चूक आणि माफी - 16 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चूक आणि माफी - 16

अमेय्च्या मामाचा मुलगा निखिल अमेय्ला घेऊन घरी आला .तो घरी आल्यावर निखिल सारखे प्रश्न त्याचा मामा ही काळजी पोटी विचारू लागला .अमेयने त्याना ही तीच उत्तरे दिली जी त्याने निखिलला दिली होती .मग सगळे जेवायला बसले .किती तरी दिवसानी अमेय वडापाव सोडून घरचे जेवण जेवत होता . अमेय आज अगदी पोटभरून जेवला . आणि झोपन्या साठी अंथरुणावर आडवा पडला .पण , त्याला एकच चिंता सतावत होती .ती म्हणजे नोकरी .तो ज्याच्या साठी मामाच्या घरापासून दूर होता , ती म्हणजे नोकरी जी त्याला अजून ही मिळाली नव्हती .
एवढ्यात निखिल त्याच्या जवळ आला .अरे अमेय , उद्या जरा लवकर उरकून तयार हो . मी माज्या एथे तुज्या नोकरी विषयी बोलो आहे .बघू काय होतय .
नोकरी ऐकताच अमेय उठूनच बसला . नोकरी ......अमेय मोठ्याने ओरडला .
निखिल त्याला म्हणाला , अरे ओरडू नकोस . सगळे जौप्लेत .आणि तुज्या ह्या नोकरी पेक्षा चांगला पगार तुला मिळेल . आणि आता तू ईतके दिवस कामावर गेला नाहीस .म्हणजे तुजी नोकरी ही गेली सम्जय्ची ....ह्यावर अमेय गप्पच बसला .
दुसरा दिवस उजाडला , अमेय निखिलच्या आधीच उरकून तयार झाला . त्याला त्याच्या आधीच उरकलेल पाहिल्यावर निखिल हसू लागला .अरे अमेय अजून वेळ आहे .ऑफीसला जायला .आणि ही कपडे काय घातलीस . यावर कस तरी थोण्ड करून अमेय म्हणाला , पण मज्याकडे हे च कपडे आहेत .
यावर निखिल म्हणाला , अरे माझे कपडे घाल .निखिल नी कपाटातला त्याचा नवीन शर्ट काढला .आणि अमेय ला घालायला दिला , आणि म्हणाला .अरे शर्ट महत्वाचा नाही , तुजी नोकरी महत्वाची आहे . आता मी तुला दिलाय , उद्या गरज लागल्यावर तू मला दे ... झाल .
त्यावेळी अमेय एक नवीन धडा शिकला ...आयुष्य ....वेळ महत्वाची ....त्यावेळी केली मदत ...म्हणजे साक्षात देवाने केलेली मदत . आणि प्रत्येक व्याक्तिने प्रत्येकाला मदत केली पाहिजे .आणि समोरच्याने सुद्धा त्याची जाणीव ठेवली पाहिजे .
अमेय आणि निखिल आता ऑफीसमधे आले होते . थोड्या वेळाने बौस्स नी अमेय्ला केबिन मधे बोलावले . दोन , तीन प्रश्न विचारून त्याला नोकरी दिली . अमेय भलताच खुश झाला . ह्या नोकरीत अमेय्ला चांगला पगार मिळणार होता , त्याच सगळ कर्ज तो फेडून टाकणार होता . पण , आपल्याला कुठे माहीत असत की पुढे काय वाढून ठेवलय . अमेय च्या बाबतीत ही काहीसे हेच होत .
अमेय आता नवीन नोकरीवर जात होता .तो खूप खुश होता .त्याला मनासारखे काम मिळाले होते , आणि पगार ही मनासारखा मिळत होता .अमेय तिथे ही नेहमी प्रमाणे मन लावून काम करत होता . आणि थोड्याच दिवसात तो ऑफीस मधे सर्वांचा लाडका ही झाला .आता अमेय कामाबरोबर पुढच शिक्षण घेऊ लागला दिवसभर काम आणि रात्रीचा अभ्यास त्याच नेहमीच गणित ठरलेल होत . अमेयला आता ही नवीन नोकरी लागून दोन महिने झाले होते .
एक दिवशी अमेय असाच कामावर निघाला होता , आज त्याच्या सोबत त्याच्या मामाचा मुलगा नव्हता .त्याच काहीतरी महत्वाच काम असल्यामुळे तो सुट्टीवर होता . त्यामुळे अमेय एकटाच कामावर निघाला होता . तो घरातून निघाला .आणि तडक रेल्वे स्टेशन वरती आला .उशीर झाल्यामूले त्याच सगळ लक्ष रेल्वे कडे होत .कधी एकदा रेल्वे येते .आणि तो त्या रेल्वे मधे बसून कामावर वेळेवर पोहचतोय अस त्याला झाल होत . त्याला कोणातरी मागून आवाज देताय , असा भास झाला . त्याने ईकडे तिकडे पाहिले .तर त्याला कोणीच दिसेना .समोरून त्याची रेल्वे आली .आणि तो रेल्वे मधे बसून निघून गेला .