गोस्ट एका वाचकीची - भाग -५ Anji T द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गोस्ट एका वाचकीची - भाग -५

दुसऱ्या दिवशी सकाळचे ६ वाजता ग्रुप मध्ये सुमीतचा मॅसेज असतो.

अंजली राम ला tickets नाही मिळत आहे conform तर पहाते का तू ??
Tickets बुक करायचे आहे, तुझ्या कढे अँप आहे त्यात तू तत्काळ मध्ये पहा ११ वाजता उद्या साठी जर मिळेल तर करून घे बुक.

मी मॅसेज पाहिला, मी काय लिहू कळत नव्हता. मला कालचा विचार करून अजीबात जायची इच्छा नव्हती. मला समझत नव्हते मी कसे नाही म्हणू की मला नाही यायचं.

खूप दिवस नंतर सर्व सोबत जाण्या साठी खूप खुश होते. सुमीत, प्रिन्स पण काय घालायचं काय नाही, कुठे जायचं काय करायचं सर्व ठरवून प्लान करून ठेवतात.

राशी सुद्धा ऑफिस मध्ये खोटं बोलून यायचं नक्की करते. आणि अचानक माझ्या मुले सर्वांचं ट्रिप खराब करावं मला पण कळत नव्हता.

सुमित, प्रिन्स, राशीला तर माहित पण नाही के हि ट्रिप रामने का प्लान केली कोणत्या कारणा नुसार.

मी फोन मध्ये पाहत होती tickets त्यात तात्काळ मध्ये tickets मिळत असते. ८ वाजले असतात माझ्या कडे विचार करायला पण वेळ कमी असतो.
मी सर्व सध्या विसरून फक्त जाण्याचा विचार करते. आणि मी ग्रुप मध्ये लिहते कि टिकेट्स मिळत आहे मी बुक करून घेणार.

तेवढ्यात रामचा मॅसेज येतो कि त. Thanx अंजली तू येत आहे.

मी राम ला रिप्लाय दिला कि मी फक्त हि ट्रिप कॅन्सल नको व्हायला म्हणून येत आहे. बाकी तू असं नको समझू की मी तुझ्या या तुझ्या फॅमिली साठी येतेय.

Okay anjali please विसर सर्व सध्या मी तुला प्रॉमिस करतो की कोणी तुला काही नाही विचारणार.

मी १० ला ऑफिस साठी निघत असते रोज पण त्या दिवशी मी लवकर निघाली. मला रस्तात थांबून टिकेट्स काढायचे होते तर.
मी १०:५५ चा अलार्म लावते आणि इअरफोन कानात लावून निघते.

माझं लक्ष ११ वाजे वर जास्त असत. अलार्म वाजतो मी साईड ला थांबते आणि टिकेट्स बुक करायला लागते.
मला कन्फॉर्म टिकेट्स नाही मिळत काही कारण नुसार. काही ऑपशन नसल्या मुले तर मी waiting ticket काढते आणि ग्रुप मध्ये सांगते कि कॉंफोर्म नाही मिळाली तर waiting tickets वर travel करावा लागनार.

रात्रीचा आणि ४ तासाचा प्रवास असल्या मुले सर्वाना काही प्रोब्लेम नसते.

नेहमी प्रमाणे राम रात्री मॅसेज करतो, तू काहीही विचार नको करू please. आपण जस अगोदर नॉर्मल बोलायचो आपण तसाच बोलू सध्या.
तू जो पर्यंत त्या गोष्टी साठी नाही comfortable तो पर्यंत मी तुला केव्हाच काही विचारणार नाही.

मी पण त्याला तेव्हा Thanx म्हणून चाल उद्या निघायचं आहे तर पॅकिंग करते असे मॅसेज करते.

सर्व खूप excited असतात त्या ट्रिप साठी सर्वांचे ग्रुप मध्ये मॅसेज सुरु असतात कोण काय काय घेत आहे, काय घालणार काय कुठे केव्हा कस जाऊ त्यांचं सुरु असते.

सकाळ झाली असते मी ऑफिस ला निघते. माझं बेग घेऊन मी डीरेक्ट ऑफिस संपून राशीच्या रूम वर जाते. माझं लॅपटॉप तिच्या रूम वर ठेवून मी राशी आणि राम स्टेशन वर पोहचतो. सुमित आणि प्रिन्स पण सोबत तिथे पोहचतात.

रात्रीचे ९ वाजे ची ट्रेन असते. आम्ही waiting मध्ये न बसता लोकल डब्बा मध्ये बसतो जागा असल्या मुले.

सर्वाना जागा मिळून जाते. खूप मस्ती करतात सर्वे. सर्वांची खुशी खूप दिसते त्याच्या चेहरा वर.
आम्ही गेम खेळतो टाइम निघून जावा म्हणून. रात्रीचे १:३० वाजतात पण स्टेशन काही लवकर येत नाही.

अचानक ट्रेन मधेच थांबते आणि स्टेशन यायला १ तास उशीर लागतो.

तेवढ्यात रामचे बाबाचा कॉल येतो काय झालं आले नाही आजून पर्यंत. तर तो सांगतो कि वेळ लागणार तुम्ही काळजी नका करू आम्ही येतो.
त्याचे बाबा घ्यायला येण्या साठी म्हणतात आणि सर्वांच्या नाही म्हटल्या वर पण ते यायची हट्ट करतात.

आम्ही स्टेशन वर २:३० ला पोहचतो. मागच्या रस्त्यानि जातो तर त्याचे आई आणि बाबा दोघेही आम्हाला घ्यायला आले असतात.
ते कार आणि ऍक्टिवा वर येतात.

त्याचे बाबा कार नि येतात कारण आम्ही ५ असतो आणि त्यान्हा रिटर्न मध्ये ऍक्टिवा वर जावं म्हणून त्याची आई ऍक्टिवा आणते.

रामच्या आई बाबाच प्रेम पाहून एक old movie couple वाटत होत. ते दोघेही खूप रोमान्टिक आणि मजाक मस्ती करत असतात.

आम्ही ५ कार नि निघतो आणि त्याचे आई बाबा ऍक्टिवा नि येतात.

काही १५ मिन मध्ये आम्ही घरी पोहचतो.

आम्ही बसतो भरपूर वेळ गप्पा गोष्टी करत. त्याच्या आईला मराठी येत असते तर त्या मला मराठी मध्ये बोलायला सांगतात. आम्ही खूप वेळ बोलतो त्या स्वभावाने खूप छान असतात. त्याचे बाबा पण खूप मजाक मस्ती करतात.

तेवढ्यात राम चे बाबा चहा कॉफी करायला सांगतात काकुन्हा. तेवढ्यात काका म्हणतात कि मी नास्ता घेऊन येतो तो पर्यंत चहा कर.
काकान्हा बाहेरच खायला खूप आवड असते तर ते नेहमी वेळ पाहतात केव्हा असं खायला मिळणार.

तर रात्रीचे ३:३० वाजले असतात काका सर्व खायला आणतात बाहेरून आम्ही चहा कॉफी नास्ता करतो नि मग सर्व झोपायचं नक्की करतो. दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत निघायचं असते म्हणून.

पण कोणाला काही झोप नाही येत. सर्व बसले असतो तेवढ्यात पाऊस येतो जोरात. आणि आम्ही सर्व बाहेर जाऊन बसतो.

सकाळचे ५ वाजतात सर्व झोपतात.

रामच्या घरी गेल्या वर सर्व पाहून मला नॉर्मल वाटायला लागलं. त्याचे आई बाबान्हा पाहून काही वेगळं नाही वाटलं.
त्या नंतर मी पण बोलायला लागली आणि काही न विचार करता ट्रिप एन्जॉय करायचा विचार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेला सर्व उठले. आम्ही ब्रश करून चहा घेतला. काकू स्वयंपाक करत होत्या.
सर्व आंघोळी साठी नंबर लावून बसले असतात. मी आणि राशी शेवटी जायचं ठरवतो तेवढयात काकू ओरडतात की वर पण बाथरूम आहे तिथे जा बाकीचे आंघोळी साठी.

काका कॉलेज वर lecturer असतात त्यांच्या कॉलेज मध्ये exams सुरु असतात तर ते लवकर जातात कॉलेज ला जेवण करून.

सुमित आणि प्रिन्स जातात आंघोळीला तेवढ्यात मी आणि राशी काकुन्हा स्वयंपाक मध्ये मदद करतो. मला काही स्वयंपाक करता येत नाही पण तरी सुद्धा मी म्हटलं कि मी पुरी लाटून देण्यात हेल्प करू का ??

काकू राहू दे म्हणतात पण माझ्या जास्त फोर्स मुले त्या करू देतात.

त्या नंतर राशीच पण आंघोळ होऊन जाते नि मी जाते आंघोळीला.

मला यायला वेळ लागतो तर आम्हाला निघायचं असते म्हणून सर्व जेवण करण्या साठी बसले असतात माझ्या साठी कोणीच थांबत नाही.
काकू माझ्या सोबत बसतात जेवायला आम्ही करतो जेवण मला काही एवढं जेवण जात नव्हता तेव्हा त्याच्या सोबत थोडं comfortable नसते मी.
हा पण जेवण खूपच स्वादिस्ट असते. काकू स्वयंपाक खूप छान बनवतात ऐकलं होत पण खरंच खूप छान होता पण.

सर्व माझी वाट पाहत बाहेर बसले असतात दुपारचे १ वाजता असतो. मी शेवटी असल्या मुले मला तयारी पण करू नाही देत सर्व.
आम्ही त्या दिवशी अगोदर दमनला जायला निघतो.

राम ची कार असते आणि फक्त त्यालाच कार चालवता येत असल्या मुले तो खूप खुश असतो कि त्याची कार सलामत हातात आहे.

नवसारी इथून काही ३ तास दमन आहे.

म्युसिक आणि मस्ती करतात करता आम्ही दमन इथे एन्ट्री करतो.


to be continued....