Prem he - 5 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 5

.........निहिरा समोर आता दुसरा ऑप्शनच नव्हता .. तिने चावी सोनिया ला दिली .. एक दीर्घ श्वास घेतला आणि विहान च्या मागे जाऊन बसली.. थोडं अंतर ठेवूनच😅😅

'हेही नसे थोडके' असा विचार करत विहान ने बाईक स्टार्ट केली.. सोनिया कडे बघून हळूच फ्लाइंग किस दिला 😗.. सोनिया हसली आणि मान हलवत निघून गेली...😄
खरं म्हणजे निहिराही विहान सोबत जायला मिळालं म्हणून खुश झाली होती..😊पण तिने चेहर्‍यावर तसं दाखवलं नाही.. मात्र मनोमन सोनिया चे आभार मानायला ती विसरली नाही 😊 😊..

सर्व जणांनी वीस मिनिटांवर असलेल्या 'रसोई' हॉटेल कडे प्रस्थान केले!.. बाकी सर्वांनी पुढे निघून जावे म्हणून विहान मुद्दामच थोडं हळू बाइक चालवत होता.. 😉 आणि आरशात तिलाच न्याहाळत होता 😍. निहिरा च्या ते लक्षातही आलं नाही.. ती तिच्या केसांच्या अल्लड बटांना वार्‍यासोबत खेळण्यापासून रोखण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती... 😄तर एकीकडे तिच्या पदराचे टोक तिच्या हातातून निसटून हवेसोबत मुक्त संचार करत होते.. 😅त्यालाही ती दटावून पुन्हा पुन्हा ओढून आणत होती!! तिची ती निरर्थक धडपड पाहून तो गालातल्या गालात हसत होता 😆😆.. इतक्यात समोर खड्डा आला म्हणून विहान ने पट्कन ब्रेक दाबला... आणि निहिरा त्याच्या अंगावर जवळ जवळ आदळलीच!! तिने पटकन त्याच्या खांद्याला हात पकडला.. एकमेकांच्या त्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने दोघेही अगदी मोहरून गेले.. 😍 एक गोड संवेदना दोघांच्याही अंगातून घरंगळत गेली..!! पण विहान ला थोडे ऑकवर्ड ही वाटले.. निहिरा काय विचार करेल माझ्याबद्दल.. मी हे मुद्दाम केले असंच वाटणार तिला... गैरसमज होऊ नये म्हणून तो लगेचच तिला म्हणाला..

"सॉरी.. खरंच माझं लक्ष नव्हतं.. 🙁😔"

"इट्स ओके .. नो प्रॉब्लेम ..😊" निहिरा ला काय बोलावं सुचत नव्हतं.. विहान सोबत एकटीने यायची ही तिची पहिलीच वेळ होती.. भिती पेक्षा जास्त ती लाजत होती 😄.. त्याच्यासोबत बोलताना तिची मान वर व्हायचीच नाही.. 😁

'विहान.. असं गप्प राहून जमणार नाही.. गोष्टी पुढे जायलाच हव्यात.. उगीच उशीर केलास तर निहू ला गमावून बसशील 😐'.. विहान स्वतःशीच बोलत होता...विचार करतच थोडं पुढे जाऊन विहान ने एका शॉप समोर बाईक थांबवली.. 'आलोच' असं निहिरा ला सांगून समोरच्या गिफ्ट शॉप मध्ये तो गेला.. निहिरा बाहेरच थांबली.. पाचच मिनिटांत तो बाहेर आला.. निहिरा च्या हातात एक छोटी पिशवी देत तो म्हणाला.. "हे तुझ्यासाठी!"

निहिरा ला खूप आश्चर्य वाटलं...
"माझ्यासाठी का? म्हणजे.. असं अचानक..?"

"अ‍ॅक्च्युअली मी सोनिया साठी गिफ्ट घ्यायला गेलो होतो.. सहजच.. मग म्हटलं तुझ्यासाठीही घेऊया काहीतरी.." विहान ने उगीच काहीतरी थाप मारली!😃

"पण असं विनाकारण गिफ्ट... म्हणजे... चांगलं नाही वाटत ना... 😕"

"ओके .. मग असं समज.. मी हे गिफ्ट तुला देतोय कारण तू आज खूपच गोड दिसतेयस 😊" विहान तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला..

तशी ती लाजली.. तिची नजर खाली झुकली.. तिचे गाल लाजेने आरक्त झाले! 😄.... आणि ती गोड हसली.. 😄मघाशी जे तिच्यामध्ये मिसिंग वाटत होतं.. ते आता त्याला गवसलं होतं.. तिची मोहक खळी!! 😊त्या खळीमुळे तिच्या सुंदरतेत चार चाँद लागले होते!!!.. विहान ला खूप गम्मत वाटली तिची!! काही सेकंद तो तिच्याकडे बघतच राहिला.. मग भानावर येऊन म्हणाला..

" निघूया? "

तिने मानेनेच 'हो' म्हटलं.. ☺️
त्याने दिलेली गिफ्ट ची पिशवी तिने हळूच आपल्या शोल्डर बॅग मध्ये टाकली.. आणि दोघेही बाइक वर बसून निघाले..

इकडे सर्वजण हॉटेल बाहेर त्यांचीच वाट बघत होते.. एव्हाना सोनिया आणि अवनी ही तिथे पोहोचल्या होत्या.. दोघे तिथे पोहोचल्यावर सोनिया ने विहान कडे बघत भुवया उंचावल्या आणि त्याला नजरेनेच चिडवलं! तसा तो लाजला... 😅
मग सर्वजण आतमध्ये गेले.. आणि मजा मस्ती करत भरपेट जेवले... 😊..सर्वांनी जेवता जेवता खूप गप्पा मारल्या.. या सुंदर क्षणाची आठवण म्हणून हॉटेल समोरच्या गार्डन मध्ये विविध pose मध्ये फोटोज् ही काढले... थोडा वेळ एन्जॉय करून सर्व घरी जायला निघाले... विहान ला खूप वाटत होतं की निहिरा ला घरी सोडायला जावं पण आता ती तिच्या स्कूटी वरुनच जाणार हे ही माहित होतं त्याला.. आणि विचारणार तरी कसं म्हणून तो गप्पच बसला.. एकमेकांचा निरोप घेत सर्व निघाले.. उद्या कॉलेज मध्ये भेटूच म्हणून निघून गेले.. सोनिया ही विहान च्या बाइक वर बसणार इतक्यात त्याने तिला तिच्यासाठी घेतलेलं गिफ्ट दिलं... सोनिया ला ही आश्चर्य वाटलं..

"विहान.. आज काय आहे मला गिफ्ट द्यायला?🤔😯"

"आज माझ्यासाठी तू जे केलंस त्यासाठी 😊"

"काहीही काय... फ्रेंड साठी एवढं पण नाही करू शकत का मी?? वेडा कुठला.. 😄"

"करू शकतेस ना... आणि यापुढेही असंच करावंस म्हणून तुला फुस लावण्यासाठी दिलंय ते गिफ्ट.. 😜😝😝" विहान हसतच म्हणाला...

" विहाsन... नालायका.. थँक्स म्हणायचं सोडून मस्करी करतोयस का माझी 😕😞"

" सॉरी सॉरी... खरच थँक्स... तुझ्यामुळे आजचा दिवस खूप स्पेशल झाला माझ्यासाठी.. सो.. खूप खूप धन्यवाद मॅडम! 😊😊"

" हाहाहा... नाऊ दॅट्स लाईक अ गुड बॉय!!... चल आता.. निघूया.. "

आणि दोघेही घरी निघून गेले...

विहान त्याच्या घरी आला.. फ्रेश होऊन बेड वर पडला.. त्याला सारखी साडीमधली गोड निहिरा आठवत होती.. 😍 तिचा तो नकळत झालेला स्पर्श.. तीचं गोड हसणं.. तीचं ते केसांच्या बटांना आवरणं.. पदराला सावरणं.. लाजणं.. सर्व आठवून तो स्वतःशीच हसत होता.. 😊 हॉटेल समोरच्या गार्डन मध्ये काढलेले ते फोटोज् तो पुन्हा पुन्हा पहात होता..!! ❤️

इकडे निहिरा ही फ्रेश होऊन तिच्या रूम मध्ये आली.. दरवाजा आतून बंद केला.. विहान ने काय गिफ्ट दिलंय आपल्याला ते बघण्यासाठी ती उत्सुक होती... तिने बॅग मधून ते गिफ्ट काढलं... आणि उघडून बघितलं..

"वॉव.. ब्युटीफुल!!! 😍" बघताक्षणीच तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले...

विहान ने निहिरा ला एक हार्ट शेप चा आरसा दिला होता... त्याला खाली पकडण्यासाठी हॅन्डल होतं.. त्या आरश्याच्या ब्राऊन कलर च्या बॉर्डर वर त्याच शेप मध्ये सिरॅमिक च्या ग्रीन वेली होत्या.. त्यांना छोटी छोटी पाने आणि त्यावर मध्ये मध्ये रेड roses होते 😍... खूपच सुंदर आरसा होता तो..!! त्यासोबत आणखी एक छोटा बॉक्स होता.. निहिरा ने तोही ओपन केला... त्यात एक नाजूक चेन आणि हार्ट शेप चं पेंडन्ट होतं.. "so क्यूट.." निहिरा आनंदाने म्हणाली.. तिने लगेचच ती चेन गळ्यात घातली आणि स्वतःला त्या आरशात बघितलं.. आणि आरसा बनून विहान च आपल्याला बघतोय असं तिला वाटलं... आणि तिने लाजेने आपली मान खाली घातली.. 😊🙈.....

To be continued..
🙏
#प्रीत 🍁

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED