दोन टोकं. भाग २ Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

दोन टोकं. भाग २

भाग २

let me love you ची instrumental रिंगटोन वाजत होती.

" काय यार, झोपू पण देत नाहीत .एकतर झोप नाहीये रात्रभर आणि त्यात फोनचा सकाळी सकाळी भोंगा. "

" कोण आहे ?? 😠 " अस्सल पुणेकराने बोलावं तसं ती म्हणाली.

" अं......... मॅम तुम्ही कधी येणार आहेत ?? " हॉस्पिटलमधून फोन आला होता.

" आता यायचय का ?? " तीने रागातच विचारलं.

" अंं........ म्हणजे ते........ "

" ए बाराखडी म्हणून झाली असेल तर पुढे बोल. डोक्यात जाऊ नको. "

" येऊ शकत असाल तर बघा ना प्लीज. "

" बर येते. " आणि तसाच फोन जोरात तीने बेडवर आपटला. उठून आवरून निघाली ती. गाडी बंद पडलेल लक्षात आलं तसं मेकॅनिकला फोन करून सा़गितल आणि हॉस्पीटलला निघाली.

तिथे गेल्या गेल्या आपली झोप पूर्ण न झाल्याचा राग सगळ्यांवर काढायला सुरुवात केली,
" टेबल नीट पुसून ठेवत जा, किती घाण साचलीये. हां त्या प्रीतीला बोलावं, काय काम होत की मला कॉल करून बोलावलं. "

तेवढ्यात हाताखालच्या मुलाने कॉफी आणून दिली,

" ए....... किती दिवसांपासून माझ्यासोबत आहेस?? माहिती नाही का मला चहा लागतो. फक्त चहा. परत कॉफी आणलीस ना तर कप फोडून टाकेन. "

बिचारा घाबरत पटकन निघून गेला तिथून. तेवढ्यात प्रीती आली.
घाबरत घाबरत ही काही विचारणार की तितक्यात पंडित आला. डॉ. पंडित हा एक ट्रेनी डॉक्टर पण आपल्या सिनियरच्या रागाला हा एकटाच हँडल करु शकतो. त्याने हातानेच खुणावल मी बघून घेतो आणि सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं.

" काय झालं मॅम, एवढी चिडचिड करायला. झोप नाही झाली ना तुमची वाटलच मला. आता एक काम करा, मस्त आल्याचा चहा प्या. बघा कसं मस्त वाटतंय. "

" काय प्रॉब्लेम झालाय, मला का बोलावलं ?? माहिती आहे ना मी रात्रभर होते इथं मग 😠😠 "

तेवढ्यात बाहेर कोणीतरी ओरडत तिच्या केबीनकडे येत असल्याचं वाटत होतं आवाजावरून.

" घ्या, प्रॉब्लेम स्वत:हून चालत येतोय तुमच्याकडे 🤭 " हसत हसत पंडित म्हणाला.

तेवढ्यात तो माणूस केबीनमध्ये ओरडत आला.
" ए कुठाय तो डॉक्टर, साला सांगितलं होतं मला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे पण नाही, मुद्दाम सिझर केल. नुसता पैसा उकळायचे काम करतात. कुठं लपलाय का ??? "

" कोण हवंय तुम्हाला ?? " ती आधीच चिडलेली होती तरी स्वत:ला शांत ठेवत बोलत होती. पेशंट कितीही चिडला तरी डॉक्टरांनी शांतच रहावं लागतं .

" तो डॉक्टर पाहिजे. ज्याने रात्री माझ्या बायकोची डिलीव्हरी केली. "

त्याच बोलण मध्येच तोडत ही म्हणाली, " मीच आहे ती डॉक्टर, बोला काय हवंय "

" तु आहेस का ती ?? माझ्या विरूद्ध जायची हिम्मत कशी झाली. 😠😠. सांगितलं होतं तरी ऐकल नाही माझं. "

आधीच ती भडकलेली होती, त्यात ह्या माणसाने डायरेक्ट अरे-तुरे केलं. तरीही शांत राहत हीने परत त्याला विचारल,
" नीट सांगाल का काय झालंय ते ?? तुमच्या मिसेसला काही त्रास होतोय का ?? "

" ए तुला सांगितलं होतं ना नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे म्हणून मग सिझर कशाला केलं ?? नुसतं पैसे उकळायचे धंदे करा....... तिला काय नाय झाल पण झालं असतं काही तर कितक्यात पडलं असतं. "

" हे बघा, मुद्दाम नाही केलं सिझर. बाळाने पोटात शी केली होती म्हणून सिझर करावं लागलं. "

" हे असले फालतू कारण दिलं म्हणजे आपण झाकून जातो असं वाटतं का ?? साला नुसतं पैसे पाहिजेत तुम्हाला आणि त्यासाठी काहिपण करता...... आता ते बिल आणुन टाकणार आमच्या मढ्यावर तुमचे लोक..... तुझ्यासोबत सगळेच अशे आहेत का ?? "

आधीच एकेरी उच्चार केल्यामुळे आणि त्यात ह्याच बोलत ऐकून तर सटकलीच तिची. एवढा वेळ शांततेत बोलणारी ती ओरडली,
" आवाज कमी करा, हॉस्पीटल आहे हे. आणि बाळाने पोटात शी केली होती म्हणून सिझर केल. नॉर्मल केलं असतं तर बाळ तर जंगलच नसतं उलट पेशंटला पण धोका झाला असता. "

तिला मध्येच अडवत तो परत ओरडला,
" सगळीकड तुमचचं राज्य असल्यावर आता आम्ही काय बोलणार. हे असले डायलॉग पिक्चर मध्ये चांगले वाटतात. मला माहिती आहे ना तुम्ही डॉक्टर लोक पैशासाठी करता हे असलं. "

आता मात्र तीचा पेशंस संपला होता. एकतर आपण आपली झोप घालवून काम करायच आणि असले भलते सलते आरोप ऐकून घ्यायचे,
" हां घेतो आम्ही पैसे. देवाचा अवतार नाहीये नुसत्या हवेवर जगायला, आम्हाला पण खायला लागत. फालतू आरोप करायचे नाहीत. इतकंच वाटत तर घरी करायची ना डिलीव्हरी तुझ्या बायकोची इथं आणायला मी सांगितलं होतं का ?? "

त्याला एकेरी बोलल्यामुळे तो अजून जोरात ओरडला, " तुला माहिती नाही मी कोण आहे, नाही दवाखाना बंद केला तर बघ. लई माज आहे तुला "

" ए तु जो कोणी असशील तो मला फरक नाही पडत. आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये नीट बोलायचं नाहीतर एक मिनिट पण नाही लागणार मला....... "

" काय करशील ?? मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. "

" पंडित, ह्यांच्या पेशंटच सामान, ते बाळ उचल आणि हाकलून दे इथुन. सगळं सामान बाहेर फेकून द्यायचं लगेच . "
" मॅम पण असं कसं....... " पंडित काही बोलायचा प्रयत्न करत होताच की ती परत ओरडली,
" सांगितलेल ऐकू येत नाही का ?? आत्ता लगेच फेकून द्यायचं. right now . " आणि तशीच तरातरा चालत कॅन्टीनकडे निघाली होती.

मागून त्या माणसाचं ओरडत चालूच होतं तरीही ही लक्ष न देता निघून गेली.
" ए एक चहा दे रे. आयला डोकं उठवलं सकाळी सकाळी . "

तेवढ्यात तिला ती मुलगी दिसली जी सकाळी गार्डन मध्ये दिसली होती.
ती रागात होती हे पण विसरून गेली. नेमकं काय होतं त्या मुलीत काय माहिती पण हि सगळा राग विसरुन गेली. ही इथे काय करतीये यांचा विचार करतच होती की ती मुलगीच हिच्यासमोर येऊन बसली.
आता मात्र‌ हीची चकित व्हायची वेळ आली 😳😳.

" हाय मी सायली. अं....... remembered ?? "

तीने एका झटक्यात हिला क्लीन बोल्ड करून टाकलं. हि अजूनही तिच्याकडेच बघत होती.

" विसरलात का ........ ?? " तीने परत तोंडासमोर हात हलवत विचारलं.

" नाही नाही. मी विशाखा. इथे डॉक्टर आहे. "

" हो माहितीये मला ☺️ " तीने चेहऱ्यावर हासू ठेवत उत्तर दिलं.

काय बावळट आहे मी, आता इथे आहे म्हणजे डॉक्टरच असणार ना....... तिला सुद्धा कळलं ते. शी...... 🥴🤦
ओयीश...........!!! कसली भारी हसती राव ही 😐, हीच तिला बघून मनातल्या मनात बोलणं चालूच होतं.

" काय झालं , असं का बघताय तुम्ही. " तीने परत हात हलवत विचारलं.

" अं.......... काही नाही. कुठे काय. काही नाही. " विशाखा काय बोलत होती तीच तिलाच कळत नव्हतं.

" ते भांडण झालं ना, ते बघितलं मी. Actually मला असं सांगायचं होतं की प्लिज तुम्ही त्या पेशंटला नका ना काढू दवाखान्यातून. माझी दिदी आहे ती. प्लीज, जीजूंकडून मी माफी मागते तुमची. त्यांचा ताबा सुटतो रागात स्वत:वरचा पण त्याची शिक्षा दिदीला का ??? प्लीज नका ना तसं करू तुम्ही. त्यांना थांबायला सांगा ना, ते सामान बाहेर काढतायत दिदीच. "

" आम्ही पैशांसाठी काम करतो असं म्हणाला तो. मान्य की काही असतात अशे पण म्हणजे सगळेच डॉक्टर तशे असतील असं नसतं ना....... आणि वर तर परत धमकी सुद्धा देतोय तो माणूस...... आणि तरीही मी शांत बसायच का ??? तर sorry. "

" मान्य आहे की ते चुकले पण म्हणून त्याची शिक्षा तुम्ही तुमच्या पेशंटला नाही देऊ शकत नाही ना...... पेशंटची जबाबदारी असते तुमच्यावर even तुम्ही तस लिहून पण घेता ना..... पेशंटचे नातेवाईक panic होऊन काहितरी बोलून जातात पण म्हणून तुम्ही पेशंटला त्रास देणार का ???? "

आता मात्र विशाखा ची बोलती बंद झाली होती. ती तशीच उठली, सायलीला वाटलं आपण हिला समजावू नाही शकलो.
विशाखा तशीच चालत परत त्या वॉर्ड कडे गेली,
" पंडित सगळं सामान परत ठेव. "

" काय 😳😳😳 पण तुम्ही तर म्हणाला होता ना.............. " तो तर चकितच झाला. अचानक मॅमचा राग कसा काय गेला.

" सांगितलं ना एकदा, ठेव परत. " एवढ सांगून मागे वळून पाहिल तीने तर सायली तिच्याकडे बघून हसली. विशाखा तशीच घरी निघून गेली.

इकडे तो पंडित विचार करत होता, मॅम रागाला आल्यावर तर कधीच कोणाच ऐकत नाही तर मग अचानक एवढ्या शांत कशा काय झाल्या ??? पॅन्ट्री मध्ये नेमकं काय झालं असेल असं ??? एकदा तवा गरम झाला की थंड व्हायला त्याला बराच वेळ लागते मग आज त्या तव्यावर कोणी पाणी तर ओतलं नसेल 🤔🤔 .......

विशाखा घरी निघून आली. गाडी मेकॅनिकने आणून लावली होती. तशीच आत निघून गेली, चहा केला आणि पीत विचार करत बसली.
" एवढी कशी काय शांत आहे ही, सकाळी तर रडत होती पण आत्ता हसली तेव्हा किती छान दिसत होती. तिला बघितल्यावर माझा राग कसा काय निघून गेला. ती जे काही बोलली ते मला पटलं म्हणून गेला की तिच्या शांत चेहऱ्याकडे बघून गेला. काहीतरी नक्कीच आहे तिच्यात.
सकाळी पण तीच्या डोळ्यात पाणी बघितलं आणि सिगरेट टाकून दिली मी, का ????? रडली तर रडली मला काय फरक पडणार होता असाही पण तरीही मी टाकून दिली, आणि आत्ता पण तीने सांगितलं तर लगेच मी सामान परत ठेवायला लावल, का ????? हिच्याशी मैत्री करायला पाहिजे.........
शी....... यार...... तीचा नंबर पण नाही घेतला, काहीच माहिती नाहीये तिच्याबद्दल मग आता कसं शोधणार. "

विचार करता करता कधी दोन कप चहा घेतला ते तिचं तिलाच कळालं नाही.
" अरे, हां.... तिची बहिण आहे ना ती. मग ती देईल हिच्याबद्दल माहिती.