Chuk aani maafi - 7 books and stories free download online pdf in Marathi

चूक आणि माफी - 7

जत्रेचा दिवस आला .घरापुढे सारवन झाली .रांगोळ्या काढल्या गेल्या .लोकांच्या घरात पाहुण्याची वर्दळ चालू झाली . गावात नुसता आनंदीआनंद होता .निशाच्या घरी सुध्दा नुसता आनंदी आनंद होता .तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले होते . त्यामुळे तिच्या घरात आनंदाची पर्वणीच़ होती . आता आपल्या बहिणी सोबत जेवढा जास्तीत जास्त वेळ घालवता येयील तेवढा घालवावा अस निशाला वाटू लागल . त्यामुळे कुठे ही जाताना मोठ्या बहिणी सोबतच़ जात . आता नीरजाकडे तीच जण ही दुर्मिळ झाल होत . निशाच्या घरात आता लग्न आणि जत्रा दोघांची गडबड चालू होती . आणि त्या गडबडीत निशा व्यस्त झाली होती .
ईकडे अमेय तर पूर्ण वैतागला .पूर्णवेळ तो त्याच्या दाजींच्या मागे मागे फिरत होता .त्यात घरात त्याच्या निकालाची चर्चा .
एके दिवशी रात्री अमेयची ताईने अमेयला जवळ बोलावले . त्याच्या डोक्यावरून हात फिरवला .अमेय तुज काय चाललाय ? तू नीट अभ्यास वेगेरे करत जा . बारावी नंतर काय करायच ठरवलय .बाबा , ही आता फारस काम करत नाही .ते ही थकत चाललेत .शिवाय गौरीच्या लग्नाच़ ही बघावे लागेल . तीच ही शिक्षण पूर्ण होत आलाय . तू शीकलास तर चांगली नोकरी मिळेल .परीस्ती सुधारेल . सगळ व्यव्सीतीथ होईल . आणि हो , निशाबदल माज्या कानावर आलय. अरे , गावातील कितीतरी मूल तिच्या मागे लागलित . ह्यां न त्या कारणाने मूल तिच्या घराच्या अवतीभवती फिरतात . काहीतरी काम काढून तिच्या घरात ही जातात .शिवाय ती पैसेवाली माणसे , आपल्यासारख्या माणसांशी त्यांच नाही जुळनार . आता अमेयला कळल होत की , निशाबदल घरात समजल आहे .आणि आणखी काय बोलायला गेल तर ही आई बाबांच्या कानावर ही गोष्ट घालणार .म्हणून त्याने शांत राहायचे ठरवले .
दुसऱ्या दिवशी अमेयची ताई जायला निघाली .तिने घरातल्याचा निरोप घेतला . अमेयला म्हणाली , सांगितलेले लक्षात ठेव . अमेय ही मान खाली घालून , हो , म्हणाला . आणि थोड्यावेळाने अमेय ची ताई त्याच्या दाजीबरोबर निघून गेली . तसा अमेय पाळला , नीरजच्या घरी , त्याने नीरजाला गाठले , आणि त्याला निशाला भेटायचे आहे .तिच्याकडे त्याचे खूप महत्वाचे काम आहे .म्हणून सांगितले. नीरजा म्हणाली .बर .....ठीक आहे , संध्याकाळी आह्मी खरेदी करायला जाणार आहे .त्यावेळी तू पण ये . आता तू जा . आणि संध्याकाळी पाच वाजता ये . यावर अमेय ही म्हणाला ....ठीक आहे .
अमेय ही घरी आला . आज काही करून निशाला भेटायचेच़ . अमेय संध्याकाळ व्हायची वाट बघत होता . संध्याकाळ झाली .अमेय नवीन कपडे घालून घराच्या बाहेर पडणार , एवढ्यात अमेयच्या आईने अमेयला अडवले .आणि दुकानातूंन सामान आणायला सांगितले . आता आईला नाही म्हणता येयीणा . आणि दुकानात जाऊन सामान आणायचे म्हणजे खूप उशीर होणार .अमेयला काय करावे ते कळेना .आज काही करून निशाला भेटायचेच़ .पण दुकानात नाही गेलो , तर आई बाबाना सांगेन .आणि त्या दुकानात पण फार मोठी रांग असते . काय कराव अमेय्ला कळेना .जाऊदे आधी पटकन दुकानात जाऊन येऊ , मग जाऊ निशाला भेटायला .अमेय वेळ वाया न घालवता दुकानात निघाला . त्याच्या नशिबाने आज फार मोठी रांग नव्हती . त्याने पटकन सामान घेतले .आणि तो घरी निघाला . तो पटापट पावले टाकत येत होता . घरी आल्यावर त्याने आईच्या हातात सामान दिले . त्याने त्याची साइकल काढली .आणि तो नीरजाने सांगितलेल्या दुकानात निघाला .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED