प्रेम हे..! - 4 प्रीत द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम हे..! - 4

............ मैदानावर एकच जल्लोष झाला .. सर्वांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं !!.. पण तो मात्र सारखा निहिरा कडे बघत होता .. 😍

" नॉट बॅड !! 😃" म्हणत निहिरा हसली .. पण यावेळी मात्र तीने त्याच्याकडेच बघून स्माईल दिली ...!! 😊😊

तिच्या गालावरची खळी पाहून मात्र विहान ची विकेट गेली .. 😄... निहिरा आणि तिचा ग्रुप आनंदात तिथून निघून गेले ..त्यादिवशी भांडणाच्या नादात तिने विहान ला इग्नोर केलं होतं... आज पहिल्यांदा निहिरा ने विहान ला नीट बघितलं होतं .. आणि नकळतच तिच्या चेहर्‍यावर smile आली होती..

ती घरी आली.. तिला राहून राहून त्याचाच चेहरा आठवत होता.. खरच काय भारी दिसतो तो!! आणि काय शॉट्स मारले त्याने... वॉव !! 😍.... ती मनोमन त्याच्यावर खुश होत होती.. ती फ्रेश झाली.. आणि टॉवेल ने चेहरा पुसता पुसता एकवार स्वतःला आरशात पाहिलं... आणि ती लाजली.. 'हे काय?? मला लाजता ही येतं🤔..' ती स्वतःशीच बोलत होती... तिचा विश्वास च बसत नव्हता.. तिला कोणीतरी आवडू लागलंय.. तिला खरच नव्हतं वाटत..!

आता तिचीही स्थिती त्याच्यासारखीच झाली होती.. तिलाही उठता बसता तोच डोळ्यांसमोर दिसायचा..! पण... तो मला लाइक करेल का?... कितीतरी मुली त्याच्यामागे वेड्या आहेत.. त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहेत.. आणि तो माझ्यासारख्या एका सामान्य मुलीला पसंत करेल??.. छे.. आपण नको वाहवत जायला.. 😔 आपलं प्रेम आपण मनातच ठेवलं पाहिजे... त्याला काय.. कुणालाही हे कळता कामा नये... म्हणून ती गप्प बसली.. आणि स्वतःला अभ्यासामध्ये बिझी ठेवू लागली.. ...

निहिरा चा ग्रुप आता चौघींपुरता मर्यादित राहिला नव्हता 😃.. मेधा, रिया, वर्षा, पियुष, अंकित, अमित..इतकंच काय तर सोनिया सुद्धा... असे नवीन मेंबर्स त्यात अॅड झाले होते 😄... सोनिया मुळे विहानचीही त्या सर्वांसोबत ओळख झाली होती.. तोही कधी कधी त्यांच्या ग्रुप मध्ये सामील व्हायचा...! सगळे एकत्र मिळून धम्माल करत.. कधी सुट्टीच्या दिवशी तर कधी एखादं लेक्चर बंक करून ते फिरायला जात.. कधी हॉटेल तर कधी मूव्ही.. कधी बीच.. तर कोणाची बर्थ डे पार्टी..... खूप मजा करायचे एकत्र!! 😊

बघता बघता नवीन वर्ष उजाडलं.. जानेवारी महिना सुरू झाला .. कुणी आत्ता पासूनच फायनल एक्झाम च्या तयारीला लागलं होतं .. तर कुणाला अजूनही रिलॅक्स व्हायला थोडा वेळ हवा होता ..!.. अशातच कॉलेज चा अन्युअल डे जवळ आला .. फेब्रुवारी च्या दुसर्‍या आठवड्यात अन्युअल डे असल्याची घोषणा झाली 😊.. जो तो तयारीला लागला... कुणी डान्स.. तर कुणी नाटक.. कुणी कविता.. प्रत्येक जण आपापल्या रिहर्सल मध्ये बिझी झाला .. पढाकू मुले मात्र अशा वातावरणातही पुस्तकातच मान खुपसून बसलेली दिसत होती .. 🙄..

त्याआधी जानेवारी महिन्यात कॉलेज मध्ये विविध डेज होते .. ट्रेडिशनल डे, फिशपाॅंड डे,ब्लॅक अँड व्हाइट डे, टाय डे.. सारखे बरेच डेज् साजरे होणार होते ..
सर्वात आधी होता ट्रेडिशनल डे... निहिरा याआधी कधीच
ट्रेडिशनल डे ला कॉलेज ला गेली नव्हती.. पण यावेळी तिच्या सर्व फ्रेंड्स ने तिला खूप आग्रह केला होता.. आणि सर्व मुलींचं साडी नेसून यायचं ठरलं होतं.. मुले शेरवानी किंवा कुर्ता पायजमा घालणार होते.... निहिरा तर तयारच नव्हती यायला.. तिने आत्तापर्यंत जीन्स आणि कुर्तीज् शिवाय इतर काही घातलंच नव्हतं.. चुकून एखाद्या प्रोग्राम ला पंजाबी ड्रेस... पण आता तर चक्क साडी नेसून यायचं होतं...! आपल्याला नाही झेपणार बुवा!! तिने तिच्या विचारांवर शिक्कामोर्तब केलं... पण यावेळी तिच्या मैत्रिणी ऐकणार नव्हत्या... त्यांनी तिला खूप फोर्स केला.. मैत्री चा वास्ता ही दिला..😜.. शेवटी ती तयार झाली.. तिने फ्रेंड्स सोबत जाऊन एक छानपैकी साडी विकत घेतली आणि अर्जंट ब्लाऊज शिवून घेतला...
शेवटी तो दिवस उगवला 😅..

- - - - - - - - -XOX - - - - - - - -

निहिरा ट्रॅडीशनल डे साठी तयार झाली होती.. सारखी सारखी स्वतःला आरशात न्याहाळून बघत होती... 'मी ठीक दिसतेय ना.. मला साडीमध्ये चालता येईल ना.. मला कुणी हसणार तर नाही ना...' 😄😄 असे बरेच प्रश्न तिला पडत होते... आईने तर पहिल्यांदा तिला अशी साडीमध्ये बघून कडाकडा बोटे मोडली होती..
इतक्यात अवनी तिला बोलवायला म्हणून तिच्या घरी आली..

" निहू.. अगं असं काय करतेस... चल लवकर.. उशीर होतोय.." अवनी ने निहिरा ला घरातून ओढत ओढतच बाहेर आणलं😂

"अवनी.. मी नाही येत.. मला लाज वाटतेय 🙈" निहिरा आपला बचाव करतच म्हणाली..

"निहू.. तुला बघायला तिथे पाहुणे नाही येत आहेत कुणी.. एवढं लाजायला.. 🤣🤣 आणि खरं सांगायचं झालं तर.. यू आर लूकींग gorgeous!! 😘"

" अवनी प्लीज ना 🙏.. तू जा ना.."

"अज्जिबात नाही.. आज मी स्कूटी चालवतेय हवं तर.. तू मागे बस.." म्हणत अवनीने निहिरा कडून चावी घेतली आणि स्कूटी स्टार्ट केली.. तशी नाइलाजाने निहिरा तिच्या मागे जाऊन बसली.. कॉलेज स्टॉप जवळ अदिती आणि रीतू थांबलेल्या होत्या .. तिथून चौघी ही आत गेल्या .. कॅम्पस मध्ये त्यांचा बाकीचा ग्रुपही थांबलेला होता.. सर्व जण निहिरा कडेच बघू लागले.. तिला या अवतारात पहिल्यांदाच पाहिले होते त्यांनी!! 😅 पण सर्व जण तिची तारीफ करत होते.. खरच दृष्ट लागण्यासारखीच दिसत होती निहिरा.. 😍
बाकी सर्व जणीही साडी मध्ये खूपच छान आणि नेहमीपेक्षा कितीतरी वेगळ्या दिसत होत्या...! 😄 सोनिया ही अफलातून दिसत होती...! मुलेही या पेहरावात खूप छान वाटत होती...!!
सर्वांनी कॉलेज मध्ये जाऊन आजचा फंक्शन अटेंड केला.. आणि ठरल्याप्रमाणे जवळच्याच एका हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जायला निघाले..

इकडे विहान ची बेचैनी वाढतच होती.. सोनिया ने सांगितल्याप्रमाणे तो त्यांच्या कॉलेज च्या गेट समोर येऊन थांबला होता.. कधी एकदा निहू ला बघतो असं झालं होतं त्याला!! 😍😅 त्यानेही आज व्हाइट शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती.. त्याला कोणताही कलर आणि कोणतेही कपडे सूट करायचे.. आजही तो खूप हँडसम दिसत होता.. 😄.. निहू ची वाट बघुन तो इकडून तिकडे येरझारा घालू लागला .. त्याचं लक्ष गेट कडे लागून राहीलं होतं.. इतक्यात समोरून त्यांचा पूर्ण ग्रुप येताना त्याला दिसला.. त्याची नजर निहू ला शोधत होती.. अखेर ती अवघडलेल्या स्थितीत.. साडी सावरत येताना त्याला दिसली.. 😅
स्काय ब्लू शिफाॅन ची साडी.. त्याला त्याच कलर ची डार्क बॉर्डर.. साडीवर व्हाईट एम्ब्रॉयडरी वर्क...मॅचिंग डिझायनर ब्लाऊज..मॅचिंग इयररिंग्स.. केसांना स्ट्रेटनिंग करून ते एका बाजूला पुढे घेतलेले.. तिला बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकला!!आज ती त्याला खूप हॉट वाटत होती😉😀!! फक्त एकच गोष्ट मिसिंग होती... तिची मोहक खळी!.. तिच्या चेहर्‍यावरचं हसू आज त्याला नेहमीसारखं मोकळं वाटलं नाही.. साडी मध्ये ती खरच अवघडून गेली होती..
त्यांचा ग्रुप आता विहान च्या जवळ आला.. सर्वांनी विहान ला हाय केलं.. आणि निघूया म्हणत सर्वजण गाड्यांवर अॅडजस्ट करून बसले..

विहान ला वाटत होतं आज तरी निहिरा ने त्याच्या बाइक वर बसावं.. त्याच्या मनातलं सोनिया ने लगेच ओळखलं.. 😄 ती पट्कन निहिरा जवळ जात म्हणाली..

"निहू तुझ्या स्कूटी ची चावी देतेस का जरा.. मला एक अर्जंट काम आहे तेवढं करून मी लगेच तुम्हाला जॉईन होते.. प्लीज.. ☺️"

"पण.. अवनी आणि मी... म्हणजे.... आम्ही..." निहिरा बोलताना अडखळली.. पण सोनिया ला कळलं तिला काय बोलायचंय ते 😅

"अवनी ला मी सोबत घेऊन जाते.. तू विहान सोबत जा.. प्लीज.. प्लीज.." ती हळूच अवनी ला डोळा मारत म्हणाली.. अवनी काय समजायचं ते समजली.. 😄

निहिरा समोर आता दुसरा ऑप्शनच नव्हता .. तिने चावी सोनिया ला दिली .. एक दीर्घ श्वास घेतला आणि विहान च्या मागे जाऊन बसली.. थोडं अंतर ठेवूनच😅😅

To be continued..
🙏
#प्रीत 🍁