सवत.. - 1 Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • जर ती असती - 1

    असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून ज...

  • नियती - भाग 33

    भाग 33इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे प...

  • वाटमार्गी

    वाटमार्गी       शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट...

  • परीवर्तन

    परिवर्तन राजा चंडप्रताप नखशिखांत रक्‍ताने भरत्ला होता. शत्रू...

  • स्कायलॅब पडली

    स्कायलॅब पडली                           त्यावर्षी ११ जुनला श...

श्रेणी
शेयर करा

सवत.. - 1



ह्या कथेच्या पहिल्या अध्याय अर्थात, " अपूर्ण " मध्ये आपण पाहिलं की हरी कसं त्याची चूक सुधारावण्यासाठी व संध्याला मुक्ती मिळावी ह्या साठी तो संध्या ला स्वतः घरी घेऊन येतो, संध्या च्या हरिवर खूप प्रेम आहे, पण संध्या जीवित नसताना फक्त एक अतृप्त आत्मा आहे.....

जर आपण " अपूर्ण " ही कथा वाचली नसेल, तर आधी ती कथा वाचून मग ही कथा वाचा, जेच्याने तुम्हाला ह्या कथेचा व त्याचे पुढचे भागाचे आनंद घेता येईल....

आता पुढे....

हरी संध्या ला घरी घेऊन आला.... सकाळ झाली ,हरी झोपलेला....

"हरी उठ अजून किती झोपणार आहेस, सकाळ झाली"..... ईशा

"उममम झोपूदेना... तू का एवढं लवकर उठली आहेस ये झोप".... हरी ने ईशा चा हाथ पकडून तिला ओढून घेतलं

"हरी चल आता उठ"....

"ईशा, बाळा इथं ये जरा".... आई

"हां आई आली".... ईशा

ईशा बाहेर गेली.... "हां आई"

"अरे हरी कुठे झोपला आहे की काय, उठवा त्याला.... बाबा
हां बाबा"... ईशा

तितक्यात हरी आला......

"हरी चल निघतोय आम्ही ईशा ची काजळी घे"... बाबा

"हो बाबा संभाळूनजा आणि पोचल्यास फोन करा".... हरी

"आई लगेच कशाला तुम्ही पण गावी जाताय".... ईशा

"हो बाळा पण गावी पण सगळं बघायचं आहे ना, तुम्ही या मग नंतर".....

"हो आई नक्कीच".... ईशा

हरी चे आई बाबा गावी निघून गेले....

संध्याकाळ झाली हरी आणि ईशा बाहेर फिरून रात्री परत घरी आले...

"हरी मूवी मस्त होती ना, काय भारी होररोर होता यार, मला तर खूप आवडली मूवी".... ईशा

"हो चला मग झोपुया आता"....

"अच्छा लगेच झोपायचं आहे".... ????

हरी ईशाच्या जवळ गेला.... "तसं तू बोलशील तर जागरण पण करू शकतो आपण, तसही आता घरी फक्त आपणच आहोत"....

"अच्छा"... म्हणत ईशा ने हरी ला गालावर चुंबन दिलं....

हरी आणि ईशा दोघे ही खूप गार झोपले होते, तेव्हाच ईशा ला काहीतरी विचित्र आवाज ऐकू आलं आणि ती झोपेतून उठली, ईशाने बाजूला बघितलं हरी गार झोपला होता, ती बेडच्या दुसरा बाजूने उतरली आणि किचनमध्ये गेली, ईशा ने फ्रिज चा दार उघडला आणि पाण्याची बाटली काढली आणि पिउन बाटली परत ठेवली....

ईशा तितच थांबली होती, खिडकीतून किचनच्या बाहेर बघत होती आणि संध्या बरोबर ईशाच्या मागे थांबलि होटी....

अचानक ईशा चे हाथ पाय गारठले, अचानक ईशा ला वाटलं की तिच्या मागे कोण तरी आहे, ती हळूच मागे वळली, पण मागे कोण नव्हतं....

ईशा परत बेडरूम मध्ये आली, पण बेडरूम मध्ये तिला काय तरी विचित्र वाटत होतं, जस की तिला कोण सारखं बघत आहे...

ईशाने काही क्षणा आधीच पाणी पिलं होतं, पण तरी तिचा घास सुखला... ईशा ला परत तहान लागली, पण ईशा पाणी प्याला गेली नाही, ईशा हळू हळू चला बेडजवळ आली....

बेडच्या एकाबाजूला हरी झोपलाहोता, ईशा हळूच येऊन झोपली....हरी आणि ईशा च्या मध्ये भरपूर जागा होती, ईशा ला अस वाटतं होतं की त्यांच्या दोघांच्या मधी कोण तरी आहे, आणि ते खरं होतं संध्या ईशा आणि हरीच्या मधी झोपली होती....

संध्या हरीच्या केसांमध्ये हळूच बोटं फिरवत होती आणि प्रेमाने गाणं म्हणत होती....

"पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले".....

ईशा डोळे मिटून बेडच्या दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली होती, कानात तिला सारखं हा गाणं ऐकू येत होतं....

ईशा ला झोपच लागत नव्हती, तिला खूप भीती वाटतं होती, अचानक गाणं बंद झालं, ईशा ने फिरून पाहिलं हरी तिच्या बाजूला तोंड करून झोपला होता, ईशा पटकन हरी च्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारून झोपली.....

सकाळ झाली.... हरी ऑफिस साठी निघत होता...

"हरी, मी काय बोलते आज घरी थांब ना".... ईशा

"का, काय झालं, तसही तुला माहीत आहे ना, लग्नानंतर ऑफिस चा आज पहिला दिवस आहे."..... हरी

"हरी मला खूप भीती वाटतेय"....

हरी हे ऐकून हसत म्हणाला.... "भीती कसली भीती"

"हरी मी काल रात्री पण झोपली नाही, मला खूप भीती वाटत होती"....

"अरे मग मला उठवलं का नाहीस"....

"मी म्हटलं जाऊदे परत तुला सकाळी ऑफिस ला जायचं होतं".....

"बघ तू अजून होररोर मूवी , चांगलं बोलत होतो, रोमँटिक मूवी बघूया पण नको"....

"हां आता त्यामुळे काही नाय झाला"....

"बरं निघू मी"....

"शोना लवकर ये हा"....

"हो शोना, चल येतो"....

हरी ऑफिस साठी निघाला....

दुपार ची वेळ होती ईशा सोफ्यावर बसून गाणे ऐकत होती टीव्ही वर, आणि अचानक वीज गेली...

"शीट यार... वीज ला पण आताच जायचं होतं" , ईशा उठून बाल्कनी जवळ गेली आणि बाल्कनीचा दार उघडून बाहेर जाऊन थांबली....

संध्या बरोबर समोर सोफ्यावर बसली होती, तिने टीव्ही चा रिमोट हातात घेतला आणि टीव्ही चालू झालं....

टीव्ही चा आवाज ऐकून ईशा मागे फिरली बघतेय तर काय टीव्ही चालू आहे, हे बघून ईशा घाबरली, तिचा घसा सुखला, ईशा जाशीच बालकोणीतून आत आली टीव्ही परत बंद झालं....

----------------------------------------------------- To Be Continued ----------------------------------------------------------------------