सवत... - २ Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सवत... - २

ईशा टीव्ही जवळ गेली व टीव्हीचा स्विच बंद करून तिने वायर काडून टाकलं आणि बेडरूममध्ये जाऊन झोपली...

संध्याकाळ झाली, हरी घरी आला, घंटी चा आवाज ऐकून ईशा पटकन उठून आली, दार उघडताच ईशा हरी ला चिपकली....

"अरे काय झालं, माझ्या ईशुला, खूप मिस केलं वाटतं मला"...

"हो खूपच"...

"बरं चल आत आधी"....

हरी ईशा ला आत घेऊन आला...

हरी ईशाला निरखून पाहत होता.... "ईशा काय झालं, तू जरा वेगी दिसतेस, घाबरलीस का परत"....

"हो हरी"..... ईशा ने हरी ला सगळं सांगितलं, हरी ने शांत पणे सगळं ऐकून घेतलं

संध्या तितच होती आणि सगळं ऐकत होती.....

सगळं ऐकल्यावर हरी ने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं... आणि हरी संध्याकडे बघायला लागला

संध्या ने लगेच स्वताचे कान पकडले आणि "सॉरी" बोलली...
हरी ने ईशा ला शांत केलं....

रात्र झाली.... ईशा झोपली होती आणि हरी संध्या सोबत बाल्कनी मध्ये थांबून बोलत होता....

"हरी सॉरी ना मी अशीच मस्करी करत होती".... संध्या

"संध्या काय मस्करी, अशी मस्करी असते का".... ??? हरी

"हो हरी, पण जाऊदे ना, ती खूप घाबरते म्हणून मी थोडी मज्जा घेत होती, बस्स छोटी सी गंमत हरी".... संध्या

"गंमत, गंमत आणि या गंमत मुले तिला काय झालं तर"....???

"हरी, असं कसं तिला काय होईल, मी काही नाही होऊ देणार तिला..... हरी मला माहित आहे, की तिच्यात तुझा जीव आहे, आणि माझा तुझ्यात"...

हे ऐकल्यावर हरी अगदी प्रेमाने संध्याकडे बघायला लागलं... हरी संध्या च्या जवळ गेला आणि तिला मिठीत घेत होता तितक्यात...

"हरी काय करतोय"...... ईशा

"ईशा तू , काय नाय".... हरी एकदम दचकला

"हरी कोणासोबत बोलतोय तू , मी ऐकलं आणि don't say की मला भास झाला असेल".... ईशा

"ईशु..… ईशु relax मी कोणासोबत बोलणार, झोप लागत नव्हती म्हणून इथं येऊन थांबलो, मग मी असा".... हरी

"मग काय असा.... ???? हरी मी तुला बोलताना ऐकलं खरं सांग मला".... ईशा

"हां तेच सांगतोय".... हरी ला अस बघून संध्या खूप हसत होती, अगदी तोंड दाबून दाबून हसत होती, आणि तिला हसताना बघून हरी एकदम बोलला....

"आधी तू हसणं बंद कर".... संध्या हे ऐकताच शांत झाली

"हसणं बंद करा म्हणजे.... मी कुठे हसली, कोणाला बोलतोय तू,कोण हस्तय इथं"......

"हसणं नाही ग राणी, मी ना, अच्छा तू विचारात होती ना मी कोणासोबत बोलत होतो, तर मी स्वता सोबत बोलत होतो"....

"स्वतासोबत, एवढा रात्री.... वाह, अप्रतिम"... ! ईशा

"हां, धन्यवाद"…. हरी

"धन्यवाद काय, इथं एवढा रात्री तू स्वतासोबत काय बोलत होतास".... ईशा

"अरे मी ना, मी.... हनिमून, हनिमून बदल बोलत होतो, बघ कसं आहे की नवीन लग्न झाले, आणि बघ अजून आपण कुठे फिरायला पण गेलो नाही, तर तेच प्लॅन करत होतो".... हरी

हे ऐकून ईशा खूप खुश झाली.... "हरी खरच... ohhh my baby"

ईशा ने पटकन हरीला मिठीत घेतलं.... आणि एक बाजूने संध्याने हरी ला ईशारा केला... "वाह" करून

"हरी तसं कुठे जायचं"..... ईशा

"तेना आपण सकाळी ठरवूया, आता मला खूप झोप आलीय"..... हरी

हरी ईशा ला बेडरूम मध्ये घेऊन गेला....

संध्या तितच बाल्कनी मध्ये बसली होती, वर चंद्रा ला पाहत होती....
चंद्रा ला बघत ती म्हणाली....

"खूप सुरेख आहे नातं तुझं चंद्र या आकाशासोबत
जसं आहे नातं माझं हरी सोबत
एकत्र असूनही सोबत नाही".....


हरी आणि ईशा ने हनिमून साठी मनाली जायचं ठरवलं, व आज रात्री च्या गाडीने दोघेही मनाली जाण्यासाठी निघाले.....

ईशा हरी च्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि संध्या हरी च्या समोर बसली होती.....

संध्या हरीला खूप निरखून पाहत होती, हरीने संध्याला विचारलं.... "काय झालं".....

"काय नाही".... संध्या

"तुला झोप नाही का आली"....संध्या ने हरी ला विचारलं

"हो अली आहे ना"... हरी

संध्या उठून हरी च्या बाजूला जाऊन बसली आणि हरी ला बोलली....
"चल माझ्या खांद्यावर डोकं ठेव आणि झोप तू पण".….

हरी संध्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला....


सकाळी ते लोक मनालीला पोचले, हॉटेल ला जाऊन त्यांनी रेस्ट घेतला व संध्याकाळी सगळ्यात आधी तितल्या प्रसिद्ध मंदिरात दर्शना गेले.... "हदींमबादेवी मंदिरात"....

दर्शन करून हरी बाहेर निघाला, तेच ईशाला तितल्या पूजारीने थांबवलं

"बेटा, आप काहासे हो".... पुजारी

"जी मै मुंबई से हू, अपने पती के साथ आई हुन, एक मिनिट मैं अपने पती को बुलाती हू"......

"बेटा उसे मत बुलाव, मैने तुमहारे पती को देखा, तुम मेरी बात सुनो, तुमहारे पती पर किसी आत्मा का साया हे, ये धागा अपने पास रखो, इसे उसकी कलई पे बांध देना उससे वो उसके पास नही आपाएगी".............. पुजारी

ईशा हे सगळं ऐकून विचारात पडली, की काय करावं, पुजारी जे सांगतोय ते खरं असेल का, मग तिला तिच्या सोबत घडलेलं सगळं आठवलं व हरीचं त्यादिवशी वागणं आठवलं जेव्हा तो बाल्कनी मध्ये रात्री थांबला होता....

ईशा हे सगळं विचार करतच होती, तेव्हाच....

"ईशु चल"... हरी

"हां आली"... ईशा ने पटकन तो दोरा घेतला व त्या पुजारीचे पाय पडून, "धन्यवाद"..... बोलून ती निघून आली....

"किती वेळ ईशु , आणि तो पुजारी काय म्हणत होता".... हरी

"काय नाही असंच, हे बघ त्यांनी हा दोरा दिलाय, आपले नवीन लग्न झाले आहेत ना म्हणून तुझ्यासाठी".... ईशा

"अच्छा, असं.... काय तु पण ना ईशु".... हरी

"हरी बांधून घे ना".... ईशा अगदी प्रमाणे हरी ला म्हणाली

"बरं बाबा हे घे बांध"....

हरी ने त्याचा हाथ पुढे केला आणि ईशा ने तो दोरा हरीच्या हातावर बांधला.....
"बस खुश"...... हरी

"हो... खुश " ईशा

मंदिरातून बाहेर पडताच संध्या हरी च्या जवळ आली, पण जवळ येताच तिच्या अंगात आग व्हायला लागली, तिला असं वाटतं होतं की जणू तिला कोणी भट्टीत टाकून दिलं....

तेव्हाच सांध्याची नजर हरीच्या हातावर पडली, त्याचा हातावर तो दोरा बघून तिला समजलं की हे त्या धाग्यामुळे होतंय.....

संध्या पटकन तिथून निघून गेली............

-------------------------------------------------------------- To Be Continued -------------------------------------------------------------