Julale premache naate - 66 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६६

कॉल वाजत होता... रिंग जात होती पण घेत मात्र कोणी नव्हतं..
"अरे यार डॅड आहे कुठे...?? कॉल का घेत नाही आहे..?"
राजने मोबाईलकडे बघितला आणि कंटाळुन तो बेडवर फेकून दिला.

स्वतःच्या डोक्याला हात लावुन बसला होताच की त्याच्या रूमचा दरवाजावर कोणी तरी वाजवला. कंटाळवाणा चेहरा करतच तो नाखुषीने उठला आणि त्याने दरवाजा उघडला... समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून मात्र त्याचा चेहरा चांगलाच खुलला होता.. कारण समोर त्याचे डॅड उभे होते..

"सरप्राईज माय बॉय...." त्यांनी आनंदाने राजला दरवाजातच मिठी मारली.

"डॅड.....!!!" राजला समोर बाबांना बघून शब्दच सुचत नव्हते. त्याने ही जोरात मिठी मारली. असे हे बाप-लेक किती तरी वेळ मिठीत होते. नंतर दोघांनी स्वतःच्या भावनांना आवरत घातला आणि दोघेही बेडरूममध्ये आले.

"डॅड.. तु मला सांगितलं नाहीस की आज येणार आहेस. मी स्वताच तुला पीक करायला आलो असतो." राज डॅडच्या बाजुला बसत बोलला.

"हो राज. पण मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. तुला माहीत आहे ना एकत्र आपली भेट खूप कमी होते. तुला मी नेहमी सांगतो तिकडे येऊन रहा तर ते तुला नको आहे. म्हटलं आज तुला सरप्राईज देऊ.. कस वाटलं मग माझं ऍडव्हान्स बर्थडे गिफ्ट...!!"


डॅडच्या या वाक्यावर राजने त्यांना घट्ट मिठी मारली.

"थँक्स डॅड. मला माहित होतं नेहमी प्रेमाने तु माझ्या बर्थडेसाठी येशील. आय एम सो हॅप्पी डॅड. थँक्स टू यु.." एवढं बोलून परत त्याने त्यांना मिठी मारली.

नंतर जरा फ्रेश होऊन बाप-लेकच्या गप्पा चांगल्याच रंगल्या... बोलता बोलता राज ने विषय काढला.

"डॅड मला तुझी मदत हवी होती."

"हा बोल ना बेटा.." डॅड मोबाईलमध्ये बघत बोलले.

त्यांनतर राजने सांगायला सुरुवात केली. प्रांजल आणि त्याची भेट.. त्यानंतर पिकनिक.. पुढे निशांतमुळे झालेला वाद. प्रांजलच ऍकसिडेंट.. हर्षलचा प्रांजल ला जीवे मारण्याचा प्रयत्न... हर्षल चा खून..., त्यांनतर प्रांजल ला येणारे कॉल, मॅसेज, आणि आता घडलेला सगळा प्रकार त्याने डॅडला नीट समजावून सांगितला.

ते ही खूप लक्ष देऊन ऐकत होते. आणि विचार ही करत होते. सगळं सांगून राज डॅड च्या उत्तराची वाट बघत होता. त्यांनी काही विचार केला आणि राजकडे बघितले.




"मिस प्रांजलचं पूर्ण नाव काय आहे..??"

"ते बाबा..., प्रांजल प्रसाद प्रधान."

"अच्छा म्हणजे ती आपल्या मुंबई ब्रांच चे सिनिअर मॅनेजर मिस्टर प्राधानांची मुलगी आहे तर... म्हणजे हे तर आपल्या फॅमिली सारखेच झाले. तुम्ही पोलीसांना कल्पना दिली आहे का.???"


"नाही डॅड. तस काही केलं किव्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रांजल किव्हा निशांतच्या घरच्यांना त्रास देईल अशी त्याने आम्हाला धमकी दिली आहे. म्हणून तर आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. डॅड बघ ना काही होतंय का.. तुझ्यातर खूप ओळखी ही आहेत ना.."



"हो राज बरोबर आहे. ठीक आहे मी माझा एक मित्र आहे पोलीसामध्ये त्याला विचारून बघतो तो काही मदत करतो का...!! आणि हो आपण त्याला नक्कीच शोधून काढु तु टेंशन नको घेऊस. पण बाळा एक विचारू का.??" डॅडच्या वाक्यावर राजने फक्त आपली मान डोलावली.

"तुला प्रांजल आवडते ना.???" डॅड च्या या प्रश्नावर राजने जरा लाजतच आपली मान डोलावली.

"अच्छा तो ये बात है।।" डॅड ने ही जरा वातावरण मोकळं होण्यासाठी राज चिडवलं.

"तस काही नाही डॅड. म्हणजे मला ती आवडते, पण तिला मी आवडतो की नाही हे अजून तरी मला माहित नाही. त्यात निशांत तिच्या जरा जास्तच जवळचा असल्याने ते कळणं अशक्य.. ते एवढे जवळ आहेत की मला वाटत कदाचित ते एकमेकांवर प्रेम ही करत असतील." राज जरा नाजरीच्या स्वरात बोलला.

"अरे हे काय..!! अशी लगेच हार नाही मानायची. आणि तु कधी विचारलस का तिला...? कदाचित ते फक्त मित्र असतील. न जाणता तु ठरवू नकोस. असो हे नंतर.आधी आपण तिला त्रास देणाऱ्या व्यक्तीला पकडु. मग मी स्वताच तिच्या बाबांशी बोलण. मग तर ठीक आहे ना..!!" डॅड च्या या वाक्यावर राजच्या गालावरची कळी चांगलीच खुलली होती. त्याने आनंदाच्या भरात डॅड ला जोरात मिठी मारली आणि गालावर एक गालगुच्छा ही घेतला.

"अरे हो हो.. बस आता एवढं ही प्रेम नको. काही प्रेम तिच्यासाठी ही ठेव." अस बोलताच राज अक्षरशः तिथून पळाला.

इकडे मी याच टेंशनमध्ये होते की राजचे डॅड आम्हाला मदत करतील का..? कारण ते एकतर खुप मोठे बीसीनेसमॅन होते. यासर्वात तसही त्यांचा काही संबंध आणि फायदा नव्हताच. पण जर राजने प्रयत्न केले तर काही तरी होऊ शकत होत. बघू आता काय होतंय.


रात्रीच जेवण आवरून मी माझ्या बेडरूममध्ये अभ्यास करत बसले होते. तोच बाजूला ठेवलेला मोबाईल खणखणला... स्क्रीनवर राजचं नाव झळकत होत.

"हा बोल राज..??" मी जरा टेंशनमध्येच मोबाईल कानाला लावला.

"अरे आज माझे डॅड घरी म्हणजे मुंबई ला आले आहेत. आणि मी त्यांना आपल्या प्रॉब्लेम बद्दल सगळी माहिती दिली आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते रेडी आहे आपल्याला मदत करायला. त्यांनी तुला आणि निशांतला उद्या घरी बोलावल आहे. हेच सांगायला कॉल केला होता. सॉरी खूप लेट कॉल केला ना मी..." राजने न थांबता सगळं एका दमात सांगून टाकल.

"नाही नाही... मी आताच जेवुन अभ्यास करत होते. खुप खुप थँक्स राज. तुझे डॅड तय्यार झाले हे ऐकून खरच खूप भारी वाटलं." मग आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा करून उद्या भेटायचं ठरवुन आम्ही कॉल्स ठेवले.



To be continued.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED