Two points - 6 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग ६

भाग ६

माझ्या सोबत ह्या बॅग घेऊन येणार का ?? असं विशाखा ने विचारलेल्या बरोबर सायली उडाली.

" कोण मी 😳😳 "

" नाही नाही. तु नाही. त्या दुकानदाराला विचारलं 😤 "

" सॉरी पण म्हणजे असं अचानक असं ना. आणि अजून माझी खरेदी व्हायची आहे. "

" मग जा करून ये. तोपर्यंत मी इथेच थांबते. हां पण पळून नाही जायचं . जा जाऊन ये पण प्लीज जरा लवकर ये. हवं तर मी परत तुला तुझ्या घरी ड्रॉप करेन. "

" ओके. मग थांबा तुम्ही इथे मी आलेच. " असं म्हणून सायली गेली. विशाखा सगळ्या बॅग सांभाळत तिची वाट बघत बसली होती. तब्बल दोन तासांनी सायली हातात भरपूर बॅग घेऊन आली.

" सॉरी, खुप वेळ थांबलात का तुम्ही ??? " सायली ने हातातल्या बॅग कसंबसं सांभाळत तिला विचारलं.

" नाही नाही. फक्त दोन तास 😐. "

" तरी आज लवकर उरकल मी सगळं. जास्त वेळ नाही घेतला. "

" दोन तास लवकर आहेत 😲😳..... "

" हो. नाहीतर दिवस जातो सगळा तरी काही पसंद पडत नाही. 😁😝 "

" बर मी कॅब बुक केलीये, येईल ती इतक्यात. " बोलत होतीच की तेवढ्यात कॅब आली. तशा दोघींनी सगळ्या बॅगस् कॅबमध्ये ठेवल्या आणि निघाल्या. सायली बडबड करत होती पण विशाखा च लक्षच नव्हतं.
एकतर विशाखा ने आधीच आवडीच काम केलं होत त्यात सकाळपासून उपाशी त्यामुळे डोकं दुखणं होतं तीच आणि सायली होती की थांबायचं नावच घेत नव्हती.


" तुम्हाला सांगु का, पुण्यात गाडी घेऊन येऊच नये त्यातल्या त्यात तर तुळशीबागेत अजिबात नाही. एकतर पार्किंगला जागा नसते आणि त्यात भर म्हणजे ट्रॅफिक...... तुम्हाला University ला नाही लागलं का ओ ट्रॅफिक 🤔. कस काय आलात तुम्ही देव जाणे.... "

" मी खुप म्हातारी वाटते का ?? " विशाखा ने विचारल तर सायलीला वाटलं की ती अजून त्या दुकानदाराचचं डोक्यात घेऊन बसलीये.

" तुम्ही त्या माणसाचं बोलणं का एवढ मनावर घेतात. तो आपलं उगीच बोलायचं म्हणून बोलला. तुम्ही छान आहात ओ दिसायला. एकदम डॅशिंग टाईप, मेकअप नाही, काहीच नाही . साध आणि सिंपल ☺️ "

" इतकं नोटीस केलं 😳..... "

" हां...... म्हणजे दिसलं ते सांगितलं..... 😀 "

मला वाटलं होतं की मीच बावळटा सारखी हिला बघते पण हीने सुद्धा नोटीस केलं मला. म्हणजे आता मी मैत्री करायला विचारलं तर ती नाही म्हणणार नाही.
" ये........ 🤗 " विचार करता करता विशाखा जोरात ओरडली.

आणि त्यामुळे सायली जोरात दचकली. " काय झालं " तीने विशाखाला विचारलं.

" काही नाही " म्हणून तीने लगेच जीभ चावली.
" आणि प्लीज मला आहो जाहो नाही करायचं. मी काही काकु नाहीये 🥴. " अजुनही हीच्या डोक्यात तेच चालु आहे म्हणून सायली हसली.
" त्यात हसण्यासारख काय आहे 🤨. नाही तर नाही. विशाखा च म्हण. "

आणि ते ऐकून ड्रायव्हर हसला 😆😅.

" तुला काय झालंय हसायला 🤨, पुढे बघुन गाडी चालव. " विशाखा ड्रायव्हरवर चिडलेली बघून सायली हसायला लागली.

" तु खुप छान हसतेस. ☺️ "

सायली हसायचचं बंद झाली, " 🙁 "

" अरे खरंच ☺️. even डोळे छान आहेत.‌ एकदम काळेभोर.... "

" Thank you " म्हणून ती खिडकीबाहेर बघत बसली.
आश्रम आलं तसं दोघी हि उतरल्या.

" हे तर आश्रम आहे ना 🤔 "

" हो. हे माझं आधीच घर आहे. "

" तु अनाथ आहेस 😨 "

" नाही. मला एक काका आहे आणि ६ बहिणी आहेत. अनाथाला कोणच नसतं पण मला इतके सगळे आहेत तर कसं काय अनाथ असणार मी ........ चल आत. "

सायलीला चांगलाच धक्का बसला होता. म्हणजे असा विचार सुद्धा केला नव्हता की इतकी मोठी गायनॅक अशी अनाथ असेल. कधी कधी आपण विचार करतो त्यापेक्षा वेगळंच काहीतरी निघत.

दोघी आत गेल्या तसं सगळेजण सायली कडे बघायला लागले. काका सुद्धा तीच्याकडे बघत होते त्यामुळे तीला खुपच अवघडल्यासारखं झालं.

" ही कोण " काकांनी विशाखाला विचारलं.

" माझी मैत्रीण सायली "

" क्काय मैत्रीण 😳😲 " काका जोरात बोलले तर मागुन लगेच एक छोटी ओरडली,
" ते पण तुझी....... घेतलीस काय सकाळी सकाळीच "

" ए बुटके. दात पाडीण काय. मला मैत्रीण नाही होऊ शकत का 🤨 "

" चल. चल. मला कसं माहिती नाही. "

" तुला सांगायला तुम्ही आमचे कोण ?? काका की मामा ?? "

ऐकुन सगळेच हसायला लागले. त्यात सायली सुद्धा.
मग काकांनीही विचारलं तेव्हा विशाखा ने सगळं सांगितलं.

" अगं, तु पुण्यात गाडी घेऊन गेली होतीस 😲. वेडी बिडी आहेस की काय ??? आता त्या पंडितला सांग , तो घेऊन येईल घरी गाडी. म्हणून म्हणत असतो जात जा कधी तरी खरेदीला कळेल तरी सगळं. पण नाही. सासरी कसं होणार देव जाणे. सासु उद्धार करणार आहे माझ्या नावाचा 😒 "

" सगळेचं खडुस असतात का तुझ्यासारखे 😏. "

" वा म्हणजे मी खडुस " काकांची आणि विशाखाची खडाजंगी चालु होती आणि सायली मात्र गप्प एका ठिकाणी बघत थांबली होती. घरी पण जाऊ शकत नव्हती कारण बाकीच्या पोरी तिलाच बघत बसल्या होत्या.

" मी हिला घरी ड्रॉप करते, स्कुटीची चावी दे. "

" सकाळपासून काहीच खाल्लं नसणार आधी खाऊन घे मग जा तीला सोडायला. " आणि काकाने सगळ्यांना खायला आणून दिलं.

सायलीला खाताना सुद्धा त्या पोरी निरखून बघत होत्या. मधेच एकाने विचारल,
" तु खरच विशाची मैत्रीण आहेस ??? "

" हो. "

" असं एका दिवसात...... नाही नाही चार - पाच तासांत हिला मैत्रीण केलीस ??? "

" हो. "

" का ???? "
" अं..... " जेवढ्यास तेवढंच उत्तर देत होती सायली पण हत्या प्रश्नाला काय बोलायचं कळलंच नाही हिला.

" ते....... असंच केली. "

" असंच...... मग कुणाशी पण करायची ना. तुला हिच मिळाली का ?? " आणि असं म्हणून त्या एकमेकांना टाळी देऊन हसायला लागल्या. 😁😁😁

" काका 😤😤😤😡. ह्यांना सांग काय. यार खातील माझ्या हातचा. "

" ए....... गप्प बसा गं. " खोटं खोटं ओरडत काका पण हसत होते.

" मला असंच करतात सगळे. जा आता येतच नसते मी.". म्हणत स्कुटीची चावी घेऊन सायली जवळ आली.
" तुला कुठे सोडायचय ?? सांग. "

" आकुर्डीत. ते इस्कॉन मंदीर आहे ना तिथेच राहते. "

" मला माहिती नाहीये ते कुठं आहे. तु रस्ता दाखव मी सोडते. "

" मी चालवु का गाडी ?? म्हणजे मला येते आणि लहरत पण माहितीये. ते सांगायच म्हणजे अवघड जाईल. "

" नक्की येते ना गाडी. "

" हो " आणि सायली ने गाडी ताब्यात घेतली. दोघी खुप दिवसांनी भेटलेल्या मैत्रीणींसारख गप्पा मारत होत्या.
कसं होतं ना, आधी एकमेकींना बोलायचं म्हणजे असं बोलणार म्हणून टाळत होत्या आणि आत्ता असं बोलत होत्या जणु बिछडे मेलें की बहने.......

विशाखा सायलीला सोडून हॉस्पीटलला आली. पंडित कडे गेली.
" पंडित माझी गाडी घेऊन येतोस का ?? "

" कुणाची ?? "

" माझी गाडी. पोलीस स्टेशन मधून आणायची आहे. "

" काय पोलीस स्टेशनमध्ये गाडी 😲😲...... का ???? म्हणजे काय केलं ?? कुणाला उडवलं का ???? की सिग्नल तोडला ??? "

" ए....... गप. असलं काहीच केलं नाही मी. " आणि विशाखा ने सगळं महाभारत परत सांगितलं. जसं सांगितलं तसा पंडित जोरजोरात हसायला लागला.

" त्यात दात काढण्यासारख काहीच नाहीये 😒. मला माहिती नव्हतं म्हणून तसं झालं. "

" पण तरीही तुळशीबागेत कोण गाडी घेऊन जात.... आणि ते पण तिथं पार्क 😂😂😂😂 "

" जा .......‌ गाडी आण माझी " आणि तणतणत केबीनमध्ये आली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED