प्रिय वाचक मित्रांनो ,
ही माझी दुसरी प्रेमकथा.. जी वाचकांना आवडली होती..
तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझ्या कडे जुना बॅकअप नाही आहे. कथा तर मला माहित आहे पण पात्राची नावे वैगरे काही गोष्टी विसरलो आहे.. त्यामुळे पात्राची नावे बदलून जशी जशी आठवत जाईल तसें तसें लिहीत जातं आहे...
आरती त्या भव्य गेट समोर काही वेळ उभी राहिली.. कसला दिमाख होता त्या इमारतीचा... सगळी काचेची चकाचक बिल्डिंग... अद्यावत पोशाखात असणारे गार्डस.. इमारती समोर असणारे लहानसे गार्डन आणी त्यात मेहनतीने रुजवलेली फुलझाडे.. त्यांना बघितल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जायचे...
" मॅडम... तुमचे काही काम आहे का ? " तिला गेट जवळ ताटकळत उभी असलेली बघून एक गार्ड तत्परतेने पुढे आला..
" अंह.... हो माझा आज इंटरव्यू आहे इथे... " तिने आपल्याजवळील इन्व्हलप त्यांला दाखवला..
" ह्म्म्म... असे करा समोर गेलात की रिशेप्शन ला तुमच्या नावाची नोंद करा.. मग त्या तुम्हाला सांगतील पुढे कुठे जायचे ते..." आतील कागदावर नजर टाकत त्याने तिला समजावून सांगितले...
" थँक्स... "
" वेलकम... या तुम्ही...." गार्ड तिला इन्व्हलप परत देत म्हणाला.. आणी ती त्या गार्डनला वळसा मारून इमारतीच्या मुख्य दरवाज्यात आली.. समोर प्रशस्त पोर्च होता.. मालकांच्या गाड्या इथं पर्यंत येत असाव्यात.. तिने मनातल्या अंदाज केला...
" एसक्यूजमी.... मी आरती काळे..." मला आज इंटरव्यू साठी इथे बोलावण्यात आले होते.. रिसेप्शन ला बसलेल्या मुली कडे आपले अपॉइंटमेंट लेटर देत ती म्हणाली.. इथला थाट पण बघण्यासारखा होता.. आजूबाजूला प्रशस्त सोफे ठेवले होते..
" मिस. आरती तुम्ही तिसऱ्या माळ्यावर जा.. तिथे रिसेप्शन ला तुमचे हे लेटर दाखवा... तिथेच तुमचा इंटरव्यू घेण्यात येईल.. "
" थँक्स..." आरती ने तिला स्माईल देत पुन्हा लेटर आपल्या पर्स मध्ये टाकले आणी ती लिफ्ट च्या दिशेने चालू लागली..
तिसऱ्या माळ्यावर तिने रिसेप्शन ला आपले लेटर दाखवले..
" मिस. आरती... आपण प्लिज बसा... सर आले की मी तुम्हाला सांगते... "
" थँक्स..." म्हणतं आरती बाजूच्या सोफ्यावर बसली.. आता वेळ जावा म्हणून ती तेथील आजूबाजूचे निरीक्षण करत होती.. सोफा चांगलाच मऊ गुबगुबीत होता... भिंतीवर उत्तम पेंटिंग्स लावली होती.. अधूनमधून हायफाय कपड्यात इंग्लिश बोलणारी माणसे तेथून जातं होती.. सगळी कडे झगमगाट होता... स्वच्छता होती.....शिस्त दिसत होती......
तिला स्वतःला वाटले नव्हते की , पटवर्धन ग्रुपज ऑफ कंपनी मधून तिला अपॉइंटमेंट लेटर येईल... पेपर ला पाहून तिने इतर सगळ्या ठिकाणी करायचा तसाच इथे पण अर्ज केला होता.. तिला कामाची गरज होती. पण पहिल्याच प्रयत्नात इतकी मोठी कंपनी आपल्याला बोलावेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते.. एकतर ती फ्रेशर.. अनुभव नाही... हुशार म्हणावी तर ते ही नाही साधारण एव्हरेज मध्ये ती गणली जातं होती.. एकदम कॉमन... त्यामुळे अश्या मोठ्या कंपनीत तिच्या पेक्षा ही खूप लायक लोकांनी अर्ज केले असतील ह्याची तिला जाणीव होती.. त्यामुळे त्याच्या कडून आपल्याला काही उत्तर येईल असे तिने मनात धरलेच नव्हते... आणी त्यांचे उत्तर आले हा एक सुखद धक्का होता... ती विचार करत होती.. आणी हळूहळू तिच्या आजूबाजूला तरुण मुलींची गर्दी वाढत चालली होती . सगळे त्या एका जागे साठी इंटरव्यू साठी आलेल्या होत्या... जागा एक आणी किमान पंचवीस उमेदवारांना तिथे कॉल लेटर पाठवण्यात आले होते....
आता साडे दहा वाजायला आले होते.. आणी एक गृहस्थ रुबाबदार पावले टाकत तेथे आले.. अंगावर अतिशय उंची कोट.. टाय... चेहऱ्यावर हुशारीची झाक.. काहीसा रागीट वाटणारा चेहरा... आजूबाजूला अजिबात न पाहता ते आपल्या केबिन मध्ये निघून गेले. ते आले तशी ती रिसेप्शनिस्ट उठून उभी राहिली..
" गुड मॉर्निग... सर... "
" गुड मॉर्निग... जुई..." त्या माणसाने तिथे खरोखर जुई बसली आहे की दुसरे कोणी हे पाहण्याची पण तसदी घेतली नाही...
" कॉल... मी. देशपांडे..." त्यांनी जाता जातं वाक्य फेकले....
" यस सर..... " जुई ने एंटरकॉम वर लगेच फोन लावला... आणी पाच मिनिटात एक माणूस लगबगीने केबिन समोर उभा राहिला. सर्वप्रथम त्याने दरवाज्यात उभा राहून आपले कपडे , टाय टिकठाक केली आणी तदनंतरच त्याने केबिनचा दरवाजा वाजवला... आणी त्या नंतर तो आत केबिन ला निघून गेला....
काही वेळातच तो परत आला आणी त्याने जुई ला काही सूचना दिल्या.. ती त्याला मान डोलावून होकार देत होती...
" एस्क्युज मी..." जुई ने सगळ्यांचे लक्ष आपल्या कडे वेधले..
" सगळ्यांनी आपली कॉल लेटर माझ्या कडे जमा करा..." आणी सगळ्यांनी तिच्या कडे कॉल लेटर जमा केली..
काही वेळानी इंटरव्हू सुरु झाला.. हळूहळू एकेक करून मुली आत जातं होत्या.. आरतीची ही पहिलीच वेळ असल्याने तिला आता फक्त घाम फुटायचा बाकी राहिला होता.. कदाचित तो पण फुटला असता पण इथे सगळी कडे ac ची गार हवा फिरत होती म्हणून घाम काही आला नाही पण हातापायाला किंचित कंप सुटला आहे हे तिला जाणवत होते... ती केबिन मधून बाहेर येणाऱ्या मुलींचे चेहरे न्याहाळत त्यातून काही लिंक लागतेय का ते पाहत होती. पण आत काय चालले आहे ते अजिबात लक्षात येत नव्हते...
पण एक गोष्ट तिच्या लक्षात आली की कोणतीही मुलगी पाच दहा मिनिटापेक्षा जास्त केबिन मध्ये थांबत नव्हती..
आणी आता फक्त चार पाच जनीचं उरल्या होत्या..
" मिस. आरती काळे.. " जुईने नाव पुकारले.. तशी आरती उठली आणी पूर्ण आत्मविश्वासाने केबिन कडे निघाली.. पण तिला मनातून माहित होते.. की हां वरवरचा देखावा आहे.. तिचा आत्मविश्वास कधीच डळमळीत झाला होता...
" मे आय कम इन सर....?" तिने विचारले..
" एस कम इन.... प्लिज सीट डाऊन..." तो माणूस म्हणाला.. त्याच्या केबिन चा थाट पण त्याला शोभेल असाच होता..
" युअर फाईल प्लिज..." त्याने तिच्या समोर हात पुढे केला..
ती विसरलीच होती..
" सर... " असे म्हणतं तिने त्यांना फाईल दिली... आणी त्याने ती चाळायला सुरवात केली..
" हे काय? मिस....... मिस.आरती..." त्यांनी पुन्हा एकदा तिच्या नावावर नजर टाकत आपले वाक्य पूर्ण केले.. त्यांची भेदक नजर तिच्यावर रोखली होती..
आरती मनातून घाबरवून गेली..
" आम्हाला M.com. झालेली मुलगी हवी होती... किमान दोन वर्षाचा अनुभव... पण तुमच्याकडे ह्यातील काहीही नाही... " तिच्या समोर त्याने ताडकन फाईल फेकली...
" तुम्ही कसा काय अर्ज केला होता... ? आणी तुम्हाला कॉल लेटर कसे काय आले? "
" सर, मी विचार केला की समजा कोणीच आले नाही तर B.Com. म्हणून मला कदाचित संधी मिळून जाईल.. म्हणून.. "
" ह्म्म्म.. पण ह्या सगळ्या M.com. मध्ये तुम्हाला कसा काय कॉल गेला? " तो माणूस पण आता जरा गोंधळला...
" एक मिनिट.. हां.. "
" जुई.. जरा देशपांडेनां बोलावले आहे म्हणून सांग... "
काही वेळातच देशपांडे आत आले..
" देशपांडे.. हे काय आहे ? आपले लोक झोपेत काम करतात काय ? ह्या मुलीला कॉल कसा काय गेला ?
कॉल पाठवायचे काम कोणाचे होते? " त्या माणसानी तो कॉल लेटर चा कागद रागानी देशपांडे समोर फेकला..
देशपांडे नी आपला घाम पुसत तो कागद वाचला आणी त्यांना काय गडबड झालीय ते लक्षात आले..
त्यांनी एक आवंढा गिळत मान वर उचलली.
" कोणाचे काम आहे हे ? "
" सर.......... सर.......... " देशपांडे चाचरत होते...
" बोला देशपांडे...मला उत्तर हवय.... "
" सर.. करण कडे हे काम होते... " शेवटी देशपांडे म्हणाले..
" मग एक काम करा.. मी. देशपांडे , त्याला घरी बसवा.. असा बेशिस्त पणा आणी कामात दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही... "
" पण.. सर.. मी...." देशपांडे सांगण्याचा प्रयत्न करत होते.. पण त्या माणसानी त्यांना हातांच्या इशाऱ्याने थांबवले...
" जा आता... " ते म्हणाले आणी मान खाली घालून देशपांडे निघून गेले...
" मिस. आरती.... इथे जरा घोळ झालाय.." मगाशी चिडलेला तो माणूस आता एकदम शांत झाला होता. त्याचा आवाज आता अत्यंत मृदू झाला होता.
" आम्हाला एक M.com. झालेली आणी किमान दोन वर्ष कामाचा अनुभव असलेली उमेदवार हवी होती.. खरं म्हणजे तुम्ही B.com. तुम्हाला कॉल जाताच कामा नये.. पण आमच्या एका बेशिस्त , कामचुकार माणसामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी आपली माफी मागतो..
आपल्याला इथे येण्याचा जो त्रास झाला त्याबद्दल खरोखर मला खूप वाईट वाटते आहे.. पण मी तुम्हाला ग्वाही देतो की त्या माणसाला घरी बसवून त्याच्या चुकीची शिक्षा त्याला देण्यात येईल.. "
" तुम्हाला बाहेर जुई काही पैसे देईल.. तुम्हाला इथे येण्याचा त्रास झाला आणी प्रवास खर्च म्हणून.. प्लिज तुम्ही येऊ शकता..." तो माणूस एकदम जन्युअल होता.. आपली चुकी झाली म्हणून आपले मोठेपण विसरून त्याने तिची माफी मागितली होती.. खरं म्हणजे हा जॉब आपल्याला भेटणार नाही ह्याची कल्पना तिला काही वेळेपूर्वीच आली होती.. त्यामुळे जेव्हा तिला जाण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा तिला त्याचे काही वाटले नाही...
पण तिला वाईट वाटले की आज ती एकाच्या नोकरी जाण्याला कारण बनत होती. तो करण काळा की गोरा हे पण तिला माहित नव्हते पण आज त्याची नोकरी जाणार हे नक्की होते.. म्हणून तिला खूप दुःख झाले...
" सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का ? "
" बघा मिस. आरती.. ही नोकरी सोडून तुम्ही काहीही बोला... " तो माणूस आता सावध झाला. त्याच्या आवाजावरून ते लक्षात येत होते.
" नाही... नाही ... सर..मी नोकरी नाही मागत... "
" मग..? "
" सर मी आपल्याला कळकळीची विनंती करते की , आपण त्या माणसाला... करण ला नोकरी वरून काढू नका... माहित नाही त्याच्या घरी काय प्रॉब्लम असतील.. कदाचित त्याच विवनचनेत त्याच्या हातून चूक घडली असेल... सर प्लिज... मला पैसे वैगरे नको पण तुम्ही त्याला कामावरून काढू नका.. प्लिज सर.... "
" बरं.. मिस. आरती.. मी त्याला कामावरून काढत नाही.. फक्त समज देतो..." थोडा वेळ विचार करून त्यांनी सांगितले. पण त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटले होते.. त्यांना कळत नव्हते की ही मुलगी त्याची नोकरी वाचवायला का एव्हडी उत्सुक आहे... एखादी असती तर चिडली असती. उगाचच तिला हेलपाटा पडला होता...
" थँक्स... सर.. येते मी.." तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून तो माणूस आणखीन विचारत पडला...
ती बाहेर आली... आणी सरळ बाहेर निघाली..
" मिस. आरती...? " मागून त्या रिसेप्शनिस्ट ने तिला हाक मारली. बहुतेक पैसे घेण्यासाठी ती हाक मारत असावी... आरतीने अंदाज केला..
" मिस. आरती.. सरांनी तुम्हाला बसायला सांगितले आहे... त्यांना तुमच्याशी काही बोलायचे आहे... "
जुई ने तिला सांगितले...
" आता ह्यांना अजून काय बोलायचे आहे ? " आरती विचारत पडली... पण जाऊदे म्हणून ती पुन्हा येऊन सोफ्यात बसली. सगळे जण तिच्याकडेच बघत होते.. कारण गेलेल्या कोणत्याही मुलीला त्यांनी असे थांबवले नव्हते.. बहुतेक तिची निवड झाली असावी असा सगळ्यांनाच अंदाज आला होता...
थोड्या वेळातच सगळ्या मुलीचे इंटरव्यू झाले आणी त्या माणसानी आरतीला परत केबिन ला बोलावले..
" मे आय कम इन सर... "
" एस.. मिस. आरती... प्लिज सीट डाऊन... " त्या इसमने हसून तिचे स्वागत केले..
" बघा.... मिस.आरती तुम्हाला माहित आहे की , ही पोस्ट M.com. साठी होती. त्यात तुमच्या जवळ अनुभव पण नाही.. तरीही ह्या पोस्ट साठी मी तुमची निवड करतोय.. "
" सर...? ती खुश झाली.. पण लगेच तिचा चेहरा पडला.. सर तुम्ही मला त्या करण च्या जागेवर अपॉइंट नाही नां करत ? " तिने घाबरून पुढे विचारले...
" नाही... नाही..." त्याने हसून उत्तर दिले...
" मग.. तुम्हाला कोणी विचारणारे नाही का ? नाहीतर तुमच्या नोकरीवर सुद्धा गदा येईल..." तिच्या त्या प्रश्नावर तो खूप हसला...
" असे काही होणार नाही मिस.आरती... मीच आहे पटवर्धन ग्रुपज ऑफ कंपनीज सर्वेसर्वा... कमलकांत पटवर्धन.... "
" ओह.. सॉरी सर... मला माहित नव्हते..." ती ओशाळत म्हणाली..
" तर.. मिस. आरती.. काही नियम तुम्हाला सांगतो ते जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही उद्या पासून जॉईन करू शकता... "
" मला आनंद होईल सर... "
" मिस. आरती मला उशिरा येणारी माणसे अजिबात आवडत नाहीत... कामचुकारपणा , बेशीस्तपणा मी अजिबात खपवून घेत नाही.. तुम्हाला कामाचा अनुभव नाही म्हणून पहिले सहा महिने तुम्हाला प्रोबेशन वर ठेवले जाईल.. त्या नंतर तुमची कामातील प्रगती बघून पुढे तुम्हाला कामाला ठेवायचे की नाही हे कंपनी ठरवेल.....मंजूर असेल तर सांगा... मी आताच तुमच्या नावाचे लेटर काढायला सांगतो... "
" मला मान्य आहे सर..." ती खुश होऊन म्हणाली... एव्हड्या मोठ्या कंपनीत सहा तर सहा महिने कामाला संधी मिळणे म्हणजे एक खूप चांगला अनुभव होता...
" ठीक आहे.. तुम्ही बाहेर बसा. जुई तुम्हाला लगेच लेटर देईल.. "
ती बाहेर आली आणी लगेच जुई चा इंटरकॉम फोन वाजला.. ती एस सर.... एस सर... म्हणत होती पण तिची नजर मात्र आरती वरून फिरत होती...
आणी खरोखर तिला पुढच्या दहा मिनिटात तिच्या नावाचे अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते.. त्यावर MD म्हणून कमलकांत पटवर्धन अशी झोकदार सही केलेली होती... आता घरी जाताना तेच लेटर तिच्या पर्स मध्ये ठेवलेले होते...
पुढील भाग लवकरच......
© सर्वाधिकार लेखकाकडे...