जुळले प्रेमाचे नाते - भाग-६२ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६२

सकाळी घडलेला प्रकार आम्ही कोणालाही सांगायचं नाही असं ठरवलं होतं. कारण आधीच घरात तणावाच वातावरण असल्याने निशांतला अजुन कोणाला टेंशन द्यायचं नव्हतं. पण तो कॉल कोणी केला याची माहिती निशांत काढणार होता.

यासर्वात मध्ये अनभिज्ञ होते ते आजी-आजोबा. त्यांना मात्र काहीच माहीत नव्हतं. आणि आम्ही ही ते त्यांना सांगणार नव्हतोच.

मी स्वतःच्या रूममधे कॉलेजचा अभ्यास करत बसले असता बाबा आले. इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या, पण मी कोणालाही आज घडलेला प्रसंग काही सांगितला नाही की मला आलेला कॉल.

त्या गप्पा जेवनाच्या टेबलावर ही सुरूच होत्या. जेवुन मी स्वतःच्या रूममधे बसले असता मला निशांतचा कॉल आला..

"हॅलो हनी-बी... निशांत बोलतोय."

"हा बोल ना.. काही माहिती मिळाली का त्या व्यक्तीची.??"

"बऱ्यापैकी..., तो कॉल आला ते लोकेशन होतं ते राज च्या घराच्या जवळच.. नंतर मी अजून काही चौकशी केली तेव्हा कळलं की, तो टेडीबिअर आणि चॉकलेट ही त्याच भागातून कोणी तरी पाठवली आहेत.. मला तर राजवरच संशय आहे.. तुला काय वाटतय ??"

"मी काही ठामपणे नाही सांगू शकत. पण राज का करेल असं..?? म्हणजे त्याला तर माझ्या बाबतीत असच वागायचं असत तर तो आधीच वागला असता.. म्हणजे त्याने एवढे दिवस नसते ना लावले...!!"

"अग ते आहेच.. आता आपल्याला ठोस पुरावा शोधावा लागणार आहे त्याच्या बाबतीतला... कदाचित याचा संबंध हर्षलच्या खुनाशी असावा...?!"

"पण मी काय केलंय... म्हणजे जेव्हा तिचा खूण झाला तेव्हा तर मी हॉस्पिटलमध्ये होते.!"

"हो ग... मला ही तेच कळत नाहीये. ती व्यक्ती तुला बोलली होती, लवकरच भेट होईल म्हणुन... बघु आता कधी होते आहे भेट..."

"हो रे निशांत.. पण मला खूप टेंशन आल आहे. कोण असेल ती व्यक्ती. ती राज तर नसेल ना..??"


"अग हनी-बी तु नको टेंशन घेऊस. मी आहे ना सोबत.. तु स्टडीवर लक्ष दे. चल आता ठेवतो कॉल. उद्या भेटुन बोलूया." मग तब्बेतीच्या गप्पा करून कॉल ठेवण्यात आला.

कॉल ठेवताच मला व्हाट्सएपला एका अनोळखी नंबर वरून एक मॅसेज आला तो मी उघडला..

"हेय डार्लिंग...,
आपली भेट लवकरच होणार आहे.. तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवत आहे उद्या कॉलेजमध्ये. कस वाटलं ते नक्की सांग... गुड नाईट स्वीटी.
तुझाच...❤"

हा मॅसेज बघुन तर माझी झोपच उडाली होती. काय गिफ्ट असेल.. कोण करत असेल आणि का.?? हेच प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते.. तो मॅसेज तसाच्या तसा निशांतला फॉरवर्ड केला..



त्याने ही मग "काही घाबरू नकोस.. मी आहे ना कॉलेजमध्ये. बघु कोण आहे तो आणि त्याच गिफ्ट..." एवढाच मॅसेज केला. ती रात्र टेंशनमधेच संपली.. दुसरा दिवस उजाडला.. लवकर तय्यार झाले खरे, पण कॉलेजला जाण्याची हिम्मत मात्र होत नव्हती..

डायनिंग वर रेंगाळत पोहे खात असताना आईने विचारलं ही.. पण काही नाही म्हणुन मी ताटातले पोहे संपवले आणि नाखुषीनेच आज कॉलेज गाठलं.

घाबरतच जिना चढुन वर्गात गेले. प्रत्येक क्षण भीतीने घाबरलेली होती. मोबाईल वाजला तरीही दचकत होते. कसे तरी एक-दोन लेक्चर्स केले आणि कँटीनमध्ये घेऊन बसले.. आज न राहून हर्षुची आठवण येत होती..


तोच बाजूला ठेवलेला फोन खणखणला. घाबरतच तो मी घेतला...

"हॅलो.., कोण बोलतय..??

"हाय स्वीटी... कशी आहेस. खुप गोड दिसत आहेस ब्लु टॉपमध्ये.. अस वाटत तुला बघत रहावं.. बर एक काम कर... उठ आणि ऑर्डर काऊंटर जवळ जा तुझ्यासाठी गिफ्ट् आहे.. आणि हो, नाही बोलु नकोस.. तुला जावच लागेल.. काय आहे ना मी आताच निशांतला बाहेर जाताना पाहिल. उगाच त्याला इजा पोहोचावी लागेल. नाही तर ऍकसिडेंट कराव लागेल. सो लवकर ज आणि ते गिफ्ट घे."

To be continued