सवत... - ३ Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • जर ती असती - 1

    असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून ज...

  • नियती - भाग 33

    भाग 33इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे प...

  • वाटमार्गी

    वाटमार्गी       शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट...

  • परीवर्तन

    परिवर्तन राजा चंडप्रताप नखशिखांत रक्‍ताने भरत्ला होता. शत्रू...

  • स्कायलॅब पडली

    स्कायलॅब पडली                           त्यावर्षी ११ जुनला श...

श्रेणी
शेयर करा

सवत... - ३

हरी ईशा ला घेऊन हॉटेलला आला, तो सारखा संध्याला शोधत होता, मनातल्या मनात तिला आवाज देत होता पण संध्या नाही आली....

रात्र झाली, ईशा झोपली होती पण हरी जागा होता त्याला काय झोप लागत नव्हती, हरी ला करमत नव्हतं तो सारखं संध्याला आठवत होता, कसं तरीच होत होतं त्याला....

हरी बेडवरून उठून खिडकी जवळ गेला, त्याने खिडकी उघडली, खिडकी उघडताच त्याने पाहिलं की समोर रेल ची पट्टरी आहे व गाडी थांबली आहे, आणि समोर त्या पट्टरीवर संध्या बसली होती, संध्याच्या आजीबाजूला निळ्यारंगाची एक चमक होती....

हरीला काहीच कळत नव्हतं की हे काय आहे, असं का होतंय.....

हरी पटकन खाली गेला हॉटेल च्या बाहेर येताच त्यांनी पाहिलं की खाली सगळं नॉर्मल होतं, आधी सारखं, समोर त्याला न रेल दिसली ना संध्या....

हरी ला काहीच सुचत नव्हतं, असल्या थंड वातावरण मध्ये पण तो घामाघूम झाला होता....

हरी ने हाताने त्याचा घाम पुसला आणि तो मागे फिरला मागे फिरताच त्याने पाहिलं की त्याच्या आजूबाजूला निळ्यारंगाची रक वेगिच चमक इथून तिथून जात आहे....

ती चमक हरी च्या जवळ येत नव्हती, हरी ने हळूच त्या चमक ला हाथ लावला, हाथ लागताच ती चमक अद्रीष्य झाली.....

हरी ला काहीच कळत नव्हतं, तेव्हाच त्याने पाहिलं की संध्या समोर थांबली आहे, ती हरी पासून खूप लांब थांबली होती, हरी संध्याला बघून खुश झालं, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तो सांध्याच्या जवळ जायला लागला पण हरी जसा जवळ येत होता संध्या मागे जात होती.…..
संध्या सारखं हरीला इशारा करत होती हाथ दाखवून पण हरी ला काहीच कळत नव्हतं, हरी असाच पुढे पुढे जात होता आणि संध्या मागे...

तेव्हाच अचानक मागून आवाज आला..... " हरी "

हरी मागे फिरला... बघतोय तर ईशा समोर उभी होती

हरी ने परत मागे बघितलं तर तिथं संध्या नव्हती.... तेवड्यात ईशाने लगेच येऊन हरी ला मिठीत घेतलं...

"हरी तू इथं काय करतोय आणि खाली का आलास एवढ्या रात्री"....


हरी काहीच बोलण्याच्या शुद्धीत नव्हतं

ईशा हरी ला रूम मध्ये घेऊन गेली, हरी ने ईशाचा हाथ घट पकडून ठेवला होता आणि हरी तसाच झोपी गेलो....

ईशा हरीच्या जवळ बसून होती, ईशा ला सारखा हा प्रश्न मनात येत होता की, हरी खाली का गेला असेल, तो एवढा घाबरला का आहे????....

सकाळ झाली, ईशा तिथंच बसल्या बसल्या बेडच्या एका बाजूला टेकून झोपली होती, हरी उठला....

ईशा अजून झोपली होती, रात्री जे काय झालं, हरी ला ते थोडं थोडं आठवत होतं.....

हरी बेडवरून उठत होता, तेव्हाच ईशाची झोप मोडली...

"हरी उठलास.... कसं वाटतंय आता"....

"ठीक आहे मी".... हरी

हरी असं बोलून बाथरूम मध्ये गेला, ईशा ने तो वर चहा मागवून घेतलं, हरी जसा फ्रेश होऊन आला ईशा बोलली...

"हरी ये मस्त गरमागरम चहा रेडी आहे"......


हरी येऊन बसला आणि चहा पिताना त्याने ईशा ला विचारलं....

"ईशा काल रात्री काय झालं होतं नेमकं, मी खाली आहे ते तुला कसं कळलं"....

"हरी काल मी जेव्हा वॉशरूमला जाण्यासाठी उठली तेव्हा मी पाहिलं की तू बेडवर नव्हता, मी तेव्हा खिडकीतून पाहिलं की तू खाली थांबला आहेस, मी तुला वरतून दोन वेळा हाक मारली पण तू काय ऐकलं नाही,म्हणून मी खाली आली"......

"जेव्हा खाली आली तर बघितलं की तुझा लक्ष भलतीकडेच होता, घाबरलेला दिसत होतास तू खूप आणि म्हणून मी तुला रात्री काही विचारलं नाही"....

"हरी काय झालं, असं काही आहे का....??? जे तू मला सांगितलं नाहीयेस किंवा लापावतोय"....

हरी ने एकदम संशय भरलेल्या नजरेने ईशा कडे बघितलं आणि बोलला.... " नाही "

"बरं सोड जाऊदेत आज संध्याकाळी निघायचं आहे, लक्षात आहे की विसरलास"....

"हो".....

सांध्याच्या विचारात हरी जणू हसणं विसरून गेला, तो एकदम शांत झाला...

संध्याकाळी ते दोघं मुबई ला परत येण्यासाठी निघाले, हरी सारखं ईशा काही बोलली की मोजकं उत्तर देऊन गप बसत होता, ईशा पण हरी च्या अश्या वागण्यामुळे चिडली होती व तीही शांत झाली....

दोघे पण गाडीत बसले होते..... हरी झोपला होता

गाडी मधीच थांबली सिग्नल मुळे आणि ईशा ची झोप उडाली, ईशा ने गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर खूप काळोख होता, अमावस्या ची रात्र होती.... चंद्र ही जणू कुठे लपला होता

तेव्हाच ईशा ला सगळी कडे निळ्यारंगाची चमक दिसू लागली.... ईशा तिच्या जागेवरून उठली आणि गाडीच्या दारावर येऊन थांबली, ती चमक हळू हळू ईशाच्या जवळ येत होती.... ईशा त्या चमक ला बघून मोहित झाली, आणि गाडीच्या खाली उतरली आणि त्या चमक च्या जवळ गेली....

जवळ जाताच ती निळ्यारंगाची चमक अद्रीष्य झाली.... आणि तेव्हाच गाडी चा हॉर्न वाजला, ईशा पटकन गाडीत चडायला जातच होती, तेव्हा वरतून तिच्या अंगावर मंदिरातू दिलेला जो डोरा तिने हरीच्या हातात बांधला होता, तशे दोरे पडायला लागले....

ईशा जशी तशी धावत गाडी जवळ आली पण गाडी चालू झाली, ईशा धावत होती गाडीच्या मागे तेव्हाच तिच्या पायात त्या दोऱ्याची गाठ बसली आणि ईशा खाली पडली....

हरी घाबरून उठला, अगदी घामात भिजला होता तो, ईशा समोरच्या सीट वर झोपली होती, गाडी चालू होती.... नशीब स्वप्न होतं, हरी ईशा च्या जवळ गेला आणि आणि त्याने तिच्या डोक्यावर हाथ ठेवला, तेव्हाच त्याच्या लक्ष त्या दोऱ्यावर गेलं.....

तेव्हा हरीला आठवलं, की काल रात्री पण जेव्हा त्याला संध्या दिसली ती इशारा करत होती सारखं हात दाखवत होती, आता पण त्याच्या स्वप्नयात त्याने पाहिलं की ईशाच्या अंगावर ते दोरे पडत होते, व त्याच दोऱ्याने तिच्या पायात गाठ बसली.....

हरी मनातल्या मनात बोलला.... "जेव्हापासून ईशा ने माझ्या हातात दोरा बांधला आहे, तेव्हापासून संध्या दिसली नाही, भौतेक ती मला हेच सांगायचं प्रयत्न करते"....

हरी पटकन उठला आणि गाडीच्या दारावर गेला, त्याने जशी तशी त्या दोऱ्याची गाठ खोलली, गाडी तेव्हा एका पुलावरून जात होती, खाली नदी होती.... हरीने पुढचा विचार न करता तो दोरा खाली फेकून दिला आणि डोळे मिटून तसाच तिथं थांबून रहायला.....

तेव्हाच संध्या बरोबर त्याच्या मागे येऊन थांबली........

--------------------------------------------------------------- To Be Continued -----------------------------------------------------------