Chuk aani maafi - 11 books and stories free download online pdf in Marathi

चूक आणि माफी - 11

आता अमेय मुंबईत येऊन पोहचला होता , त्याला स्टेशनवरती न्ह्यायाला त्याच्या मामाचा मुलगा आला होता .तो अमेयला घेऊन घरी आला .रात्रीची जेवण झाली . आणि दिवा घालवून सगळी झोपी गेली .प्रवासात थकल्यामुळे अमेय ही जोपी गेला .अगदी शांतपणे , उद्या पासून अशी शांत जोप त्याला लागणार होती की नाही काय माहीत .
आता अमेय मुंबईत आला होता , त्याला रहायला मुंबईत जागा मिळाली होती , पण , नोकरीच काय ? नोकरी कशी मिळवायची .आणि नोकरी साठी फीरयाचे म्हणजे आपल्याला मुंबईतले काहीच माहीत नाही .आणि खिशात ही थोडे थोड्केच पैसे . त्याने ह्याविषयी मामाच्या मुलाशी बोलायचे ठरवले .
सकाळ झाली , अमेय त्याच उरकून तयार झाला . त्यानी त्याच्या मामाच्या मुलाला त्याच्या नोकरी विषयी विचारले .यावर तो हसत हसत म्हणाला , अरे एथे प्रत्येक गोष्ट ज्याची त्याला करावी लागते . नोकरी काही अशीच नाही मिळत , त्यासाठी ईकडे , तिकडे फिरावे लागते . ' ' तू अस कर , तू तुज्या पध्दतिने पर्यंत कर .मी माज्या कंपनी
त तुज्या विषयी बोलून बघतो .पण त्याच्या भरवशावर बसू नकोस .तू तुजे पर्यन्त करत रहा . एवढ बोलून तो म्हणाला , चल मी निघतो कामावर .
अमेयला आता काय कराव कळेना .मुंबईत तो दुसऱ्या कोणाला ओळखत सुध्दा नव्हता . त्यानी आजूबाजूला स्वतः जाऊन फिरायचे ठरवले .बघू कुठे छोटीशी का होईना नोकरी मिळते का ? म्हणून तो निघाला , पैसे कमी असल्यामुळे त्याने पायीच जायचे ठरवले .
अमेय नोकरीच्या शोधात बराच फिरत होता , फिरून फिरून त्याचे पाय दूखूण आले होते .आणि भूक सुद्धा लागली होती . पण नोकरी मिळेपर्यंत बाहेर खाणे , त्याला परवडनारे नव्हते . साधा वडापाव खाणे सुध्दा त्याला परवडणारे नव्हते . त्याने तसच भूक मारली .आणि पुढे तो कामाच्या शोधात निघाला . दिवसभर फिरून सुध्दा त्याला काय नोकरी मिळेना . संध्याकाळी तो दमूनभागून घरी आला . दिवसभर फिरून त्याचे पाय खूप दूखू लागले .आणि भूक ही खूप लागली होती . त्याने जेवण केले आणि तो झोपी गेला .
सकाळी पुन्हा तेच , दिवसभर नोकरी साठी वणवण फिरायचे , आणि रात्री जेवून झौपय्चे .असा अमेय्चा दिनक्रम झाला होता , असे त्याने पंधरा दिवस काढले .पंधरा दिवसानंतर त्याला मोबाइलच्या दुकानांत काम मिळाले . पगार कमी होता , पण त्याला खूप आनंद झाला . आता मुंबईत आपला ठावठिकाणा आहे , अस वाटू लागला . तस त्याने घरी फोन करून कळवले .घरच्यांनाही आनंद झाला .
अमेय आता रोज मोबाइलच्या दुकानांत कामाला जायी .तिथे मन लावून तो काम करत होता .अमेय पडेल ते काम करत असे . अस त्यानी महिनाभर काम केल .त्याला महिन्याचा पगार मिळाला .तो घेऊन तो खूप खुश होता .त्याची ती पहिली कमाई होती . ती त्याला आभाळाएवढी वाटत होती . त्या पैशातून आपण वाटल ती गोष्ट खरेदी करू शकतो . अस त्याला वाटत होत .पण म्हणतात ना पैसे यायला जेवढा वेळ लागतो , तेवढा पैसे घालवायला लागत नाही .तसच काहीस अमेयच झाल होत . मुंबई मधे फुकट कोण खायला घालत नाही . तरीही त्याच्या मामांनी त्याला नोकरी मिळेपर्यंत आणि पगार हातात येयी पर्यंत फुकट जेवायला घातले .
पण अमेयला पगाराचे पैसे मिळाले . हे कळल्यावर मामांनी अमेयजवळ जेवणाच्या पैशाची मागणी केली . अमेयनी सुध्दा पैसे लगेच काढून दिले . राहिलेले थोडेसे पैसे त्यानी घरी दिले . आणि आता त्याच्याजवळ फक्त दोनशे रुपए राहिले होते . त्यानी विचार केला .दर महिन्याला असच होणार , पगार येणार , आणि असाच वाटून आपल्या हातात फक्त दोनशे रुपए राहणार . जास्त पैसे येण्यासाठी आपल्याला काय बर करावे लागेल .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED