Trushna ajunahi atrupt - 14 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १४

आपल्या मॉडर्न ड्रेसिंग टेबलवर स्वतःला न्याहाळत ती विचारांत गुंगून गेली होती. मागचे काही दिवस त्याच वागणं बदलल्यासारखं वाटत होत. आधी तिच्याभोवती भिरभिरत असणारा तो तिच्यापासून दूर गेल्यासारखं वाटत होता. तिच्यासोबत प्रणयाच्या रंगात तासनतास रंगून जाणारा तो आता कुठे गायब होऊन जाऊ लागला. आताही जसा आला तसाच निघून गेला.. जणू कुठल्या रागात असावा...मी समोर असताना राग तरी कसा आठवतो त्याला... आणि आता शोधणार तरी कुठे त्याला... तिने आरशात स्वतःला पुन्हा पाहिलं. तिचे तांबूस सोनेरी केस विस्कटून कपाळभर पसरले होते. तिच्या मादक डोळ्यात त्याच्या विरहाची कळ ठसठसून दिसत होती. तिचे आरक्त गुलाबी गाल संतापाने अजुनच फुगले होते. तीच धारदार नाक किंचित थरथरत होत. त्याच्या स्पर्शाला आसुसलेल तीच अंगप्रत्यंग उभारून त्याला साद घालत होत.

तिने डाव्या हाताने आपले विस्कटलेले केस एका बाजूला घेतले. मानेवर उजव्या बाजूला कालच्या प्रेमलीलेची उमटलेली नाजूक खूण तशीच होती. तिला आवडायच्या त्याच्या शरीरभर पसरलेल्या खुणा. तो नसताना त्या खुणा त्याची आठवण करून देत. आणि मग अंगभर पसरलेला त्याच्या स्पर्श झंकारू लागे.

ती दिवसेंदिवस त्याच्या प्रेमात साखरेसारखी विरघळत होती. आणि तो मात्र तिच्यापासून दूर जात होता. जणू काही त्याचा इथला मुक्काम संपला असावा... का अस वागतोय तो.. माहितेय त्याला.. मी प्रेमात आहे त्याच्या... त्याच्यासाठी मी सर्वांशी लढेन... तो.. तो.. अनय नकोय मला... मला फक्त तोच हवाय... कायमसाठी... भलेही जग रहाटीच्या विरुद्ध असेल... तर असुदे... प्रेमाची ताकद काय असते ते दाखवून देईन मी सगळ्यांना... आरशात पाहून ती स्वतःशीच घोकत होती. रडून पुन्हा पुन्हा तीच वाक्य वेड्यासारखी बडबडत होती. चिडून तिने ड्रेसिंग टेबलवरच सगळ सामान उधळून लावल. संतापाने ती इतकी थरथरत होती की तोल जाऊन धाडदिशी जमिनीवर कोसळली. जोराने कपाळावर आपटल्याने काही क्षणात तिची शुद्ध हरपली. तिने केलेल्या त्राग्याने तो मात्र हसत होता. त्याला जे पाहिजे ते गवसल होत. त्याच गडगडाटी आवाजातील भयंकर हास्य ऐकायला ती शुद्धीत नव्हती. त्याच्या प्रेमाचे पाश तिच्या भोवती असे काही आवळले गेले होते की आता तिची सुटका अजुनच मुश्किल झाली होती.

तांबूस पसरलेली सायंकाळ संपत आली तरी त्याचा काही पत्ता नव्हता. ती पुन्हा पुन्हा सार घर फिरून त्याला धुंडाळत होती. आधी तिने आठवण काढली की लगेच हजार पण आज झाल होत कुणास ठावूक... तिला मनातुन सारखं अस्वस्थ वाटत होत. काळीज उगाचच धडधडत होते. कसल्या कसल्या शंका कुशंका मनात येत होत्या. तो सोबत असतं तर त्याच्या मिठीत सामावून ती विसरून गेली असती. पण....

तिने तयार व्हायला सुरुवात केली. जर तो आलाच तर राग नको का घालवायला. तिने कपाटातील खास नाजूक सोनेरी वर्क केलेली तिच्या आवडीची साडी काढली. मोती कलरच्या साडीला जर्द गुलाबी काठ होता. त्यावर सोनेरी धाग्याने वेलबुट्टी गुंफली होती. मध्येच नुकतीच उमललेली फुल होती. त्याभोवती खड्यांच कोंदण होत. त्याने कधीतरी भेट दिली होती... पुन्हा त्याची आठवण... तिच्या छातीत एक बारीकशी कळ उमटली. आणि पापण्यांच्या कडांना आसवांचे थेंब साचले. स्वतःशी उसन हसत तिने साडी नेसली. आपल्या मोकळ्या तांबूस कुरळ्या केसांना सावरत तिने मोठा अंबाडा घातला. अशा भरगच्च अंबाड्यावर लालबुंद काश्मिरी गुलाब खोचायला खूप आवडायचं तिला. पण ऐनवेळी फुल कुठून आणावी... तिने ड्रावर खोलला. लग्नाच्या पहिल्या रात्री अनयने तिला भेट दिलेला एक ब्रॉच होता. सोनेरी रंगाच्या ब्रॉचवर लखलखत्या हिऱ्यांमध्ये एक मोठा दुधाळ रंगाचा खडा बसवला होता. तिला आधी कधी तो ब्रॉच वापरवासा वाटला नव्हता... अनयशी कधी तीच मन जुळल नव्हता ना. पण आता ह्या साडीवर बरोबर मॅचींग होत होता. तिने त्या खड्यावरून हळुवार हात फिरवला.. बिचारा अनय.... त्याची काहीही चूक नसताना आपल्यामुळे त्रास भोगतोय....त्याच्या वागण्यावरून वाटत की त्याचं प्रेम असाव.. पण... आपल आवरून आणि मेकअप करून ती स्वतःला न्याहाळत होती. तिची सुंदर चेहऱ्यावर उदासीच्या छटा होत्या. काय चाललंय हे आयुष्यात.. आपण कोणासाठी तयार होतोय इतके आणि ते ही कोणी दिलेल्या वस्तू घालून.. क्षणासाठी तिला स्वतःचीच लाज वाटली...काय चालवलय मी हे सगळं.. माझी वागणूक इतक्या खालच्या दर्जाची कशी होऊ शकते... माझं लग्न झालंय... नाही अशी वाहवत जाऊ शकत मी.... मी काय करतेय हे... तिच्या मनात अनेक विचारांचं द्वंद्व चालू झालं. तिचे निळसर डोळे अजुनच भरून आले. तिला त्या घरातून निघून जावस वाटत होत. ती तशीच दरवाजाच्या दिशेने वळली मात्र अचानक तिच्या सर्वांगाला कापर भरल. ड्रेसिंग टेबलच्या आधारासाठी ती थोडीशी वाकली. पण वाकतानाच तिच्या पाठीच्या मणक्यात जोरदार लचक भरली. त्या वेदनेची सनक तिच्या पाठीतून मस्तकात प्रवाहित होत होती. सर्वांगातून कसलीशी शिरशिरी लहरत गेली. आणि काही कळायच्या आधीच तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. आपल्याला काय होतंय ते न कळून ती जोराने किंचाळली. परंतु तिचा आवाज घशातच अडकला. तिच्याभोवती पांढऱ्या रंगाचा धूर आपल वळत बनवत होता. सफेद धुक्यासारखे दिसणारे ढग त्या वलयाभोवती गोलसर फिरत होते. तिच्या अंधारलेल्या डोळ्यांना काही नीटस दिसेना. परंतु काहीतरी विचित्र चाललंय हे ती समजून चुकली. तिला अजुन ओरडायच होत... कोणाला तरी मदतीला पुकरायच होत. परंतु घशातून आवाज निघेना. घाबरून तिचे श्वासही अडकू लागले. पांढऱ्या धुरात तिचा जीव गुदमरू लागला. खोल श्वास घ्यायला ती तडफडू लागली पण धुक्याच वलय अजुनच घट्ट आवळल जात होत. तिच्या दुखऱ्या शरीराची तडफड अजुनच वाढली. धुक्याच्या पुंजक्यांनी अजुनच आपली पकड घट्ट केली एखाद्या भिजल्या कापडाला पिळाव तस व तरंगत जाऊन खोलीभर विसावले. तीच तडफडणार शरीर निस्तेज होऊन जमिनीवर कोसळलं. तिच्या भोवतीचे ढग वाऱ्यावर लहरत खोलीतच फिरत होते....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED