Aaghat - Ek Pramkatha - 7 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 7

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(7)

प्रथम वर्ष बी.ए.ची वार्षिक परीक्षा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली होती. साऱ्यांच्या नजरा माझ्यावर लागल्या होत्या. पण इकडे माझा दुसराच उद्योग सुरू होता. मी माझ्या ध्येयउद्दिष्टांपासूनच विचलित होत होतो. पण नाही आता पुन्हा अशी चूक होता कामा नये, असा मनाशी निश्चय केला. थोडे दिवस सगळयांपासून अलिप्त राहून फक्त अभ्यासावर भर दिला. बारावीमध्ये सर्वप्रथम आलेला मी विद्यार्थी होतो. त्यामुळे अपेक्षांची पूर्तता करणं हे मी माझं कर्तव्य मनात होतो. माझ्याकडून निराशा कोणाचीही होऊ नये. पूर्वीप्रमाणेच सगळयांच्या मनात माझं स्थान असावं. मी अभ्यासाचा जोर वाढवित होतो. वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे सुरू होते. मित्रांबरोबर सकाळी लवकर उठून कॉलेजला जाणे, कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजच्या बागेमध्ये अभ्यास सुरू होता. माझे मित्रही माझ्याबरोबर होते. बघता बघता परीक्षा आली. प्रत्येकजण मला म्हणायचे, ‘‘प्रशांत यावेळी बहुतेक प्रथम क्रमांक सुमैयाचाच असणार. खूपच जोशपूर्ण अभ्यास चालू आहे तिचा. आणि तिने क्लासेसही लावले आहेत. तुझ्या या क्लासेसविना संथ अभ्यासाकडे पाहिल्यानंतर आम्हाला वाटत नाही, तुला खुप चांगले गुण मिळतील.’’ प्रत्येकाकडून मिळणाऱ्या उपदेशांचा मी हसतपणे स्वीकार करायचो. मला त्यांना बोलून दाखवायचं नव्हतं तर प्रत्यक्ष कृतीतून त्यांना करून दाखवायचं होतं.परीक्षेचा पहिला दिवस होता. सर्व मित्रमैत्रिणी एकमेकांना परीक्षेच्या शुभेच्छा देत होते. थोडसं मनावर दडपणही होतंच.करण वार्षिक परीक्षा होती. कॉलेजच्या आवारात, हॉलमध्ये मुलामुलींची गर्दी जमली होती. त्या गर्दीतून मार्ग काढत मी ग्रंथालयात चाललो होतो. कारण उरलेल्या १५ ते २०मिनिटात वाचत बसणे. मी माझ्या नादात ग्रंथालयाकडे मार्ग काढीत चाललो होतो. अचानकपणे पुढे हात आला, माझं त्या व्यक्तीकडे लक्ष न जाता मी तिच्या हाताकडेच पाहू लागलो.

‘‘अरे वेड्या असा काय पाहतोस?’’

मी एकदम वर पाहिलं तर पुढे सुमैया. मला शुभेच्छा देण्यासाठी तिने हातपुढे केला होता. मी ही तिला शुभेच्छा दिल्या. तिनं माझ्याकडे हसरा कटाक्ष टाकला.

‘‘एवढ्या गडबडीने कुठे चाललायस या गर्दीतून?’’

‘‘ग्रंथालयात चाललो होतो.’’

‘‘पुरे आता. अरे १५ मिनिटे तर राहिली आहेत. तेवढी तरी सोड! किती करायचा तो अभ्यास?’’

‘‘तू कर खूप अभ्यास आणि मला म्हणतेस पुरे आता अभ्यास!’’

‘‘ए नाही रे तसं काही मला म्हणायचं नव्हतं.’’

‘‘मग काय म्हणायचं होतं तुला?’’

‘‘अरे माझी चेष्टा इतक्या गांभीर्याने का घेतोस? हेच माझे मला कळत नाही.’’

‘‘बरं ठीक आहे! सॉरी’’

‘‘एवढ्यानं नाही तुला माफ करणार.’’

‘‘का पण?’’

‘‘काय हवं आहे तुला?’’

‘‘मी जे मागेन ते देशील?’’

‘‘बघू.’’

‘‘बघू नाही.”

‘‘नक्की काय ते सांग?’’

‘‘तू सांगितल्यानंतर सांगेन.’’

‘‘ठीक आहे!’’

‘‘आता इथेच थांबू.’’

‘‘बाय.’’

‘‘बाय. बाय.’’

गडबडीने येऊन परीक्षेला बसलो. एक एक पेपर चांगले जात होते. तसं मनाला समाधान वाटत होतं. अखेर एकदाची परीक्षा संपली. पेपर चांगले गेले. उन्हाळयाची सुट्टी सुरू झाली. प्रत्येकजण आपापल्या गावी जाण्याची गडबड करू लागले. सगळयांना गावी जाण्याची आतुरता होती. सगळयांचे चेहरे आनंदाने फुलले होते. प्रत्येकजण एकमेकाला सुट्टीच्या शुभेच्छा देत होते. आता

पुन्हा महिना-दीड महिन्यानंतरच एकमेकाला भेटणार होतो. सुरेश साताऱ्याला, संदिप रत्नागिरीला, अनिल आणि मी माळवाडीला तर रोहन, सूरज हे बीडला जाणार होते. प्रत्येकाचे चेहरे तरारून निघाले होते. त्यांना आतुरता होत. घरच्यांना भेटण्याची मीही त्यांच्यापैकीच एक होतो. आम्ही गडबडीने होस्टेलवर येत होतो. इतक्यात सुरज आमच्या पाठीमागून प्रशांत... प्रशांत म्हणून हाका मारीत आला. हाक कानावर पडताच मी थांबलो.

‘‘सुमैया तुझी वाट पाहत थांबली आहे. तुला ती खूप शोधत होती.’’ सुरज धापा टाकत म्हणाला.

मला थोडं आश्चर्य वाटलं. सुमैया आणि माझी वाट पाहत होती. माझ्या बरोबरच्या मित्रांनाही थोडं आश्चर्य वाटलं.

‘‘प्रशांत, लवकर जाऊन ये. आम्ही इथेच थांबतो.’’

मी गडबडीत कॅन्टीनमध्ये गेलो. सुमैया माझी वाट पाहत बसलीच होती.

‘‘काय हे प्रशांत, इतक्या गडबडीने गावी जायला निघालास. आमची काही फिकीर आहे की नाही?’’

‘‘तुझं बोलणं मला समजलं नाही.’’ ‘‘अरे वेड्या आज तू गावी जाणार. पुन्हा आपली लवकर भेट नाही.आम्हांला सांगून जावं, थोडंसं भेटून जावं असं काही वाटत नाही तुझ्या मनाला? आम्ही मात्र वेड्यासारखी तुझी वाटत पाहत राहायचं. तू मात्र मला विसरून आपल्याच नादात निघून जायचं. इतकी का आतुरता लागलीय गावाची.’’

‘‘सुमैया, माणूस घरात असला की त्याला घरातल्या लोकांचे एवढं महत्त्व वाटत नाही. पण घरापासून, गावापासून माणूस लांब असला की गावाचं, घरातल्या लोकांचे महत्त्व खूप असतं. ते महत्त्व तुला कळणं अवघड आहे.’’

‘‘सॉरी, प्रशांत.’’

‘‘तुझ्या भावना मी समजू शकते. तुझ्या गावाची, तुझ्या घरची, तुझ्या मनाला ओढ असणं साहजिकच आहे पण तेवढीच ओढं तुझ्या मनात या मैत्रिणीबद्दल असू दे. सुट्टीत कदाचित विसरू नको.’’

ती थोडी भावूक होऊन बोलत होती. तिचं बोलणं थोडं मला वेगळं वाटतं होतं. तिच्या बोलण्यात फार मोठा गर्भित अर्थ सामावला होता. माझ्याबाबत इतका मैत्रीचा धागा तिनं मजबूत करावा, तो आणखीन गुंफावा, माझ्या मनामध्ये उलटसुलट अनेक विचार येऊन जात होते. पण माझ्या मनाला जो विचार स्पर्शकरून जात होता, त्या साच्यात ती बसण्यासारखी नव्हती. तिच्या मनात माझ्याबद्दल वाईट भावना नव्हती. ती शुद्ध मैत्रीचं पावित्र्य राखणारी सुसंस्कृत घराण्यातली मुलगी होती. आपणच वाईट आहोत. तिच्याबद्दल वाईट विचार आपल्या मनात येतात. मी दोन्ही गालावर चपराक मारून घेतलं. मी तिच्यासमोर उभा आहे हे विसरूनच.

‘‘अरे, प्रशांत असे काय करतोस?’’

तिचा हा प्रश्न पडताच मी चपापलो. मी कुठे उभा आहे याची जाणीव झाली.

मी गोंधळून म्हणालो, ‘‘काही नाही.’’

‘‘मी बोलल्याचा राग नाही ना आला.’’

‘‘नाही. राग येण्यासारखं त्यात बोललीस तरी काय?’’

‘‘नाही, पण वेड्यासारखं तू चेष्टा-मस्करीचं बोलण

गांभीर्याने घेशील,मनाला लावून घेशील, त्याचीच मला भीती वाटते.”

‘‘नाही राग वगैरे काही येणार नाही. तुला जे काही बोलायचं ते बोल. मी आता मोकळेपणाने वावरतोय. पूर्वीचा मनातला संकोच केव्हाच निघून गेलाय.’’

‘‘असाच मला हवा आहेस तू.’’

खरंच! सुमैयाचं बोलणं आज वेगळच भासत होतं. तिच्यात जास्त गुंतून राहण्यापेक्षा तिचा निरोप घेण्याचं मी ठरविलं.

‘‘सुमैया, मी येतो. मला खूप उशीर होतोय. माझे मित्र माझी वाट पाहत राहिलेत.’’

‘‘तुला मित्रांची काळजी वाटते आणि या मैत्रिणीची नाही?’’

पुन्हा तिचं ते भावनिक शब्द मला गुंतवून ठेवत होते.

‘‘सुमैया मला माफ कर. मला आता जायला हवं!’’

‘‘बरं, तू जाऊ शकतोस.’’

तिचा चेहरा पडला होता. ती आज वेगळी भासत होती. तिचं वेगळं पाहणं, हसणं, सारं काही आज निराळचं वाटत होतं. मनाला कोड्यात टाकण्यासारखं होतं. दोन पावले पुढे येतो न्‌ येतोच कॅन्टीनबाहेर येऊन तिने मला आवाज दिला. मी पटकन्‌ मागे वळून पाहिलं. ती हसत होती की रडत होती समजत नव्हतं. हात वर करून तिने बाय बाय केले. मी पुन्हा मार्गक्रमण करायला लागलो. वाटेत जाताना वाटलं सुमैया इतकी भावूक का झाली? असं वाईट काय घडलं असेल तिच्याबाबतीत! की तिचं घरी खटकलं की काय? या विचारातच मी पुढं चालत होतो. खूप उशीर झाला होता. अनिल व सुरेश माझ्यावर नक्कीच चिडणार. बिचारे! माझी वाटत पाहत उशीरापर्यंत उभे होते. शेवटी मी तरी काय करणार?

‘‘काय हे प्रशांत सुट्टीवरून आल्यानंतर खुशाल इतका वेळ बोलायला चालले नसते काय? इतका वेळ तुम्ही कोणत्या विषयावर बोलत होता?’’

सुरेशने रागारागाने प्रश्न केला.

‘‘या चर्चेत पुन्हा आणखीन वेळ नको. आपण आता पुढे गेल्यावर बोलूया.’’

तसे आम्ही पुढे चालू लागलो. मी त्यांना सांगितलं की, ‘‘हे बघा तुमच्या एवढीच मलाही घरी-गावी जाण्याची आतुरता आहे. मी काही जाणूनबुजून उगीचंच उशीर केलेला नाही.’’

‘‘अरे, पण एवढा उशीर होण्याचं कारण तरी काय?’’ पुन्हा सुरेशने प्रश्न केला.

आता त्याला पटवून सांगण्याशिवाय पर्याय नव्हता.

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED