savat - 5 books and stories free download online pdf in Marathi

सवत... - ५

संध्या हरी आणि ईशा च्या आस पासच होती, जेव्हा हरी ने दोरा गाडीच्या बाहेर फेकलं तेव्हापासून संध्या हरी आणि ईशा च्या जवळच होती, पण त्या दिवस नंतर संध्या कधी हरी ला दिसली नाही.....

हरीचे घरचे व ईशा चे घरचे सगळेच खूप आनंदात होते....

सगळं चांगलं चालू होतं तेव्हाच एक दिवस हरी ईशाला त्यांच्या गुरुजी कडे आश्रम मध्ये घेऊन गेला, नुसतंच आईने त्याला सांगितलं होतं की जाऊन पाया पडून या करून....

हरी आणि ईशा आश्रम मध्ये आले... पाया पडून झाल्यावर गुरुजींनी ईशा ला आश्रम ची परिक्रमा करायला सांगितली आणि हरी ला त्यांनी त्यांच्या जवळच बसवलं.....

हरी ला समजलं नाही, पण ईशा ला खात्री झाली की भोतेक गुरुजींना काही तरी हरी ला सांगायचं आहे.....

ईशा उठून परिक्रमा करायला गेली.... तेव्हाच गुरुजींनी हरीला सांगितलं....

"बाळा, तू काही तरी चूक केली आहेस ज्याच्या परिणाम तुला भोगावा लागणार आहे"..... गुरुजी

"गुरुजी कोणती चूक"..... हरी

"बाळा कर्मा ह्याचं अर्थ काय माहित आहे तुला, जे कर्म इथं तू केले आहेस ना ते तुला इथंच फेडावे लागणार, कर्मा च्या पुस्तकात माफी नसते, सग्यांचे हिशोब कर्मा वेळे अनुसार करतो"..... गुरुजी

"तुझ्या बाळाला जीवाचा धक्का आहे, बायकोची नीट काळजी घे बाकी जशी देवाची मर्जी"... गुरुजी

"गुरुजी काय सांगताय तुम्ही, ह्याचा काही तरी उपाय असेल ना.... माझं बाळ"..... हरी

"बाळा तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुला वेळ देईल, हे घे प्रसाद आणि संभाडून जा"..… गुरुजी

हरी गुरुजींचे पाय पडून उठला आणि तिथून ईशाला घेऊन निघाला

जाताना कार मध्ये ईशा ने हरी ला विचारलं..... "हरी काय बोलले का गुरुजी, आश्रम मधून निघालास तेव्हा पासून खूप शांत आहे तू"....

"नाही ग तसं काही नाहीये.... फक्त डोकं जळ झालय"....

"घरी जाऊन मस्त चेपून देते तेल लावून बरं वाटेल मग थोडं"...

"हो चालतंय की"....

हरी अगदी विचारात गुंतला होता, नक्की काय आणि कुठली चूक आहे जेच्यामुळे त्याच्या बाळाला जीवाचा धक्का आहे ते हरी ला काहीच कळत नव्हतं....

दोघे पण घरी पोचले, हरी ईशा च्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता आणि ईशा त्याच्या केसांमध्ये तेल लावून मालिश करत होती.....

"ईशु मला न कळत नाही, की नेहमी मीच का अडकतो प्रोब्लेम्स मध्ये"..... हरी

"काय झालं हरी कसलं प्रॉब्लेम"..... ईशा

"यार म्हणजे ना सोड आता काय सांगू तुला"..... हरी

"का काय झालं सांग ना, गुरुजींनी काय सांगितलं".... ईशा

हरी हे ऐकून आश्चर्यात पडला, त्याला ईशा च्या आवाज वेगळा ऐकू आला, हरी पटकन ईशा च्या मांडिवरून उठला....

"अरे काय झालं हरी उठलास का, अजून मालिश बाकी आहे ये"..... ईशा

ईशा चा आवाज वेगाचा होता ती खाली मान टाकून बोलत होती, हरीला आता भीती वाटायला लागली, त्याला खात्री झाली की हे नक्की वेगळच आहे काय तरी.......

तेव्हाच ईशा परत अगदी प्रेमाने बोलली...... "हरी काय विचार करतोय ओळखलं नाहीस तू मला, थांब आता तुला आठवले"....

इशाने असं बोलून गाणं म्हणू लागली.....

"पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले".....

गाणं ऐकताच हरी बोलला..... " संध्या ! "

हे ऐकताच ईशा ने मानवर करून हरी कडे बघितलं.... "खूप वेळ लावलंस हरी , विसरलास तू मला".….

"संध्या तू हे काय करतेय, तू ईशा च्या अंगात"..…

"हो हरी..... पण त्यात काय चुकीचं आहे, मी पण तर बायको आहे ना तुझी, लग्न नाही झालं आपलं पण तरी मी तर तुला माझं नवरा म्हणून कधीच स्वीकारलं आहे"....

"संध्या हे तू काय बोलतेस, मस्करी करतेय ना तू, संध्या please नको करुस मस्करी, भीती वाटते आता मला".... हरी

"मस्करी, मी कुठे मस्करी करते, बघ मी हसतेय का बघ"..... ईशा हरीच्या

अगदी जवळ येऊन त्याच्या तोंडाला तोंड लावत म्हणत होती...

"संध्या मी तुला चांगल्या साठी आणलं होतं घरी, तुला मुक्ती मिळावी म्हणून"...... हरी

"आणि मी तेच करतेय हरी, अरे तू रडतोय का मी कुठे काय केलं आहे ईशाला किती दिवसापासून मी राहतेय बघ पण कधी काय केलं का मी तिला, शेवटी माझी लाडकी सवत आहे , आणि तिच्या मुले तर मला मुक्ती मिळणार आहे"....

"संध्या जे काय झालं ते माझ्यामुळे झालं, त्यात ईशा ला काहीच माहीत नव्हतं संध्या तुला तर माहीत आहे please संध्या ईशाला सोडून टाक"..... हरी

"नाही हरी अजून ती वेळ आली नाहीये..... इतके दिवस मला तू आठवत होतास, तेव्हा तुझ्या बोलण्यात प्रेम दिसत होतं पण आज तुझ्या बोलण्यात भीती का दिसतेय, मला कधीपासून घाबरायला लागला तू".....

"एवढे दिवस तर नाही घाबरला जेव्हा, मी रोज तुझ्यासोबत हातात हात घालून फिरत होती, तुला जेवण बनवून भरवत होती, तुझ्यासोबत रोज मी झोपत होती"....

"पण ईशा च्या प्रेमात आंधळा झाला आहेस तू , तुला कळलच नाही की ईशा च्या जागेवर मी आहे तुझ्यासोबत".....

"त्या दिवशी जेव्हा तू तो दोरा फेकलास ना पाण्यात तेव्हा मी तुझ्या मागेच उभी होती, तुझं माझ्यावर प्रेम बघून मन तर करत होत की तुला मिठीत घेऊ, पण माझी पण मजबुरी आहे ना".....

"त्या दिवसापासून मी ईशा च्या अंगात आहे आणि अजून थोडे दिवस रहाणार मी, जे पर्यंत माझं काम होत नाही हरी"....

आणि हां घाबरू नकोस मी माझ्या लाडक्या सवत ला काही होऊ देणार नाही"..... ईशा

ईशा हरी च्या जवळ आली आणि आणि हरीच्या गालावर तिने चुंबन दिलं आणि तशी ती खाली पडली.....

हरीने पटकन तिला उचलं आणि तिला बेडवर झोपवलं.....

हरी ईशाला सारखं उठवत होता, तिच्या गालावर सारखा हाथ फिरवत होता....

"ईशा उठणा ग काय झालं तुला ईशा, उठणा".... हरी

तेव्हाच ईशाने एकदम डोळे उघडले आणि बोलली..... "Thanks हरी मला उचलून बेडवर झोपण्यासाठी".....

हरी एकदम दचकला, ईशा चा हाथ सोडून तो मागे गेला.....

अरे हे काय हाथ सोडला तू ईशा चा, आता....??? तुला माहितीय का इतक्या दिवसा नंतर मी आज का आली तुझ्यासमोर.... कारण तुला गुरुजींनी सगळं सांगितलं आणि तुझ्या डोक्यात काय चालाय आई ला तू इथं बोलवशील, पूजा घालायला लावशील, पण नाही हरी जर तू अस काय केलस ना तर लक्षात ठेव ईशा माझी लाडकी आहे पण शेवटी सवत आहे"..….

"आता आपल्या दोघांकडे एकच रास्ता आहे.... ईशाला बाळ होई पर्यंत दिवस मोजायचे तू पण आणि मी पण".....

----------------------------------------------------------------- To Be Continued ---------------------------------------------------------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED