Prem he - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 3

............ विहान ने जवळच असलेली उशी सोनिया च्या डोक्यात मारली... 😄 तशी ती बाहेर पळाली आणि "उद्या मला सोडायला यायचंय.. लवकर आवर😁😁" म्हणून ओरडतच निघून गेली.. विहान मान हलवून गालातल्या गालात हसत होता... 😊

ठरल्याप्रमाणे विहान आणि सोनिया लवकरच कॉलेज जवळ पोहोचले... कॉलेज गेट समोरील रोड च्या पलिकडे एका झाडाखाली विहान ने त्याची बाइक थांबवली.. दोघेही इकडे तिकडे बघत तिची वाट पाहत होते.. सोनिया ला खरं तर माहित नव्हतं ती कोण आहे.. पण ती उगीचच येणा जाणार्‍या मुली बघून अंदाज लावायचा प्रयत्न करत होती.. 😁... थोड्याच वेळात त्यांचा ग्रुप आला... तसं विहान ने.. एकीकडे बोट दाखवत सोनिया ला सांगितलं ... "ती बघ येतेय... ती पिंक टॉप वाली.. 😄"

सोनिया ने दुरूनच तिला थोडं निरखून बघितलं...

"ओह्ह.. शी इज निहिरा !!... क्यूट गर्ल !! माझ्याच क्लास मध्ये आहे 😊... जास्त बोललो नाही आम्ही अजून..फक्त जाता येता स्माईल देते.... पण आता फ्रेंडशिप करावीच लागेल 😜.. नाईस चॉईस बट ... नाईस गर्ल शी इज😊😊" सोनिया विहान च्या चॉईस वर खुश होत म्हणाली.. "पण.... थोडी तापट आहे.. राग आल्यावर मागचा पुढचा विचार करत नाही.. तेवढं मात्र तुला जड जाणार आहे 😬.. अदरवाइज खूप चांगली आहे ती..😊 "

"तेवढं मी घेईन सांभाळून.. डोन्ट वरी.. शेवटी कुणीही परफेक्ट नसतोच ना... आणि थँक्स नकटे ... आज तुझ्यामुळे निदान तीचं नाव तरी कळलं... 😅"

" ह्म्म... बस क्या...तुझ्यासाठी तिची पूर्ण ऑटोबायोग्राफी घेऊन येते 😜🤣"

आणि दोघेही हसत हसत आपल्याला कॉलेज मध्ये निघून गेले...

- - - - - - - - XOX - - - - - - -

कॉलेज चे दिवस अभ्यासाबरोबरच मजा मस्ती करण्यात सरत होते.. निहिरा चं ही ग्रुप सोबत हिंडणं फिरणं चालूच होतं.. एके दिवशी चौघींचा मुव्ही ला जायचा प्लान ठरला... संध्याकाळी साडे सहाचा शो होता.. अदिती, रीतू आणि अवनी तर केव्हाच पोचल्या होत्या... निहिराला मार्केट जवळच्या मेडिकल मधून आईच्या गोळ्या घ्यायच्या होत्या... शो सुटल्यावर लेट होईल म्हणून ती आधीच जाऊन येणार होती.. तिघीही आतमध्ये तिचीच वाट बघत थांबलेल्या...
निहिरा आली.. घाईघाईत बाहेर पार्किंग मध्ये स्कूटी पार्क केली.. आणि आत जायला वळली.. जाता जाता सहज तिने एकदा स्कूटी कडे बघितलं.. तर कुणीतरी तिची स्कूटी सरकवून त्याची बाइक तिथे अॅडजस्ट करत होता..तो विहान होता...! त्याने हेल्मेट घातलं होतं.. तसंही निहिरा त्याला ओळखत नव्हती...तिची स्कूटी म्हणजे तिची जान होती... खूप जपायची ती तिला...... ती धावतच तिकडे गेली..

"हेलो मिस्टर. काय स्कूटी चोरायचा विचार आहे की काय..😡" निहिरा जरा चिडूनच बोलली..

विहान ने हेल्मेट काढून तिच्याकडे बघितलं.. आणि तो बघतच राहिला.. 'निहिरा इथेही!!!?😍' तो मनातच म्हणाला..

"हेलो.. मी तुमच्याशी बोलतेय... माझ्या स्कूटी ला हात लावायची हिम्मत कशी झाली तुमची.. 😠" निहिरा आणखी वैतागत म्हणाली..

विहान तिच्याचकडे बघत होता.. बोलताना तीचं ते नाक मुरडणं.. मानेला हळूच झटका देणं.. तिच्या चेहर्‍यावरचे पटापट बदलणारे हावभाव...!!

"हेलो मिस.. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय..माइंड युअर......... " विहान सोबत आलेला त्याचा फ्रेंड बोलतच होता की .....

त्याला अडवत पटकन विहान बोलला...
"सॉरी.. अ‍ॅक्च्युअली लेट झालाय.. शो सुरू होईल.. म्हणून बाईक इथेच अॅडजस्ट करत होतो... पार्किंग फूल आहे ना.. 😬"

इतक्यात निहिरा चा फोन वाजला... अदिती चा होता... तिने त्यांना येतेच आहे म्हणून सांगून फोन ठेवला...

"हे बघा मिस्टर.. लेट होतोय म्हणून काही बोलत नाहीये.. बट डोन्ट टच माय स्कूटी.. ओके?? " म्हणत ती तणतणत निघून गेली..

आजूबाजूचे लोक बघत होते... विहान चा फ्रेंड खूप वैतागला होता.. पण विहान चं तिकडे लक्ष नव्हतं... तिच्या रागाची झलक त्याने आज पाहिली होती.. मात्र तिचा हा अॅटिट्युड ही त्याला आवडला होता... 😄

आजची ही गोष्ट त्याने सोनिया ला सांगायचं मात्र टाळलं.... उगीच निहिरा बद्दल तिच्या मनात दुमत नको व्हायला...

- - - - - - - - XOX - - - - - - -

बघता बघता पावसाळा सरला... टेस्ट्स.. सेमिस्टर ही झाले.. आणि स्पोर्ट्स चे वेध लागले.. विविध प्रकारचे स्पोर्ट्स कॉलेज मध्ये सुरू होते.. निहिरा आणि तिच्या मैत्रिणींनी सुद्धा आपापल्या परीने त्या त्या स्पोर्ट मध्ये भाग घेतला होता... निहिरा बॅडमिंटन तसेच चेस मध्ये पहिली आली होती.. तर अदिती कॅरम मध्ये.. रीतू टेबल टेनिस मध्ये दुसरी आली होती.. तर अवनी रांगोळी स्पर्धेत.. सोनिया ही कमी नव्हती.. बास्केटबॉल मध्ये तिने तिचे कौशल्य दाखवले होते...!

विहान चं अधून मधून निहिरा साठी कॉलेज वर येणं चालूच होतं..😄... एकदा कॉलेज सुटल्यावर निहिरा चा ग्रुप चालत चालत गेट कडे चालला होता.. निहिरा आपल्या मोबाईल मध्ये कसलातरी गेम खेळत चालत होती.. इतक्यात अदिती म्हणाली..
"आयला... तो बघ समोर... आज पण आलाय तो.. 😍"

"कसला भारी दिसतो ना 😍😙".. अवनी ने जोड दिली..

"ए अवनी , तो इकडेच बघतोय का गं आपल्याकडे?🤔😮" अदिती

"ए.. गप्प बसा.. जगातल्या सर्व सुंदर मुलींनी काय संन्यास घेतलाय का, जे तो तुमच्या कडे बघेल 🤣🤣🤣" रीतू मनापासून हसत म्हणाली..

" आम्ही एवढ्या ही वाईट दिसत नाही हा... पण तुझं म्हणणं बरोबर पण आहे.. पण मग कोणाकडे बघत असेल तो 🤔" अदिती म्हणाली..

इतक्यात विहान ने हात उंचावून हाय केलं.. रीतू, अदिती, अवनी तिघीही चकित झाल्या.. तरी त्यांनी सहज म्हणून मागे बघितलं तर मागून सोनिया येत होती.. तीही हात हलवून त्याला हाय करत होती... ती त्यांच्या ग्रुप ला स्माईल देत निघून गेली..तिघीही हिरमुसल्या 😒... निहिरा अजूनही मोबाईल मध्येच होती.. अधून मधून पायाखालच्या रस्त्याकडे तेवढं लक्ष देत होती.. ह्या तिघींचं काय चाललंय ते तिच्या गावातही नव्हतं...🤦😃

- - - - - - - - XOX - - - - - - - -

खुपदा विहान च्या मनात येई निहिरा ला विचारायचं.. पण ती इतर मुलींसारखी नव्हती.. त्यामुळे डायरेक्ट तिला विचारून तिचा राग ओढवून घ्यायचा नव्हता त्याला.. त्यासाठी त्याला तिच्यासोबत फ्रेंडशिप करायची होती.. तिचा विश्वास संपादित करायचा होता... आणि मगच तिला विचारायचं त्याने ठरवलं होतं.. ती इतर मुलींपेक्षा जरा वेगळी होती म्हणूनच कदाचित विहान च्या मनात चटकन भरली होती.. 😍

- - - - - - - - XOX - - - - - - - -

दुसर्‍या दिवशी विहान च्या कॉलेज मध्ये त्यांची क्रिकेट मॅच होती.. विहान त्यांच्या कॉलेज टीम चा कॅप्टन होता.. 😎 लास्ट इयर त्याने उत्तम खेळून आपल्या टीम ला तसेच कॉलेज ला विजय मिळवून दिला होता... सर्वत्र त्याची वाहवा होत होती.. 😄.. आधीच दिसायला हँडसम त्यात एवढं भारी खेळल्यानंतर मुली तर वेड्याच झाल्या होत्या त्याच्या मागे..!! 😍😍

जवळपासच्या बर्‍याच कॉलेज चे स्टुडंट्स मॅच बघायला आले होते.. आज फायनल मॅच होती.. त्यामुळे सर्वांनाच ती बघायची होती.. लास्ट इयर चा विहान आणि त्याच्या टीम चा परफॉर्मन्स बघता यंदाही त्यांचीच टीम जिंकेल असा अंदाज सर्वत्र वर्तवला जात होता...! निहिरा च्या कॉलेज मधले ही बरेच स्टुडंटस् गेले होते... अवनी, अदिती आणि रीतूलाही जायची इच्छा होत होती.. त्यांनाही विहान चा खेळ बघायचा होता.. खरं तर त्यालाच बघायचं होतं😜... त्यासाठी त्या निहू ला मस्का मारत होत्या...

"निहू चल ना गं.. आम्हाला विहान ची मॅच बघायची आहे.. 😒 अर्ध्याहून जास्त मॅच तर संपली असणार.. उरली असेल ती तरी बघू.. 😐" अवनी म्हणाली

"कोण हा विहान आणि एवढ्या का वेड्या झालायत तुम्ही त्याच्यासाठी??" इति निहिरा

"अगं कधीतरी मान वर करून बघत जा.. म्हणजे कळेल कोण विहान ते.. त्याला बघितलंस तर तू ही त्याच्या प्रेमात पडशील!! 😍" अदिती म्हणाली

" निहिरा.. आणि कुठल्या मुलाच्या प्रेमात पडेल... 😏 Impossible..!! "

"निहू तुला इंट्रेस्ट नसेल तर नको बघू पण आमच्यासाठी तरी चल ना.. इथे बाजूलाच तर आहे त्याचं कॉलेज.. आणि तुला सोडून आम्ही कशा जाणार 😓.. " अदिती तोंड एवढंसं करत म्हणाली...

"बरं बाबा.. चला.. 🙏🙄" निहू कशी बशी तयार झाली...

सर्वजणी ग्राउंड वर आल्या.. समोरच जागा बघून त्या बसल्या.. विहान च्या opposite टीम ने 20 overs मध्ये 180 धावांचं आव्हान विहान च्या टीम समोर उभं केलं होतं.. विहान च्या टीम ने 15 overs मध्ये 125 धावा cover केल्या होत्या.. आता 5 overs मध्ये 56 धावांची गरज होती.. विहान ची टीम खूप छान प्रयत्न करत होती.. इतक्यात त्यांच्या एका बेस्ट बॅट्समन ची विकेट गेली..

"ओह्ह.. शीट्!!" ग्राउंड वरुन नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले..

तेवढ्यात विहान ने बॅटिंग साठी एंट्री केली.. तसे सर्व आनंदाने ओरडू लागले... 😅😅

"विहाssन विहाssssन" म्हणत चीअर अप करू लागले..

विहान ने हसून बॅट उंचावली आणि सर्व ऑडियन्स कडे बघत त्याने अभिवादन केलं.. इतक्यात त्याचं लक्ष निहिरा कडे गेलं.. खूप खुश झाला तो तिला तिथे बघून 😍!!.. चेहर्‍यावरचा आनंद लपवत त्याने बॅटिंग ला सुरुवात केली.. पण छे!! आज त्याची बॅट त्याला साथ द्यायला तयार नव्हती.. 😑 त्याचं लक्ष राहून राहून निहिरा कडे जात होतं.. 😊.. निहिरा ने ही त्याला बघितलं... 'ह्याला कुठे तरी बघितलंय'... आणि मग तिला आठवलं.... 'ओह माय गॉड!! हा विहान आहे?? त्यादिवशी किती चिडलो होतो आपण याच्यावर 😬... असू दे.. त्याने माझ्या स्कूटी ला हात का लावला होता 😏' तिने स्वतःशीच बडबडत नाक मुरडलं......

इकडे प्रेक्षकांची निराशा होत होती.. कशाबशा विहानने आणि पार्टनर ने मिळून एक, दोन रन्स काढत किंवा मध्येच एखादा चौकार मारत 38 रन्स पूर्ण केल्या.. 😞.. निहिरा ने तर वैतागून आपला मोबाईल बाहेर काढला होता आणि ती त्यात गेम खेळण्यात बिझी झाली होती.. आता फक्त पाच बॉल उरले होते.. आणि अजून 18 धावा काढायच्या होत्या.. सोनिया ला ही कळत नव्हतं आज विहान ला काय झालय.. तिने एकदा तो बघत असलेल्या दिशेला वाकून बघितलं..

"ओह्ह God!! निहिरा आलीये.. तरीच.. विहान चं लक्ष मॅच मध्ये नाहिये..🤦 देवा आता तूच वाचवू शकतोस विहान च्या टीम ला🙏" तीने हात जोडून देवाला प्रार्थना केली ..

इकडे निहिरा तिच्या फ्रेंड्स ना बोलत होती ..

"हा खेळ बघायला आलायत तुम्ही 🤔... ह्याच्यापेक्षा मी चांगलं क्रिकेट खेळतेय असं वाटायला लागलंय मला आता 🙄😏" आणि एका बाजूने आपले ओठ फाकवत विहान कडे बघत स्वतःशीच हसली ..

विहान ला वाटलं ती त्यालाच smile देतेय.. एवढ्याशा विचाराने देखील तो खूप खूप खुश झाला 😍😍😄.. त्याच्या अंगात स्फुर्ती आली !! आणि 3 बॉल मध्ये लागोपाठ तीन षटकार मारत त्याने त्याच्या टीम ला जिंकवून दिलं .. 😄😄!! मैदानावर एकच जल्लोष झाला .. सर्वांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं !!.. पण तो मात्र सारखा निहिरा कडे बघत होता .. 😍

त्याची आत्ताची बॅटिंग बघून निहिरा चा त्याच्यावरचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता..

" नॉट बॅड ... !! 😃" म्हणत निहिरा हसली .. पण यावेळी मात्र तीने त्याच्याकडेच बघून स्माईल दिली ...!! 😊😊

To be continued..
🙏
#प्रीत


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED