Prem he - 7 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 7

.......... आजही तो तिची प्रॅक्टिस बघायला आला होता.. पण आज तिचा पार्टनर काही कारणामुळे आला नव्हता... मग तिने एकटीनेच नाचायला सुरुवात केली... सरांनी song प्ले केलं.......

प्रीत की लत मोहे ऐसी लागी
हो गई मैं मतवारी..
बल-बल जाऊँ अपने पिया को
हे मैं जाऊँ वारी-वारी..
मोहे सुध बुध ना रही तन मन की
ये तो जाने दुनिया सारी..
बेबस और लाचार फिरूँ मैं
हारी मैं दिल हारी......
हारी मैं दिल हारी.......

आणि निहिरा ने ताल धरला...... 💃सुरुवात तिची एकटीचीच असायची... आणि मग तिचा पार्टनर तिला जॉईन व्हायचा..

तेरे नाम से जी लूँ
तेरे नाम से मर जाऊँ...

विहान गर्दीतून धावत पळत आला आणि त्याने निहिरा ला जॉईन केलं.....तो ही मुळात डान्सर असल्याने आठ दिवसांत त्याला निहिरा चा डान्स पाठच झाला होता.. 😄निहिरा आधी गोंधळली.. पण तिने डान्स थांबवला नाही... तिने ही लगेच त्याच्यासोबत नाचायला सुरुवात केली....

🎼🎼💃💃
तेरे नाम से जी लूँ
तेरे नाम से मर जाऊँ..
तेरी जान के सदके में
कुछ ऐसा कर जाऊँ..
तूने क्या कर डाला
मर गयी मैं मिट गयी मैं..
हो जी.. हाँ जी..
हो गयी मैं...
तेरी दीवानी दीवानी......
तेरी दीवानी दीवानी......

विहान निहिरा च्या मागून आला... त्याचा एक हात तिच्या कमरेत आणि दुसर्‍या हातात तिचा हात होता ... दोघांनी नाचायला सुरुवात केली.. दोघेही बेभान होऊन नाचत होते... जणू त्या क्षणी ते दोघेच तिथे होते.. आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता त्यांना... दोघांचा synchro जबरदस्त होता... विहान सुंदररीत्या तिला लिफ्ट करत होता...! दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत बघत नाचत होते....😍 बघणारे अवाक् होऊन पाहत होते... 😮 आजूबाजूला काळोख होता.. फक्त एक spotlight दोघांवर सोडला होता.. दोघेही त्या गाण्याच्या प्रत्येक ओळी मध्ये धुंद होऊन नाचत होते..शब्दनशब्द फील करत होते..

🎼🎼💃💃
इश्क जुनूँ जब हद से बढ़ जाए
हँसते-हँसते आशिक सूली चढ़ जाए..
इश्क का जादू सर चढ़कर बोले
खूब लगा लो पहरे रस्ते रब खोले...
यही इश्क दी मर्ज़ी हैं
यही रब दी मर्ज़ी हैं..
तेरे बिन जीना कैसा हाँ खुदगर्ज़ी है..
तूने क्या कर डाला
मर गयी मैं मिट गयी मैं
हो जी.. हाँ जी.. हो गयी मैं..
तेरी दीवानी दीवानी.....
तेरी दीवानी दीवानी.......

गाणं संपलं.. आणि शेवटी गोल गोल फिरत ती विहान वर आदळली.. त्याच्या छातीवर तीचं डोकं होतं.. त्यानेही आपले हात तिच्या भोवती लपेटले... दोघांचेही श्वास एकमेकांत मिसळले होते.. सभोवताली टाळ्यांचा अन्‌ शिट्ट्यांचा आवाज दणाणला.. तसे दोघे भानावर आले... निहिरा ने मान वर केली आणि बघितले तर ती अजूनही त्याच्या मिठीत होती... ती लाजेने गोरीमोरी झाली.. 😍🙈 आणि विहान पासून पट्कन दूर झाली... विहानही गालातल्या गालात हसला... 😅.. निहिरा चे सर म्हणजे विहान चा मित्रच होता 😅.. विहान ही सुरुवातीला त्याच्याकडे डान्स शिकला होता.... आणि आता तर त्यानेही विहान आणि निहिरा ला खूप appreciate केलं... सर्वच जण त्यांची वाहवा करत होते...! निहिरा अजून लाजतच होती... तिने सरांची परमिशन घेतली आणि अवनी ला घेऊन तिथून निघून गेली..... जाता जाता अवनी ने तिला चिडवलंच..

"मॅडम... काय नाचलात आपण!! रोजच्या पेक्षा आज काहीतरी वेगळं वाटलं डान्स मध्ये... विहान तर काय नाचतो यार!!!.... सुपर्ब.... दोघांनी चार चाँद लावलेत गाण्याला.. 😍😁😁"

"अवनी.. प्लीज.. आता तू तरी नको सुरू होऊ.. आधीच लाजून पाणीपाणी झालंय माझं...🙈🙈.. गाडी चालवू दे मला.. "

" ओह्हो.. लाजायला पण शिकलात वाटतं... 😝"

आणि दोघीही हसायला लागल्या ....!

- - - - - - - XOX - - - - - - -

निहिरा घरी आली... फ्रेश झाली.. आज ती खुशीत गुणगुणतच होती...

" काय मग.. आमची लेक आज खूप खुशीत दिसते!! काय झालंय एवढं? 😃 आणि डान्स प्रॅक्टिस काय म्हणतेय? ".. निहिरा च्या बाबांनी तिला विचारलं.. निहिरा ने हळूच जीभ चावली.. 😬 चेहर्‍यावरचे भाव नॉर्मल ठेवत ती सोफ्यावर बाबांजवळ येऊन बसली...

" काही नाही बाबा... डान्स प्रॅक्टिस खूप छान चालली आहे आमची... मीच फर्स्ट येणार आहे यंदा.. बघाच तुम्ही!!! "निहिरा confidently म्हणाली 😊

"हो का.. अरे वाह.. छान छान!... पण अभ्यासाकडे दुर्लक्ष नका करू म्हटलं..."

"नाही बाबा.. अज्जिबात नाही... अभ्यास ही खूप छान सुरु आहे.. आणि तुम्हाला माहितीये फायनल इयर ला जी प्रोजेक्ट competition असते ना आमच्या कॉलेज मध्ये.. ज्यामध्ये सिलेक्ट झाल्यावर सिंगापूर ला प्रतिष्ठित IT कंपनी मध्ये ट्रेनिंग ची संधी मिळते.. मी त्यात ही भाग घेणार आहे आणि त्या प्रोजेक्ट वर काम करायला मी आत्तापासूनच सुरुवात केली आहे.. 😊😊... मलाही सिंगापूर ला जायचंच आहे..मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे! "

" अरे व्वा... छान स्वप्ने आहेत माझ्या लेकीची... असेच ध्येय ठेव आयुष्यात आणि त्यासाठी खूप मेहनत घे.. आणि यशस्वी हो... माझे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बेटा!! "निहिरा चे बाबा तिच्यावर खुश होत बोलले .. 😊

निहिरा ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती.. त्यामुळे वडिलांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या .. निहिरा ला ही याची जाणीव होती.. त्यामुळेच ती तिच्या ध्येया पर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेत होती... ☺️☺️
पण तिची आई तिला नेहमी तिच्या रागावरुन बोलायची..
"निहू तुझा राग जरा कमी कर.. एकदा चिडलीस की तुला कशाचंही भान राहत नाही.. मुलीच्या जातीला एवढा राग चांगला नव्हे... 😐"

"हो गं आई.. नको ना सारखं तेच तेच... घेईन मी काळजी"
दरवेळी असं काहीतरी बोलून ती वेळ मारून न्यायची.. पण खरं म्हणजे तिच्या रागाला काही औषधच नव्हतं जणू...!

- - - - - - - - - XOX - - - - - - - -

बाबांसोबत बोलून ती तिच्या रूम मध्ये गेली.. आणि आज जे झालं ते परत आठवू लागली.. 😊 किती भारी डान्स करतो विहान...!! 😍 किती सुंदर साथ दिली त्याने आज मला.. 😄.. काश गॅदरींग च्या वेळी पण तोच माझा पार्टनर असता.. 😅😅😍.. नाचताना झालेला विहान चा स्पर्श आठवून तिला अजूनही गुदगुल्या होत होत्या.. 😄 आणि शेवटी तर काही वेळ ती त्याच्या मिठी मध्येच होती...! ते आठवून तर तिचे गाल लाजेने लालेलाल झाले.. 😄😄

पण.... परत तिने स्वतःला सावरलं.. का विचार करतेय मी त्याचा एवढा.. 😑 एवढा स्मार्ट, हुशार, एका बिझनेसमन चा मुलगा.. माझ्यासारख्या सामान्य मुलीच्या प्रेमात पडू शकतो का!?.. की तो फक्त टाइमपास करतोय माझ्यासोबत 😒😔.. निहिरा अजूनही विहान च्या बाबतीत कन्फ्युज होती...

- - - - - - - XOX - - - - - - -

विहान तर आज जे झालं त्यानंतर हवेतच होता.. 😍😍 तो ही घरी आला... त्याला तर सारखं निहिरा आपल्या जवळच असल्यासारखं वाटत होतं.. आज तो खूपच खुश होता... येता येता सोनिया ने त्याला चिडवलं ही होतं..

"मिस्टर विहान गाडी पुढे सरकली तुमची!! 😂😂"

ते आठवून तो स्वतःशीच हसला... 😅

"विहान बेटा... जेवून घे चल .. डॅडी वाट बघतायत" आईच्या आवाजाने तो भानावर आला..

"आलो मॉम...." म्हणत तो जेवायला गेला...

आज जेवणाकडेही लक्ष नव्हतं त्याचं..आईने विचारलंही
जेवत का नाही म्हणून...

" मॉम.. अ‍ॅक्च्युअली खूप दमलोय आज.. खूप झोप येतेय... भूक नाहीये.. "

" अरे पण थोडंतरी खाऊन घे " डॅडी काळजीने म्हणाले..

"सॉरी डॅड.. पण खरंच बास झालंय.. तुम्ही दोघे जेवा.. मी झोपतो जाऊन..." विहान काहीतरी कारण देऊन त्याच्या रूम मध्ये गेला ..

झोप तर आज त्याला लागणारच नव्हती 😄बेड वर पडल्या पडल्या तो निहिरालाच आठवत होता... इतक्यात त्याच्या फोन ची मेसेज टोन वाजली... इतका वेळ बाजूला पडलेला मोबाईल त्याने हातात घेतला .. आणि बघतो तर... निहिरा चा मेसेज!!! ❤️
त्याने घाईघाईने मेसेज ओपन केला ...!

📱हाय विहान..
थँक्स.. आज मला सोबत केल्याबद्दल!
यू आर अमेझिंग डान्सर!

विहान ने मेसेज परत परत वाचला... आज निहिरा ने पहिल्यांदाच त्याला मेसेज केला होता.. तसे ग्रुप चॅट वगैरे चालूच असायचे त्यांचे.. पण एकमेकांनी पर्सनली मेसेज नव्हता केला कधी.. आज विहान चं 'सोने पे सुहागा' असं झालं होतं...!! 😄😄

To be continued..
🙏
#प्रीत 🍁


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED