Trushna ajunahi atrupt - 9 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ९

करालचा राग अनावर होत होता. एक सामान्य शूद्र मनुष्य आपल्याच गोटात राहून आपल्या विरोधात बंड पुकारतो हे त्याला सहन झाले नाही व इतके दिवस त्याने मनाच्या तळाशी डांबून टाकलेला अहंकार उसळी मारून वर आला. त्याने रागाने छाती पिटत गळा फाडून गगनभेदी गर्जना केली. बाजूची मगाशी बळीच्या मानेवर चालवलेली तलवार उचलून त्याने सर्व शक्तिनिशी शास्त्रींच्या अंगावर फेकली. बंदिस्त असल्याने त्यांना काही हालचाल करणं जमत नव्हतं. करालने फेकलेल्या तलवारीने तडक त्यांच्या छातीचा वेध घेतला. रक्ताची एक चिळकांडी म्हातारीच्या जळणाऱ्या अंगावर उडाली. ती त्याही जळक्या अवस्थेत भीषण हसली. शास्त्री आपली शुद्ध हरपत जमिनीवर कोसळले. त्यांच्या हतबलतेवर हसत करालने आपले मंत्रोच्चार अजुन जोमाने चालू ठेवले. खड्यातील प्रकाश अगदी अंधुक होत संपणार होता. तसंही म्हातारी आता करालवर खूष झाली असती. शास्त्री रक्ताच्या थारोळ्यात शेवटच्या घटका मोजत होते. श्वास बंद पडत होता. सर्व संपून जात होत...

इतक्यात सारे खडे पुन्हा एकदा लकाकले. ती सूक्ष्म चमक शास्त्रींच्या डोळ्यांनी अचूक टिपली. आपले अंधारी येऊन बंद होणारे डोळे मोठ्या कष्टाने उघडे ठेवत त्यांनी नजरेच्या टप्प्यातील अंधुक दिसणाऱ्या परिसराचा वेध घेतला. आपल्या नाजूक पैंजनांची किणकिण करत शशिकला नग्नावस्थेत हरिणीच्या चालीने चालत होती. माथ्यावरून मोकळे सोडलेले तिचे काळेभोर केस तिच्या कपाळावर लाडिक हालचाली करत होते. तिची गोरीपान काया त्या अंधारातही चमकत होती. नाजुक वळणाऱ्या तिच्या कंबरेची हालचाल सर्वांच्याच काळजाचा ठाव घेत होती. थंडीने ताठरलेल तीच शरीर सर्वांच्या पौरुष्याला साद घालत होते. तिच्या शरीराच्या गंधाने मोहित होऊन करालचीही नजर तिच्या दिशेने वळली. आपल्या इंद्रियांवर वर्चस्व गाजवणाऱ्या करालचाही तीच निसर्गावस्थेतील रूप पाहून काम जागृत झाला. आपल्या उभ्या आयुष्यात कधी तरुण स्त्रीकडे कोणत्याच दृष्टीने न पाहणाऱ्या करालसमोर अप्सरेलाही लाजवील अस सौंदर्य त्याच्या कामाग्नीला साद घालत उभ होत. तिच्या सौंदर्याच्या रसापानात त्याच्या तोंडातून निघणारी मंत्राची आवर्तने कधीच बंद झाली. स्वतःच भान हरपून तिला न्याहाळताना त्याच शरीर कधी प्रणयातूर झाल त्याला कळलंच नाही. आजूबाजूच वातावरण विसरून तो थेट शशीकलेच्या शरीराशी भिडला. तेवढ्या काही क्षणांच्या अवधीत खड्यांची चमक पहिल्याप्रमाणे प्रखर झाली. चंद्रग्रहणाचा मुहूर्त कधीचाच टळून गेला होता. खड्यांच्या तेजाने म्हातारीच शरीर जळू पुन्हा जळू लागलं. तिच्या किंकाळ्यानी कराल भानावर आला. क्षणिक मोह त्याला भलताच महाग पडला होता. जळता जळता म्हातारी त्याला सर्व शक्ती गमावण्याचा शाप देऊन राख होऊन पडली. करालने चिडून शशीकलेचे केस खेचले त्याला त्यात काहीतरी वेगळं जाणवलं म्हणून गुरासारखे तिचे केस ओढू लागला. तिच्या केसातून एक प्रकाशणारा खडा घरंगळून जमिनीवर पडला. वेदनेने शशिकला जोराने किंचाळली. परंतु त्याला अजिबात दया येणार नव्हती. त्याच्या तेजोभंगाला शशिकलाही जबाबदार होती. त्याने आपली मजबूत लाथ तिच्या पोटात मारली. असह्य वेदनेने ती मागेच भेलकांडली. धावत जात त्याने तिचा गळा पकडला. सर्व शक्तिनिशी आपली बोट तिच्या नाजूक गळ्याभोवती रूतवत तिला परलोकी पाठवलं. एव्हाना पहाट झाली होती. त्याच्याच शक्ती त्याच्या गुलामीतून मुक्त होऊन भुकेने त्याच्यासहीत सर्वच अनुयायांवर तुटून पडल्या. पहाटेच्या किरणांबरोबर एक संकट टळलं होत मात्र शशिकला नाहक बळी गेली होती.

परमेश्वर कृपेने विश्वनाथशास्त्री मात्र मरतामरता वाचले. त्यानंतर बरीच क्रियाकर्म करून सर्व शक्तींना बंदिस्त करून पृथ्वीला संकटमुक्त केलं. जे काही थोडे लोक वाचले होते त्यांच्याच हातात उरलेला सर्व कार्यभार सोपवला गेला. व त्या सर्वांनी करालच्या स्मृती इतिहासातून पुसून टाकल्या. त्यामुळे कुठेच कराल व इतर कोणाचाच उल्लेख कुठेही आढळत नाही. विश्वनाथशास्त्री मात्र भविष्य जाणून होते. कोणत्याही शक्तीला अंत नाही त्या अधांतरी कुठेतरी भटकत राहतील व त्यांची वेळ येताच त्या ह्या जगात पुन्हा प्रवेश करतील. त्यामुळे कोणा न कोणाला त्यांचा सामना करण्यासाठी कार्यक्षम राहण्याची गरज होती. म्हणून त्यांनी आपल्या काही निवडक अनुयायांना ह्या प्रकाराची कल्पना देऊन त्यावर शक्य त्या प्रकारचे उपायही सुचविले गेले. एका हस्तलिखिताच्या स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही माहिती हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे माझ्यासारखे काही लोक ह्या एकाच उद्देशाने आयुष्यभर तपश्चर्या करत आले आहेत जेणेकरून पुन्हा सामन्याची परिस्थिती उद्भवली तर पूर्ण तयारी असली पाहिजे. " बराच वेळ बोलल्याने गुरुजींना दम लागला. त्यांच्या एका अनुयायाने तत्काळ पुढे येत त्यांना पाणी पाजले.

इतका वेळ केवळ श्रोत्याची भूमिका घेतलेला ओम बावरून गेला. एखाद्या चित्रपटाची कथा असावी तशीच सगळी कथा होती. विश्वास न ठेवावा तर आतापर्यंतचा प्रवास त्याने पूर्ण शुद्धीत अनुभवला होता. त्यामुळे हे सगळं स्वप्न समजून विसरू शकत नव्हता. मुख्य म्हणजे तो स्वतः का गोवला गेलाय ह्याच उत्तर त्याला पाहिजे होत. आणि फक्त गुरुजी त्याला उलगडा करू शकत होते. म्हणून तो शांतपणे गुरुजींच्या बोलण्याची वाट बघत बसला.

" बराच वेळ झालाय ओम.. दमला असशील ना.. बाकीचं सकाळी बोलूया का..?" शांत बसून पेंगणाऱ्या ओमकडे पाहत गुरुजींनी विचारलं.

त्यांच्या प्रश्नावर तो ताडकन जागा झाला. इतक्या विचित्र प्रवासाने थकण साहजिकच होत. परंतु सर्व तर्कसंगती लावून त्याचा मेंदू जास्त थकला होता. व इतका विचार केल्यावरही ठोस अस काहीच उत्तर मिळालं नव्हतं. " नाही गुरुजी.. मला ऐकायचं.. अर्धवट ऐकून रात्री त्याच विचारांत झोप नाही लागणार.."

" बर ठीक आहे..." गालातल्या गालात हसत गुरुजींनी पुढे बोलायला सुरुवात केली. " खरतर करालने एक चूक केली होती. यक्षिणीविद्याप्राप्तीच्या नादात त्याने चुकून भलत्याच कुठल्यातरी शक्तीला आवाहन केलं होत. यक्षिणी असती तर आपला बळी घेऊन निघून गेली असती. मात्र ऐन वेळी कोपिष्ट होऊन आपण करत असलेली क्रिया चूक की बरोबर इतका साधा विचार करण्याची शक्ती तो गमावून बसला व चुकत जाऊन जे काही मंत्र उच्चारले त्याने एका भयानक शक्तीला आपल्या जगतात पाचारल. त्या खड्यांच्या मंतरलेल्या प्रकाशाने आपल काम चोख पार पाडून तो शक्ती परतवून लावली मात्र तिच्या शापाने करालही आपली शक्ती गमावून बसला. अर्थात ते बरच होत. संकट खूप जास्त वेळासाठी टळलं. परंतु ते जेव्हा परतेल ते त्याच्या कित्येक पटीने ताकदवान होऊन... वर्षानुवर्षे केलेल्या तपाने आम्हाला भविष्यात घडणाऱ्या काही घटना पहायची शक्ती दिली. व आमच्या पिढ्यानपिढ्या करालच्या कारवाया जाणून घेऊ लागल्या. त्यावेळी माझा जन्मही झाला नसेल तेव्हा आमच्या एका पूर्वजाला करालच्या परतीचे वेध मिळाले आणि सगळे सावध झाले. माझ्या कालावधीत तर आम्हाला अजुनच कडक आदेश होते. त्या ताकदिशी लढणारी आम्ही शेवटची तुकडी होतो. परंतु कदाचित योग्य माध्यम न मिळाल्याने करालच ह्या जगात प्रवेश करणं लांबत गेलं आणि आम्हा लोकांची वय वाढत गेली. ह्या नवीन पिढीचा कशावर विश्वास नाही की काही नाही. त्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे पण. म्हणूनच वारसदार कोणाला करावं ह्या संभ्रमात आम्ही सगळेच होतो. एव्हाना ती चा जन्म झाला होता.. अगदी खग्रास चंद्रग्रहणाच्या मुहूर्तावर... का कोण जाणे पण मनात तेव्हा पाल चुकचुकली होती. नंतर काहीतरी कारणाने तिची पत्रिका पाहिली आणि खात्री पटली की हीच करालच माध्यम होऊ शकते. त्यावेळी मी तिच्या वडिलांना थोडीफार कल्पना देऊन काही उपाय सुचवायचा प्रयत्न करून पाहिला. पण अंधश्रद्धेच्या नावाखाली तिच्या वडिलांनी माझं म्हणणं धुडकावून लावल. या ना त्या प्रकारे त्यांना मनवायचे हरेक प्रयत्न केले परंतु त्याला वैतागुन त्यांनी शहर बदललं. पुढे शिक्षणासाठी ती परगावी गेली. आधीच तिच्या पत्रिकेतील ग्रहदोषाप्रमाणे ती कोणत्याही अमानवी शक्तीसाठी उत्तम माध्यम होती. त्यात तिथे एकटेपणात ती बऱ्याचदा वैतागुन जायची व विरंगुळा म्हणून निरनिराळ्या कल्पना करत बसायची. कल्पनाही अशाच भयाण.. किळसवाण्या... विचित्र अशा... अशाच कल्पनेच्या माध्यमातून त्या सर्वांनी तिच्या शरीराला वापरत ह्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पृथ्वीतलावरची अस्तिकता त्यांना प्रवेश देण्यास नाकारते. परंतु त्यावर मात करून त्या सगळ्या शक्ती कधी ना कधी अवतरतीलच...."

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED