेच्या मार्गाची लांबी साधारण ३००० कि मी आहे.

नर्मदे हर नर्मदे हर ..