चूक आणि माफी - 3 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चूक आणि माफी - 3

ईत्कयात नीरजा , बस मधून उतरली .तिच्या सोबत निशा ही बस मधून उतरली . नीरजा आणि निशा ला बघून नीरज म्हणाला .तुम्ही दोघी पण आला .चला आपन जाऊ यात उसाचा रस प्याला . असे हे चौघे पण उसाचा रस प्याला गेले . मग गप्पा गोष्टी झाल्या . मग निशा तिच्या मुंबईच्या गप्पा गोष्टी सांगू लागली .ह्या चौघांचा मस्त ग्रूपच़ झाला . मग काय रोज नवीन नवीन प्लान बनू लागले . कधी चिंचा तोडायचे . कधी जांभळ तोडायचे . आता निशा आणि अमेयची चांगलीच़ गट्टी जमली . ज्या अमेयला मुली अजिबात आवडत नव्हत्या . तो अमेय नकळत निशाची काळजी घेऊ लागला .तिला काय हवय काय नको पाहू लागला . निशाला ही अमेय च्या रूपात एक चांगला मित्रच मिळाला .
अशीच एक दिवस ह्या मुलाची शेतामधे पार्टी होती .ठरलेल्या वेळेत निशा , अमेय , नीरज , नीरजा जमले . सगळे खुश होते .पण निशा मात्र दुःखी होती . अमेयच्या हे लक्षात आले .त्याने त्याबद्दल विचारले . ती म्हणाली ......अरे अमेय उद्या आह्मी मुंबईला परत जाणार . एथे किती मजा येत होती . पुढच्या वर्षी परत दहावी .आता परत कधी यायला मिळतंय काय माहीत . ' ' पण मला तुमच्या सगळ्याची खूप आठवण येयील .' ' मी तुम्हाला सगळ्याना फोन करेन . तुम्ही पण मला सगळे फोन करत जा .
यावर अमेय ला आतल्या आत काहीतरी तूटल्यासारख झाल . आपल्या जवळची कोणी व्यक्ती आपल्याला सोडून कुठे तरी लांब चालली , अस त्याला वाटू लागले . अस त्याला का वाटत होत , त्याला ही कळेना . काहीही न बोलता सगळे जण आपल्या आपल्या घरी निघून गेले .ईकडे अमेय च्या दोन नंबरच्या बहिणीचे लग्न ठरवायचे चालेले होते . अमेयच्या मोठ्या बहिणीला तिच्या सासरच्या माणसांनी जाळून मारले होते . अमेय्च्या आई वडिलांनी खूप वर्ष त्याची केस लढवली , पण निकाल काही चांगला लागला नाही . त्या दुःखात अमेयचे आई वडील ईतकी वर्ष जळत होते . आणि आता दुसऱ्या मुलीच्या लग्नासाठी अनेक स्थळ चालून येत होती . अमेयच्या आई वडिलांची तर अजिबात ईछ्या नव्हती की , आपल्या मुलीचे लग्न लावून द्यावे .म्हणून , पण घरात तरी किती दिवस ठेवणार .
आणि आलेल स्थळ पण चांगल होत .ते नकारन पण शक्य नव्हते .म्हणून अमेयच्या आईनेच ह्याचा पुढाकार घेऊन लग्न ठरवायचे असे ठरवले . रात्रभर विचार करून सकाळी अमेय्ची आई उठली . तिने अमेयला सोबत घेतले आणि ती अमेयच्या मावशीकडे आली . तिथे आल्यावर स्थळाविषयी बोलाचाल झाली . एकंदरीत अमेय्च्या आईला ते स्थळ आवडल . त्या आनंदी मनाने घराकडे परतल्या.पण अमेयच़ मन मात्र नाराज होत .आज निशा मुंबईला जाणार होती . ती परत कधी येणार माहीत नव्हते . आणि आज शेवटच़ तिला भेटता सुधा आल नाही .ह्याची त्याला खंत वाटत होती .आता ती परत कधी भेटणार हे सुध्दा त्याला माहीत नव्हते .
अमेय घरी आला , पण त्याच कशातच मन लागेना .असे कितीतरी दिवस निघून गेले .परीक्षा जवळ येऊ लागली .पण त्याचे काही केल्या अभ्यासात लक्ष न लागल्यामुळे आणि घरात बहिणीच्या लग्नाची गडबड चालू असल्यामुळे त्याला परीक्षेत मार्क कमी पडले .पुढे बारावीचे वर्ष त्याला पुन्हा मार्क कमी पडू नये .आणि त्याचे अभ्यासात लक्ष लागावे म्हणून अमेयच्या बाबांनी त्याला होस्टेल मधे ठेवायचे अस ठरवल .पुढील कथा पुढील भागात .' ' चूक आणि माफी भाग -4' ' .