सवत... - ६ Harshad Molishree द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सवत... - ६

हरी खूप घाबरला होता.... ईशा झोपली पण हरी ला झोप लागत नव्हती, संध्या ईशाच्या शरीरात आहे ह्याची भनक पण नव्हती हरीला....

हरी बेडच्या समोर बसला होता आणि एकटक ईशा ला बघत होता....

हरी च्या डोक्यात सध्या एकच विचार होता की ईशाला संध्या पासून लांब कसं करावं....

हरी रात्र भर तितच बसून होता व तिथंच बसल्या बसल्या झोपला,

सकाळ झाली ......


"हरी तू इथं का झोपलाय, काय झालं".... ईशा ने हरी ला झोपेतून उठवलं

"काय नाय असच, ईशु तुझी तबेत कशी आहे आता"....


"मला काय झालं, मी तर एक दम fit and fine आहे, आधी हे सांग की तू इथं का झोपला होता असा"....

"काय न ग, ते बसून इथं जरा मी ऑफिसचं काम करत होतो, आणि झोप लागली"....

"काय हरी तू पण अशी कशी झोप लागली"....

ईशा बोलत बोलत किचन मध्ये गेली, हरी तिच्या मागे मागे किचन मध्ये गेला, तिथून ईशा हॉल मध्ये आली आणि हरी पण तिच्या मागे आला....

"हरी माझ्या सोनू काय लावलं आहेस हे तू सकाळी सकाळी.... नुसतं मागे मागे फिरतोय अंघोळ करून ये जा, ऑफिस ला नाही जायचं का"....???

"ईशु ऐक ना मी काय म्हणतोय"....

"हां साहेब बोला"....

"थोडे दिवस आपण आई कडे जाऊया का तुझ्या....??? बघना किती दिवस झाले तू आईला भेटली पण नाही, मग काय म्हणतेस जायचं"....

"हां पण असं अचानक का"....?? ईशा हळूच बोलली

"अचानक कुठे ईशु , बघ आता तूझी Pregnancy ची बातमी ऐकून आई बाबा किती आनंदात आहे आणि त्यात जर आपण त्यांना भेटायला जाऊ तर त्यांना किती आनंद होईल"....

"हो पण तरी.... असं अचानक जायचं"....

"हो मग काय suprise देऊया ना जाऊन त्यांना".....

"अच्छा suprises द्याच आहे".... ईशाचा आवाज अचानक बदलला, हरी हे ऐकून दचकला....

"मी काल तुला इतका मोठा suprise दिलं तरी अजून तुला suprise द्याचा आहे हरी".....

"ठीक आहे दे किती ही करशील ना तरी मी जाणार नाही हरी…. कर तू, तुला हवं ते कर ईशा ला माझ्यापासून जितकं लांब ठेवण्याच्या प्रयत्न करायचं आहे कर, पण पुढे काय होणार ह्याचा विचार पण कर नंतर सांगू नको की मी बोलली नाही तुला".... ईशा असं सांगून लगेच नॉर्मल झाली,

हरी काय बोलेन त्या आधीच ईशा बोलली.....

"चालतंय की हरी, मी फटाफट आवरून घेते, मग आपण निघुया लगेच"....

हरी काहीच बोलला नाही..... पण संध्या ने दिल्या धमकी मुळे हरी नुसताच घाबरला होता

दुपारी दोघे पण कार ने ईशा च्या घरी जायला निघाले रस्त्यात अचानक गाडी बंद पडली....

"हरी काय झालं गाडी काशी काय बंद पडली"....

"थांब बघतो काय झालं आहे".... हरी खाली उतरला व त्याने बोनेट उघडून पाहिलं

"काय नाही गाडीतच बस ईशु उतरू नको, झाला"..... हरी ने असं म्हणत बोनेट बंद केला पण बोनेट बंद करताच त्याने पाहिलं की ईशा गाडीत नव्हती.….

"ईशा, ईशा कुठे आहेस तू.... ईशा" .....

हरी ने सगळी कडे पाहिलं पण ईशा कुठेच नव्हती, हरी चे हाथ पाय अचानक गारठले एक दम शांतता होती, इतकी शांतता की हरी ला त्याच्या घडल्यालाचा पण आवाज ऐकू येत होता....

"टिक टिक टिक"....

तेव्हाच हरी ला रेलगाडी चा आवाज आला, हरी रस्त्याच्या खाली उतरला आणि थोडं पुढे चालत गेला... बघतोय तर काय पूढे रेल च्या पट्टरीवर ईशा चालत जात होती आणि समोरून वेगाने गाडी येत होती.....

हरी "ईशा, ईशा"..… ओरडत धावत सुटला ईशाला वाचवण्यासाठी, पण तो पोचेल त्या आधीच गाडी ने ईशाला उडवलं....

हे बघताच हरी जागेवर त्याच्या गूढघ्यानवर पडला, हरी जोर जोरात रडू लागला.....


गाडी निघून गेली, हरी पटकन उठला आणि पट्टरीवर गेला, पण तिथं काहीच नव्हतं, रक्ता ची एक थेंब पण नाही.....

हरी खुप रडत होता तेव्हाच त्याच्या फोन ची रिंग वाजली....



हरी ने खिशातून फोन काढून बघितलं तर, भीतीने त्याच्या अंगावर काटे उठले अचानक.…...

तो फोन ईशाचा होता, हरी ने फोन उचलला.....

"हरी ऐक ना येताना आज जरा, बाजारातून ना गुलाब जामुन चा पॅकेट घेऊन ये हां.... आणि हा शोनू लवकर ये, I am waiting for uhhhh"....

हरी हे ऐकताच त्याने ईशाला विचारलं.... "ईशा तू कुठे आहेस"

"मी घरी आहे हरी, आणि काय झालं तुझा आवाज का असा येतोय,कुठे आहे तू,ऑफिस ला गेला नाहीस का"....???

"नाही काय नाय, ईशा तू ठीक आहेस ना"....

"हो हरी मी ठीक आहे, मला काय होणार, पण तू ठीक आहेस ना".....

"मी घरी येतोय ईशा, तू जाऊ नकोस कुठे, मी येतोय लगेच".....

"हां हरी ठीक आहे ये तू मी कुठे जात नाहीये".....

हरीच्या जीवात जीव आला, "हे नकीच संध्याने केलं असणार.... संध्या खूप चुकीचं करतेय तू"...... हरी मनातच बोलला


हरी ने फोन ठेवला आणि तो धावत जाऊन गाडीत बसला, हरीने लगेच गाडी फिरवली आणि तो घरी पोचला, घरात शिरताच त्याने ईशाला आधी त्याच्या मिठीत घेतलं....


"हरी, हरी ठीक आहेस ना तू काय झालं, एवढा घाबरलेला का दिसतोय तू"....

"ईशा तू ठीक आहेस ना, तुला काय झालं नाही ना"....

"अरे हो मी ठीक आहे, सकाळीच तर बोलली तुला मी.... पण तुला काय झालं".....

"काय नाही ईशु, बस तुझापासून लांब जावसं वाटत नाहीये, त्या दिवशी नशीब म्हणा मी आलो वेळेवर, पण तेव्हा पासून मला खूप भीती वाटते तुला एकटीला सोडून जायला"....

हरी ने गोस्ट फिरवून टाकली जेच्याने ईशाला काही कळलं नाही पाहिजे.....

"अरे माझ्या शोनू, तू पण ना किती ते काळजी".....

ईशा ने हरी ला एकदम tight hug केला.... आणि थोडा वेळ अशीच थांबली

दिवस असेच जायला लागले, हरी ने ऑफिस ला जाणं बंद करून टाकलं, कधी गेला तरी त्याच्या जीव घरातच असायचा ईशा मध्ये.... हरी नुसतं ईशाच्या मागे मागे रहाऊ लागला,मधीच कुठे कुठे संध्या ईशा च्या शरीरात यायची, पण हरी त्याच्या पूर्ण प्रेमाने ईशा ला मिठीत घेऊन थांबून रहायचं जे पर्यंत संध्या जात नाही आणि संध्या निघून जात असे....

पण हे प्रकरण दिवसांदिवस वाढत चालला होता, आणि हरी ची भीती पण, त्यात हरीने भुरपूर वेळा प्रयत्न केला की ईशाला देवळात घेऊन जाण्याच्या पण ते शक्य झालं नाही तेवढच नव्हे पण त्याने कितेक तरी, पुजारी जाणकार ब्राह्मण आधी ना घरी आणायचा प्रयत्न केला पण ,नेहमी काय ना काय होत असे....

हरी ने खूप प्रयत्न केलं पण शेवटी काहीच परिणाम त्याला भेटलं नाही, त्यातच एक दिवस असा आला…...

ईशा बाल्कनी मध्ये बसली होती, तिला आता सातवा महिना चालू होता....

ईशा बसल्या बसल्या रडायला लागली..... तेव्हाच मागून हरी आला, हरी ने तिला रडताना बघून पटकन विचारलं

"अरे ईशु काय झालं, रडतोस का"....

तेव्हा ईशा ने हरी चा हाथ धरला आणि रडत म्हणाली....

"हरी मला खूप भीती वाटते, माहीत नाही का पण ना मला मधीच सगळं विसरायला होतं, मी काय करतेय मला काहीच लक्षात रहात नाही".....

"ईशा, ईशा आधी तू शांत हो... बघ pregnancy मध्ये असं होतं असतं ग बाई.... तू घाबरतेस का मी आहे ना".....

"हरी तुला एक सांगू, कधी कधी ना मला असं वाटतं की आपलं बाळ ना जिवंत नाहीये, मला त्याचे heart beats feel नाही होतं"....

हे ऐकताच हरी ने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं आणि तिला शांत करत म्हणाला.....

"बस ईशु काहीच बोलू नको पुढं, शांत हो आपल्या बाळा ला काहीच होणार नाही"....

हे ऐकताच ईशा ने ही तिचे दोनी हाताने हरीला मिठीत घेतलं आणि हळूच बोलली....

"हो हरी बाळाला काही होणार नाही मी आहे ना".....

हे ऐकताच हरीने ईशाला सोडला हा आवाज संध्याचा होता.... हरी ईशाला बघत होता


"हरी मोजतोय ना दिवस बस थोडे दिवस अजून..... मग सगळं तुझ्या मनासारखं होईल"....

"संध्या कुठ पर्यंत असं भीतीत जगू मी, ह्याच्या पेक्षा बर होईल की मारून ताक मला, घेऊन ताक बदला, मग तुला शांतता भेटेन ना"....

हे ऐकून संध्या हसायला लागली.... "हरी असलं काही होणार नाहीये पण एक होणार तू जगे पर्यंत मी सोबत असनार तुझ्या मग तुझी ईच्छा असेल की नसेल".....

"आणताना मला तू खूप प्रेमाने आणलं, पण ते तेवढ्या प्रेमाने झपु नाही शकला".....

"प्रेम, तुला काय माहीत की जेव्हा तू मला दिसत नव्हती तेव्हा माझी काय अवस्था झाली होती, पण मला कुठे माहीत होतं की प्रेमाचा खरा अर्थ तुला माहीतच नाहीये".... हरी

"शेवटी तू तेच केलं जे एक आत्मा करतेय, पण लक्षात ठेव संध्या मारणारा पेक्षा वाचणारा मोठा असतो, माझ्या बाळाला की ईशाला काही झालं न तर मी"..... हरी त्याचे शब्द पूर्ण नाही करू शकला, पण त्याचा डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब मध्ये ईशा आणि त्याच्या होणाऱ्या बाळाची काळजी होती....


"खूप जास्त emotional झालास हरी, पण का ईशा साठी, तुझा बाळा साठी की माझ्यासाठी".....????

"बर चल मी तुझं थोडं टेन्शन कमी करून टाकते, पुढच्या तीन आठवडा नंतर तू याच condition मध्ये रडत आशील, कारण की तू तेव्हा काय तरी गमावणार आहेस"....

हे ऐकून हरी जागेवरून उठला आणि ईशा समोर रागाने बघू लागला.....

"फक्त ३ आठवडे हरी आणि वाचणार फक्त दोन लोक".....

------------------------------------------------------------- To Be Continued -------------------------------------------------------------