चूक आणि माफी - 10 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चूक आणि माफी - 10

अमेयला बाबांचे शब्द खूप मनाला लागले होते , जास्त करून ते निशाविषयी जे बोलले .ते शब्द .निशा तशी मुलगी नाही .पण निशाच्या मागे पळून सुध्हा काही उपयोग नव्हाता .कारण आपली परीस्तीथी ही अशी . आपण तिला काय देऊ शकत नाही . आपल्या भवितव्यचा काय ठावठिकाणा नाही .आणि निशा श्रीमंत घरातली . त्यात ती किती सुंदर ...आणि आपण हे अस..... आणि तिच्या मनात ही आपल्या विषयी काही नाही . त्यामुळे ह्या सगळ्या पासून लांब रहीलेल्च बर
.... पण आता पुढे काय करायच . बाबा तर पुढच्या शिक्षना साठी पैसे नाही देणार .आणि घरची परीस्तीथी ही तशी नाही आता काय करायच .... अमेय ने नोकरी करायचा निर्णय घेतला .पण बारावी नापासला कोण नोकरी देणार .आपण मुंबईला जायच ......अमेयच्या डोक्यात विचार आला ..... मुंबई मधे आपल्याला काय न कायतरी काम मिळेलच . आणि मुंबई मधे आपले मामा पण आहे .त्यांच्या तिथे आपण राहू शकतो . हो , नक्कीच ..... पण , घरच्यांना सोडून कस जायचे .पण जाव तर लागणारच ...
काही तरी करावच लागणार . अमेय ने ठरवल की मुंबईला जायचे म्हणजे जायचे . पण घरच्याशी कस बोलायचे .आधीच घरचे त्याच्यावर चिढ्लेले .त्यामुळे त्याला भीती वाटत होती .तरी पण आज संध्याकाळी जेवताना विषय काढायचाच . त्याने ठरवले .
संध्याकाळ झाली , अमेय घरी आला .सगळेजण जेवायला बसले .अमेय ही जेवायला बसला . अमेयच्या बाबांनीच विषय काढला .पुढे अमेय काय ठरवलस ? .....त्याच्या बाबांनीच विषय काढला . अमेय घाबरत घाबरतच म्हणाला . बाबा .....मी .....मुंबईला जायचे ठरवलंय . त्याला पुढे न बोलू देताच अमेयचे बाबा अमेय्ला म्हणाले .कशासाठी .....त्या पोरीसाठी .....ती पण त्या मुंबईतच राहते ना ....
अमेय म्हणाला नाही बाबा , त्यासाठी नाही ... मला मुंबईमधे कुठे ही काम मिळेल .आणि मी पुढच शिक्षण सुध्दा घेऊ शकेन .आणि मी निशाचा विचार सोडून दिलाय .मी तुम्हाला वचन देतो .मी कधी तिच्या मागे फिरणार नाही ...मुंबईला जाऊन कामच करेन .
तरीही अमेयचे बाबा काही केल्या तयार होईना .अमेयची आई त्याच्या बाबांना म्हणाली , अहो , जाऊ द्याना त्याला , करेल तो काम ....आणि एवढ्या मोठ्या मुंबईत त्याला कुठे भेटणार आहे ती निशा .....जाऊ द्या आपल्याला पण आता पैशाची गरज आहे .शेवटी अमेय्च्या आई च्या सांगण्यावरून अमेयच्या बाबांनी त्याला जायला होकार दिला .अमेय्ला थोडस बर वाटल .
आता अमेयची जायची तयारी झाली .तयारी कसली .त्याच्याजवळ असणारे चार चांगले कपडे त्यानी घेतले . नोकरीसाठी लागणारे त्याचे कागदपत्रे त्यानी घेतले .आणि तो निघाला . त्याच्या सोबत जर आठवणी घेतल्या .तर त्यांच तिथे ओझ होईल .म्हणून आपल्या मोबाईल मधील निशाचा नंबर ही त्याने डीलिट केला .त्या नंबर बरोबर तीही आपल्या अयुषतून डीलिट झाली .अस त्याला वाटल . तो मुंबईला निघाला . त्याला मुंबईला जायला पैसे द्यायला ही त्याच्या आई वडीलाण्कडे पैसे नव्हते . त्याच्या आईने शेजाऱ्यांकडून उसने आणलेले पैसे त्याला दिले . ते पैसे घेऊन अमेय मुंबईच्या गाडीत रवाना झाला .
प्रत्येकाच्या अयुषत अशी वेळ येतच असते .' ' सगळ गमावून पुन्हा नव्याने तेच मिळवायचे .' ' अमेय च ही काहीस असच झाल होत . ' ' गाडी पुढे पुढे चालली होती . आणि अमेयच घर , त्याचा गाव मागे पडत चालला होता .पण काहीतरी करून दाखवायच ही आशा आणखीनच त्याला पुढे पुढे घेऊन चालली होती .मुंबईच्या दिशेने .