Prem ase hi - 8 - last part books and stories free download online pdf in Marathi

प्रेम असे ही (भाग 8) (अंतिम भाग )

मागील भागावरून पुढे......


तो आडोसा... योग्य वेळी पडलेला काळोख... पावसात भिजलेली ती दोघे... आता मोह कोणाला टाळता येणार होता...? तिनेही आता स्वतःला पूर्णपणे त्याच्या हवाली केले होते.. त्याचा हात तिच्या कमरेत गुंफला होता. त्याने सावकाश तिला आपल्या जवळच ओढली आणी तिच्या अधीर ओठावर आपले ओठ ठेवले... त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या मनात कितीतरी फुलपाखरे उडाली ... आधीच मन अधीर झाले होते त्यात त्याचा स्पर्श... तिने आपले डोळे बंद केले.... तिचे ते सहज झालेले समर्पण बघून तो काहीसा सुखावला... आता त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर आले होते. प्रतिउत्तर म्हणूंन तिचे ही दोन्ही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते... पावसाचा जोर वाढला तसें ते दोघे आणखीन एकमेकांच्या मिठीत शिरले. बाहेर वातावरण एकदम थंड झाले होते पण एकमेकांच्या अंगाच्या उबेने त्यांना आता थंडी जाणवत नव्हती.... कितीतरी वेळ तो तिला असाच आपल्या मिठीत घेऊन उभा होता... ती लाजून पण त्याच्या छातीवर आपले डोके ठेऊन उभी होती.. त्याचा हात कधी तिच्या पाठीवरून तर कधी डोक्यावरून फिरत होता... त्या स्पर्शात तिच्यावर असलेले प्रेम जाणवत होते... खुप दिवसांनी दोघे पुन्हा एकत्र आले होते... त्यात वासना नव्हती पण मधेच आलेला दुरावा आणी परत भेटल्याचा आनंद होता जो आता ते स्पर्शातून दाखवत होते... ह्या आधी कधी दोघांनी आपली पायरी ओलांडली नव्हती.... पण आज मात्र दोघे स्वतःला रोखू शकले नाही... बऱ्याच वेळानी पाऊस कमी कमी होत थांबला....

" चल पाऊस थांबला आहे... निघूया..? "

" ह्म्म्म... " ती म्हणाली पण तिने त्याचा आपल्या हातातील हात मात्र सोडला नव्हता... कदाचित त्याचा हात आता तिला पुन्हा सोडायचा नव्हता... त्याच्या ही ते लक्षात आले... तिला घेऊन तो हळूहळू चालत गावाकडे निघाला .. लांबून गावातले लुकलुकणारे दिवे दिसत होते . त्याच्या दिशेने दोघे निघाले. . पण घाई कोणालाही नव्हती...

" अरे... भिजलात की रे तुम्ही ? " त्यांना भिजलेले बघून शकू मावशी ओरडली..
" जा लवकर अंघोळ करून घ्या... मी पटकन गरम पाणी देते..." ती पाण्याचे मोठे तपेले चुलीवर ठेवत म्हणाली...

थोड्या वेळानी दोघांच्या आंघोळ्या झाल्या... तसें थंडी पळून गेली आणी चांगले फ्रेश वाटू लागले... रात्री शकू मावशीने दोघांना जेवण दिले... जेवण झाल्यावर शकू मावशी तिच्या बरोबर बोलायला आली... बोलताना दोघे लग्न करणार आहेत ही गोष्ट तिने मावशीला सांगितली... ते ऐकून मावशी खूप खुश झाली.. शकू मावशीला पण खूप बरं वाटले...तो असा एकटा इथे राहतोय तिला कसे बरं सहन व्हावे. मुलगा नव्हता पण करण वर आपल्या मुलांसारखेच प्रेम ती दोघे करत होती. दोघींच्या खुप वेळ गप्पा चालल्या...
शेवटी रात्री उशिरा शकू मावशी निघून गेली.. आता झोपायचे कसे ह्याचा प्रश्न उभा राहिला... खाट एकच होती. तो एकटाच राहत असल्याने त्या प्रमाणात त्याच्या कडे सामान होते..

" तु एक काम कर.. तु वर झोप.... मी इथे खाली झोपतो.. पाऊस पडतो आहे जमिनीवर ओल येईल.. इथे झोपलीस तर सकाळ पर्यंत अंग आखडून जाईल.. मला काय सवय आहे..." त्याने सांगितले..

"'नको तु इथेच झोप वरती... माझी काही हरकत नाही..." ती हळू आवाजातं म्हणाली...

" काय ? " त्याने चमकून विचारले..

" ह्म्म्म " तिने लाजून त्याला दुजोरा दिला... मग करण पण खाटेवर तिच्या बाजूला झोपला... बाहेर जोरदार पाऊस पडत होता.. त्यामुळे वातावरण थंड झाले होते. एका जाड गोधडीत दोघे झोपले होते... सुरवातीला कटाक्षाने काही अंतर ठेऊन झोपलेले दोघे थंडी मुळे कुडकुडत होते. काही वेळाने आपसूक दोघे जवळ आले... एकमेकांच्या शरीराच्या उबेने आता जरा बरे वाटत होते.. दोघांच्या मनात वादळ उठले होते... आणी जो पर्यंत हे वादळ शांत होत नाही तो पर्यन्त झोप येणे दोघांनाही शक्य नव्हते... पण अडचण ही होती की पुढाकार कोणी घ्यावा... स्त्री सुलभ लाजेने ती पुढाकार घेत नव्हती.. आणी अगोदर तिच्या बरोबर झालेल्या प्रकारामुळे तिला हात लावायची त्याची हिम्मत होत नव्हती.ती आपल्या बद्दल काय विचार करेल ह्याची त्याला भीती वाटत होती... ह्याच विचारात दोघे बराच वेळ असेच पडून होते.. शेवटी कूस बदलून तिने त्याच्या दिशेने चेहरा केला...

" काय झालं झोप येत नाहीं नां ? नवीन जागा असल्यामुळे असे होते कधी कधी..." तो म्हणाला...

" ह्म्म्म...." तीने फक्त हुंकार दिला आणी त्याच्या छातीवर डोके ठेऊन झोपली...

" थंडी वाजतेय? "

" ह्म्म्म.. " ती पुन्हा...पण तिला बोलण्यात सारस्य नव्हते. त्यांनी पटकन आपल्याला जवळ घ्यावे अशीच तिची इच्छा होती. त्याने तिला आणखीन जवळ ओढली... आता तिच्या छातीचा स्पर्श त्याला होत होता आणी त्याचे अंग तापायला लागले... त्याचा हात तिच्या पाठीवरून फिरत होता... ती पण त्याला सावकाश उत्तेजित करत होती..... त्याची उत्तेजना आता तिला ही जाणवायला लागली... आता तो माघार घेणार नाही ह्याची पूर्ण खात्री झाल्यावर ती पुन्हा वळून झोपली.... पण अजूनही ती त्याला चिटकूनच होती. क्षणभर तो गोंधळला आणी मग तो ही सावकाश तिच्या दिशेने वळला... आता दोघे एकमेकांना अगदी चिटकून झोपले होते... त्याचा हात सावकाश तिच्या हातावरून फिरत होता... तिच्या अंगावर आलेले रोमांच त्याला जाणवत होते.. त्याच्या स्पर्शाने ती हलकेच तळमळत होती... पण तरीही त्याच्या पासून लांब जाण्याचा तिने किंचित ही प्रयत्न केला नाही. तिला ही आज हे सुख भरभरून हवे होते... ती त्याच्या कोणत्याही कृतीला मज्जाव करत नव्हती हळूहळू त्याचा हात तिच्या सर्वागावरून फिरू लागला... तिच्या तोंडून हलकेच चित्कार निघत होता.. पण बाहेर जोरदार पाऊस असल्याने तिचा आवाज खोली बाहेर पडू शकत नव्हता... ती अगदी तळमळत होती... एखाद्या स्त्री कडून जबरदस्तीने ते सुख लुटण्यात आणी तिच्या इच्छेने ते सुख मिळवण्यात किती अंतर असते ना?... एकात यातना , दुःख , मानहानी असते तर दुसऱ्यात परमसुख , समर्पण , विश्वास असतो... दोघात असलेला फरक आज तिला लक्षात येत होता... झालेल्या प्रकारा नंतर कोणी आपल्याला स्वीकारेल का ? हां विचार मनात होताच पण नशिबाचे फासे असे काही पडले की तिच्या आयुष्यात करण आला.. सगळे सांगून पण त्याने तिचा स्वीकार केला , नव्हे तर अगदी नितांत प्रेमाने तिचा स्वीकार केला. त्यात तिच्यावर काही उपकार करतोय अशी भावना नव्हती... तिच्या डोक्यात आता अचानक विचार येऊ लागले... त्याच्या प्रेमावर असलेला विश्वास आणी त्याची तिच्यासाठी काहीही करायची असलेली तयारी आज तिला त्याच्या मिठीत घेऊन आली होती... आता ह्या खेळाची सुरवात झाली होती.. आणी मांडलेला खेळ अर्धवट कोणी सोडते का ? तिने आपल्या मनातील विचार झटकले आणी समरसून त्याला साथ द्यायला सुरवात केली... तिचा प्रतिसाद बघून तो ही चकित झाला... आता फक्त तिला सुखचं सुख दयायचे हे ठरवूंन तो पुढे सरसावला.....

सकाळी तिला जाग आली तेव्हा त्याचा हात तिच्या छातीवरच होता.... दोघांच्या अंगावर एकही कपडा नव्हता... अगदी नैसर्गिक अवस्थेत दोघे एकमेकांना चिटकून झोपले होते... दोघांच्या सहमतीने होणारे समागम किती आनंद देऊन जाते नां... पहिला विचार तिच्या मनात आला.... तिने वळून त्याच्या कडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव अजून पण होते... रात्रभर तिला खुलवत केलेला प्रणयाच्या खुणा अजून त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या... तिला खुप लाज वाटली... ती लाजून पुन्हा त्याच्या कुशीत शिरली... आणी त्या हालचालीने त्याला जाग आली.... ती पुन्हा आपल्या कुशीत आलेली बघून त्याने पुन्हा तिच्या अंगावर हात फिरवायला सुरवात केली... त्याच्या डोक्यात काय विचार चालू आहेत हे लक्षात येताच ती पटकन बाजूला झाली आणी लाजून गोधडीतुन बाहेर निघणार होती पण आपल्या अंगावर एकही कपडा नाही हे लक्षात येताच ती थबकली होती. त्याने तिचा एक हात पकडला होता...तिची अडचण त्याच्या अचूक लक्षात आली...

" जा... जा..." तो मुद्दाम म्हणाला...

" अहं .... तु डोळे बंद कर." तिने तक्रारीच्या सुरात म्हंटले..

" हे... मी अजिबात बंद करणार नाही.. मी काय वेडा आहे अशी संधी सोडायला... " तो मिश्किल हसत उत्तरला..

" नको नां रे.... सकाळ झाली आहे.. मावशी पण कधीही येईल उठवायला... मला आवरू दे नां..." ती त्याला समजावत म्हणाली..

" थोडावेळ झोप नां माझ्या बाजूला... प्लिज... " तो असा काही आवाजात प्लिज म्हणायचा की तिला त्याचा आग्रह मोडवत नसे...

काही वेळानी दोघे उठले.. त्याच्या समोर एकदम नग्न अवस्थेत आल्याने तिला एकदम मेल्या हुन मेल्या सारखे झाले... पटापट आपले आवारात ती अंघोळीला गेली...

पुढील दोन दिवसात दोघे सगळ्यांचा निरोप घेऊन मुंबईला आले... त्यांच्या जाण्याने सगळ्यात जास्त दुःख मंगळू काका आणी शकू मावशीला झाले...

मुंबईत आल्या आल्या करण कामाला लागला... त्याने त्या दोघांना शोधायचा प्रयत्न सुरु केला... पण नशिबाने काही दिवसातच ते पोलिसांच्या हाती लागले होते.. त्यामुळं बाहेरच्या बाहेर त्यांचा काटा काढायची संधी हातून गेली होती. पण एव्हढ्यात हार मानेल तर तो करण कसला ?

त्याने उस्मान भाई आणी आणखीन काही लोकांना भेटून पुढची तजवीज केली... त्या साठी त्याला खूप खर्च आला पण त्याने त्याची पर्वा केली नाही... सगळे झाल्यावर तो शांत बसून होता....

आणी एका दिवशी सकाळी त्याला फोन आला त्याचे काम फत्ते झाले होते...

त्याने बातम्या लावल्या आणी आरतीला फोन केला... त्यात नाशिक जेल मध्ये कैद्यात झालेल्या हाणामारीत दोन कैद्यांचा अमानुष मारहाणीतून मृत्यू... ही ब्रेकिंग न्यूज दाखवण्यात येत होती...

ते दोन कैदी म्हणजे आरतीवर अत्याचार करणारे दोघे होते... हे त्यांच्या नावावरून स्पष्ट होत होते... करण ने मोठ्या हुशारीने त्या दोघांचा जेल च्या आत खून घडवून आणला होता आणी प्रकरण कैद्याची आपापसातली दुश्मनी ह्या सदरात टाकले होते आता तो ह्या प्रकरणातून नामानिराळा राहिला होता. कोणी त्याच्या कडे बोट दाखवू शकत नव्हते...

ती न्यूज बघून आरतीला समाधान वाटले... ते मेले आणी तिच्या डोक्यावरील टांगती तलवार बाजूला झाली होती... आता जीवनात तिला त्यांची भीती बाळगण्याचे कारण नव्हते... करण ने सांगितल्या प्रमाणे आपले काम चोख केले होते.

करण परत आला ते बघून पप्पा पण खुश झाले... योग्य वेळ बघून करण ने पप्पाना तिच्या बद्दल सांगून त्यांचे मन वळवण्यात यश मिळवले....

आता त्यांना लग्न करायला कसलीही अडचण नव्हती.... लग्न ठरले आणी लग्नाच्या पत्रिका अगदी मंगळू आणी शकू मावशी पर्यंत पोचल्या... आणी ते पण आपल्या मुलाच्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिले....


-------------------------समाप्त --------------------------------

© सर्वाधिकार लेखकाकडे....

कशी वाटली कथा आवर्जून सांगा... तुमच्या कमेंट मुळे पुढे लिहायचे बळ येते.. लवकरच एक नवीन कथा घेऊन येईन...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED