Prem he - 11 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 11

.......... तिच्या अशा वागण्याने विहान पुरता गोंधळून गेला असला तरी त्याच्या वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट आज त्याला निहिरा कडून मिळालं होतं... काही न बोलताही ती खूप काही बोलून गेली होती....पाच मिनिटांनी विहान ही बाहेर आला... आणि सर्वांसोबत येऊन बसला... सर्वांच्या छान गप्पा रंगल्या होत्या.. मध्ये मध्ये selfies घेणंही चालूच होतं!! 😊 विहान ची आईही थोडावेळ त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली..मग त्यांनी सर्वांना जेवून घ्यायला सांगितलं.. आणि त्या जेवण वाढण्यासाठी उठल्या... तसं सर्वजण म्हणाले.. आँटी तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका... जेवण आम्ही इथेच घेतो आणि आमचं आम्ही घेऊ वाढून.. तुम्ही आराम करा हवं तर.. 😊

"हो आँटी... आम्ही अज्जिबात लाजणार नाही... तुम्ही टेंशन घेऊ नका 😄" पियुष म्हणाला..

विहान च्या मॉम ने 'ठीक आहे😄' म्हणत सदा आणि उषा ला जेवणाचं सर्व सामान टेबल वर आणून ठेवायला सांगितलं.. मुलींनीही त्यांना हेल्प केली... आणि सदा आणि उषा घरी निघून गेले... विहान च्या मॉम ने त्यांना सकाळी लवकर बोलावलं होतं उरलेला पसारा आवरायला... ☺️

"मुलांनो .. मी माझ्या रूम मध्ये पडते जरा.. काही लागलंच तर आवाज द्या" विहान ची मॉम म्हणाली..

" हो आँटी.. नक्की..." सर्वजण म्हणाले..

विहान ची मॉम त्यांच्या रूम मध्ये निघून गेली..

सर्वांनी आपल्याला हवं ते हाताने घेत जेवणावर यथेच्च ताव मारला!! जेवता जेवता मजा मस्ती.. चिडवाचिडवी चालूच होतं... जेवण झाल्यावर थोडा वेळ सर्वजण परत गप्पा मारत बसले.. मुलींनी सर्व वस्तू उचलून आतमध्ये नेऊन ठेवल्या.. सोनिया ने त्यांना बाकी काही करू दिलं नाही... आँटींनी तसं सांगून ठेवलंय असं ती म्हणाली.... किचन चा ओटा आणि जेवलेल्या जागी साफ करून त्या सर्वांसोबत येऊन बसल्या... विहान तर सारखं निहिरा कडेच बघत होता.. कितीही बघितलं तरी त्याचं समाधानच नव्हतं होत.. 😅

बसल्या बसल्याच सोनिया निहिरा ला म्हणाली...

"निहू प्लीज फ्रीज मध्ये सर्वांसाठी आईस्क्रीम ठेवलंय तेवढं आणतेस का?"

"हो आणते.." म्हणून निहिरा उठून किचन मध्ये गेली... तसा विहान ही हळूच उठून तिच्या मागोमाग गेला.. सोनिया हळूच हसली... 😄.. बाकी सर्व गप्पांमध्ये रंगले होते...

विहान निहिरा च्या अगदी जवळ येऊन उभा राहिला... तिने चमकून त्याच्याकडे बघितलं.... त्याने तिचे हात हातात घेतले... आणि म्हणाला...

" नको ना जाऊ... आज इथेच रहा ना.."

ती हसली.... "काहीही काय... 😅"

"मग काय झालं.. सोनिया पण कधी कधी राहते इथे..." तो निरागसपणे बोलला...

"विहान... तिचं वेगळं आणि माझं वेगळं आहे... उगीच काहीतरी हट्ट करू नकोस... 😃"

"ठीक आहे.. 😏 तुझी मर्जी... कशी जाणार आहेस? 😐" विहान थोडा रागावूनच बोलला...

"आता ऑटो तर भेटणार नाही एवढ्या लेट...बस ने जाईन.. "

" काही गरज नाही... मी येतोय तुला सोडायला..."

"कशाला उगीच... तू आराम कर.. मला सवय आहे.. आणि अवनी ही आहेच माझ्या सोबत... " निहिरा त्याला समजावत म्हणाली...

" हो मग तिलाही सोडेन ना... पण तू माझ्यासोबत येणार आहेस... अ‍ॅन्ड दॅट्स फायनल... 😎" म्हणत तो आईसक्रीम घेऊन बाहेर गेला..

"विहान प्लीज..... "

तो तिचं ऐकायला थांबलाच नाही.... निहिरा ने एक सुस्कारा सोडला... 'आज हा काही ऐकणार नाही माझं असं दिसतंय..' ती मनातल्या मनात म्हणाली.. आणि तीही त्याच्या मागोमाग गेली...

- - - - - - - - XOX - - - - - - - -

आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मात्र सर्वांना पेंग येऊ लागली...
एक एक करून सर्व जायला निघाले.. विहान ने डोळ्यांनीच निहिरा ला 'तू थांब' म्हणून सांगितलं.. बाकी सर्वांना तो बाहेर सोडून आला... अदिती आणि रीतू ही निहिरा ला हळूच चिडवत बाहेर पडल्या... निहिरा हसली फक्त... 😃
सर्वजण निघून गेले... आता फक्त निहिरा, अवनी आणि सोनियाच होत्या तिथे... विहान आत आला...

"सोनिया चल... दोघींना सोडून येऊ..." तो key holder वरुन कार ची चावी घेत म्हणाला...

सोनिया ने नाटकी लूक देत त्याच्याकडे बघितलं... आणि ती हसली....

"हसतेस काय... चल लवकर..." त्याने तिचा हात पकडून तिला बाहेर आणलं..

"हो..... येतेय.... किती घाई... 😄😄" सोनिया त्याला चिडवत म्हणाली...

तसा विहान लाजून पार्किंग मध्ये निघून गेला...
तिघीजणी बिल्डिंग समोर थांबल्या.. सोनिया ने घरी कॉल करुन उशीर होणार असल्याचं सांगितलं...

विहान ने कार त्यांच्यासमोर आणून थांबवली..

सोनिया ने निहिरा ला समोर बसायला सांगितलं.. ती आणि अवनी मागे बसल्या.. निहिरा ला थोडं ऑकवर्ड वाटत होतं... पण सोनिया ने सांगितल्यावर आता नाईलाज होता.. म्हणून ती फ्रंट सीट वर बसली.. विहान ने कार स्टार्ट केली.... Driving करतानाही तो अधून मधून निहिरा कडे बघत होता... निहिरा ला खूप लाजल्यासारखं होत होतं...सोनिया आणि अवनीच्या गप्पा रंगल्या होत्या.... विहान आणि निहिरा मात्र गप्पच होते....
विहान ने कार मधलं म्युझिक सिस्टीम चालू केलं आणि मराठी songs ची सीडी प्ले केली..... गाणं चालू झालं...

'गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे.. तुझा रंग मला दे....
I Love you…I Love you …I Love you....❣️'

निहिरा ने विहान कडे बघितलं... तो तिच्याचकडे बघत होता.. तिला खूप हसू आलं... ती काचेतून बाहेर बघत हसली... 😄.... हसल्याबरोबर तिच्या गालावर गोड खळी पडली! 😍 विहान ने ती खळी बघण्यासाठीच मुद्दाम हे गाणं लावलं होतं....!! काही क्षण तो तिच्याचकडे बघत राहिला... अवनी आणि सोनिया एकमेकींकडे बघून हळूच हसल्या.... 😁😁

थोडं पुढे गेल्यावर एक पार्क होतं... सोनिया ने विहान ला कार पार्क जवळ थांबवायला सांगितली... विहान ने कार एका side ला थांबवली... आणि गोंधळून तिला विचारलं.. "काय झालं? कार का थांबवायला सांगितलीस?😦"...

"मग काय करू... तू असं driving सोडून तिच्याकडे बघत राहणार... आणि आम्ही आमचा जीव का धोक्यात घालायचा...😕 त्यापेक्षा दोघांनीही उतरा... साडे दहा वाजलेत.. पार्क बंद झालंय... पण तरीही बाहेरच्या बेंच वर बसा... एकमेकांना काय बघून घ्यायचं ते घ्या.. काय बोलायचं असेल ते बोलून घ्या.. 😁😁😁😜"

" बरोबर आहे तुझं सोनिया... मला पटलंय... निहिरा चल उतर खाली... "म्हणत तो इंजिन बंद करत खाली उतरला... 😂😂

निहिरा लाजत मानेनेच 'नाही' म्हणाली.. विहान ने तिच्या side ला जाऊन दरवाजा उघडला... आणि तिला खाली उतरायला request केली... ती उतरली... दोघेही जाऊन एका बेंच वर बसले... अवनी आणि सोनिया ही एका बेंच वर जाऊन बसल्या.... आणि परत आपल्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.... 😊

विहान ने निहिरा चा हात हातात घेतला... दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती...💓

"Thanks निहिरा... आज घरी आल्याबद्दल.." तो तिच्या हातावर आपला हात फिरवत म्हणाला...

"Thanks काय त्यात... आपण ग्रुप मधल्या सर्वांचेच बर्थडे celebrate करतो ना.... मग तुझ्याकडे ही यायलाच पाहिजे होतं ना.... 😊"

"ह्म्म्म्म... फक्त एक ग्रुप फ्रेंड म्हणून आली होतीस का तू?"

"हो ना...." ती हसतच म्हणाली...

"OK.." त्याने रागाने तिचा हात सोडला आणि दुसरीकडेच बघू लागला..

तशी ती गंभीर होत म्हणाली....

"विहान प्लीज... चिडू नकोस... हेच तर मी तुला सकाळी सांगायचा प्रयत्न करत होते..." निहिरा ने त्याचा हात हातात घेतला... आणि ती पुढे म्हणाली... "तू जे हे निरागसपणे माझ्यासाठी करतोयस ना ते सर्वच मला खूप आवडतं...! पण तू जर असाच वागत राहिलास तर मला स्वतःला आवरणं कठीण होऊन जाईल.. मघाशीही तुझ्या रूम मध्ये किती मुश्किलीने सावरलं मी स्वतःला... 😑.. विहान.... अजून दोन वर्षे जायची आहेत... माझं शिक्षण पूर्ण होण्यासाठी... मला माझं आणि तुलाही तुझं करीयर घडवायचं आहे....तोपर्यंत आपल्याला कंट्रोल करावंच लागेल... म्हणून प्लीज तूही माझ्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करू नको... आणि मीही तुझ्यापासून लांबच राहीन... 😒.. No long chats on messages and no phone calls for two years... प्लीज... त्यानंतरही तुझं माझ्यावर तेवढंच प्रेम असेल तर बोलू आपण या विषयावर.. आणि हो... त्यादरम्यान तुला जर दुसरी कोणी आवडली तर U are free to go!! मी तुला नाही अडवणार... 😐"

" निहिरा प्लीज.... माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे... आणि कायम असेल... 🙁...." एक पॉज घेऊन तो परत बोलला...." ठीक आहे.. तू जसं म्हणशील तसं... 😑.... यापुढे मी तुझ्या जास्त जवळ यायचा अन्‌ तुझ्याशी जास्त बोलायचाही प्रयत्न नाही करणार... माझ्यामुळे तुला त्रास होईल किंवा तुला तुझ्या अभ्यासामध्ये डिस्टर्ब होईल असही नाही वागणार.... दोन वर्ष..!!.....No problem... मी वाट बघेन तुझी.... आणि तेव्हाच आपलं नातं प्रेमात बदलेल जेव्हा तू स्वतःहून माझ्याजवळ येशील.... " एवढं म्हणून तो उठला... आणि कार मध्ये जाऊन बसला...

💓🎼
बक्षा गुनाहों को
सुन के दुवाओं को
रब्बा प्यार है
तूने सब को ही दे दिया..

मेरी भी आहों को
सुन ले दुवाओं को
मुझको वो दिला मैंने
जिसको है दिल दिया..

आस वो प्यास वो
उसको दे इतना बता..
वो जो मुझे देख के हँसे
पाना चाहूं रात दिन जिसे
रब्बा मेरे नाम कर उसे
तेनू दिल दा वास्ता.....

अज्ज दिन चढ़ेया तेरे रंग वरगा..... 💟💟

To be continued..
🙏
#प्रीत 🍁


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED