चूक आणि माफी - 6 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चूक आणि माफी - 6

हळू हळू नीरज च्या घरात गर्दी वाढू लागली . गावातील मुल ह्या न त्या कारणाने नीरज च्या घरी जमली होती .त्याचा सगळ्याचा एकच उद्देश होता . एक छोटीशी का होईना निशाची एक झल्क आपल्याला पाहायला मिळावी . आता अमेयला कळून चुकले होते , की ज्या प्रमाणे आपण निशाची स्वप्न पाहतो .त्या प्रमाणे गावातील सगळीच़ मूल निशाची स्वप्न पाहत होती .प्रत्येक जण तिच्याशी सलगी बनवायला बघत होते .ते निशाविषयी मारत असलेले घाणेरडे जौक्क त्याला ऐकणषे झालते .आपण ही त्यातले एक आहोत असे त्याला वाटू लागले होते .त्याला स्वतःचाच राग येऊ लागला होता . तो तडक तेथुन निघाला .आणि घरी आला . मागे आवाज देत असलेल्या नीरज कडे त्याने वळून सुध्दा पाहिले नाही .
तो घरी आला . आणि रागावून आई शेजारी जाऊन बसला . तेवढ्यात त्याची तीन नंबरची बहीण तेथे आली . ती त्याला म्हणाली , अरे अमेय तू एथे आहेस .अरे मगाशी , ती नीरजा आली होती . आणि तिच्या सोबत कोणा तरी मुलगी होती . विचारल तर म्हणाली . ती समोरची निशा आहे म्हणून , नीरजाच़ तुज्याकडे काही तरी काम होत . मी म्हणाल .आल्यावर तुला सांगते म्हणून . पण ती निशा कोणा आहे रे ?
आपल्या बहिणीच बोलण ऐकून अमेयचा आनंद गगनात मावेना .नक्कीच निशा आपल्याला भेटायला आली असेल . तिला ही आपल्या विषयी काहीतरी वाटतय .हो , नक्कीच .एवढ्यात तो ताडकन उठला .आणि बाहेर निघणार . ऐत्क्यात त्याची आई त्याला थांबवत म्हणाली .अरे , कुठे निघालास ? आता तर रागात होतास .आणि ह्या नीरजाच़ तुज्या कडे काय काम ? आणि ही निशा कोण? अमेय्च्या आईने एकामागून एक प्रश्नाचा नुसता भडिमार चालू केला .
तिला थांबवत अमेय म्हणाला , अग , नीरजाच़ मज्याकडे काय काम आहे , हे , तिथे गेल्याशिवाय मला कस कळणार . आणि ती निशा म्हणजे नीरजाच्या समोरच्या बंगल्यातली ती विजय काकांची तीन नंबरची मुलगी . हे बोलण चालू असतानाच़ अमेयचे बाबा घरात आले . अमेय कडे बघून म्हणाले , तुला बरच़ माहीत आहे रे तिच्याविषयी ." तसा अमेय दचकला ' ' .हो , ते .....काय ....आहे .....ती नीरजाची मैत्रीण आहे ना .....त्यामुळे नीरजाच्या तोंडून ऐकतो तीच बऱ्याचवेळा नाव . एवढ बोलून त्याने सुटकेचा श्वास घेतला . यावर अमेय चे बाबा म्हणाले , ठीक आहे ...ठीक आहे . आता मी काय सांगतोय ते ऐक .उद्या जत्रा आहे . तुजी बहीण आणि दाजी घरी येणार आहेत .त्यामुळे उद्या ईकडे तिकडे कुठे ही जाऊ नकोस .ती लोक जो पर्यंत आहेत तो पर्यंत घरातच थांब .
आता मात्र अमेय्ची पंचायत झाली .आता उद्या पासून जत्रा चालू आहे . आणि उद्या नेमके आपली बहीण आणि दाजी येणार .आणि ही लोक जत्रा झाल्याशिवाय काय ईथुन जाणार नाहीत . त्यामुळे मला त्या दाजीच्या मागे मागे फिरायला लागेल . आणि मग आपल्याला काय निशा
सोबत जत्रेत जाता येणार नाही . आपण बघितलेली सगळी स्वप्न धुलीत मिळतील .एकतर आधीच गावातील सगळी मूल तिच्या मागे लागलित .त्यात तिला फसवून जर कोण जत्रेत घेऊन गेल्यावर .आणि निशा खूप भोळी आहे .तिला ऐथ्ल्या मुलांचा डावपेच कळणार नाही .आता आपण काय कराव ह्या पेचात अमेय पडला . ईकडे त्याचे दाजी होते .आणि ईकडे निशा . शिवाय वडिलांचे नाही ऐकल तर वडील रागावनार .अमेयला काय कराव ते सुचेना .