नर्मदा परिक्रमा भाग ५
श्रद्धापूर्वक नर्मदा परिक्रमा करीत असताना वारंवार असा अनुभव येतो की नर्मदा माता कायम आपल्या सोबत आहे .अनेक संकटातून ती आपल्यला तारून नेत असते .अनेक लोकांनी केलेल्या परिक्रमेतील अनुभव आपल्यला थक्क करतात .
एकदा चालायला सुरवात केल्यावर मनाचा कणखरपणा दाखवावा लागतो .
रोज कमीतकमी ३५ किमी चालले तरच हा टप्पा तीन महिन्याच्या अवधीत पूर्ण होतो आणि तुम्ही निर्धारित वेळेस निर्धारित ठिकाणी पोचू शकता .
प्रथम प्रथम रोज इतके चालण्याची सवय नसल्याने पायाला फोड सेप्टिक वगैरे होऊ शकते .
रात्रीची जागा मिळेल तिथे, अंधारात, मंदिरात, उघडय़ावर, पारावर झोपावे लागते .
हळू हळू वातावरणाशी समरसता होत जाते.
तेथील वातावरण इतकं ‘नर्मदे हर’ या शब्दांनी भारित झाले आहे की कोंबडय़ाची बांग, गाईचं हंबरणं, पक्ष्यांचा मंजूळ आवाज या सगळ्यातून आपल्याला ‘नर्मदे हर’ असेच ऐकावयास येते. त्याला आपण ‘नर्मदे हर’ या शब्दांनीच प्रतिसाद द्यायचा असतो.
नर्मदेने आपल्या आवाक्यातील सारा परिसर हराभरा आणि निसर्गसौंदर्याने समृद्ध केला आहे. काही ठिकाणी परिक्रमा मार्ग शेतातून व केळीच्या बागांमधून जातो. तेथील भरपूर निसर्गसौंदर्य, शेती, ताजी फळं, ताज्या भाज्या या सर्वाचा परिक्रमेदरम्यान आनंद घेता येतो.
प्रत्येकाच्या शेताजवळून जाताना हवी तेवढी फळे, भाज्या, ऊस खायला मिळतो .
तुम्ही परिक्रमावासी म्हटल्यावर तुमच्याबद्दल अत्यंत आदराची भावना लहानथोर, गरीब, श्रीमंत अशा सर्व प्रकारच्या माणसांमध्ये दिसते. दोन वर्षांच्या मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण ‘नर्मदे हर’ म्हणून आदर व्यक्त करीत असतो.
प्रवासात कोरीव काम केलेली अनेक सुंदर सुंदर मंदिरे दिसतात.
मगरीवर स्वार नर्मदामातेची मूर्ती व छबी अतिशय मोहक वाटते.
खूप सुंदर घाट, ठिकठिकाणी सुंदर आश्रम, धर्मशाळा असे सर्व लागते .
परिक्रमेतील एक विलक्षण अनुभव म्हणजे पाच तासांचा समुद्रप्रवास.
नर्मदा नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तिथे समुद्राच्या मध्यभागी, समुद्रात सामावून न जाता तिचे वेगळे अस्तित्व पाहायला मिळते.
तिथे आपण परिक्रमेसाठी घेतलेले गोमुखातील अर्धे जल नर्मदा नदीला समर्पित करून तिथूनच अर्धे जल पुन्हा बाटली पूर्ण भरून नर्मदामैयाची ओटी समुद्रातील पाण्यात सोडायची असते.
हा प्रवास समुद्राच्या भरतीनुसार १५ दिवस सकाळी व १५ दिवस रात्री असा असतो.
‘नर्मदे हर, नर्मदे हर, रक्षो माम, नर्मदे हर, नर्मदे हर, प्राही मा मेजेच’ |
म्हणजे नर्मदे माते, आमचे रक्षण कर व तूच आम्हाला तार, अशा प्रकारचे प्रार्थनास्वरूपी नामस्मरण धर्मशाळेत तुमच्याकडून करून घेतले जाते. कारण आपण तिच्यापुढे समर्पित होऊन हा प्रवास करावयाचा असतो.
समुद्राला भरती आल्यानंतर या बोटी समुद्रात उतरवता येतात.
त्यामुळे सकाळी चार वाजल्यापासून जेव्हा भरती येईल त्या वेळेला ती बोट सुटते. भरपूर थंडी, अथांग समुद्र, वर निळेभोर आकाश, नावाडी आणि प्रवासी.. रात्रीच्या प्रवासात आजूबाजूला मिट्ट काळोख असतो. अवर्णनीय व रोमांचकारी असा हा प्रवास!!
दोन्ही तटांवर प्रचंड चिखल. त्यामुळे बोटीत चढताना व उतरताना प्रचंड त्रेधातिरपीट होते. पण खूप आनंदही वाटतो.
त्यात नावेत भजन, आरती हेही चालू असतेच. नर्मदामैयाची आर्ततेने केलेली आरती व त्यामुळे ती आपल्याला सुखरूप पैलतीरी नेते अशी भक्तांची भावना असते.
नर्मदेचे नाभीस्थान म्हटले जाणारे नेमावर हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. शंकराचे खूप प्राचीन मंदिर तेथे आहे. येथेच नर्मदामातेचे सुंदर मंदिर आहे.
प्रचंड थंडी. प्रचंड धुकं आणि पाऊस. असे तीठेल हवामान असते .
रोज पहाटे साडेचार वाजता उठून नर्मदेत किंवा हातपंपावर आंघोळ करणे, पूजा-आरती, नंतर साडेसहा वाजता चालायला सुरुवात.. असा दिनक्रम. दमून संध्याकाळी थांबू तिथे सर्वासाठी चूल पेटवून टिक्कड, जाड पोळी व भाजी-आमटी बनवणे असा दिनक्रम असतो .अनिश्चित हवामाना मुळे प्रवासात अडचणी येतच असतात .
पण मातेच्या कृपे मुळे आपण त्यातून तरुन जाऊ हाही विश्वास असतो .
माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी नर्मदामातेचे उगमस्थान असलेल्या अमरकंटकला पोचणे हा नातीं टप्पा असतो . त्याआधी संक्रांतीला ग्वारी घाट येथे मैयामध्ये स्नान करण्यासाठी थांबतात .
पुढे बिलासपूरहून ४० कि.मी. वर अमरकंटकला मृत्युंजय आश्रम आहे .
मध्ये घनदाट जंगल आहे .
‘माई का बगीचा’मध्ये उगमस्थानी पुन्हा जल चढवून प्रसाद घेऊन डिजेरी मार्गावर जावे लागते तेथेही . पुन्हा घनदाट जंगल लागते .
२६ जानेवारीला नर्मदा जयंती प्रत्येक घाटावर साजरी केली जाते.
त्यानंतर देवगाव येथील बुढीमाई संगमावर पोहोचतात.
नर्मदामैया व तिची आई इथे एकमेकींना भेटतात, म्हणून हा बुढीमाई संगम.
हे संगमाचे ठिकाण अतिशय सुंदर आहे.
नर्मदे हर नर्मदे हर ...