Two points - 5 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग ५

भाग ५

विशाखाने आता परत भेट होईल ही आशाच सोडली होती. ती आधी जिथे जिथे भेटली होती त्या जागा पालथ्या घातल्या होत्या. मनात वाटायचं की आज तरी चुकून भेट होईल पण झालीच नाही. शेवटी तीने ही तो नाद सोडला. आता परत विशाखा तिच्या लाईफ मध्ये बिझी झाली. हॉस्पिटल, घर आणि आश्रम या तीन जागांभोवतीच तिचं जग फिरत होतं.

सायली च ही तेच झालं होतं. तिला भेटाव पण वाटत होतं आणि भेटू नये असं पण वाटत होतं. सायली तर इतकं घाबरलेली होती की दुकानात जाताना सुद्धा ती चुकुन समोर येऊ नये म्हणून बघत बघत जायची.

आज आधीच उठायला उशीर झाला होता त्यात सकाळी सकाळी काकांनी आश्रमात बोलावलं होतं. त्यामुळे विशाखा न खाताच घराबाहेर पडली आणि डायरेक्ट आश्रमात गेली.
" काका काका काका काका काय काम आहे बोल पटकन. "

" अगं हो. दम खा जरा. आल्या आल्या काय 😒 "

" नाही नाही. दम खायला वेळ नाही. हॉस्पिटलला जायला उशीर होतोय रे. तु बोल. का बोलावलं मला "

" सगळ्यांसाठी नवीन कपडे घेऊन ये....... "

" का.......य 😳😳 " मोठ्याने ओरडली ती.

" किंचाळायला काय झालं 🤨. कपडे घेऊन ये पोरींसाठी "

" कोण मी 😨 "

" आता तुला सांगतोय म्हणजे तुच आणणार ना 😏 "

" पण काका तु..... " ती पुढे काही बोलायच्या आत काकांनी थांबवलं.

" विचारल नाही. सांगतोय मी. थांब पैसे देतो. "

" काही गरज नाहीये. आहेत माझ्याकडे 😤 " आणि तशीच तणतणत हॉस्पीटलला आली.

आता कपडे खरेदीला जायचं म्हणजे सोबत कोणीतरी लागेल.
तीने जाऊन प्रीतीला विचारायच ठरवलं पण त्याआधीच प्रीतीने येऊन तिच्याकडे अर्ध्या दिवसाची सुट्टी मागितली.

" काय यार. आजचा दिवसच खराब आहे 😣😖 " ती स्वत:शीच बडबडत होती तेवढ्यात पंडित समोरून गुणगुणत येताना दिसला.

" एएए....... " त्यांच्या समोर दोन्ही पसरवत‌ ती थांबली.

" काय झालं 🙄😳 " असं अचानक विशाखा समोर आल्यामुळे तो भांबावला आणि दचकुन म्हणाला. म्हणाल्यापेक्षा जास्त ओरडला.

" ऐक. माझ्यासोबत शॉपींगला यायचं तु. "

" अं........ नाही ते आलो असतो...... "

" यार..... 😟. Don't tell me की आता तुला पण घरी काम आहे. "

" नाही काम नाही पण गर्लफ्रेंड सोबत मुव्हीला जायचंय 😬. आणि नाही गेलं तर ती चिडेल आणि ती चिडली की पुढचे तीन दिवस ती राग राग करेल. आणि ती रागात असली तर मला तीला मनवाव लागेल आणि मनवायच म्हणजे खर्च होईल. आणि खर्च होईल म्हणजे....... "

" कळलं. तु येणार नाहीस हे कळलं. पण प्लीज हे असलं पकवु नको 😵. "

" 🤭😁😁. बर तुम्ही जाणार कुठे पण..... 🤔 "

" मी आता सरळ मॉल मध्ये जाईन आणि उचलून आणेण कपडे. "

" मॉलमध्ये 😳😳🙄. नको नको तुम्ही तुळशीबागेत जा मॅम. तिथे कपडे स्वस्त मिळतात आणि व्हरायटी पण खुप असते. "

" बागेत........ कपडे..... 🙄🙄. बरा आहेस ना. बागेत कपडे कस मिळतील 🤨 "

" नाही नाही. ते नाव फक्त तुळशीबाग आहे पण तिथे लेडीजच सामान मिळत जसं मेकअप, बॅग, कपडे असं सगळं....... "

" तुला बरं माहितीये 🤨 "

" हां. ते गर्लफ्रेंडला घेऊन जातो ना म्हणून 😁😁. "

" बर मी येईपर्यंत सांभाळ मग हॉस्पीटल. असं पण तु दुपारी जाणार आहे ना. "

" हो. तीन वाजता निघेल मी. "

" मग तोपर्यंत येईल मी. मी आल्यावर तु जा. "

" हो चालेल. पण तुम्ही तुळशीबागेतच जा. "

" कधी गेली नाहीये मी 😐 "

" टेन्शन नही लेनेका. मॅप ओपन करके जानेका 😁 "

" बरं बरं. मी निघते. तु लक्ष ठेव ईथे. "
आणि विशाखा मॅडम गाडी घेऊन तुळशीबागेत जायला निघाल्या.
" काय यार....... कसं ह्या पोरी शॉपींग करतात काय माहिती 😖😖. नुसतं जायचं म्हणलं तर मला टेन्शन आलंय आणि हे तुळशीबाग कुठे आहे राव. इतके वर्ष झालं पुण्यात आहे मी पण ही बाग कुठंय हे मला माहिती नाही. "
स्वत:शीच बडबडत आणि मॅप वरून शोधत शोधत ती शनिवारवाड्या पर्यंत आली. तिथून पुढे सरळ तर तुळशीबाग आहे पण तिला ते पाच मिनिटांच अंतर पार करायला जवळपास पंधरा ते वीस मिनिटं लागली.
विशाखा गाडी मुलचंद पर्यंत घेऊन आली आणि तिथे विचारलं की तुळशीबाग कुठे आहे. मग त्या माणसाने हात दाखवला तसं ती गाडी तिथेच पार्क करून आत शिरली.

सगळीकडे गर्दी......., आधीच आवडत नसलेली गोष्ट त्यात एवढ्या गर्दीची सवय नाही 🤦.
श्या........ किती गर्दी आहे राव.... मी कधीच असं काही केलं नाही. ह्या काकाला तर घरी गेल्यावर बघणारी आहे मी 😤😤. आणि त्या पंडितला पण. चांगल मॉलमध्ये गेले असते ना, त्याच्यामुळे इकडे आले 😡.
बेकार मार खाणारे तो 😡😡.

विशाखा तुळशीबाग फिरत होती पण तिला काय घ्यायचं तेच कळत नव्हतं. तीथे इतके कपडे होते की पुर्ण confuse झाली होती ती.
तिथल्या एका दुकानात गेली आणि तिथल्या दुकानदाराच डोकं खायला सुरुवात केली.
" ते ड्रेस दाखवा ना..... तो नाही ओ, त्याच्या बाजुचा दाखवा. "
( आयला, हा काय येडा आहे का 🙄...... मनातल्या मनात 😂 ) तो दुकानदार सुद्धा वैतागला होता. तरी पण हिचं चालुच होते. त्याला अर्ध दुकान बाहेर काढायला लावला होता विशाखा ने. तरीही काय घ्यायचं यात confuse होतं होतं. एक हातात घेतला की वाटायचं नाही दुसरा छान आहे. मग तो घेतला की तिसऱ्याकडे लक्ष जायचं आणि असं करत करत अजूनच वेडी होतं होती.
यार खरंच असं कपडे खरेदी करतात ह्या पोरी 😵..........
दुकानदार आता चांगलाच वैतागला होता, " ओ काकु काय घ्यायचय ते घ्या ना. कशाला वेळ घालवताय "

" काय 😲😲 मी काकु....... 😳.... मी काकु दिसते काय तुला 😡😤 "
खरेदी राहिली बाजुलाच आणि ह्या दोघांची भांडण सुरु झाली.

" ओ मग काय म्हणू...... एकतर वेळ घालवला आणि मी त्यात मलाच बोलताय "

" पण म्हणून काय काकु म्हणणार का तु मला 😡😡 "
तेवढ्यात तीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला, मागे वळून बघितलं तर सायली. तीला बघून विशाखा गप्पच बसली.

" काय झालं " सायली ने विशाखाला विचारलं. पण विशाखा तीला बघून hang पडली होती, ही इथे कशी..... तीला कळालं का मी इथे आहे ते......

" मॅम....... काय झालं " सायली ने विशाखाच्या खांद्याला हलवली तेव्हा कुठे भानावर आली ती.

" अरे हां बघ ना....... " ती त्याच्याकडे हात करून बोलतच होती की तो म्हणाला,

" काय..... मी काय. अहो उलट ह्याच मला त्रास देतायत . लवकर घेत नाहीयेत. "

" मला समजत नाहीये कोणत घ्यायच 😞 " एवढसं तोंड करत विशाखा म्हणाली.

" मी मदत करू का ?? " सायली ने असं विचारताच तीच कळी खुलली.
" हो हो कर ना 😊 "

विशाखा थोडं मागे जाऊन थांबली आणि तिला सांगु लागली की किती वयाच्या मुलींसाठी कपडे घ्यायचेत आणि किती घ्यायचेत. सायली ने त्याप्रमाणे कपडे घेतले. बिल पे करुन दोघी बाहेर निघून आल्या.

" कपडे घ्यायला इतकं का confuse झालात तुम्ही. "

" ते...... actually मला कळत नाही त्यातल काही "

" म्हणजे 🤔 "

" मी कधी घेतच नाही ना कपडे. माझे कपडे पण काकांचं आणतो लहानपणापासून त्यामुळे मला ते आवडत नाही. "

" काय 😳😲...... तुम्हाला शॉपींग आवडत नाही " सायली इतक्या जोरात ओरडली की आजुबाजुचे बघायला लागले होते.
" सॉरी सॉरी, पण खरच तुम्हाला शॉपींग आवडत नाही 😳😳 "

" नाही 😖. तीन - चार तास स्वत:चे तंगडे कोण तोडून घेणार 🥴🥴 "

" भारी आहे. " बोलत बोलत दोघी पुर्ण बाहेर आल्या होत्या. समोर बघितल तर गाडीच नाही.

" गाडी........ माझी गाडी कुठे गेली. 😱😵 "

" तुम्ही पुण्यात गाडी आणली होती , ते पण फोर व्हीलर 😲😳 "

" हो पण आता इथं नाहीच. मी इथेच पार्क केली होती. "

" नेली पोलीसांनी उचलून 🤭 " तोंडातल हसु दाबत सायली म्हणाली.

" का 😳🙄 असं कसं नेली. "

" नो पार्किंग मध्ये असल्यावर नेणारी ना उचलून 🤭 "

" मग आता ह्या बॅग्स कसं नेणार 😞 " हातातल्या बॅगकडे बघत म्हणाली. कारण दोघींच्या हातात मिळून जवळपास १५-१६ बॅग सहज असतील.

" एक फेवर करशील प्लीज..... माझ्यासोबत चल ना बॅग घेऊन प्लीज. हवंतर मी परत तुला तुझ्या घरी ड्रॉप करेन. "

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED