सवत... - ७ - अंतिम भाग Harshad Molishree द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सवत... - ७ - अंतिम भाग

हरी ला खूप टेन्शन येत होतं की आता पूढे के होईल, पण त्या दिवसा नंतर सगळं नॉर्मल झालं, अगदी नॉर्मल संध्याने जणू ईशा ला सोडलंच, सांध्याच्या असण्याचा भासही हरी ला परत झाला नाही कधी.....

पण तरी हरी आधी पेक्षा जास्त लक्ष ठेवत होता ईशा वर..... बघता बघता तीन आठवडे संपत आले, उद्या शेवटचा दिवस होता....

त्या दिवशी रात्री ईशाला हरी ने झोपवलं आणि स्वता तिच्या बाजूला बसून बस एक टक तिला बघत होता, खरं तर हरी ला खूप भीती वाटत होती,कुठल्या ही क्षणी काही ही होऊ शकतं, ह्याची त्याला खात्री होती.....

हरी नजर न चुकवता ईशा ला बघत होता, तेव्हाच अचानक त्याला खूप थंडी वाजायला लागली, एक दम गार वारा सुटला, हॉल मधून खूप गार वारा येत होता, हरी ने ईशा कडे पाहिलं आणि मग उठून हॉल मध्ये गेला, बघितलं तर बाल्कनी ची खिडकी उघडी होती हरी ने खिडकी बंद केली....

मागे वळताच त्याने पाहिलं की हॉल मध्ये सगळी एक निळ्या रंगाची चमक वाहत होती, ते ड्रिष्य खूप विस्मयकारक होता, हरी ला कळलं की नक्की काही तरी होणार आहे, तो घाबरला आणि धावत बेडरूम मध्ये आला, ईशा गार झोपेत होती.....

तेव्हाच पातून त्याला आवाज ऐकू आलं..... " हरी "

हरी मागे वळला आणि हळूच चालत परत हॉल मध्ये आला, हरी ला त्याच्या समोर जे काही त्याच्या सोबत घडलं होता ते सगळं दिसत होतं, जणू त्याच्या समोर theatre चा मोठा परदा आहे ज्यावर त्याला सगळं स्पष्ट दिसत होतं, सुरवाती पासून जेव्हा तो संध्याला भेटला तेव्हापासून.....

तेव्हाच संध्याने त्याचा हाथ धरला, हरी घाबरला बघतोय तर काय बाजूला संध्या उभी होती, संध्या हरी ला पुढे घेऊन आली..... पुढे येता येता अचानक सगळं बदललं.....

हरी रेल गाडीत दारावर उभा होता, गाडी पुला वरून जात होती संध्या हरीच्या मागे थांबली होती, हा तोच दिवस होता ज्या दिवशी हरीने मनाली वरून येताना तो दोरा पाण्यात टाकून दिला होता.....

हरी ने त्याच्या हातातून दोरा काढला, तो दोरा तो फेकणारच होता पाण्यात तेव्हाच अचानक त्याने तो दोरा खाली न फेकता त्याच्या खिश्यात ठेवला आणि डोळे मिटून तितच थांबला....

संध्या हरीच्या मागेच उभी होती, हे पाहून संध्याला कसं तरी वाटायला लागलं आणि जसाच हरी मागे फिरला ती अद्रीष्य झाली....

सगळं अचानक नॉर्मल झालं, संध्या हरी च्या समोर उभी होती, हरीने त्याचे डोळे मिटून घेतले, आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं....

हरी ने त्याच्या खिश्यात हाथ टाकला आणि तो दोरा काढला आणि वर मान करून संध्याला ला बघितलं, संध्याचा शरीर अगदी चमकत होता, जसे आकाशातले तारे....

"का हरी.....??? माझ्या मनात तुझ्याबद्ल कधीच वाईट विचार नाही आला, मग तू का असं केलस, त्या दिवशी तू तो दोरा फेकलाच नाही, हे बघून मला खूप वाईट वाटलं, मन केलं की तुला सोडून जाऊ पण माझाकडून ते नाही झालं हरी"....

"बस एकदा मला बोलला असता हरी मी निघून गेली असती, पण तू असं का केलं आणि जर हेच करायचं होतं तर मग आणलं का मला सोबत".....

"हरी मी ईशाचा किंवा तुझा बाळाचा जीव घेऊन काय करू, काय मिळणार मला.... नकोय मला काहीच इतके दिवस मी बस्स ईशाच्या शरीरात रहाऊन हे मान्य करत होती की ते बाळ फक्त ईशा आणि तुझा नाही माझा पण आहे"....

"का केलस अस हरी"..... ?????
हरी थोडं वेळ असंच थांबला,त्याने तो दोरा बाजूला फेकला आणि शेवटी त्याने संध्याला तिच्या प्रश्नांचा उतर दिलं....

"संध्या मी तुला चांगल्या मनाने घरी घेऊन आलो होतो, तेच नवे पण माझ्यामनात कधीच अस आलं नाही की तुला"....???

"

पण लोकं मला वेळा समजत होते, माझ्याबद्ल काहीही बोलत होते, इतकंच नाही पण माझ्यासोबत लोकांनी बोलणं बंद करून टाकलं, माझे सगळे जवळचे मित्र मैत्रिणी, ऑफिसचा स्टाफ सगळ्यांना वाटत होतं की मी वेळा झालोय, ऑफिस मध्ये सारखी माझी complaint जायची की हरी एकटाच बडबड करत असतो, काय माहीत कोणासोबत बोलतो.... चालताना येताना जाताना त्याची बडबडत चालू असते, पागल झाला आहे तो"....


"लहान पोरं, चिडवायला लागले मला, वेळा वेळा करून..... मला काहीच सुचत नव्हतं संध्या की काय करू लोकांना कसं समजवू, तू नेहमी माझ्यासोबत असायची, ऑफिस मध्ये घरी बाहेर सगळी कळे, मी तुला स्वता आणला होतं आणि माझी हिम्मत होत नव्हती तुला सांगायची की".....

"जेव्हा ईशा ने तो दोरा माझ्या हातात बांधला तेव्हापासून तू माझ्या कडून दुरावलीस, आधी मला खूप वाईट वाटत होतं मी सारखं तुझी आठवण काडत होतो, माझ्या मनात आलपन की तो दोरा फेकला की तू येशील माझ्याजवळ आणि मी तेच करायला गेलो होतो पण तेव्हाच, माहीत नाही काय झालं मला, कुटून हे सगळे विचार यायला लागले मनात आणि मग मी ठरवलं की जे करावं लागेल ते मी तुझ्या मुक्ती साठी करेन, मंदिर दरघा चर्च कुठेही जावं लागलं ना चालेल पण तुझ्यामुक्ती चा मार्ग शोधून काढेन आणि तीच माझी चूक झाली, मी ते विचार करून तो दोरा खिश्यात ठेवला आणि विचार केला की ह्याच्याने तू माझ्या जवळ येणार नाहीस आणि मग परत कोणाला वाटणार नाही की मी".... ???

"आणि तेच मी काहीही करून तुला मुक्ती मिळावी त्यासाठी हवं ते करेन आणि"..... हरी

"पण तसं झालं नाही ना.... खूप फिरलास ना तू ईशा ला खोटं बोलून बोलून, पण झालं नाही ना काही, बरीच पूजा केलीस तू, दान धर्म केलं.... पण जे करायचं होतं ते नाही केलस हरी".... संध्या

"तुला आठवतं मी काय बोलली होती हरी...... हरी, मला नाही माहीत मला मुक्ती काशी मिळणार पण एक क्षण मात्र एक क्षण, एक अशी वस्तू एक अस काम ही पुरेल ज्याचने मला मुक्ती मिळेल"....

"आणि तो क्षण होता तू हरी, तुझा माझ्यासोबत एक क्षण प्रेमाचा बस"....

"जर मनापासून हे केलं असतं तर हे कधीच झालं असतं, मी हे तुला आधीही सांगू शकली असती, पण मला तुझं खरं प्रेम हवं होतं हरी"....

संध्या बोलता बोलता रडायला लागली..... "हरी मला माहित आहे मला घेऊन तू कधीच वाईट विचार नाही केलास, तू आश्रम मध्ये पण हाच्याचा साठीच गेला होता, तिथं तुला गुरुजींनी सांगितलं पण".....

"बाळा, तू काही तरी चूक केली आहेस ज्याच्या परिणाम तुला भोगावा लागणार आहे"..... हरीला गुरुजींनी म्हटलेलं आठवलं

"मला वाटलं की तू आता तरी माझ्याशी बोलशील पण नाही"..... संध्या

"संध्या मी खूप वेळा प्रयत्न केला तुला सांगण्याचा पण, मला स्वतःची खूप लाज वाटायला लागली, अस वाटत होतं की काय करू कुठे जाऊन जीव देऊ, काय करू"......

"हरी जाऊदे तसही आता मी जातेय, परत नाही येणार आता मी आणि हा आज थांबवू नकोस हरी मला बस शेवटची एक इच्छा पूर्ण करशील माझी"....

हरी ने काहीच उत्तर दिलं नाही बस तो संध्याला नजर भरून पाहत होता....

"डोळे बंद कर"..... संध्या हळूच बोलली

हरीने डोळे बंद केले आणि संध्याने जवळ जाऊन हरी ला होटांवर चुंबन दिलं आणि परत मागे सरकली"..... हाच तो एक क्षण होता, सांध्याच्या जाण्याच्या वेळ आला होता संध्याचं शरीर चमकत होता, जणू आकाशातले तारे स्वता तिला घायला आले आहेत....
संध्या जात होती तेव्हाच मागे वळून बोलली....

"हरी फक्त ब्रेक वर पाय ठेवायला विसरू नकोस".... संध्या असं बोलून अद्रीष्य झाली

हरीला आता खूप पसच्याताप होत होता, पण त्याच्या आता काहीच फायदा नव्हता संध्या निघून गेली आणि सगळं जसं होतं तसं आधी सारखं झालं.....

सकाळ झाली..... ईशा उठली, हाल मध्ये येऊन पाहिलं तर हरी सोफ्यावर झोपला होता....

"हरी चल उठ लवकर, हरी.... बाबा उठ चल उशीर होईल परत".... ईशा

"हरी उठला काय, कुठे उशीर होईल"..... हरी

"विसरलास तू, अरे आरतीच्या लग्नाला जायचं आहे ना"..... ईशा

"अरे हां"..... हरी


"मग जा पटापट अंघोळ करून घे, मला पण फ्रेश व्हायचं आहे".....

दोघे ही लग्नाला जाण्यासाठी निघाले.....

ईशा ने कार मध्ये गाणे लावले, हरी पण शांत गाणे ऐकत ऐकत गाडी चालवत होतं, तेव्हाच अचानक रेडिओ वर हा गाणं आलं....
" पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले "

आणि हरी ला एकदमच संध्याची आठवण आली, हरी रात्री चे काय झालं त्या विचारात गुंतला पण तेव्हाच ईशाला पोटात दुखायला लागलं, ईशा हरी ला हाथ करत होती, सांगत होती पण हरीचं लक्ष नव्हतं, तो गाडीच्या दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत होता....

पुढं highway होतं गाडी फिरवून सरळ highway च्या मार्गाने त्यांना जायचा होतं, पण हरीचं लक्ष नव्हतं, समोरून एक ट्रक जात होता.... ईशा जोरात ओरडली " हरी ".....

हरी ने एकदमच समोर पाहिलं आणि अचानक त्याला संध्याने सांगितलेलं आठवलं....

"हरी फक्त ब्रेक वर पाय ठेवायला विसरू नकोस".... आणि हरी ने पटकन ब्रेक मारला आणि गाडी थांबली, तो ट्रक समोरून निघून गेला.... नुसतंच सीट बेल्ट लावल्या मुळे कोणालाच काही झालं नाही.....

"ईशा तू ठीक आहेस ना".... हरी

"हरी मला खूप दुखतंय पोटात, लवकर दवाखान्यात घेऊन चल....आहहहह" ईशाला ते दुखणं सहन होतं नव्हतं, ती ओरडत होती....

हरी ने पटकन गाडी फिरवली आणि तिला दवाखान्यात घेऊन आला....
ईशाला पटकन operation theatre मध्ये घेऊन गेले....

थोड्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि हरीला म्हटले.... " बघा मी त्यांना बघितलं, तुमच्या बायकोची डिलिव्हरी ची तारिक अजून पुढे आहे, पण त्यांना वेळेच्या आधीच लेबर पैन होतंय, अश्या sitution मध्ये its difficult to say but बाळाला वाचवणं काठीन आहे".....

हे ऐकताच हरी चे हाथ पाय थंड पडले.... डॉक्टरांनी पटकन operation ची तयारी केली....

हरी शांतच बसून होता, त्याला काहीच सुचत नव्हतं, तो सारखा बस्स प्रार्थना करत होता देवाला, तेव्हाच त्याला संध्याचे ते शब्द आठवले.... "हरी बाळा ला मी काहीच होऊ देणार नाही".....

आणि डॉक्टर बाहेर आले..... "It was quite difficult but let me say, you're blessed with a baby girl.... आई आणि बाळ दोघे ही स्वस्त आहेत, थोड्या वेळ नंतर त्यांना आय सी यू मध्ये शिफ्ट करू तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता, ते पर्यंत please coperate".... डॉक्टर

"Thank you so much डॉक्टर".... हरी आनंदाने भरला

ईशा ला शिफ्ट केल्यानंतर, हरी तिला भेटायला गेला....

ईशा बाळाला जवळ घेऊन झोपली होती, हरीने ईशाला जसच चेहऱ्यावर हाथ लावला ती उठली....

हरीने तिच्या मुलीला हातात घेतलं... "ओए बघ डोळे उघड, बघ बाबा आले".... हरी

" संध्या ".... ईशा च्या तोंडातून हे नाव ऐकताच हरी ईशा कडे आश्चर्याने पाहू लागला....

"आपल्या मुलीचं नाव..... संध्या, छान आहे ना हरी"....

हरीचे डोळे भरून आले हे ऐकताच, आणि मग हरीने ईशाला सांगायची सुरवात केली, कसं त्याला संध्या भेटली आणि कसं हे सगळं घडलं.....

ईशाला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं, हे सगळं ऐकून ईशाला मोठा धक्का बसला, पण तिने स्वतःला सांभाळलं....

"हरी रडू नकोस, जे होत असतं ते चांगल्या साठीच होतं असतं".….. ईशा

"

हो ईशा पण संध्या"..... हरी


"काय हरी, तिने तुला सांगितलं होतं ना की ती नेहमी तुझ्यासोबत रहाणार मग तुझी इच्छा असेल की नसेल".... ईशा

"हो ईशा"... हरी

"मग हरी ती। अपल्यासोबतच आहे आणि आयुष्य भर रहाणार.... बघ हरी तुझी संध्या तुझ्या हातात आहे आपली लाडकी मुलगी"....

"ईशाने तिच्या मुलीला हरी कडून घेतलं आणि प्रेमाने बोलली..... " संध्या माझी लाडकी".....

------------------------------------------------------- A Happy Ending ---------------------------------------------------------------------

कुठलाही निर्णय घ्याच आधी १०० वेळा विचार करा, की जे निर्णय तुम्ही घेताय किंवा त्या वचनला तुम्ही पूर्ण करू शकाल का...???

कोणाला ही कधी खोटी आस देऊ नका, तुमच्याकडून जेवढं होतं असेल बस तेवढच सांगा....

आयुष्यात कधी चूक झाली तर त्या चूक ला मान्यां करण्याची शक्ती मनात ठेवा, व ती चूक सुधरवून एक नवीन सुरवात करा....

― हर्षद मॉलिश्री ―

प्रिया वाचकांनो मनोरंजन ची गाडी इतःच थांबली नाहीये, लवकरच एक नवीन कथा," सान्या ".... Born on Saturday येत आहे….

So till then stay home stay safe and stay safe from corona virus, stay precautious......