Prem he - 9 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 9

.......... "अ‍ॅक्च्युअली थोडं बोलायचं होतं तुझ्याशी... कॉलेज जवळच्या कॅफे मध्ये येशील का दहा वाजता? प्लीज...एकटीच ये.."

"ओके ... नो प्रॉब्लेम .. येते.."

"ओके बाय.."

"बाय".. म्हणत दोघींनीही फोन ठेवला..निहिरा विचारात पडली... 'कशासाठी बोलावलं असेल सोनिया ने.. 🤔 सिंगापूरवाल्या प्रोजेक्ट बद्दल तर बोलायचं नसेल ना...'
सोनिया ही त्या लास्ट इयर च्या प्रोजेक्ट मध्ये पार्टीसिपेट करणार होती.. 'पण त्यासाठी एवढ्या अर्जंट कशाला बोलावेल... 🤔.... किंवा कदाचित विहान च्या बर्थडे साठी काही प्लान करायचा असेल आणि आपली मदत हवी असेल.. हो... असही असू शकतं.. '

निहिरा निरनिराळे तर्क लावतच तयार झाली.. आई ला सांगून ती आपली स्कूटी घेऊन निघाली.. कॉलेज जवळच्या कॅफे समोर आपली स्कूटी लावून ती आत गेली.. विहान आधीच तिथे पोहोचला होता... विंडो जवळच्या एका कोपर्‍यातल्या टेबल वर तो बसला होता... तिचीच वाट पाहत... तिला पाहताच तो उठून उभा राहिला...निहिरा ने आबोली कलर चा लॉन्ग फ्लेअर्ड कुर्ता आणि ब्लू कलर चं लेगिंग घातलं होतं.... ती खूपच सुंदर दिसत होती... 😍 विहान तिच्याकडे पाहातच राहिला... त्याच्या हृदयाची धडधड वाढली...💓

निहिरा इकडे तिकडे बघत सोनिया ला शोधत होती... इतक्यात तिला समोर विहान दिसला... विहान ने नेव्ही ब्लू कलर चा हूडेड स्टाइल टी-शर्ट आणि लाइट ब्लू जीन्स घातली होती.. तोही नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत होता... 😍 कॅफे मधल्या कितीतरी मुलींनी एवढ्या वेळात त्याच्याकडे वळून वळून पाहिलं होतं... 😄😄....
त्याला बघताच निहिरा त्याच्याजवळ आली...

"हाय विहान... विश यू अ व्हेरी हॅप्पी बर्थडे!!!" निहिरा त्याला हात मिळवत म्हणाली..

"थँक यू सो मच निहिरा... ☺️" तो जरा थरथरतच म्हणाला..

"तू इथे काय करतोयस... आणि ही सोनिया कुठे राहिली काय माहीत... थांब तिला कॉल करते..." म्हणत निहिरा ने पर्स मधून मोबाईल बाहेर काढला...

" निहिरा wait.... तिला कॉल नको करू... अ‍ॅक्च्युअली.. तिने माझ्यासाठीच तुला इथे बोलावलंय... 😓"

" म्हणजे... मला समजलं नाही..." निहिरा ने गोंधळून विचारलं...

" आय अॅम सॉरी .. बट .. मलाच तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं.. पण कदाचित मी तुला बोलावलं असतं तर तू आली नसतीस..😔 म्हणून सोनिया ला सांगितलं... प्लीज चिडू नको...😓 बस ना... आपण बसून बोलुया... " विहान तिचा अंदाज घेत म्हणाला..

निहिरा काही बोलली नाही.. ती चेअरवर बसली... तसा तोही समोरच्या चेअरवर बसला... इतक्यात वेटर त्यांच्या टेबल जवळ आला...विहान ने तिला 'कॉफी घेणार ना' म्हणून विचारलं.... ती मानेनेच 'हो' म्हणाली.... विहान ने वेटर ला दोन कॉफी☕ ची ऑर्डर दिली....

आता निहिरा चं हृदय जोरजोरात धडधडत होतं... 😑 काय बोलायचं असेल विहानला... असं अचानक.... 😧 विहान तर आपला फ्रेंड आहे... कितीतरी वेळ आम्ही एकाच ग्रुप मध्ये सोबत असतो... मग आज माझं हृदय एवढ्या जोरजोरात का धडधडतंय😑... मला कसली भीती वाटतेय 🙁...विहान ची?? की आणखी कसली??
निहिरा ला तर काही सुचतच नव्हतं... ती खाली मान घालून पायाच्या अंगठ्याने उगीच काहीतरी गिरवत बसली होती..! थोडा वेळ असाच गेला.... कुणीच काही बोलत नव्हतं....निहिरा तिच्या विचारांत हरवली होती.... आणि विहान... तो एकटक तिलाच बघत होता..! वेटर कॉफी घेऊन आला तसे दोघेही भानावर आले.. त्याने दोघांच्या पुढ्यात एक एक कप ठेवला.. आणि निघून गेला...

"निहिरा आधी कॉफी घे.. मग बोलू..." विहान ने request केली..

तिने मान वर न करताच तिच्याजवळचा कप हातात घेतला.. आणि बघितलं तर त्या कॉफी वर क्रीम ने दोन हार्टस् काढले होते... 💕 निहिरा ने विहान कडे बघितलं... दोघांची नजरानजर झाली... त्याने काहीच न बोलता एक आवंढा गिळला.. आणि काचेतून बाहेर बघत कॉफी चा एक घोट घेतला.... तसं निहिरा ने ही एक एक घोट घेत कशी बशी कॉफी संपवली.. विहान ला तर कॉफी चा एवढा मग संपवूनही घसा कोरडा पडल्यासारखं वाटलं...
पण... बोलावं तर लागणारच होतं...!

"विहान... बोलतोयस ना...? 😓" निहिरा धीर एकवटून म्हणाली....

"हो....."
त्याने शब्दांची जुळवाजुळव केली..... आणि पुढे म्हणाला...

"मला वाटतं निहिरा .. जास्त ताणून धरून काही उपयोग नाही... जे आहे ते स्पष्ट बोलतो......त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला................I Love You Nihira.... I want to be yours forever!! Will you be mine???" विहान तिच्याकडे बघत म्हणाला....

तिच्यासाठी हे सर्व अनपेक्षित होतं.... एवढ्या लगेच विहान असं काही बोलेल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं... तिने झटकन मान वर करून एकदाच विहान कडे बघितलं.. आणि परत खाली बघायला लागली... तिच्या डोळ्यांतून ओघळलेला अश्रू विहान ने बघितला... विहान ला कसंसंच वाटलं... त्याने तिच्या हातावर हात ठेवला....

" हे.... प्लीज रडू नको... 😐 तुझं उत्तर 'नाही' असेल तरी इट्स ओके... नो प्रॉब्लेम !! पण प्लीज अशी रडू नको..
आय अॅम सॉरी... निहिरा प्लीज बोल ना काहीतरी...🙁" विहान ला खूपच टेन्शन आलं...

निहिरा ने दीर्घ श्वास घेतला... आपला हात तसाच त्याच्या हातात राहू दिला.. आणि बोलली...

" विहान... खरं सांगायचं तर कुठलीही मुलगी तुला 'नाही' म्हणूच शकत नाही...😑 तू आहेसच तसा.... कोणत्याही मुलीला आपल्या जोडीदारामध्ये जे हवं असतं ते सर्व तुझ्यात आहे.. पण तरीही..... माहीत नाही का.... मी तुला 'हो' ही म्हणू शकत नाही.. 😔 माझी काही स्वप्ने आहेत विहान.. माझं एक ध्येय आहे... मला आधी माझं करिअर घडवायचं आहे.. सिंगापूर based mnc through होणार्‍या IT प्रोजेक्ट competition मध्ये मला पार्टीसिपेट करायचं आहे... त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागेल... त्यासोबतच कॉलेज एक्झाम ही आहेच...त्यामुळे मला रिलेशन मध्ये अडकून राहणं नाही जमणार.. तुझ्यात जास्त गुंतत गेले तर मला माझं ध्येय गाठणं कठीण होऊन बसेल..... 😔"

निहिरा ने एक पॉझ घेतला... आणि परत बोलू लागली...." खरं म्हणजे मलाही तू खूप आवडतोस विहान... हे प्रेम आहे की आणखी काही मला नाही माहित... पण मलाही तुझा सहवास आवडतो.. पण आत्ता या क्षणी तुला काय उत्तर देऊ तेच कळत नाहिये... 😑"

विहान शांतपणे तीचं बोलणं ऐकत होता.. तीचं बोलणं त्यालाही पटलं होतं... तो तिला म्हणाला...

"नो प्रॉब्लेम निहिरा.. तुला आत्ता काहीच म्हणायचं नसेल तर ठीक आहे... मी वाट बघायला तयार आहे... तुला हवा तितका वेळ घे... तुझं लास्ट इयर कम्प्लिट होऊ दे.. खूप अभ्यास कर.. तुझा प्रोजेक्ट ही होऊ दे... मग बोलू आपण.. माझ्या बोलण्याचं कोणत्याही प्रकारचं दडपण मनावर येऊ देऊ नको... आणि आपली फ्रेंडशिप तोडू नको.. ती तशीच राहू दे.. प्लीज... आणि हो... आज संध्याकाळी घरी बर्थडे पार्टी आहे...☺️ तुला यायचंय... येशील ना? "

" प्रयत्न करेन... "

" निहिरा प्लीज... ☹️"

" 😅ओके "

" थँक्स ☺️... निघूया? "

" हो "

विहान ने बिल पे केलं..

" Can I hold your hand..? 😬" विहान ने विचारलं..

निहिरा ने हळूच हसून त्याच्याकडे बघितलं फक्त... तिच्या हसण्याला होकार समजून त्याने तिचा हात हातात घेतला.. त्याचा तो स्पर्श निहिरा ला खूप सुखावह वाटला......

आणि दोघेही तिथून बाहेर पडले...! 💕

🎶🎵🎶🎵🎶🎵

पाहता क्षणी वाटे कुणी आपलं
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
दिसताना लपतं
हसताना रुसतं
सरल्यावर उरतं… प्रेम हे!
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध… प्रेम हे!

आभाळ हे दाटे मनी कसलं
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
स्पर्शाचा रंग
विरहाचा चंद्र
चाहूल सुखाची… प्रेम हे... प्रेम हे!! 💕


To be continued..
🙏
#प्रीत 🍁


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED