चूक आणि माफी - 13 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चूक आणि माफी - 13

अमेय गावाला आल्यापासून त्याच्या घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू झाली .पैसे नसल्यामुळे कर्ज काढावे लागले .आधीच मोठ्या बहिणीच्या गरोदरपनात कर्ज झालेले .त्यात आता हे आणखीन कर्ज .आणि वडील आजारी असल्यामुळे त्यालाच धावपळ करावी लागत होती . शिवाय संध्याकाळी परीक्षेचा अभ्यास .काही करून त्याला बारावी पास व्हयचेच होते .
अमेयच्या परीक्षेचा दिवस जवळ आला . त्याने
परीक्षेला जायची सगळी तयारी केली . त्याने देवाला नमस्कार केला .आई वडिलांना नमस्कार केला .आणि तो पेपर द्यायला निघाला .
अमेयला पेपर चांगला गेल्यामुळे तो खुश होता .पण दोन दिवसानी बहिणीचे लग्न होणार ती सासरी निघून जाणार म्हणून त्याला वाईट ही वाटत होते . लहानपणीचा काळ एक सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत होता .
लग्नाचा दिवस आला होता , दारापुढे लग्न असल्यामुळे मांडव टाकला होता .पाहुण्यांची रीघ आली होती .विधीला सुरवात झाली होती . नवऱ्या मुलाने नवरी मुलीला मंगळसूत्र घालून तिला आपलस केल होत . पंक्ती पडल्या जेवण झाली . नवऱ्या मुलाची जाण्याची तयारी झाली . नवरीची पाठवनी करण्यात आली . सगळे पाहुणे ही आपापल्या घरी निघून गेले .घरात राहिले ते फक्त सुनेपण .....आता घरात फक्त अमेय , अमेय्ची आई आणि बाबा तिघेजणच राहिले . अमेयने ही सकाळी मुंबईला निघणार असल्याचे घरात सांगितले .आईने अजून दोन दिवस राहन्याचा आग्रह केला . पण अमेय्ला ते शक्य नव्हते . आधीच घेतलेल्या सुट्टी पेक्षा तो दोन दिवस न कळवता तो राहिला होता .अण्घी दोन दिवस राहणे त्याला शक्यच नव्हते .
रात्री लग्नाच्या गडबडीमुळे सगळेच फार दमले होते .भूक तर कोणालाच नव्हती .पण थोड थोड जेवून सगळे जोपी गेले .अमेय ही अंथरुणावर पडला .गावाला आल्यामुळे निशाच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून जयीणा .एक सारखा तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता .अमेयच्या बाबांचे अमेयकडे लक्ष गेले .अमेय झौप्ला नाही , हे पाहून ते अमेय्ला म्हणाले , अमेय झौप येत नाही का ? उद्या लवकर जायचे ना .मग झौप की ... वडिलांचा आवाज ऐकून अमेयने डोळे झाकाले .आणि तो झौपय्चा पर्यंत करू लागला .
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली .अमेय ही उठला .सगळ उरकून , तो मुंबईला जायला निघाला .आपल्या जवळ असलेले थोडेसे पैसे त्यानी आईच्या हातावर ठेवले . आणि देवाला नमस्कार करून तो मुंबईच्या गाडीत बसला . मुंबईला जाताना मागच्या वेळेसारखी त्याच्या डोळ्यात स्वप्ने नव्हती . त्याच्या डोळ्यात बहिणीच्या गरोदरपानात आणि दुसऱ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले कर्ज कसे फेडायचे , ह्याची काळजी होती .तुटपुंज्या पगारात आपण कोणालाच खुश ठेवू शकत नाही ह्याच दुःख होत .' ' पण हे ही दिवस जातील.' ' अशी कुठे तरी आशा त्याला वाटत होती . अलगद गालावर आलेले पाणी त्याने हाताने पुसून टाकले .
अमेय मुंबईला आला .आणि मामाच्या घरात शिरला . मामाने त्याला जेवण करून घ्यायला सांगितले .अमेयने जेवण केले .आणि तो कामावर निघाला .निदान कामावर अर्धादिवस तरी लागेल म्हणून तो जात होता .पण ऑफीस मधे त्याच्या पुढे काय वाढून ठेवले होते , हे त्याला कुठे माहीत होते .
अमेय ऑफीस मधे आला , तिथे जाताच त्याला त्याच्या मालकानी बोलावले . आणि न सांगता एक दिवसाची सुट्टी का घेतली , आणि आज ही न सांगता अर्धा दिवस कामावर का आला ? म्हणून विचारले . अमेय फार घाबरला . त्याने घाबरत घाबरत सगळ सांगितले .पण त्याचा मालक काही ऐकयलाच तयार नव्हता . त्याने त्याला कामावरून काढायचे ठरवले . अमेय त्याला फार गयावया आला परंतु त्याचे तो मालक ऐकेना .